डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते" ते आजच्या काळात अगदी सत्यच ठरत आहे कारण हजार तलवारीने जरी पराक्रम केला आणि लेखणी कुचकामी निघाली तर त्या हजार तलवारीचे कर्त्रुत्व नाहिशे होते शुन्य होते.
लेखणीचा एक फ़टका काय करू शकतो हे बघायचे असेल तर भारतीय इतिहासाकडे बघावे लागेल.ज्यांच्या हाती लेखणी होती त्यांनी किती " हिरोंचे झिरो आणि झिरोंचे हिरो" केले ते भारतीय इतिहासाचे पान अन पान आक्रंदुन सांगेल.
तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही ती ऐकली असेलच की एक माणुस एकदा जंगलात गेला आणि वाघाला म्हणाला की सांग "माणुस श्रेष्ट की वाघ"वाघ म्हणाला अर्थातच वाघ.तेंव्हा माणुस म्हणाला चुक माणुसच श्रेष्ट ,ते कसं काय ? माणुस म्हणाला चल माझ्याबरोबर तुला पुराव्यासहीत दाखवतो. वाघ त्याच्या बरोबर घराकडे जातो त्या माणसाने वाघाला भले मोठे एक चित्र दाखवले त्या चित्रामध्ये माणुस वाघाच्या डोक्यावर पाय ठेऊन उभा होता आणि म्हणाला आता सांग कोण श्रेष्ट ? तु की मी ? वाघ थोडा विचार करून उद्गारला " हे चित्र तु काढलंस म्हणून असं आहे ,जर मी चित्र काढलं असतं तर परिस्थिती काही वेगळीच असती.
मराठा समाजाची परिस्थिती वरच्या कथेतील वाघासारखीच आहे.लेखणीच्या ठेकेदारांनी लेखण्यांचा पुरेपुर वापर करून आपल्या पुर्वजांचा उदो उदो केला.त्यातूनच टिळक "लोकमान्य" झाले,,बळीराजाला मारणारा वामन " पाचवा अवतार" झाला,इंग्रजांना घाबरलेला शिपाई "साईबाबा" झाला,दुसरा क्रांतिकारक आद्य झाला अशी ही लेखणीची करामत आहे.ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे,वाचलं पाहिजे, चिंतन-मनन-मंथन केलं पाहिजे.तरच भारतीय इतिहासाचा भटाळलेला ’मुखवटा’ ओरबडला जाऊन अस्सल मराठमोळा चेहरा समोर येईल.अर्थात हे कार्य कित्येकांनी सुरु केलं आहे.त्यांचं मनापासून अभिनंदन.
अशाच तर्हेने आमच्या सार्या दैदिप्यमान इतिहासाचा विचका करून टाकला त्यातच जगातील सर्वश्रेष्ट राजांपैकी एक असलेला राजा लुटारू, बंडखोर करण्यात आला, ज्या राज्याच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही त्या राजाला बदफ़ैली, स्त्रीलंपट करून टाकले,एका सामान्य चाकराला गुरु पदावरती बसवले,शिवरायांचा आणि शाहू महाराजांचा अपमान करणार्यांना लोकमान्य बनविले एवढेच नाही तर अमच्या प्रत्येक महामानवाच्या डोक्यावर एक वामन आणुस बसवला, "रामांच्या डोक्यावर वसिष्ठ बसवला, क्रुष्णाच्या डोक्यावर सांदीपनी बसवला, चंद्रगुप्त मौर्याच्या डोक्यावर चाणक्य बसवला, नामदेवांच्या डोक्यावर विसोबा खेचर बसवला, रामचंद्रराय यादवांच्या डोक्यावर हेमाद्री पंडीत बसवला,तुकोबांच्या डोक्यावर बाबाजी चैतन्य बसवला आणि यांचा कळस म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर दादू कोंडदेव बसवला.
लेखणीचा फ़टका काय असतो हे बघाचे असेल तर हे जाणीवपुर्वक शब्दप्रयोग कसे असतात पहा..
"आर्यांचे आगमन - मुस्लिमांचे आक्रमण",पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले - मराठ्यांचं पानिपत झालं", "क्रुष्णाजी भास्कर यांनी शिवरायांवर वार केला - जिवा महालाने सय्यद बंडास मारले".सावरकरांची संडासातली उडी म्हणजे मार्सेलिसची ऐतिहासिक उडी,क्रांतीसिंह नाना पाटलांनी क्रुष्णा नदीत १५० फ़ुट उंचीवरून रेल्वेतून मारलेल्या उडीचा उल्लेख नाही.विशेष ही बाब की सावरकर पकडले गेले पण क्रांतीसिंह यशस्वीरित्या निसटले.मराठ्यांचे नेत्रुत्व करून औरंगजेबाची कबर इथेच खोदणार्या ताराराणींवर इतिहासामध्ये काही ओळीच पण गोषातून कधी बाहेर न पडलेल्या (तलवार चालविणे तर लांबच)आणि आपली अंगरक्षिका झलकारीदेवीस आपल्या वेशात लडावयास लावणार्या दुप्लिकेट झाशीच्या लक्ष्मिबाई वर चित्रपट काय अन मालिका काय! तिचे जागोजागी पुतळे.खरं तर गीत असं होतं की " खुब लढी मर्दानी वो तो झाशी की झलकारी थी" ते बदलून "खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी" असं करण्यात आलं.
वर लिहिलेली तथ्ये ही मोजकीच उदाहरणे आहेत.लेखणी काय करू शकते,तर लेखणी अशा करामती करू शकते."जिसकी लाठी उसकी भैंस" अशी एक म्हण आहे,त्याच अर्थाने "ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी" असेही म्हणता येईल.याच लेखणी मुळे आमचे हिरॊ झिरो झाले आणि भटी वरवंटे हिरो ठरलेत.