24 December 2012

इतिहास म्हणजे चोपड्या नव्हेच !

          "इतिहास" हा व्यक्तींभोवती फ़िरतो, व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुर्नछाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध ओघवते विवेचन दिसले पाहिजे. सत्याचा अपलाप न करता काल्पनिक, पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तिचित्रणे असता कामा नयेत.तटस्थ व्रुत्तीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज, गैरसमज आणि अपसमज आढळून येतात.इतिहासलेखण देखील व्यक्तिच करतात.छत्रपती संभाजी महाराज, महादजी शिंदे, होळकर, दुसरे बाजीराव, आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, शाहू एवढेच काय पण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी राजे यांच्याबाबतीतही आपल्या काही इतिहासकारांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत. तसेच काही काल्पनिक पात्र इतिहासात घुसडली आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायला नकोच , म्हणूनच त्यातील सत्य शोधणे आवश्यक आहे. 
आता याला इतिहास तरी कसे म्हणावे ? कारण इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेला असतो.ती पद्धत या इतिहासात जास्त दिसून येत नाही.इतिहास लेखण हे ब्राह्मण इतिहासकारांना लिहिता येते का ? कारण इतिहास लेखणात प्रामाणिकपणा असावा लागतो, पण तो यांच्यात दिसून येत नाही.इतिहासकार हुशार असू शकतात पण प्रामाणिक असू शकत नाहीत.त्यांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास नसून काल्पनिक गोष्टी आहेत.असे त्यांच्या लिहिलेल्या इतिहासाची चिकित्सा केल्यावर दिसून येते.म्हणून असा इतिहास म्हणजे "चोपड्या" आहेत असे हमखास मानावं लागेल आणि या चोपड्यांना जे बिनडोक इतिहास समजतात ते भटांचे "पिट्टू" आहेत असे समजावे.अर्थात वर्णवर्चस्ववादी इतिहासकर नसून इतिहासविध्वंसक आहेत.हा इतिहास केवळ बहुजनांवर वर्चस्व लादण्यासाठी लिहिलेला आहे.पण आता त्यांची चांगलीच चिकित्सा होत चालली आहे.जाग्रुतीचा वनवा पसरला आहे.या वणव्यात त्यांना खाक व्हावे लागेल अन्यथा सुधरावे लागेल.काय करायचे ते त्त्यांनीच ठरवायचे आहे.दादू कोंडदेवचा पुतळा काढून इतिहास शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नसावी.अजुन अशी बरीच घाण साफ़ करायची आहे.त्यांनी जे लिहिले ते त्यांचे वर्चस्व रहावे म्हणून  लिहिले तो इतिहास होऊ शकत नाही.जातीयपुर्वाग्रहातून जे लेखण केले जाते त्याला इतिहास म्हणता येत नाही. मुळात इतिहास म्हणजे काय ? ते समजुन घेतले पाहिजे.
फ़्रॉंन्सिस बेकन यांचे मत इतिहास म्हणजे "मानवाला शहाणे बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय", तर हेन्री जॉन्सन म्हणतात इतिहास म्हणजे " जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होय" आणि" ज्या घटनांनी मानवी मनावर खोल ठसा उमटतो , अशा घटना म्हणजे इतिहास होय".इतिहासाची व्याख्या करताना प्रो.लेस्की म्हणतात, "इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय".तर इतिहास लेखणाबाबत डॉ.भिमराव आंबेडकर म्हणतात "प्राचीन भारताच्या इतिहासाचा बहुतेक हिस्सा हा इतिहास नाही, असे नाही की प्राचीन भारत इतिहासविना आहे.प्राचीन भारताला फ़ार इतिहास आहे परंतू तो आपले स्वरून गमावून बसलेला आहे.स्रियांचे व मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्याला जाणीवपुर्वक पौराणिक  स्वरूप दिले आहे" ,"पुढे ते म्हणतात की ,प्राचीन भारताच्या इतिहासावरील पडदा हटविला जावा याशिवाय प्राचीन भारत इतिहासविहीन राहील.आनंदाची गोष्ट अशी की बौद्ध साहित्याच्या मदतीने प्राचीन इतिहासाला त्या मलब्यातून खोदून काढता येवू शकते. ज्या मलब्याखाली इतिहासकारांनी पागलपणात त्याला लपवून ठेवले आहे "
           या द्रुष्टिने विचार करता ब्रह्मव्रुंदांचे लिखाण इतिहास लेखनाच्या कसोटीवर खरे उतरत नाही.जर ते इतिहासाच्या नावाने आमच्यावर गुलामी लादत असतील तर ती आम्ही ठोकारून लावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.जो इतिहास त्यांनी रचला आहे तो साफ़ चुकीचा व दिशाभुल करणारा आहे.त्यांनी जो इतिहास लिहिला तो स्वत:चे हित बघुनच.ब्रह्मव्रुंद इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात शेंबड्याला राष्ट्रिय नेता बनविले जाते व आमच्या महापुरुषाला हे एवढे लहान करून ठेवतात की आम्हाला आमचा महापुरुष आमचा वाटत नाही. तेली,तांबोळी, कुणबी यांचा जाहीर अपमान करणारे टिळक राष्ट्रिय पुरुष ठरतातच कसे ? महात्मा फ़ुले यांचे कार्य राष्ट्रीय स्वरुपाचे असताना त्यांना महाराष्ट्रापुरतेच मर्यादित करण्याचे महापातक याच वर्णवस्चस्ववादी इतिहासकारांनी केले.उमाजी नाईक हे पहिले क्रांतीकारक असताना कोणा दुसर्याला आद्य क्रांतीकारक म्हणने हा इतिहास आहे ? ज्या राजाच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही अशा राजाला स्त्रीलंपट म्ह्णून अपमानित केले हा इतिहास आहे ? शिवरायांच्या आकाशाला गवसणी घालणार्या कार्याचे श्रेय स्वजातीय किड्यांना देणे हा इतिहास होऊ शकतो ? एका  चाकराला गुरुपदी बसवले जाते हा इतिहास आहे ? इतिहास लिहिताना स्वार्थाचा लवलेशही नसावा. मग याला आपण इतिहास म्हणायचे ?.
काय हा खरा इतिहास होऊ शकतो ? वर्णवस्चस्ववादी पुरुषांचा इतिहास (गोष्टी) रंगवून सांगितल्या जातात. खलनायकांना नायक बनविणे हा इतिहास होऊ शकतो काय? अशा इतिहासातून राष्ट्रिय भावना कशी काय निर्माण होऊ शकते ?. म्हणूण अशा इतिहासातील घाण साफ़ करणे आवश्यक आहे.पण ती घाण ब्राह्मण साफ़ करणार नाहीत.ते बहुजन इतिहासकारांनाच करावी लागेल.कारण यांचा इतिहास अर्थात चोपड्या रद्दीत फ़ेकण्यालायकच असतात.म्हणून बहुजन इतिहासकार निर्माण होणं आवश्यक आहे.आत्ता पर्यंत बराच इतिहास स्वच्छ झालेलाच आहे त्याबद्दल त्या इतिहासकारांचे आभार आणि अभिनंदन.
  आज बरेच साहित्यिक ,इतिहासकार सत्य इतिहास लेखण करीत आहेत.अर्थात त्याची आवश्यकता आहेच.खरा इतिहास जाणुन घ्यायचा असेल तर हे होणे नक्कीच गरजेचे आहे."ध" चा "मा" करण्यात वर्णवस्चस्ववादी इतिहासकार पटाईट असतात.संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करण्याचे काम या वर्णवस्चस्ववादी तथाकथित विद्वानांनीच केले.जिजामातेची बदनामी याच तथाकथित विद्वानांनीच केली.त्यामुळे बहुजन इतिहासकार व साहित्यिकाने या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करावेत आणि या पिढीला स्वच्छ आणि खरा इतिहास द्यावा हिच विनंती.
जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र 

22 प्रतिक्रिया :

 1. अप्रतिम खरं आहे की ज्यांच्या हातात लेखणी होती त्यांनी इतिहास आपल्या हिताचा लिहिला आहे आणि इतरांना कमी लेखले आहे.पण आता संभाजी ब्रिगेड सगळा इतिहास संपुर्ण सुरक्षीत आणि स्वच्छ करेल यात शंकाच नाही.

  ReplyDelete
 2. आज पर्यंत्चा इतिहास हा ब्राह्मणांनी म्हणा किंवा इतर लेखकांनी लिहिला तो आपले हित बघुनच आणि इतरांना लांब ठेऊनच लिहिला आहे. पण आता इतिहास शुद्ध होत आहे आणि खर्या गोष्टी लिहिल्य आहेत.त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.

  ReplyDelete
 3. खरेच आहे ज्यांची लायकी नव्हती त्यांना हिरो बनविले आहे ब्राह्मण इतिहासकारांनी आणि जे खरे हिरो होते त्यांना दुर्लक्षीत ठेवले.हा न्याय त्यांनी लावला हे काय प्रामानिकपणा होत नाही.त्यांनी ठरवायचे आहे आता काय करायचं ते.

  ReplyDelete
 4. नाद खुळा लेख पाटील साहेब अखेर इतिहासातील चुका दाखवीन चांगले काम केले आहे.आपले लिखान चान आहे त्याबद्दल THANKSSSS

  ReplyDelete
 5. नाद खुळाच पाटील ................कोल्हापुरी भाषेत...

  ReplyDelete
 6. बरोबर आहे की इतिहासात अनेक चुका झाल्या आहेत पण काय एवढ्या मोठ्या चुका झालेल्या आहेत का ? आता हे सत्य आहे कि ब्राह्मणांनी इतिहास लिहिला आहे मग जसे चुकिचे थोडेफ़ार लिह�B9्मणांच्या लिखानामुळेच ना ? त्यांनी तर काहीच लिहिले �हास मराठयांचा इतिहास आपल्याला मान्य का नही ? की तोही खोटा ? आज तुम्ही स्वत:ला ग्रेट मराठा समजता(आणि आहातच ग्रेट) ते कशामुळे ब्राह्मणांच्या लिखानामुळेच ना ? त्यांनी तर काहीच लिहिले नसते किंवा जर फ़क्त आपलाच इतिहास लिहिला असता तर तुम्हाला कळालं असतं का मराठयांचा पराक्रम ? शिवरायांचे शौर्य ? त्यामुळे विचार करताना दोन्ही बाजुनी केला तर प्रश्न आपोआप सुटतील असे मला वाटते.बाकी लेख छान आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. AGADI BAROBAR BOLALAT NEHAA JI
   BRAHMANANI JYA CHUKA KELYA TYA AATA SUDHARANAT YET AAHET
   JAY HINDURASHTRA

   Delete
 7. मस्त लिखाण आहे आपले लेख खरच अशा विषयांत तर पारंगत आहेत अचुक अभ्यास आपल्या या लेखणाला कारणीभुत आहे असे मला वाटते.जे काही भुतकाळात चुका झाल्या त्या विसरून नव्याने एक द्वेषमुक्त आयुष्य अनुभवू शकतो आपण.जे झाले ते आप्ल्य स्वर्थापोटी झाले हे त्यांनी ही मान्य केले आहे आणि त्यांचं ही मत आहे की जुन्या गोष्टींचा तेही निषेद करतातच.तेंव्हा त्यांना मोठ्या मनाने माफ़ करा.

  ReplyDelete
 8. ज्या भि काय इतिहासात चुका झाल्या असतील तर तुम्ही ते सुधारा जरुर पण आत्ताच्या ब्राह्मणांना काही दोष देऊ नका कारण आजही ब्राह्मण चुकिच्या इतिहासचा विरोधच करतात कोण समर्थन करत नाहीत.पुर्वी काय प्रथा होत्या त्या त्यांनी पाडल्या त्या आजच्या ब्राह्मणांना ही मान्य नाहीत.
  जय महाराष्ट्र ॥

  ReplyDelete
  Replies
  1. बरोबर आहे आपलं पण इतिहास दुर्लक्षीत राहता कामा नये.

   Delete
  2. खरोखर आहे की एका मुळे किंवा काही लोकांमुळे सगळ्या समाजाला बदनाम करता येणार नाही पण इतिहास शुद्ध करण्यात त्यांनी हस्तक्षेप न करण्यातच त्यांची भालाई आहे नाही तर संघर्ष अटळ आहे असं मला वाटतं

   Delete
 9. छान लेख आहे खरा इतिहास जनते समोर आला पाहिजे.
  ॥ जय शिवयाय ॥

  ReplyDelete
 10. अफ़लतुन लेख आहे.खरच ब्राह्मनांनी लिहिलेल्या सगळ्या करमती आहेत ज्या थोड्याच दिवसात उघड होतील आणि अमप्ल्याला स्वच्छ इतिहास वाचायला मिळेल.संभाजी ब्रिगेडचे स्वागत आहे आणि अभिनंदन.
  जय हिंद जय महाराष्ट्र

  ReplyDelete
 11. इतिहास न बदलता अर्थ बदललेला समजुन देणे अवश्यक आहे ते तुम्ही केले आहेच म्हणा.

  ReplyDelete
 12. Your blog is very high.I have not yet had read a blog like this.
  Very very good
  Thank you!
  Keep Writing

  ReplyDelete
 13. बरोबर आहे की इतिहास शुद्धी करण झालाच पाहिजे कारण ब्राह्मण इतिहासकारांनी बरेच गोंधळ केले आहेत.महात्मा फ़ुलेंनी जेंव्हा पहिली शाळा काधली १८४८ मध्ये तेंव्हा राधाक्रुष्णन काय त्यांच्या बापाचा पण जन्म झाला नव्हता.
  तरीपण शिक्षक दिन त्या ब्राह्म्णाच्या नावाने केला जातो.

  ReplyDelete
 14. TUMHI LOK DUBALI AHAT.AMHI BRAHMAN ALPASANKHYA AHOT TARI TUMHI KAHI PAN KARU SHAKAT NAHI.NUSTYA GADHAW CHACHA KARAT RAHA.

  KITI PHULE ALE WA GELE AMCHE KAY ZALE?

  ReplyDelete
  Replies
  1. Varil Anamit 12/6/12 Yaanche Comment Hey Briged'chech Vaattey? (Brigedi Kaava )

   Delete
 15. मस्त लेख लिहिलात पण एक गोष्ट सांगावीशी वाटते की संभाजी महाराजांचा बदनामीकारक इतिहास शुद्ध करण्याचे काम बेंद्रे आणि गोखले या ब्राह्मणांनी केले होते हेही विसरता कामा नये.

  ReplyDelete
 16. बरोबर आहे आजपर्यंतचा इतिहास हा बहुजनांच्या विरोधात लिहिला गेला आहे तो आता साफ़ स्वच्छ झाला पाहिजे हेच संभाजी ब्रिगॆड ला विनंती आहे आणि आम्हाला पुर्ण विश्वास आहे की तुम्ही तो इतिहास साफ़ कराल.ब्राह्मणी घाण आता संपुर्ण गेली पाहिजे.
  जय मुलनिवासी । जय सनातन । जय अनार्य

  ReplyDelete
 17. साहेब आपण म्हंणता ते खरं आहे की इतिहास शुद्ध झाला पाहिजे पण परत तो विक्रुत झाली नाही म्हणजे घेतलं.नाहीतर ब्राह्मणांनी असं केलं तसं केलं म्हणून त्यांची बदनामी करून इतिहास शुद्ध करण्याच्या नादात भलतेच वाद निर्माण कराल.तरीही आपल्या लेखनास शुभेच्छा !

  ReplyDelete
 18. इतिहासातून चांगले सत्य ते घ्या!

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.