6 November 2012

आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके

           उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक.... परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते. 
          आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
        त्यासाठी आपण जरा दोघांच्याही जीवनपट आणि कार्यकालावरून नजर टाकू. दोघांचाही इतिहास पारदर्शक आहे त्यामुळे समजायला वेळ लागणार नाही की कोन असली हिरो, आद्य क्रांतिकारक आहेत. 
आधी आपण आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी जाणुन घेऊया
आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक
               उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु फितूर भोरच्या सचीवामुळे १५ डिसेंबर १८३२ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.
क्रांतिकारक वासूदेव बळवंत फ़डके यांच्या विषयी जाणुन घेऊया
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
          वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.आता जरा थोडा विचार केला की जर त्यांची रजा मंजुर झाली असती तर ? त्यांनी शस्त्र घेतले असते का ? यामुळे आद्य राहुदेत नुसते क्रांतिकारक यावरच प्रश्न निर्माण होतो असो....
           दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?
          महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये.याला इतिहासाचे विक्रुतीकरण म्हणत नाहीत तर इतिहासाचे शुद्धीकरण म्हणतात.

18 प्रतिक्रिया :

 1. खूपच छान लेख, धन्यवाद!!!!!!!!!!!!!!!!

  ReplyDelete
 2. अप्रतिम लेख !!!!!!!!

  ReplyDelete
 3. तशी दोन क्रांतीविरामधील तुलन अयोग्य पन ब्राह्मनांनी च ही सुरुवात केली त्यामुळे आमचे बरेच महापुरुश अंधारात राहीले.

  ReplyDelete
  Replies
  1. आमचे म्हणजे नक्की कोणाचे आ???? उमाजी नाईक हे काय एका विशिष्ट जाती धर्माशी निगडीत होते का??? मला वाटतं आपण पण आपले विचार बदलून या महापुरुषांना जातीच्या विळख्यातून बाहेर काढले पाहीजे .... Please आमचे नाही आपल्या सर्वांचे म्हणा

   Delete
 4. mast lekh lihilaat patil
  aapale likhaan chalu asudet khup sundar

  ReplyDelete
 5. ya faDakyache laayaki kay aahe de dakhavali tumhi dhanyawad patil

  ReplyDelete
  Replies
  1. विनायक वि. रानडेMonday, 30 March, 2015

   तुझ्या लिहिण्यातून तुझी लायकी नक्की कळली. आकाश संस्कार कशाशी खातात माहित आहे का.....

   Delete
 6. नाद खुळा नाद खुळा !!!!!!!!!१

  ReplyDelete
 7. sahi articla aage badho ham tumare sath hai

  ReplyDelete
 8. मस्त लेख आहे धन्यवाद ! भटांची लायकी दाखवली आहे तुम्ही

  ReplyDelete
 9. पाटील... काय ब्रिगेडी वाल्यांची औलाद आहे का तू? इतिहास बदलायला निघालेले ब्रिगेडी.

  ReplyDelete
 10. पाटील... काय ब्रिगेडी वाल्यांची औलाद आहे का तू? इतिहास बदलायला निघालेले ब्रिगेडी.

  ReplyDelete
  Replies
  1. पाटील खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद

   Delete
  2. खरा इतिहास

   Delete
  3. खरा इतिहास

   Delete
 11. kranti ghadhun anli mahapurshani
  mast

  ReplyDelete
 12. विनायक वि. रानडेMonday, 30 March, 2015

  आपल्या अज्ञाना बद्दल कीव येते. आद्य या शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला असतात तर बरे झाले असते. ब्राह्मणांना शिव्या घालता, तुमच्या जातीत जे कोणी सुशिक्षित असतील त्यांना तरी विचारायचे होतेत. असो मि तुमच्या ज्ञानात भर टाकतो.
  आद्य क्रांतिकारक याचा नेमका अर्थ समजण्यासाठी क्रांतीचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. क्रांती म्हणजे समाजातील मृत अथवा सुप्त सदिछांना पुनरुज्जीवित करणे. १८५७ च्या फसलेल्या स्वातंत्र्य समरानंतर सर्व हिंदुस्थान ब्रिटीशांच्या अधीन झाला होता, आता इंग्रज हेच आपले तारक, पालनहार वैगेरे वैगेरे असे सर्वांना वाटायला लागले होते. तेव्हा पहिल्यांदा वासुदेव बळवंत फडक्यांनी समाजाला दाखवून दिले कि आपल्याला देखील स्वतंत्र जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी आपण सशस्त्र लढा दिल्या शिवाय पर्याय नाही. इंग्रजां विरुद्ध १८५७ नंतरचे ते प्रथम सशस्त्र क्रांती युद्ध आणि फडके त्याचे करते धरते म्हणून त्यांना आद्य क्रांतिकारक असे म्हणतात.
  ब्राह्मणांना जर इतर कोणाचे चांगले दिसत नसते तर पुरंदर्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास केला नसता, आपले संपूर्ण जीवन त्यांना समर्पित केले नसते.
  आयुष्यात मि व्यक्तीशः असंख्य ब्राह्मणेतर मित्रांना मदत केली आहे, आणि त्यांना पण याची जाण आहे. कृपा करून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद वाढवू नका. त्याने समाजाचे नुकसान होईल.

  ReplyDelete
  Replies
  1. तुम्ही सत्य मान्य केले तर वाद वाढायचा संबंधच नाही.
   त्यासाठी आपण सशस्त्र लढा दिल्या शिवाय पर्याय नाही. >> मग फ़डकेंनी इंग्रजांच्या सेवेत नोकरी का केली ? त्यांची आई आजरीच पडली नसती तर ? किंवा त्यांना सुट्टी मिळाली असती तर ??

   आयुष्यात मि व्यक्तीशः असंख्य ब्राह्मणेतर मित्रांना मदत केली आहे, आणि त्यांना पण याची जाण आहे > मी पण कित्येक ब्रह्मणांना मदत केली आहे पण व्यक्तिश: मित्र वेगळे आणी सामाजिक चळवळ वेगळी..ब्राह्मणांनी केलेया घान लिखानाला मी मित्रांना कसा जबाबदार धरणार ?

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.