19 March 2013

सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण एकच..

माझ्या मते सनातनी ब्राह्मण आणी पुरोगामी ब्राह्मण यांच्यात फ़रक करणे मुर्खपणाचे लक्षण आहे.ते दोघे एकच आहेत.ते एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाला वाचवण्यास त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडा करायला सुद्धा ते कटिबद्ध आणि वचनबद्ध असतात.
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
आज सतत असे म्हंटले जाते की,सगळे ब्राह्मण वाईट नाहीत.आंतरजालावर तर हा मुद्दा कायमच असतो.थोड्या लोकांमुळे सर्व समाज कसा काय दोषी असू शकतो ?,सगळेच ब्राह्मण वाईट आहेत का ? काही चांगले ब्राह्मण देखील असतात.अगदी बरोबर ! सगळेच ब्राह्मण वाईट नसतात,काही चांगले ब्राह्मण देखील असतात,होते आणि असतील देखील,पण जेंव्हा शिवरायांची बदनामी एखादा ब्राह्मणच करतो तेंव्हा चांगले ब्राह्मण कोठे जावून बसतात कोणाच ठाऊक.जेंव्हा विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तेंव्हा पुरोगामी -चांगले ब्राह्मण कोठे गेले होते ? शिवरायांच्या बदनामी कटातील  भांडारकर संस्थेवर जेंव्हा संभाजी ब्रिगेड ने कारवाई केली तेंव्हा ब्राह्मणांसह बहुजनांनीदेखील संभाजी ब्रिगेड वर टिका केली.तेंव्हा एक तरी पुरोगामी ब्राह्मण भांडारकरवरील संभाजी ब्रिगेड चा हल्ला निषेधार्ह असेल तर शिवरायांची बदनामी करण्यार्यांचा निषेद करण्यासाठी पुढे का आले नाहीत ? अनेक मराठ्यांनी संभाजी ब्रिगेडचा निषेद केला.तेंव्हा एका तरी पुरोगामी ब्राह्मणाने शिवरायांची बदनामी करणार्या पुरंदरे, बेडेकर, लेन, भांडारकर संस्था यांचा निषेद का केला नाही ? याउलट पुरोगामी ब्राह्मण भांडारकर संस्थेच्या मदतीला धावले. त्यामध्ये डॉ.श्रीराम लागू, कुमार केतकर, डॉ.नरेंद्र दाभोळकर, कुमार सप्तर्षी, अनंत दीक्षित इत्यादी पुरोगामी ब्राह्मण आहेत.डॉ.श्रीराम लागू,कुमार केतकर इत्यादी पुरोगामी ब्राह्मणांनी भांडारकर संस्थेला आर्थिक मदत केली.
लाल महालातील "जिजाऊ - शिवबा" पुतळ्याशेजारील दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्याचा निर्णय महानगरपालिकेने कायदेशीर बाबी पुर्ण करून घेतला.तेंव्हा पुणे मनपाचे कायदेशीर सल्लागार एड.अभ्यंकर यांनी या बाबीचा निषेद म्हणून राजीनामा दिला.नगरसेवक शाम देशपांडे,उज्वल केसकर,प्रा.मेधा कुलकर्णी, मुक्ता टिळक यांनी दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्यास विरोध केला.पुतळा काढू नये म्हणुन शिवसेनेच्या आमदार डॉ.निलम गोर्हे या लालमहालाबाहेर तीन दिवस पहारा देत होत्या.आमदार निलम गोर्हे या स्त्रीवादी आहेत.स्त्रियांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी लढत असतात.स्त्रियांवर कोठे अन्याय झाला तर त्या त्यांच्या मदतीला धावून जातात.पण जेंव्हा जिजाऊंची बदनामी झाली तेंव्हा त्या रस्त्यावर आल्या नाहीत.बदनामी करणार्यांचा निषेद केला नाही.जिजाऊ माता कोणत्या जातीच्या आहेत, कोणत्या धर्माच्या, पंथाच्या आहेत याचा विचार न करता त्या एक स्त्री आहेत.त्या स्त्री ची बदनामी होत असताना स्त्रीवादी नेत्या निलम गोर्हे जिजाऊमातांच्या नव्हे तर दादू कोंडदेवाच्या मदतीला आल्या.दादू कोंडदेवाचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ निलम गोर्हे यांनी पुण्यात दंगल घडविण्याचा कट केला.त्याबद्द्ल पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.सांगा ब्राह्मण खरेच चांगले आणि पुरोगामी आहेत का ? स्त्रीभ्रुणहत्या करणारे परळीचे डॉ.सुदाम मुंडे यांच्या निषेधार्थ बीडच्या आ.उषा दराडे आणि सुशीलाताई मोराळे ह्या डॉ.मुंडे यांच्या विरोधात निषेद करण्यासाठी रस्त्यावर आल्या.ही नैतिकता आणि प्रामाणिकता आ.निलम गोर्हे, मेधा पाटकर यांच्याकडे कधी येणार ? स्त्री ची बदनामी करणार्या पुरंदरे आणि बेडेकर यांच्याविरोधात आ.गोर्हे, विद्या बाळ, मेधा पाटकर कधी मोर्चा काढणार आहे का ? यावरून स्पष्ट होते की ब्राह्मण स्त्रिया देखील ब्राह्मणी व्यवस्थेच्या बळी आहेत.जगातील सर्व स्त्रीयांचा आदर सन्मान झाला पाहिजे.शिवरायांनी शत्रुंच्या स्त्रीयांचा देखील आदर केला.त्यांच्या मातेची बदनामी करणार्यांचा निषेद करण्यासाठी एकही पुरोगामी ब्राह्मण किंवा ब्राह्मण स्त्री पुढे आली नाही.दादू कोंडदेव शिवरायांचे गुरु नव्हते असे नगरसेवक रविंद्र माळवदकर पुणे मनपात म्हणाले तेंव्हा नगसेविका मेधा कुलकर्णी ढसाढसा रडल्या असेही आम्हांस ऐकावयास मिळाले.जिजाऊंची  बदनामी झाली तेंव्हा कुलकर्णी रडल्या नाहीत.मराठी साहित्य संमेलनाचे उमेदवार पुरोगामी ब्राह्मण ह.मो.मराठे याने शिवरायांबद्दल गरळ ओकले (शेण खाले इ.स.२०१२) तेंव्हा त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडने पोलिस कारवाई केली.
यावरूनच स्पष्ट होते की शाहू महाराजांनी जे म्हंटले आहे की ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो हे खरे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटल्याप्रमाणे पुरोगामी ब्राह्मण निर्णायक क्षणी प्रतिगामी ब्राह्मणांच्या मदतीला धावतो.तो कधीही सत्याच्या, बहुजनांच्या बाजुने उभा राहत नाही.पुरोगामी ब्राह्मणांनी माझा आरोप खोटा ठरावा इतक्या चांगल्या पद्धतीने वागावे ही अपेक्षा.