Showing posts with label बाबा पुरंदरे. Show all posts
Showing posts with label बाबा पुरंदरे. Show all posts

12 June 2012

मृत दादोजी करवी केले लालमहाल चे बारसे

                  पुण्यातील शिवारायांच्या या लालमहालाचं वर्णन बाबासाहेब पुरंदरेने आपल्या "राजाशिवछत्रती" या पुस्तकातही केलं आहे ते ते लिहितात- पुण्यातील वाडा बांधून पुर्ण झाला आईसाहेबांस वा शिवबास वाडा आवडला. पागा, गोशाळा, शिलेखाना, कचेरी, दफ़्तरखाना, सदर, कोठी,राहण्याचे महाल, देवघर वगैरे जागा बांधून झाल्या.मुहुर्त पाहून आईसाहेब आणि शिवबा यांना वाड्यात राहावयास पंतांनी आणलं,पंतांनी वाडा तर अगदी सायसंगीन,दणकट,पण झोकदार बांधला.वाड्याला पंतांनी नाव दिलं "लालमहाल".त्यांनी वाड्याचे जोते पूर्व पश्चिम १७॥ गज लांब व दक्षिण - उत्तर २८॥ गज रूंद (५२॥ x ८३॥)धरले होते.वाड्याची उंची १०। गज (३०॥ फ़ूट) होती.आत चौकात कारंजी तयार केली होती.कारंजाचे पश्चिमेस भव्य प्रशस्त सदर होती.सदर म्हणजे छोटासा दरबारी महालच. वाड्यात पाण्याचा मुबलक पुरवठा केला होता.तीन विहिरी बांधल्या होत्या.पंतांनी अस थाट एकूण केला होता.शिवाय लालमहालात तळघरं बरीच बांधली होती.तळघरांची खोली ४॥ गज (१२ ॥ फ़ुट) होती.
         पुरंदरेनी लालमहालाचं वर्णन मोठं बहारीचं व त्याचा भव्य विस्तार स्पष्ट करणारं केलं असलं तरी तो पंतांनी म्हणजे दादोजी कोंडदेव ने बांधला व पंतांनीच त्याला लाल महाल असं नाव ठेवलं, अशी चुकीची माहीती त्यात आहे.कदाचीत वर्णन करण्याच्या भरात आणि दादोजी कोंडदेव ला मोठं करण्याच्या कैफ़ात त्यांना शिवाजी महाराज आणि जिजाऊमांसाहेब या दादोजी कोंडदेव वारल्यानंतर (दादू इ.स.१६४७ ला वारला) दोन-तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६४८ -४९ ला पुण्यात कायम मुक्कामास आले.हे ऐतिहासिक सत्य पुरंदरे विसरले.त्यामुळे त्याने वारलेल्या दादोजी कोंडदेव पंतास लालमहाल बांधण्याचा व त्याचं बारसं घालण्याचा मान दिला.शिवाजी महाराज व जिजामाता खेडला राहात असल्या तरी ते काही काळासाठी पुण्यात येऊन राहत होते.पण ते लालमहालात नव्हे, तर पुण्याच्या झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत असत.त्यावेळी पंताच्या हयातीत लालमहाल बांधलाच नव्हता.तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.शिवाय शिवरायांना शहाजी महाराजांनी बंगरूळहून इ.स.१६४२ मध्ये पुणे जहागिरीवर पाठवलं, तेंव्हा ते पहिल्यांदा खेड ला राहिले.या संदर्भात जेधे करीन्यात स्पष्टपणे लिहिलंय - महाराजांनी (शहाजी महाराजांनी) राजश्री सिवाजीराजे यासमागमे (सोबत)  राजश्री सामराजपंत पेशवे व मानकोजी दहातोंडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वराजा जमाव देऊन पुण्यास पाठवले त्यावरी कसबे खेडेबारे येथे वाडे बांधले.या पुराव्याला पुष्टी देणार्या अनेक निंदी उपलब्ध आहेत.