18 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

संतश्रेष्ठ तुकोबाराया
           साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
            संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
           संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी  ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
             निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा  हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ?  ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.  
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते.  ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
           भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
                                     (क्रमश:)

42 प्रतिक्रिया :

 1. तुकोबांच्या अभंगांना जोडले ५ बोगस अभंगांचे शेपूट
  तुकोबांनी आपल्या आयुष्यातील सर्व घडामोडी अभंगरूपाने मांडल्या आहेत. या प्रसंगावरही त्यांनी अभंग लिहिले. हे एकूण ९ अभंग आहेत. तुकोबांच्या मूळ अभंगांना आणखी ५ अभंगांचे शेपूट चाफळच्या रामदासी चेल्यांनी जोडले. कटकारस्थाने करून हे अभंग हस्तलिखित गाथ्यात व्यवस्थित घुसडविण्यात आले. तुकोबा शिवरायांना रामदासांकडे पाठवित आहेत, असे या बोगस अभंगात दाखविण्यात आले आहे. पुण्यातल्या इंदुप्रकाश छापखान्याने तुकोबांच्या अभंगांचा पहिला छापील गाथा प्रसिद्ध केला, त्यात हे अभंग अनायासे आले. पुढे महाराष्ट्र सरकारने गाथा प्रसिद्ध केला, त्यातही हे अभंग आले. रामदास हे शिवरायांचे गुरू होते, हा समज या ५ बोगस अभंगांनी दृढ करण्याचे काम केले. खुद्द तुकाराम महाराजांनीच शिवरायांना रामदासाकडे पाठविले होते, हे दाखविणारा कागदोपत्री पुरावा या कारस्थानाने पुरविला होता.

  ReplyDelete
  Replies
  1. बरोबर आहे असेच काही अभंग तुकोबांच्या गाथ्यात घुसडण्यात आलेत.त्यातील जास्त चर्चेचे ठरलेले म्हणजे शिवरायांना रामदासांकडे पाठविले आणि जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट्र तरी..... हे आहेत.यावरही मी सविस्तर लिहिणार आहे ही सर्व भाग संपले की.

   Delete
  2. नमस्कार, धाकलं पाटील, आपण यावर सविस्तर लेखन करणार होतात. आम्ही वाट पाहतोय.

   Delete
  3. http://vishvamarathi.blogspot.com/2015/12/blog-post_33.html

   Delete
 2. वारकरी तत्वज्ञान समाजात रुजविण्यासाठी संत रविदास, संत कबीर, संत सज्जन कसाई, संत सेना न्हावी, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत बहिणाबाई इत्यादी संतांनी पुढे सतराव्या शतकापर्यंत कार्य केले. या सर्व संतांचे तत्वज्ञान नाथ, दत्त, महानुभाव विचारधारांचे मिश्रण होते. मुळातच ते ब्राम्हणशाही नाकारणारेच होते. वारकरी कीर्तनातून गावोगाव सामाजिक सुधारणा होऊ लागल्या. वर्णभेद, जातीभेद कमी होऊ लागला. त्यामुळे वैदिक ब्राम्हण या वारकरी संताविरोधात एकत्रित व संघटीत होवू लागले. त्यासाठी धर्मसत्ता व राजसत्ता यांचा गैरवापर करून प्रमुख नेत्याविरोधात घातपातांची कृत्ये करू लागले. महात्मा बसवेश्वर व चक्रधर स्वामींची हत्या करण्यात आली होती. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, व मुक्ताबाई या चार भावंडांना ब्राम्हणांनी अतोनात छळले. तरुणपणीच एकाच वर्षात या चारही भावंडांचा घातपाती मृत्यू झाला. सन १३३८ मध्ये मंगळवेढ्यास संत चोखोबा व त्यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा अअसाच घातपाती मृत्यू झाला. त्यावेळी संत नामदेव महाराज पंजाबात होते. त्यांनी परतताच संत चोखोबांची समाधी श्री विठ्ठल मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधली भारतभर या संतांना वैदिक ब्राम्हणांचा त्रास सहन करावा लागला.त्यातून पुढे संत नामदेव महाराजांचाही त्यांच्या सोळा कुटुंबियासह घातपाती मृत्यू झाला. संत रविदास, संत कबीर यांनाही हेच सोसावे लागले. तर जगतगुरू संत तुकाराम महाराजांना सन १६५० मध्ये अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी विज्ञानाचा स्फोट होत असतांना पुष्पक विमानातून वैकुंठी जावे लागले. वास्तवात त्यांचीही हत्या करण्यात आली आणि वैकुंठाची अफवा पसरविली.

  ReplyDelete
 3. युरेशियन बामन हमेशा कहते है कि भारत का इतिहास
  हिंदू और मुसलमानो के संघर्ष का इतिहास है और
  मुसलमान हमारे शत्रू है, अगर यह सत्य है
  तो इस्की भी जांच होनी चाहिये
  १)क्या वर्ण व्यवस्था मुसलमानो ने निर्माण कि ?
  २)क्या जाती व्यवस्था मुसलमानो ने निर्माण कि ?
  ३)क्या अस्पृस्य्ता मुसलमानो ने निर्माण कि ?
  ४)क्या गैर बराबरी असमानता ,भेद भाव (ऊंच-
  नीच)मुसलमानो ने निर्माण कि ?
  ५)क्या शुद्र - आतीशुद्र को अपने हक आधीकारो से
  मुसलमानो ने वंचित किया ?
  ६)क्या जगदगुरू तुकाराम महाराज को शुद्र कहकर
  मुसलमानो ने अपमानित किया ?
  ७)क्या जगदगुरू तुकाराम महारज
  कि हत्या मुसलमानो ने कि ?
  ८)क्या छ.शिवाजी महाराज के राज्याभिषेक के
  समय उनको शुद्र कहकर राज्याभिषेक के लिये
  मुसलमानो ने विरोध किया ?
  ९)क्या छ. शिवाजी महारज पर पहला वार
  (पहला हमला) मुसलमानो ने किया ?
  १०)क्या छ. शिवाजी महाराज
  कि हत्या मुसलमानो ने कि ?
  ११) क्या राष्ट्रपिता महात्मा फुले को कदम-कदम
  पर मुसलमानो ने अपमानित किया ?
  १२)क्या हमारी महिलायो को मुसलमानो ने गुलाम
  बनाया ?
  उपरोक्त सारे प्रशनो का एक हि जवाब
  मिलता है,वो है नही ! इसलिये उपरोक्त प्रशनो मे से
  जिसने यह कृत्य किया है वही हमारा असली शत्रू है
  मगर उपरोक्त सारे कृत्य किसने किये ? अर्थात
  युरेशियन बामणो द्वारा इसलिये युरेशियन बामन
  हि हमारा असली शत्रू ह

  ReplyDelete
  Replies
  1. प्रत्येक समस्याचे मुळ कारण फ़क्त ब्राह्मणच आहेत.हिंदू मुस्लिम दंगल घडवून आपण नामानिराळे राहतात हीच त्यांची खासियत आहे.
   जय मुलनिवासी

   Delete
  2. kahi proof ahet ka kahi pan post karta ha bolo...Mulinviasi kon ahe mahitey ka babasahebache who are shudra vacha

   Delete
 4. संतश्रेष्ठ संतमुकुटमणी तुकोबाराय यांना विनम्र अभिवादन

  ReplyDelete
 5. मस्त अभ्यासपुर्ण लेखण आहे हे.पुढच्या भागाची उत्सुक्ता वाढत चाललीय.लवकर प्रकाशित करा.सत्य बाहेर आले पाहिजे.सर्वांना सत्य काय आहे ते समजले पाहिजे.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद ! हो लवकरच प्रकाशित करत आहे.

   Delete
 6. आज हे सनातनी सुधरायला तयार नाहीत तिथे ३-३५० वर्षापुर्वी तुकोबांचा बाणेदारपणा सनातन्यांना किती झोंबला असेल ही कल्पनाच केलेली बरे.तुकोबांचा नक्कीच खुणच केला आहे मंबाजी भट आणि रामेश्वर भटांनी.आता सर्व सत्य बाहेर आले पाहिजे.धन्यवाद

  ReplyDelete
  Replies
  1. बरोबर आहे प्रत्येक भट हा अहंकारी सनातनी होता.त्यांनीच आपल्या महापुरुषांचा घात केला आहे.तुकोबांपासून ते शाहू राजांपर्यंत.आता कर्माची फ़ळं भोगायची वेळ आली की कशाला इतिहास उकरून काढायचा असे थेरं चालू होतात.

   Delete
 7. छान लेख आहे.मंबाजी भट आणि रामेश्वर भट हे नंतर तुकाराम महाराजांचे भक्त झाले ही गोष्ट अजुनही काही लोकांना माहीत याचं आश्चर्य वाटतं तुकाराम महाराज महान संत होते त्यामुळे त्यांना वैकुंठाला जाणे काही आश्चर्याची गोष्ट नाही.इतक्या दिवसानंतर बहुजन महापुरुषांचे खुण केला हा मुद्दा आत्ताच बाहेर का आला समजलं नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. हे सत्य नाही.तुकारामा सारख्या शुद्राचा शिष्य होणे किंवा शुद्रांच्या देवाची पुजा करणे मंबाजीच्या चौकटीत बसण्यासारखे आहे का ?

   Delete
  2. पाटील हे खरे आहे की मंबाजी आणि रामेसवर हे तुकोबांचे शिष्य झाले नंतर आणि त्यांनीच तुकोबांची स्तुती केली आहे अतिशय छान..

   Delete
  3. संत शिरोमणी श्री. तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन आक्षेप खंडन,,,,
   http://raamprahar.blogspot.in/2012/03/blog-post_11.html

   Delete
  4. @ वैभव : हो त्यावरही मी लिहिणार आहे.
   @ विजया : त्यांच्या ब्लोगवर मी कमेंट पाठविलेली अहे बघू कसा प्रतिसात देतात ते.

   Delete
 8. विषमतावादी वैदिक-ब्राम्हणी धर्मव्यवस्थेविरोधात लढा पुकारणारा जगतगुरु योद्धा संत तुकाराम !
  जगतगुरु विद्रोही तुकाराम महाराजांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यातून विषमतावादी वैदिक व्यवस्था नेस्तनाबूत झाली. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या विद्रोही कीर्तनावर मंबाजी व सालोमालो या वैदिकांच्या छावणीने बंदी घातली. तुकाराम महाराजांची अभंग गाथा देहू येथील इंद्रायणी नदीत बुडविण्यात आली. कारण की तुकाराम महाराजांनी वैदिक धर्माविरुद्ध एक मोठा वारकरी संघर्ष चालविला होता. संत नामदेवापासून ही वारकरी प्रेरणा तुकाराम महाराजांना मिळाली होती. विठ्ठल हे वारकरी समतावादी चळवळीचे प्रतिक होते. देहू हे वारकरी चळवळीचे केंद्र होते. तुकाराम महाराजांच्या प्रभावाने अनेक लोकं त्यांचे शिष्य झाले होते. तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून वैदिक-ब्राम्हण हतबल झाले होते. विषमतावादी वैदिक धर्माच्या शोषणाविरोधात अभंगाच्या माध्यमातून बहुजन समाजाचे प्रबोधन करणे हे वारकरी धर्माचे लक्ष्य होते. त्यासाठी तुकाराम महाराजांनी रात्रंदिवस वैदिक धर्माविरुद्ध युद्ध पुकारले. यासाठी जीवाच्या आकांताने त्यांनी हे आंदोलन पुकारले. म्हणूनच त्यांच्यावर वैदिक-ब्राम्हणांनी दोनदा शारीरिक हल्ले केले. व तिसऱ्यांदा धुळवडीच्या दिवशी इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर सदेह इंद्रायणीत गाडले. घातपातातून ही हत्या घडविण्यात आली. व संशय येऊ नये म्हणून देहू गावात वैकुंठगमनाची अफवा पसरविण्यात आली. तुकाराम महाराजांनी चालविलेली वारकरी चळवळ ही भक्तीची चळवळ नव्हती. तर ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध पुकारलेला लढा होता. म्हणूनच त्यांना वयाच्या ४२ व्या वर्षी घातपाताने मारण्यात आले. तुकाराम महाराज म्हणायचे मी चमत्कार करीत नाही, मी चमत्कार जाणीत नाही, व चमत्कार करणारा भोंदू असतो. जे तुकाराम महाराज चमत्काराला नाकारतात. त्यांच्याच गाथेत चमत्कार कुणी घुसडले.

  ReplyDelete
 9. हा वाद आता उकरण्याचे कारण मला समजले नाही कारण असे वाद उकरून काही उपयोग नाहीत तुम्हाला काय वाटते तुकारामांची हत्या केली म्हणुन सगळे वारकरी ब्राह्मनांना मारून टाकतील ?असे होईल का किंवा दुसरे काय लाभ होणार अहे असे वाद काढून ? आता एक होऊन जगण्याची गरज आहे हीच देशाला श्रेष्ठ बणवणार आहे.बघा विचार करून...

  ReplyDelete
  Replies
  1. तुकारामांची हत्या केली असे सिद्ध झाले तर ब्राह्मणांना मारण्याचा संबंध काय ? की तुम्हाला असे तर सुचवायचे नाही ना की तुकोबांची हत्या ब्राह्मणांनी केली.
   एक होऊन जगुयाच पण एक होऊन सत्य बाहेर का आणु नये ?

   Delete
  2. मित्रा प्रश्न जुन्या गोष्टी उकरण्या चा नाही तर सत्या चा उलगडा करण्याच्या आहे.
   आणि समानतेच्या गोष्टी भट्टा-ब्राम्हन्नांनी करू नयेत. माझ बोलन पटत नसेल
   तर इतिहासाची पाने चालून बघा.
   ज्या शिवरायांनी स्वताचे प्राण पणाला लाऊन स्वराज्य स्थापन केल त्यांचीच उपेक्षा केलीत तुम्ही.

   Delete
 10. १०० टक्के खुनच झाला अहे तुकाराम महाराजांचा.तुकारामांचा खुण हा बामनांनीच केला आहे हे काय आता लपून राहिलेले नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. तुम्ही तिथे होता का खून होताना

   Delete
 11. खरोखर आता परिवर्तनाचा भडका उडालेला आहे आणि आता भटुकड्यांना त्या भडक्यामध्ये भस्म व्हावे लागेल.जय शिवराय जय महाराष्ट्र जय वारकरी सांप्रदाय

  ReplyDelete
 12. तुकाराम महाराजांना खुणच झालेला आहे आणि तो भटांनीच केलेला आहे.सत्य सर्व बाहेर आलेच पाहिजे.

  ReplyDelete
 13. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची हत्याच झालीये हे आता कोणी नाकारू नये.ज्याज्यावेळी बहुजन महापुरुष विद्रोही होतील तेंव्हा तेंव्हा बामन आतंकवादी त्या महापुरुषांना ठार मारतात हे त्रिकालीक सत्य आहे.
  अशांचे पितळ आता उघडे पडत आहे.

  ReplyDelete
 14. विद्रोही संत तुकाराम महाराजांना मानाचा मुजरा
  तुकाराम महाराज यांचे स्वराज्यासाठी खुप मोठे योगदान आहे त्यांच्या किर्तनामुळेच वारकरी शिवबाचे धारकरी झालेत.

  ReplyDelete
 15. संत तुकाराम महाराज हे महान संत होते त्यामुळे असे चमत्कार होणे साहजीकच आहे.यामध्ये जातीमध्ये दुही माजतील अशी काही कार्य करू नये.संभाजी ब्रिगेड वाल्यांनी तुकोबांचा वापर फ़क्त बामनविरोधी म्हणून केला आहे आणि त्यांचेच प्रयत्न आहेत हे ह्त्या आहे असे दाखवायचे म्हणजे बामन संपवायला मोकळे.

  ReplyDelete
  Replies
  1. नवसे कन्यापुत्र होती । तरी का करणे लागे पती ॥ असा रोखठोक सवाल वस्तुनिष्ट वैज्ञानिक द्रुष्ठीकोणातून करणारे महापुरुष संतश्रेष्ठ तुकोबांना वैकुंठगमनाची कल्पना खरोखरच मान्य होती का ?त्या तथाकथित वैकुंठला जाण्याची मनिषा [इच्छा] कोठे व्यक्त केली आहे का ?

   Delete
  2. जर खरच चमत्कार असता तर ब्राह्मणांनी बहुजनांना सांगितला असता का?त्या चमात्काराचा उपयोग यांनी स्वतः घेतला असता,तर प्रत्येक गोष्टीत चमत्काराच्या गोष्टी घुसवून बहुजनांना मूर्खात ठेवून स्वतःबराज करणे हा यांचा professional व्यावसाय आहे.आणि माध्यमातून जनतेची फसवणूक करून लूट करणे हेच चाललंय आहे, आणि त्यामुळे देशाच्या प्रगतीला बाधा आणून बाहुजनांना दारिद्र ठेवून देशाला मागास आणने याला जबाबदार कोण?

   Delete
 16. Sambhaji brigade mhanje yedyachi jatra

  ReplyDelete
 17. खुनच करण्यात आला आहे

  ReplyDelete
 18. फालतू लिखाण लिहू नका.
  वैकुंठ गमन बाबत संपूर्ण माहिती घ्या आणि मग लिहा काय ते.बामनाना विरोध करण्यासाठी तुकाराम महाराज यांना मध्ये घेऊ नका.नाही तर जड जाईल.

  ReplyDelete
  Replies
  1. ब्राह्मणांना वाचवण्यासाठीची तुमची तळमळ व्यर्थ आहे. तीन क्रमांकाचा भाग वाचा म्हणजे कळेल. "जे तुकोबांना बामनांनी मारले असे म्हणतात त्यांना तुकोबा कळले नाहीत.". विनाकारण राजवाडी परंपरा चालवू नका

   Delete
 19. शी मंत खरकाटे चोखाटे बिडी ग्रे आणि खोड्याकार च्या कोणी पण #जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बद्दल काही वादग्रस्त लिखाण केलेले जर आढळला तर त्याची गय केली जाणार नाही.
  वैचारिक वाद वैचारिक पद्धतीनेच सोडवला जाईल पण ठराविक पातळीवरच.
  नंतर मग
  मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
  भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
  साम दंड भेद वापरून फोडून काढण्यात येईल.
  महेश
  राम कृष्ण हरी

  ReplyDelete
  Replies
  1. पहिली गोष्ट म्हणजे खेडेकर साहेब आणि श्रीमंत कोकाटॆ सरांचा इथे काही संबंध नाही. मुळात इथे अपमान नाही तर सत्य बाहेर येण्यासाठी केलेली धपडत आहे. तुकोबांना न्यायला आलेले विमान इतर संतांना न्यायला आले नाही हे शंकास्पद आहे. बाकी सर्व शांत वाचून समजून घ्या

   Delete
  2. अत्यंत बरोबर !

   Delete
 20. राम राम साहेब

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.