जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभुराजे । जय महाराष्ट्र ।
॥ विश्व मराठी ॥ वर आपले स्वागत आहे.
पराक्रम-परोपकार-नैतिकता-शालीनता यांचा सर्वाच्च संगम असलेले ज्वलंत, जिवंत आणि मुर्तिमंत महामानव छ. शिवराय आणि निधड्या छातीचे व पोलादी बाहुंचे, वाघाची आक्रमकता असलेले महापराक्रमी आणि अद्वितीय युद्ध कौशल्याचे धनी हिंदवी स्वराज्याचे उत्तराधिकारी छ.संभाजी महाराज यांना प्रथमत: विनम्र अभिवादन.
सम्राट बळीराजा, कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छत्रपती शिवराय, संतश्रेष्ठ तुकोबाराय, शिवपुत्र महापराक्रमी शंभुराजे, फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांनी परिवर्तनवादी वाटचाल करणारा एक हिंदू. आजतागत ज्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातले. अशा महापुरुषांचे विचार आणि संस्कार पुढे न्यायचा हा छोटासा प्रयत्न.
खरं तर मी इतिहासकार नाही किंवा (मोठा) लेखक नाही.मी आहे संगणक क्षेत्रातला व्यवसायिक (आणि नोकरदार सुद्धा).त्यामुळे सगळेच मुद्दे निकालात काढू शकत नाही.पाच वर्षापुर्वी मी लिहायला सुरुवात केली ती फ़ेब्रुवारी २०१२ मध्ये. वाचणाची आवड होती म्हंटलं जे वाचतोय (त्यावर विचार करून) ते लिहिले पाहिजे.आपण व्यक्त झाले पहिजे आणि आपल्या अंगी असलेली (थोडीफ़ार) प्रतिभा लेखनातून मांडण्यासाठी सामाजिक संकेतस्थळां सारखी साधी-सोप्पी जागा कोणती असणार.आपल्या वाचन अभ्यासाचा काही उपयोग तर केला पाहिजेच नाहीतरी बर्यापैकी लोकांची अशी समजूत असते की आपण शिकलो आहोत चांगल्या परिस्थितीत आहोत म्हणजे झालं आपल्याला काय करायचं आहे इतिहासाचं काय तरी करू देत.पण मी याला अपवाद (व्हायचं ठरवलं) आहे. बहुतांशी समाज अजूनही अज्ञानातच आहे.अजुनही बरेच जण खोट्या इतिहासाला बळी पडून अज्ञानाचा गर्व बाळगताना दिसतात. इतिहासाचे विक्रुतीकरण थांबविण्याची गरज आहे.प्रबोधन आणि परिवर्तन करण्याची गरज आहे.हे प्रबोधन कार्य करण्यात "विश्व मराठी" ब्लॉग नक्कीच कार्यरत राहिल.आज बरेच जण ओरडत असतात की इतिहासातील गोष्टी आता कशाला काढता ?.खरं तर हे त्याचे अज्ञान आहे ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी अपल्या अज्ञानात सुखी रहावे.
डॉ.आ.ह.साळूंखे सरांनी महाराष्ट्र राज्याचा सांस्क्रुतीक धोरणाचा आराखडा शासनास सादर केला.त्यात बोलीभाषेचा सन्मान व्हावा,अशी अपेक्षा व्यक्त केली होती.हीच अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्या "विश्व मराठी" ब्लॉग वरून करत राहीन.काहीवेळा माझ्यातील स्पष्टपना, सडेतोडपणा अनेकांना जिव्हारी लागतो. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती.वाळलेल्या गवताने व्यापलेल्या विस्तीर्न जंगलात एखादी आगीची ठिनणी पडावी आणि कुणाला काही समजण्या आधीच आगीने ते जंगल व्यापून टाकावे.असेच सध्या झाले आहे.एकुणच मराठा समजातील युवकांनी आपल्या लेखनाने या क्षेत्रास कवेत घेतले आहे.त्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन. भारतरत्न डॉ.बाबासाहेब म्हणतात "जो समाज स्वत:चा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही,तर तो समाज इतिहास जमा होतो".मराठा-बहुजनांचा दैदिप्यमान इतिहास ’इतिहास जमा’ करण्याचा इतिहास या भुमित वारंवार घडलेला आहे,हा इतिहास आता तरी आम्ही डोक्यात घेतला पाहिजे.याच इतिहासाच्या दफ़नभुमितून इतिहासाचे नवसर्जन करण्याची जबाबदारी आता आपल्यावर येवून ठेपलेली आहे.हि जबाबदारी आम्ही पेलली नाही तर "मराठा" नावाचे कुणी लोक या भारतभुमीत वास्तव्य करून होते असा "इतिहास" इतिहासाच्या पानावर नोंद झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे इतिहासाचे नवसर्जन ही अत्यंत-अत्यंत आवश्यक बाब झाली आहे.आपला इतिहास "जिसकी लाठी उसकी भैस" अशी एक म्हण आहे त्याप्रमाणे "ज्याच्या हातात लेखणी तोच इतिहासाचा धनी" अशा प्रकारे लिहिला गेला.आम्ही जेंव्हा इतिहास घडवत होतो, तेंव्हा आमच्या हातात लेखण्या नव्हत्या.इतिहास घडविला आम्ही पण तो लिहिला नाही,कारण आम्हाला लिहिताच येत नव्हते.त्यामुळे इतिहास आपल्या बापजाद्यांनी घडविला असूनही ते आम्हाला ’झिरो’ दिसतात आणि वरवंटे मात्र हिरो दिसतात.म्हणून इतिहासाची पुणर्लेखणी अत्यावश्यक आहे,हे समजून घेतले पाहिजे.
आजच्या घटनांना समोर ठेवून प्रासंगिक लिखाण करणे तसे अवघड असते.तरीही ही अवघड वाट चालण्याचे धाडस मी करीन.आजपर्य़ंत लिहिलेले लेख हे सामाजिक, धार्मिक, राजकीय, प्रबोधन अशा भिन्न क्षेत्रांना स्पर्श करणारे आहेत."रुढ्या व परंपरा समाजात एवढ्या पसरल्या आहेत की त्या चुक आहेत असे सर्वप्रकारे सिद्ध झाले व अनुभवले तरीही बहुतांशी समाजमन हे असले अस्सल पुरावे नाकारून रुढ्यांना कवटाळून बसत आहेत" आमच्या तरूण पिढीला आज दुध म्हणुन पिठाचं पाणी पाजलं जातंय आणि यासाठीच आजच्या तरूणांना नवयानातून सफ़र करून नवजीवनाची ओळख करून देणे गरजेचे आहे म्हणूनच हा सगळा खटाटोप.
जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभुराजे । जय महाराष्ट्र ।
॥ विश्व मराठी ॥
परिवर्तनाच्या मार्गावरून चालणार्या माझ्या लढाऊ आणि स्वाभिमानी मराठी बांधवांना..............!
इतिहास पुनर्लेखनासाठी अहोरात्र झटणार्या तमाम इतिहासकारांना.............!
जे सत्यवचनी आहेत आणि सत्य स्विकारण्यास नेहमीच इच्छुक आहेत अशा मावळ्यांना...................!
अभिजीत पाटील
कागल,कोल्हापूर,महाराष्ट्र.
संपर्क : ९५०३९९८०१०.
बहुजन समाजाचे प्रबोधन केल्याबद्दल आपले आभार असेच लिखाण सुरु ठेवा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteनमस्कार अभिदादा.आम्हीही आता आपल्या ब्लॉग विश्वातील विश्व मराठीच्या सहवासात राहू.बर्यापैकी लेख वाचले एकदम झक्कास आहेत.
ReplyDeleteअसेच लिहित रहा बर्याच दिवसात लिहिले नाही.लवकरच लिहाल ही अपेक्षा
धन्यवाद प्रविण.
Deleteकामात व्यस्त असल्यामुळे ब्लॉग वर आलो नाही बरेच दिवस.आता परवा झालेल्या मराठा महासंघाच्या आमसभेवर लिहिणार आहे मराठा समाजाच्या आदर्श आचारसंहिते विषयी.ब्लॉग वाचत रहा आणि प्रसार करत रहा.
प्रथमत: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती संभाजी राजेंना मानाचा मुजरा.पाटील साहेब आमचे आगमन झालेले आहे.एक नेहमीचा वाचक वाढला आहे आपल्या लेखणाचा.अप्रतिम लेख आणि खंडण.
ReplyDeleteजय शंभुराजे जय शिवराय
बाबुराब "विश्व मराठी" मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.
Deleteजय शिवराय जय शंभुराजे