॥ राजा शिवछत्रपती ॥
लेखक : बाबा पुरंदरे
आव्रुत्ती चौदावी, दिनांक : १ एप्रिल २००१
पुरंदरे म्हणजे शिवचरित्र आणि शिवचरित्र म्हणजे पुरंदरे असे समीकरणच झाले होते याआधी.या सर्वामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणी व्यवस्थेचा धुर्तपणा होता.आजपर्यंत शिवचरित्राची वाट कोणीच लावली नसेल इतकी बाबा पुरंदरेने लावली आहे(वाट लावणे म्हणजे सत्यानाश करणे).पुरंदरे हा तसा पेशवे इतिहासाचा लेखक होता पण त्याला तिकडे लोकमान्यता मिळाली नाही म्हणुन शिवचरित्राकडे वळला.राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुले आणि क्रुष्णाजी अर्जून केळुसकर यांनी लिहिलेले खरे शिवचरित्र संपविण्यासाठी पुरंदरेने उभी हयात घालवली.शिवरायांचे खरे चरित्र लपवून पुरंदरेने शिवरायांच्या माध्यमातून दैववाद,अंधश्रद्धा,मुस्लिमद्वेष,विषमता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रामदास,दादू कोंडदेव यांचे उदात्तीकरण तर बहुजनांत फ़ुट पाडण्याचा प्रयत्न केला.प्रसारमाध्यमे त्यांच्या ताब्यात असल्याने ब्राह्मणांनी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला.शिवरायांच्या आयुष्यातील खर्या बाबींचा अनुल्लेख तर नाट्यमय घटकांचे उदात्तीकरण करून पुरंदरेने शिवरायांची विटंबना केली आहे.
वरील ग्रंथ बाबा पुरंदरेने १ एप्रिल २००१ रोजी प्रसिद्ध केला.त्याने महाराष्ट्रातील लोकांना चांगलच एप्रिल फ़ुल बनवलं असं दिसतं.त्याच्या ग्रंथात पान नं.१२५ व १२६ तसेच १८१ व १८२ वर जेम्स लेन पेक्षा भयानक लिखान केलेले आहे.त्याला सुचवायचे आहे की काही शब्द व वाक्य वगळून अर्थबोध असे उतारे करा.मुळ उतार्यातील काही थोडी वाक्य व शब्द वगळल्यास भयानक अर्थबोध होतो.
पुरंदरेच्या डोक्यातील विष:- पंतांचे शहाजीराजांवर,आईसाहेबांवर,शिवबाबर ,भोसले कुटुंबावर असे प्रेम होते की स्वामी आणि सेवक हे नाते उरलेच नव्हते.पंत म्हणजे भोसल्यांच्या कुटुंबातलेच.आजपर्यंतची सारी हयात राजांच्या पदरीच गेलेली होती.ते वयाने सत्तरीच्या दारात उभे होते.शहाजी राजेही त्यांना फ़ार मान देत.राजांच्य घरातले ते मानाचे,धाकाचे,दरार्याचे ,मायेचे आणि ममतेचे वडीलधारे पुरूष होते,ते सर्वांवर हक्काने प्रेम करीत.
सतत दोन पिढ्या पंत राजकारणात वावरत असावेत.राजांचा आणि त्यांचा स्वभाव सारखाच होता.स्वतंत्र दौलत स्थापावी असं दोघांनाही वाटले.आईसाहेबांवर ते फ़ार माया करीत.हि बाई अशी तशी नाही,हिची जडण घडण काही वेगळीच आहे;पण त्यांची ती मुळची रग थोडीच जाते,हे त्यांनी ओळखले होते.शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल इतका जीव पंताचा होता.
ते अधुनमधुन, कधी कधी स्वत:च्या संसारातही लक्ष घालीत.पंत देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण.गोत्र ? गोत्र शांडिल्य; पण खरे म्हणजे त्यांचे,आईसाहेबांचे आणि शिवबाचे गोत्र एकच होते.पंत म्हातारे झाले होते;पण त्यांच्या स्वभावातला हौशीपणा कमी झाला नव्हता.मोठा हौशी म्हातारा !.म्हातारपणी हौस करायला मन तरूण असावे लागते.
वरील उतार्यांमध्ये एकही शब्द किंवा वाक्य बाहेरचे नाही,किंवा अनुस्वार मात्रा,उद्गारवाचक चिन्हे, प्रश्नचिन्हे बाहेरून लावलेली नाहीत.वरील लिखाण बाबा पुरंदरेच्या कादंबरीमध्ये पान नं.१२५ व १२६ वर आहे.
पाने १८१ व १८२ वर बाबा पुरंदरे त्याच्या ग्रंथात लिहितो:एखाच्या शिल्पकाराने देवाची सुंदर मुर्ती घडवावी,प्रसन्न देवपण त्या मुर्तीत उतरावे,ओंजळभर फ़ुले भक्तिभावाने वाहावीत अन असे म्हणावे,त्वमेव माता पिता त्वमेव... त्वमेव सर्व ममदेव देव! ही मुर्ती मी घडवली,मीच हिचा निर्माता आहे,हा अहंकार तेथे रतीभरही न सापडावा. त्यांचा आनंद त्या शिल्पकाराचा होता,शिवरायांची मुर्ती त्यांनी घडवली होती.पण ही मुर्ती मी घडवली ,मीच हिचा निर्माता आहे असा अहंकार पंतांच्या मनात कधीही उमटला नाही.
याआधीच्या जुण्या आव्रुत्ती मध्ये सुद्धा पुरंदरेने जे अकलेचे तारे तोडले आहेत ते तर कहरच आहेत.हे सर्व करण्यामागे पुरंदरेच्या मनात काय पाप आहे ते दिसून येते.हळू हळू येईल बाहेर याने काय काय दिवे लावलेत ते.बर्याच ठिकाणी पुरंदरेने घेतलेले मुद्दे अनाकलनीय आहेत.परत मला प्रश्न पडतो की या पिट्ट्याला शिवशाहीर का म्हंटलं जातं ? वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे हा.पण आज खर्या इतिहासकारांमुळे पुरंदरेचे पितळ उघडे पडले आहे हे निश्चित.
पुरंदरे शिवरायांचा इतिहास सांगत नाही, तर तो दादू कोंडदेवचे उदात्तीकरण पडद्यामागून करत आहे. बाबा पुरंदरेने लेन ला कोणत्या प्रकारची माहीती दिली हे चाबकाचे फ़टके मारून काढून घ्यावे.या अगोदरच सोलापुरच्या समारंभात त्याने जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक केले होते.पुरंदरेचे वरील उतारे जिजामाता,शिवाजी राजांचे चरित्रहनन करतात.आता पर्यंत साप सोडून जमीन धोपटण्यासारखा प्रकार चालला होता.चोर सोडून संन्याशाला फ़ाशी असा प्रकार चालू होता.मराठी संघटना,मराठा समाज यांच्याविषयी पुरंदरेच्या मनात असुया आहे.व्यासपिठावर त्याचे खाण्याचे दात व दाखवण्याचे दात निराळेच असतात.
पुरंदरे पान नं.५० व लिहितो..मरायला माणसे मराठ्यांची चांगली.दुसर्यासाठी वक्तशीरपणे मरतात.कडक झुंजतात.अगदी कोंबड्यासारखी जीव खावून! मालकाला यश मिळवून देतात...कुठेही चार दाणे फ़ेकले की तेवढे टिपीट पोट भरतात.त्यांना मालकाने कापून खाल्ले तरी त्यांची तक्रार नसते.
पुरंदरेने लेनच्या पुस्तकाची स्तुती केलेली आहे.आनंद देशपांडे या पेशवाई किड्याने ७ सप्टेंबर २००३च्या दैनिक "सामना" मध्ये लेनच्या पुस्तकाचे कौतुक करताना म्हंटले की लेन चे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणुन ग्रंथालयामध्ये असावे,अशी शिफ़ारस ही केली आहे.ब्राह्मण संपादक,वार्तापत्रे यांनी मराठी संघटनांना दोष दिला आहे.जेम्स लेनच्या पुस्तकाला कारणीभुत झालेला बाबा पुरंदरे ने मात्र तोंड उघडले नाही.तो पाहत आहे महान नाटक.त्याचे स्वत:चे नव्हे,महाराष्ट्रातील लोकभावनांचे.चाणक्यनितीचा मनुष्य तो म्हणतो "मी माझ्या ’राजाशिवछत्रपती’ चौदावी आव्रुत्ती या ग्रंथात एवढे लिहुनही त्यांच्या डोक्यात अजुनही कसे शिरले नाही ?" या सर्व सर्व घटनांत पुरंदरे सर्वात पुढे आणि पिलावळ त्याच्या मागून.
पुरंदरे लेनची स्तुती करतो,धिक्कारही करतो.बेभरवशाचा माणुस! लोकं म्हणतात त्याला शाहीर.पण मला अजुनही समजलं नाही की पुरंदरेला शाहीर का म्हणतात.कधिही शाहिरी न गायलेली.पण ब्राह्मण लेखकांनी दिलेला शाहिरीचा डगला मात्र अंगावर घालतो आणि शाहिरीचं ढोंग करून ,शिवरायांचा खोटा इतिहास सांगुण साध्या भोळ्या लोकांना फ़सवतो.तो मराठ्यांचा खरा इतिहास सांगण्याऐवजी खोटा इतिहास सांगतो.
आधीच्या काळात होनाजी बाळा,राम जोशी,पट्ठे बापुराव हे शाहीर होते.शाहीर स्वतंत्र असतो.तो बुद्धीचातुर्याने लोकांचे मनोरंजन करतो.पोवाडे, कथानकांचे वर्णन करतो.पुरंदरेचा रग मुस्लिमद्वेष. जळी, स्थळी,पाषाणी त्याला मुसलमान दिसतो.मुसलमान राज्यकर्यांविषयी तो राईचा पर्वत करतो.पण खरं तर मुस्लिम सुलतानांनी जेवढे अत्याचार प्रजेवर केले नाहीत तेवढे महाभयानक अत्याचार पेशवे काळात पेशव्यांनी प्रजेवर केले आहेत.
पुरंदरेचा इतिहास थोडा,कल्पना मात्र भव्य.कल्पनेतच वाचायचं...अहंगडाला गोंजारून,सत्याला बाजुला सारून. पुरंदरेवर सेतूमाधवराव पगडी,शेजवळकर,एम.व्ही.धोंड यांनी कडाडून हल्ला केला आहे. हे सर्व जण म्हणतात की ब्राह्मण शाहिरांनी, कादंबरीकारांनी, कथाकारांनी, नाटककारांनी, सिनेमावाल्यांनी इतिहास नासवला आहे.या सर्वांवर पुरंदरेने कडी केली आहे.
इतिहासकार,इतिहाससंशोधक,शिवप्रेमी श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरेच्या फ़ोटोसहीत एका छोट्याशा पुस्तिकेमध्ये लिहिले आहे की,""बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन" ते म्हणतात लेन च्या लिखाणासारखेच पुरंदरेचे लिखान भयानक,वाचवतही नाही.मन,अंत:करण द्रुढ करावे लागते.जसजसे वाचत जावे तसतसे रक्त तापत जाते आणि शेवटी उद्गार बाहेर येतात."काय हा उलट्या काळजाचा माणुस! याने तर जिजामाता, शिवबांचे पंख लावून कोट्यावदी रुपये मिळवले आणि या अशा माणसाने जिजामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत ! "
काही वर्षापुर्वी प्रतिकात्मक "शिवस्रुष्टी" शिवाजी पार्क,मुंबई इथे उभी केली होती.चिपळून तालुक्यातील डेरवण येथे कोल्हापुरच्या वालावलकर धर्मादाय विश्वस्त संस्थेकडून "शिवस्रुष्टी" उभा केली. उद्घाटन सरसंचालक सुदर्शन यांच्या हस्ते झाले.त्यासाठी त्यांना त्यांच्या डोक्यावर पडलेल्या चपलांच्या पावसाचे स्वागत करावे लागले.कारण होते "शिवस्रुष्टी"त रामदास आणि कोंडदेवाची शिल्पे.तेथे जी शिल्पे आहेत तेथे शहाजी राजांची शिल्पे नाहीत.