पेशवाईच्या उत्तर काळात इ.स.१८०० च्या आसपास (याच वेळी पेशव्यांच्या गादीवर इतिहासात चैनखोर व पळपुटा म्हणुन प्रसिद्ध असलेला बाजीराव दुसरा स्थानापन्न झालेला होता) स्वराज्य स्थापनेचे श्रेय जातीनिशी लाटण्यासाठी दादोजी कोंडदेव कुलकर्णीला शिवरायांच्या गुरुपदावर आरुढ करण्याचं कार्य सुरु झालं. त्याला साजेसा असा इतिहास बखरीच्या रुपाने पुढे आणण्यास ब्रह्मव्रुंदांनी सुरवात केली.याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय,चिटणीस बखर,शेडगावकर भोसल्याची बखर यांसारख्या बखरीमधुन दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवरायांचा गुरु असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. दादोजी कोंडदेव ची प्रामाणिकता आणि महानता द्रुढ करणार्या भाकडकथा त्यावेळी रचण्यात आल्या.असत्य ठासुन वारंवार सांगितलं की ते सत्य भासू लागतं या तत्वाने दादोजी कोंडदेव कुलकर्णी शिवरायांचा गुरु होता,त्याने शिवरायांना घडविले,स्वराज्य उभारण्यामागे त्याची प्रेरणा होती.त्यांनी शिवरायांना स:शास्त्र चालविण्यास शिकवले, दादोजी कोंडदेव ने मावळ्यांची सैन्याची उभारणी केली.दादोजी कोंडदेव ने शिवरायांच्या आंब्याच्या बागेतील आंबा धापला (चोरला) नंतर पश्चाताप होऊन त्याने आपल्या हाताची बाही लांडी करून आयुष्यभर तशा एक बाहीचा अंगरखा वापरला अशा अनेक फ़ालतु ऐनतिहासिक कथांचा सुळसुळाट या बखरीतून झालेला आहे.
अशा बखरीचा आणि त्या बरहुकुम लिहिलेल्या लेखकांच्या पुस्तकाचा आधार दादोजी कोंडदेव चे समर्थक कायम घेत असतात हे इतिहासलेखनशास्त्राच्या विरुद्ध आहे.या दादोजी कोंडदेव समर्थकांनी दादोजी कोंडदेवला शिवरायांचा गुरु करण्यासाठी लबाडीच्या सीमांचं अनेक वेळा उल्लघंन केलं आहे.
त्याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास तर जेष्ट इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ३० वर्षापुर्वी "मराठी सत्तेचा उदय" आणि "शिवाजी व शिवकाल" हे ग्रंथ उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी लिहिले होते.त्यावेळी म्हणजे ३० वर्षापुर्वी त्यांनीही दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा शिक्षक होता(गुरु नव्हे) अशी मांडणी केली होती.पण वादग्रस्त जेम्स लेन प्रकरणानंतर या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला.त्यानंतर त्यांनीही दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा शिक्षक नव्हता हे सप्रमाण सिद्ध करणारं संशोधन जगासमोर आणलं.त्यावेळी त्यांनी आपलं ३० वर्षापुर्वीचं दादोजी कोंडदेव संबंधाबाबत मत कसं चुकीच्या संदर्भावर आधारलेले होते याचीही मांडणी केली आणि त्यांचं नवंसंशोधन त्यांनी २००६ साली पुण्यात या विषयावर झालेल्या परिसंवादामध्ये मांडलं. त्यानंतरही त्यांनी अनेक व्रुत्तपत्रे,पुस्तक,साप्ताहीक व व्याख्यानामधुन वारंवार दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु नव्हता असं लिहिलं- बोललं आहे.असं असुनही दादोजी कोंडदेव च्या गुरुपदाचं समर्थन करणारे भटी महाभाग त्यांच्या जुन्या ३० वर्षापुर्वीच्या पुस्तकातील वाक्य आपल्या मुद्द्याच्या समर्थनात पून:पून्हा सांगत लिहित असतात.
पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवारी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहीकात (याच साप्ताहीकात ४ महीन्यापुर्वी म्हणजेच ओक्टोंबर २०१० मध्ये डॉ.जयसिंगराव पवार यांनी प्रदीर्घ लेखातून आपलं म्हणनं मांडलं होतं)३० वर्षापुर्वीचं डॉ.पवारांचं मत पुन्हा एकदा आपल्या समर्थनासाठी मांडलेलं आहे.
एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध मुर्खपणा आहे यात दुमत नाही.