"इतिहास" हा व्यक्तींभोवती फ़िरतो, व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुर्नछाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध ओघवते विवेचन दिसले पाहिजे. सत्याचा अपलाप न करता काल्पनिक, पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तिचित्रणे असता कामा नयेत.तटस्थ व्रुत्तीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज, गैरसमज आणि अपसमज आढळून येतात.इतिहासलेखण देखील व्यक्तिच करतात.छत्रपती संभाजी महाराज, महादजी शिंदे, होळकर, दुसरे बाजीराव, आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, शाहू एवढेच काय पण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी राजे यांच्याबाबतीतही आपल्या काही इतिहासकारांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत. तसेच काही काल्पनिक पात्र इतिहासात घुसडली आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायला नकोच , म्हणूनच त्यातील सत्य शोधणे आवश्यक आहे.
आता याला इतिहास तरी कसे म्हणावे ? कारण इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेला असतो.ती पद्धत या इतिहासात जास्त दिसून येत नाही.इतिहास लेखण हे ब्राह्मण इतिहासकारांना लिहिता येते का ? कारण इतिहास लेखणात प्रामाणिकपणा असावा लागतो, पण तो यांच्यात दिसून येत नाही.इतिहासकार हुशार असू शकतात पण प्रामाणिक असू शकत नाहीत.त्यांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास नसून काल्पनिक गोष्टी आहेत.असे त्यांच्या लिहिलेल्या इतिहासाची चिकित्सा केल्यावर दिसून येते.म्हणून असा इतिहास म्हणजे "चोपड्या" आहेत असे हमखास मानावं लागेल आणि या चोपड्यांना जे बिनडोक इतिहास समजतात ते भटांचे "पिट्टू" आहेत असे समजावे.अर्थात वर्णवर्चस्ववादी इतिहासकर नसून इतिहासविध्वंसक आहेत.हा इतिहास केवळ बहुजनांवर वर्चस्व लादण्यासाठी लिहिलेला आहे.पण आता त्यांची चांगलीच चिकित्सा होत चालली आहे.जाग्रुतीचा वनवा पसरला आहे.या वणव्यात त्यांना खाक व्हावे लागेल अन्यथा सुधरावे लागेल.काय करायचे ते त्त्यांनीच ठरवायचे आहे.दादू कोंडदेवचा पुतळा काढून इतिहास शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नसावी.अजुन अशी बरीच घाण साफ़ करायची आहे.त्यांनी जे लिहिले ते त्यांचे वर्चस्व रहावे म्हणून लिहिले तो इतिहास होऊ शकत नाही.जातीयपुर्वाग्रहातून जे लेखण केले जाते त्याला इतिहास म्हणता येत नाही. मुळात इतिहास म्हणजे काय ? ते समजुन घेतले पाहिजे.
फ़्रॉंन्सिस बेकन यांचे मत इतिहास म्हणजे "मानवाला शहाणे बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय", तर हेन्री जॉन्सन म्हणतात इतिहास म्हणजे " जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होय" आणि" ज्या घटनांनी मानवी मनावर खोल ठसा उमटतो , अशा घटना म्हणजे इतिहास होय".इतिहासाची व्याख्या करताना प्रो.लेस्की म्हणतात, "इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय".तर इतिहास लेखणाबाबत डॉ.भिमराव आंबेडकर म्हणतात "प्राचीन भारताच्या इतिहासाचा बहुतेक हिस्सा हा इतिहास नाही, असे नाही की प्राचीन भारत इतिहासविना आहे.प्राचीन भारताला फ़ार इतिहास आहे परंतू तो आपले स्वरून गमावून बसलेला आहे.स्रियांचे व मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्याला जाणीवपुर्वक पौराणिक स्वरूप दिले आहे" ,"पुढे ते म्हणतात की ,प्राचीन भारताच्या इतिहासावरील पडदा हटविला जावा याशिवाय प्राचीन भारत इतिहासविहीन राहील.आनंदाची गोष्ट अशी की बौद्ध साहित्याच्या मदतीने प्राचीन इतिहासाला त्या मलब्यातून खोदून काढता येवू शकते. ज्या मलब्याखाली इतिहासकारांनी पागलपणात त्याला लपवून ठेवले आहे "
या द्रुष्टिने विचार करता ब्रह्मव्रुंदांचे लिखाण इतिहास लेखनाच्या कसोटीवर खरे उतरत नाही.जर ते इतिहासाच्या नावाने आमच्यावर गुलामी लादत असतील तर ती आम्ही ठोकारून लावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.जो इतिहास त्यांनी रचला आहे तो साफ़ चुकीचा व दिशाभुल करणारा आहे.त्यांनी जो इतिहास लिहिला तो स्वत:चे हित बघुनच.ब्रह्मव्रुंद इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात शेंबड्याला राष्ट्रिय नेता बनविले जाते व आमच्या महापुरुषाला हे एवढे लहान करून ठेवतात की आम्हाला आमचा महापुरुष आमचा वाटत नाही. तेली,तांबोळी, कुणबी यांचा जाहीर अपमान करणारे टिळक राष्ट्रिय पुरुष ठरतातच कसे ? महात्मा फ़ुले यांचे कार्य राष्ट्रीय स्वरुपाचे असताना त्यांना महाराष्ट्रापुरतेच मर्यादित करण्याचे महापातक याच वर्णवस्चस्ववादी इतिहासकारांनी केले.उमाजी नाईक हे पहिले क्रांतीकारक असताना कोणा दुसर्याला आद्य क्रांतीकारक म्हणने हा इतिहास आहे ? ज्या राजाच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही अशा राजाला स्त्रीलंपट म्ह्णून अपमानित केले हा इतिहास आहे ? शिवरायांच्या आकाशाला गवसणी घालणार्या कार्याचे श्रेय स्वजातीय किड्यांना देणे हा इतिहास होऊ शकतो ? एका चाकराला गुरुपदी बसवले जाते हा इतिहास आहे ? इतिहास लिहिताना स्वार्थाचा लवलेशही नसावा. मग याला आपण इतिहास म्हणायचे ?.
काय हा खरा इतिहास होऊ शकतो ? वर्णवस्चस्ववादी पुरुषांचा इतिहास (गोष्टी) रंगवून सांगितल्या जातात. खलनायकांना नायक बनविणे हा इतिहास होऊ शकतो काय? अशा इतिहासातून राष्ट्रिय भावना कशी काय निर्माण होऊ शकते ?. म्हणूण अशा इतिहासातील घाण साफ़ करणे आवश्यक आहे.पण ती घाण ब्राह्मण साफ़ करणार नाहीत.ते बहुजन इतिहासकारांनाच करावी लागेल.कारण यांचा इतिहास अर्थात चोपड्या रद्दीत फ़ेकण्यालायकच असतात.म्हणून बहुजन इतिहासकार निर्माण होणं आवश्यक आहे.आत्ता पर्यंत बराच इतिहास स्वच्छ झालेलाच आहे त्याबद्दल त्या इतिहासकारांचे आभार आणि अभिनंदन.
आज बरेच साहित्यिक ,इतिहासकार सत्य इतिहास लेखण करीत आहेत.अर्थात त्याची आवश्यकता आहेच.खरा इतिहास जाणुन घ्यायचा असेल तर हे होणे नक्कीच गरजेचे आहे."ध" चा "मा" करण्यात वर्णवस्चस्ववादी इतिहासकार पटाईट असतात.संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करण्याचे काम या वर्णवस्चस्ववादी तथाकथित विद्वानांनीच केले.जिजामातेची बदनामी याच तथाकथित विद्वानांनीच केली.त्यामुळे बहुजन इतिहासकार व साहित्यिकाने या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करावेत आणि या पिढीला स्वच्छ आणि खरा इतिहास द्यावा हिच विनंती.
जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र