एक कथा आहे चिमणी आणि कावळ्याची की एक जंगल होते त्या जंगलात विविध प्राणी राहत होते.एक दिवस जंगलाला आग लागली सर्व प्राणी,पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग कशी विझवायची.त्यावेळी चिमणी चोचीमध्ये पाणी भरून ती त्या आग आगीवर आणुन टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली. तिथेच असलेला कावळा त्या चिमणीला पाहुन हसत होता.तेंव्हा त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला."चिऊताई चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली आग विझेल का ?" असे म्हणून तो कावळा हसला.चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या कामात ती गर्क राहीली.चिमणीने धडपड करून चोचीत जेवढे मावेल तेवढे पाणी आणुन त्या घरट्यावर ओतत होती.ती आग वाढतच चालली होती.पण चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसू लागला.त्याचे ते हास्य कुत्सित होते.पुन्हा तो कावळा चिमणीला म्हणाला-"चिऊताई चिऊताई तु वेडी आहेस का ? तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का ? ". आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी त्याला म्हणाली- " अहो कावळेदादा, या जंगलाला आग लागली आणि या जंगलाच्या आगीला विझविण्याचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्यात माझे नाव नक्कीच आग विझवणार्यांच्या यादीत असेल, आग लावणार्यांच्या किंवा त्याच्या समर्थकांच्या यादीत माझे नाव नसेल".
ही कथा सांगण्याचे कारण हे आहे की आज सर्वत्र जातीयवाद,वर्चस्ववाद, ब्राह्मणवाद वाढला आहे. कोणत्याही अडाणी लोकांना हाताशी धरून महापुरुषांचा अपमान करणे ,इतिहासाचे विक्रुतीकरण करणे याचे प्रमाण वाढले आहे.इतिहासाचे विक्रुतीकरण करणे हे काही लोकांचे धंदेच बनले आहेत.त्यातील एक वाद म्हणजे जेम्स लेन आणि दादू कोंडदेव प्रकरण.आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की जेंव्हा जेम्स लेन ला हाताशी धरून काही वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला तेंव्हा फ़क्त संभाजी ब्रिगेड सारख्या शिवप्रेमी संघटनाच पुढे सरसावल्या निषेद नोंदवायला.संभाजी ब्रिगेड ने जेंव्हा दादू कोंडदेव यांचा पुतळा काढला तेंव्हा ते शुभ क्रुत्य सर्व जाणव्यांना झोंबले.कुणीही असो ते क्रुत्य त्यांना झोंबण्याचे कारण देखील होते.कारण हे इतिहास शुद्धीकरणाचे संकेत होते.याचे कारण म्हणजे दादू कोंडदेव यांच्या प्रती असलेले प्रेम.पण जे कार्य संभाजी ब्रिगेड ने केले त्याबद्दल समाजामध्ये मोठी चर्चा सुरु झाली.संभाजी ब्रिगेड ही एक शिवप्रेमी संघटना आहे हे विचार रुजू लागले.संभाजी ब्रिगेड गावोगावी पसरली.समाजामध्ये चित्र स्पष्ठ झाले की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही प्राच्यविद्या संस्थेतील त्या १४ भटांनीच केली आहे.
आज पर्यंत इतिहासाला वाचविण्याचे आणि शुद्ध करण्याचे काम संभाजी ब्रिगेड ने केले.खरे तर समाज काय आहे किंवा जातीपाती काय आहेत? सगळ्या जाती-धर्मा मधले लोक आपले बांधव आहेत हे विचार समाजात संभाजी ब्रिगेड मुळेच पसरले.आपले खरे शत्रु कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे संभाजी ब्रिगेड मुळेच समजले. नाहीतरी वर्णवर्चस्ववादी लोकांनी सगळ्यांना अंधारात ठेवून जाती - धर्मात फ़ुट पडण्याचे काम केले होते.शिवप्रेमी कोण आणि शिवद्रोही कोण हे सर्व बहुजनांना संभाजी ब्रिगेड मुळेच कळले.आज अशा बर्याच गोष्टी होत्या त्यामुळे महापुरुष बदनाम होत होते,इतिहास विक्रुत होत होता पण संभाजी ब्रिगेड ने त्यावर गदा आणली.आपल्या इतिहासाला वाचविण्याचे महत्वाचे काम संभाजी ब्रिगेड ने केले आहे.संभाजी ब्रिगेड नसते तर काय अवस्था झाली असती इतिहासाची, कल्पना ही करवत नाही.उदा.दादू कोंडदेव हा शिवरायांचा गुरु म्हणूनच बोंबाबोंब झाली असती आणि पावलो-पावली शिवराय दादू कोंडदेव मुळे कर्त्रुत्ववान झाले, नाही तर कुठ्ले ! हे ऐकावे लागले असते.इथेच हे थांबले नसते तर यापुढे जेम्स लेन च्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय अपमान कारक इतिहास आपल्या माथ्यावर मारला गेला असता जर संभाजी ब्रिगेड नसते तर. हे तर संभाजी ब्रिगेडचे आभार मानले पाहिजेत.
संभाजी ब्रिगेड हा बहुजन महापुरुषांच्या स्वाभिमानाचा त्यांच्या चळवळीचा मुद्दा आहे.त्यामुळे वरील बोधकथा येथे सुद्धा लागू होते.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान झाला त्या इतिहासामध्ये बदनामी करणार्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले असा इतिहास होईल ना की समर्थकांच्या यादीत त्यांचे नाव असेल.भांडारकर प्राच्यविद्या संस्था ही संशोधनाचे किंवा ज्ञानाचे केंद्र राहीले नसून ते मनुवाद्यांच्या नालायकपणाचा आणि षडयंत्राचा अड्डा बनले आहे.ही बाब तेंव्हा नोंदविली जाईल.ज्याप्रमाणे चिमणीने आपल्या क्षमते प्रमाणे आग विझवण्यासाठी धडपड केली म्हणूण तीचे नाव आग विझवण्यार्यांच्या इतिहासात अव्वल राहील.तसेच आज ज्या भांडारकर नावाच्या बौद्धिक वेश्यागिरी केंद्राने जी घाण किंवा जे षडयंत्र केले त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले हा इतिहास लिहिला जाईल.त्या इतिहासात संभाजी ब्रिगेड चे नाव अमर होईल यात तीळमात्र शंका नाही.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान करणार्या मनुवाद्यांना संभाजी ब्रिगेड चांगलाच धडा शिकवेल अशी अपेक्षा करुया.मराठ्यांनो आपला तेजस्वी इतिहास जीवंत ठेवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडला पर्याय नाही हे लक्षात घ्या. तो इतिहास त्याचा पुरावा राहील.हे होणार आहे ते निश्चित होणारच आहे.
अतिसुंदर लेख !!!!!!!!
ReplyDeleteखुप छान लेख आहे ,,मस्त
ReplyDeleteDHanyawaad mayuri !!!
Deletenice article
ReplyDeletejai sambhaji briged jai jijaau jai shivraya !!!
ReplyDeleteनाद खुळा नाद खुळा !!!!!!!!!१
ReplyDeleteसंभाजी बिग्रडे कोण्या एका जातीची संघटना नाही,तर ति सर्व जातीची म्हन्जेचे सर्व बहुजनांची संघटना आहे.भारत मुक्ती मोर्चा.बामसेफ,मराठा सेवा संघ अशा बहुजनांच्या संघटना जागृत झालेल्या आहेत आणि बहुजनांना जागृत करण्याचे कार्य ते दिवसरात्र करीत आहेत.आणि हेच बामानांच्या डोळ्यात खपत आहे.त्यामुळे ह्या जातीवादी संघटना आहेत असा प्रचार ते बामणी मिडिया सोबत करीत असतात.कारण बहुजन जागृत झाला तर बामन राज खत्म होईल हीच त्यांना भीती आहे.
ReplyDeleteदिवाळी : हिंदूंचा एक प्रसिद्ध सण. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होत असल्यामुळे या उत्सवाला धार्मिक व सामाजिक महत्त्व आले आहे. यावेळी नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून हा कृषिविषयक आंनदोत्सवही आहे. दिवाळीच्या पाचही दिवसांचे माहात्म्य सांगणाऱ्या अनेक कथा पुराणांत आलेल्या आहेत. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गोवत्सद्वादशी असते. यास वसुबारस असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस मानतात.
ReplyDeleteआश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात.
आश्विन वद्य चतुर्दशीस नकरचतुर्दशी हे नाव आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला. त्या वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले.याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले अशीही एक कथा आहे.
आश्विन वद्य अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. या रात्रीच केवळ द्यूत खेळावे, असे सांगितले आहे. द्रव्य हे चंचल आहे, हे लक्षात येण्यासाठीच या खेळाची योजना असावी. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता,मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.
या दिवशी महावीरांचे निर्वाण झाले. म्हणून जैन लोक या दिवशी सर्वत्र दिवे लावून हा दिवस पाळतात. महावीरांचा प्रकाश सर्वत्र पसरावा, हा उद्देश त्यामागे असावा.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळिराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होते, म्हणून याला दिवाळीपाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.
कार्तिक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला, तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली.
भारताच्या निरनिराळ्या भागांत दिवाळीसंबंधी भिन्नभिन्न लोकाचार दिसून येतात. वर्षात ओळीने पाच दिवस येणारा हा दीपोत्सव असतो. दिवाळीचा सण विशेष महत्त्वाचा असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळीत घरांवर आकाशदिवे लावतात. त्यामुळे शिव, विष्णू ,यम इ. देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात, असे पुराणांत सांगितले आहे. निरनिराळी मिष्टान्ने व फराळाचे पदार्थ करून त्यांचा देवांना नैवेद्य दाखवितात व आप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलावितात. फटाके, बाण, भुईनळे इ. उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात.
देवदिवाळी : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी किंवा देवांची दिवाळी म्हणतात. पंचांगांमधून ‘देवदीपावलि’ असा निर्देश असतो. माणसांचे सर्व व्यवहार देवांवर कल्पिण्याच्या प्रघातामुळे, माणसांप्रमाणे देवांच्या दिवाळीची कल्पना आली असावी. या दिवशी आपापल्या कुलदैवताला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्याची रूढी आहे. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. या दिवसापासून खंडोबाचा उत्सव सुरू होतो.
ReplyDeletenaaaaaaaaaaaaaaaad khuuuuuuuuuuuuuuuuula
ReplyDeleteयांना म्हणजेच मी भारतीय यांना ब्लोग चा सत्त्यानाश करण्यासाठीच नेमलेले आहे हे लक्षात घ्या.
ReplyDeleteबळीराजा :
Deleteप्राचीन भारतातील एक अत्यंत सद्गुणी, प्रजाहितदक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. पुराणकथेनुसार हा ⇨ सप्तचिरंजीवांपैकी एक आहे. ⇨ विष्णूने वामनावतारात याच्या मस्तकावर पाय ठेवून याला सुतल नावाच्या पाताळात गाडले, अशी कथा आहे. हा ⇨ प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. विरोचनाच्या देवी वा सुरूची या पत्नीनपासून याचा जन्म झाला. त्याला विंध्यावली, अशना इ. भार्या होत्या. त्याला अशना नावाच्या स्त्रीपासून बाणसुर हा पुत्र झाला (भागवत ६.१८). भागवतातच बाणाच्या आईचे नाव कोटरा असे आढळते (१०.६३). त्याला १०० पुत्र होते अशी कथा असून त्याचे बाण, कुंभगर्त इ. पुत्र प्रसिद्ध होते. शकुनी व पूतना या त्याच्या दोन मुली होत. बळीच्या नातीचा म्हणजेच बाणासुराची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाच्या अनिरूद्धनामक नातवाशी (प्रद्युग्नाच्या मुलाशी) झाला होता. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती. तो अत्यंत सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याला नुसते बळी असे न म्हणता महाबळी असे म्हणत असत.
बळी व इंद्र यांच्या संघर्षाची वर्णने पुराणांतून वारंवार आढळतात. या संघर्षातून आर्य व अनार्य यांचा संघर्ष सूचित होतो. यथासांग नसलेल्या, विशेषतः दक्षिणेशिवाय केलेल्या कर्मांचे फळ बळीला मिळते, या संकेतावरूनही हा संघर्षच सूचित होतो. एकदा बळीने इंद्राचा पराभव करून त्याच्या संपत्तीचे हरण केले होते. ती संपत्ती समुद्रात पडली; तेव्हा ती परत मिळविण्यासाठी (वा अमृत मिळविण्यासाठी) देवांनी बळीच्या मदतीने ⇨ समुद्रमंथन केले (भागवत ८.६; ८.८). त्यानंतर अमृतासाठी झालेल्या युद्धात मृत झालेल्या बळीला शुक्राचार्यांनी जिवंत केले. त्याने पुन्हा इंद्राला जिंकले आणि इंद्रपद मिळविले.
एकदा बढाई मारल्यामुळे प्रह्लादावने त्याला राज्यनाशाचा शाप दिला; विष्णूला भूमीचे दान देऊ नकोस, असे शुक्राचार्यांनी सांगितले असतानाही त्याने त्यांचे ऐकले नाही, म्हणून शुक्राचार्यांनीही त्याला असाच शाप दिला; त्याने एक विश्वजित याग व १०० अश्वमेध यज्ञ केले होते; त्याला सोडविण्यासाठी रावण पाताळात गेला असता, ते तुला जमणार नाही, असे म्हणून बळीने त्याला परत पाठविले; रावण त्याला जिंकण्यासाठी पाताळात गेला असता रावणाला अपमानित होऊन परत जावे लागले इ. कथा आढळतात.
प्रह्लादाच्या उपदेशानुसार बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभदिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. वामनाने याच दिवशी बळीचा पाडाव केला होता. बळीकडे तीन पावले जमीन मागून दोन पावलांनी पृथ्वी व आकाश व्यापल्यानंतर त्याने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले होते. त्या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून वा त्याचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया पुरूषांना ओवाळताना ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणतात. यावरून प्रजेच्या मनातील त्याच्या विषयीचा आदर स्पष्ट होतो. आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षात केरळमध्ये ⇨ ओणम् नावाचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बळी आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो, आपले दुःख त्याला दिसू नये म्हणून प्रजा उत्सव साजरा करते आणि प्रजा सुखी आहे, हे पासून तो आनंदाने परत जातो, अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला, याचा अर्थ त्याने केरळात राज्य स्थापन केले असावे, असे अभ्यासकांचे मत आढळते. पं. सातवळेकरांच्या मते त्याने कोकणात राज्य स्थापन केले असावे. कन्याकुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भूशिरावर त्याची राजधानी होती, असे उल्लेख तमिळ वाङ्मयात आढळतात. त्रिविक्रम वामनाने बळीला पाताळात ढकलले, या विषयावरची अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात.
साळुंखे, आ. ह.
इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो.
मराठ्यांना पूर्वीपासूनच महाराष्ट्रात प्रतीनिधीत्वात पहिले स्थान मिळालेले आहे.त्याचा पूर्वीच्या मराठ्यांनी समाजासाठी चांगला उपयोग केला.परंतु आताचे मराठे बामनांच्या जाळ्यात अडकलेले दिसतात.त्यांना आपल्या जातीचा जरा जास्तच पुळका वाटतो,त्या नादात इतर समाजाचा ते तिरस्कार करतात.ज्याला जातीचा अभिमान असतो तो स्वतःची किंवा समाजाची प्रगती करूच शकत नाही.आजकालचे मराठे बामानांच्या पंगतीत जरा जास्तच बसतांना दिसतात.जिजाऊ मातेचा अपमान बामनानी केल्यापासून (करवून आणल्यापासून) बरेच मराठे जागे झालेले दिसतात.परंतु जसे प्रमाण पाहिजे तसे दिसत नाही.कारण बरेच मराठे जातीच्या पलीकडे जायला तयार नाही.बमानांचे कार्य बऱ्याच मराठ्यांनी हाती घेतलेले दिसत आहे.मराठ्यांच्या साथीनेच बमानांनी महाराष्ट्रात आपले पाय घट्ट रोवले हि सत्य परिस्तिती नाकारता येत नाही.बऱ्याच मराठ्यांना शिवाजी,संभाजी,जिजाऊ,तुकाराम महाराज अश्या थोर महापुरुषांपेक्षा काल्पनिक हिंदू देवता श्रेष्ट वाटतात.तसेच आंबेडकरांनी जी दलितांमध्ये क्रांती घडवून आणली त्यात त्यांना त्यांच्या जातीचा थोडाही अभिमान नव्हता.म्हणूनच दलित लोक फक्त ६०-६५ वर्षात मागून येऊन पुढे जातांना दिसत आहे.तसेच त्यांनी हिंदू धर्म लाथाडला.परंतु मराठा समाज हिंदू धर्माला असा चिकटून बसला कि लाख प्रयत्न केले महापुरुषांनी परंतु प्रयत्न विफल.खरे पाहता बहुसंख्य मराठा समाज फार गरीब झालेला आहे,आणि थोडाच समाज प्रगती पथावर आहे,परंतु त्यांना आपल्या बांधवाचे जराही भान नाही.म्हणून मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे.मराठा समाजाच्या अधोगतीत त्यांचा जातीचा अहंकाराच जबाबदार आहे आणि तो जोपासण्याचे मोठे कार्य त्यांचे पुढारी करीत आहे.ह्या पुढाऱ्यांनी मराठा समाजाचा वापर फक्त आपल्या सत्तेसाठी केला आहे,आणि अजूनही तेच चालू आहे,परंतु जातीच्या अहंकारात गुरफटलेल्या आमच्या मराठा बांधवाला याची जराही जाणीव नाही.ते जातीसाठी माती खायला तयार होतात.ते शिवरायांचा आदर्श विसरतात.बमानांनी मराठ्यांचा याच कारणाने वापर करून घेतला.शिवसेना फक्त मराठ्यांचा भरवश्यावर सत्तेचे फळे चाखत आहे.शिवसेना या बामानांच्या पक्षाने मराठ्यांवर मोहजाल पसरवले होते,पण या पक्षाने कधीच मराठ्यांचे भले केले नाही.त्याच प्रमाणे राष्ट्रवादी पक्ष मराठ्यांचा वापर करून घेत आहे.पण मराठ्यांचे कधीच भले पाहत नाही.या दोन्ही पक्षातील पुढारी मालामाल झाले परंतु त्यांना मालामाल करणारे आमचे मराठे कंगाल झाले.जो पर्यंत मराठा समाज सर्व समाजाला सोबत घेवून चालणार नाही तोपर्यंत मराठ्यांची प्रगती होणार नाही.त्याच प्रमाणे मराठ्यांतील काही समाज सुधारक मराठ्यांचा वापर करून घेत आहे.आता आम्हाला जागे होण्याची गरज आहे.अशा स्वार्थी पुढाऱ्यांच्या ढुंगणावर लवकरात लवकर लाथा माराव्या लागणार आहे.आणि प्रतिनिधी निवडायचे तर त्यांच्या कार्याच्या आधारावर जातीच्या आधारावर नाही.मराठ्यामध्ये प्रतिनिधित्वाची फार मोठी शक्ती आहे परंतु ति एका कोपर्यात रुतून बसलेली आहे तिला बाहेर काढणे जरुरी आहे.आणि सच्छे मराठे पुढारी म्हणून समोर आणणे जरुरी आहे.ज्यांच्या मध्ये शिवरायांची खरी जान आहे.तर उठ मराठ्या जागा हो देशाच्या प्रगतीचा धागा हो.... जय शिवराय...
ReplyDeletesharad pawar,r.r.patil,ajitdada he sagale bamananche gulam ahet.yannich marathyancha sattyanash kela ani ata tar jor lavun shetkaryanchya nardicha ghot ghet ahet.hech marathyanche khare shatru ahet.pan he sagale maratha aslyane marathe chup.....
ReplyDeleteसंभाजी ब्रिगेड चा विजय असो आता असेच म्हणायचं बाकी राहिलं आम्हाला व्हय ना पाटील ?
ReplyDelete