संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....