24 September 2013

जिजाऊ चरित्रातून काय शिकावे

           अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे!. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.
राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे.आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते.जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
आजची श्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे.पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.
शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगेसोयरे आणि कौटूंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही.जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.त्यामुळे तानाजी,येसाजी,कान्होजी,शिवाजी,बाजी पालसकर,मुरारबाजी,बहिर्जी,कावजी,नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले.म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.
स्वराज्यावर अनेक संकट आली,अफ़जलखान,दिलेरखान,शाईस्तेखान,सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास  निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले.शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या,घोड्यावर बसा,गडकोट-किल्ले पायदळी घाला,शत्रुचा नि:पात करा,तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस,आपल्याला काय करायचेय, असे सांगते.आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे.जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.
राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,तप,शांती,उपवास करीत बसल्या नाहीत.यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत.आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी,निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जीवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी,म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी  स्त्री  स्वत:चे संरक्षण  करू  शकत नाही. इतका न्युनगंड स्त्रियांमध्ये  असणार्या  धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.
जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती,युद्धकलेचे शिक्षण दिले.पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी  उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला.सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं,विकासाचं,प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.
शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्जाराजा जयसिंगला जिंकता आली नाही.कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती.म्हणजे जिजाऊंमातांची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते.शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या.आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे.शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले.गावागावांईल तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेंव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला.या प्रसंगी जिजाऊंची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.जिजाऊ - शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता.जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात.असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल,निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी,हिच जिजाऊ चरणी प्रार्थना...
शिवश्री श्रीमंत कोकाटे,इतिहासतज्ञ 
संपर्क : ९४२३३३६४२८

24 प्रतिक्रिया :

  1. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
    या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले .नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

    शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
    राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
    राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

    ReplyDelete
  2. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
    जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.

    ReplyDelete
    Replies
    1. birthday 12 janeuri 1598 and death 17 jun 1674 Ann age 76 years ago

      Delete
  3. आदर्श आई तू
    संस्कराची महान ज्योति तू
    निर्भिड रूपी खरा इतिहास
    जगी निर्मिला तू


    माणसाला माणूस म्हणुन
    ओळखनारी तू
    जतिधर्माचा भिंती पाडणारि
    तीक्ष्ण पहार तू


    स्वभिमानाची तू
    महान क्रांति होती
    तुझ्याच आद्हनेने
    शिवबाची तलवार उजळली होती


    खरे शत्रु ओळखन्याची
    तुझी नजर होती
    सर्व धर्मियांसाठी
    तू दयेचा सागर होती


    ब्राम्हणी धर्माची खरी चिढ
    होती तुलाच आई
    म्हणून तुझ्या जन्मदिनी
    शिवधर्म उदयास येई

    ReplyDelete
  4. राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
    शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. माहेरात त्यान्च्यावर घडलेले सन्त एकनाथान्च्या वाङ्गमयाचे संस्कार त्यानी शिवबावर केले. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.
    प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त भावार्थ रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
    -- ANITA PATIL

    ReplyDelete
  5. जाधव घराण्याचे कुलदैवत माता जोगेश्वरी, सिंदखेडचे लखूजी जाधव यांची पुत्री! स्वरात्य स्थापनेची सहायक प्रेरणा शक्ती तेजस्वीनी शुभ लक्षपती, सर्वगुण संपन्न रूपवान कन्या 12 जानेवारी 1598 रोजी पिता लखुजी जाधव व माता म्हाळासाबाई यांच्या पोटी सिंदखेड विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला. त्यावेळी एक तेजस्वी वातावरण झाले. एक तेजच जणू प्रगटले.
    आई वडिलांनी मुळाक्षराचे शिक्षण घरीच दिले. राज घराण्यत बालपण झाले. त्याकाळी लवकरच लग्न होत. सगाई होई. दिवसेंदिवस जिजाऊ वाढत होत्या. 5 वर्षाच्या असतांना शहाजी जिजाऊंच्या विवाहाची बोलणी झाली. सिंदखेडकर जाधवाच्या दरबारात असलेले रामसिंग भाट व त्यांचे बंधू बजरंग भाट यांनी शहाजी जिजाऊ यांचे विवाहासंबंधी कवन लिहून ठेवले त्यांचेच शब्दात… जिजा झाली पाच वर्षाची। वडीलासोबत गेली रंगपंचमी दरबारी। शहाजी राजे भोसले आले होते दरबारी। वय आठ वर्षाचे। दरबारी आले होते शहाजी राजेचे वडिल। मोठै मोठे सरदार मानकरी। राजे लखूजी बोलले जिजाईला राज बिंडा जोडा। शहाजी राजे दिसतो हा सुंदर मनोहर। ठरविला आम्ही निर्धार। सिंदखेडचे रंगमहलात झाली सोईरीक निश्चित पुढे लग्न झाले दौलताबाद येथे। विवाहानंतर शिवबाचा जन्म झाला. जिजाऊने शिवबांना स्वराज्याचे आपले अधुरे असलेले स्वप्न कथन केले. आता त्यांना स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न साकार करायचे होते. शहाजीराजे सुरार जगदेवच्या विश्वासू सहकार्याने राज्याची स्थापना करतात पण मुरार जगदेवचा वध झाला स्वतंत्र राज्याचे स्वप्नच राहिले पण जिजाऊ शहाजीराजे यांचा निश्चय फार दांडगा होता. जिजाऊ शहाजी राजेंना स्वतंत्र राज्याची प्रेरणा देत होत्या. ज्ञानोबा माऊली नंतर त्यंाना राष्ट्राची माऊली बनायचे होते. त्याकाळी स्त्री अत्याचार, समाजात स्त्री विटंबना, मोगलाची दंडेलशाही यामुळे त्या अस्वस्थअसत. वास्तविक त्यांना राजघरण्यात काही कमी नव्हते. शेतकऱ्यांची पिक बुडत. मोगल शेतात तळ ठोकत गाव लुटत. ते जिजाऊला सहन होत नव्हते.
    गनिमी गुप्त पद्धतीने स्त्री संरक्षण करून जिजाऊंची आज्ञा मार्गदर्शन घेऊन आईसाहेबांच्या नेमुन दिलेल्या खेळ शिवापुरचे गाव पुण्यापासून नऊ कोसावर पाटलाने बदअलम केला. बाबाजी भिकाजी गुजर पाटील हे त्यांचे नाव त्याचे बदअमल केला. म्हणजे एक पर स्त्रीवर बलात….! आणि शिवबाला हे समजले. पर स्त्रीला आई मानणाऱ्या शिवबाच्या मुलाखत पाटलासारख्या एका जबाबदार अधिकाऱ्याने हा रावणशाही गुन्हा केलेला समजताच शिवबा संतापला. कोपरापासून पाटलाचे हात तोडण्याचा हुकूम दिला. पाटीलकी पिढीजात पद्धत होती ती आता शैक्षणिक पात्रतेवरच ठरली काळानुरूप. दिनांक 28 जानेवारी 1645 ला पाटलाचे हातपाय तुटले. रागावलेले शिवबा लोकांनी पाहिले, “अग्री व पृथ्वी यांचे धुंद प्रणयातून सह्याद्री जन्मला.’ 6 जानेवारी 1965 ला शिवरायांनी जाजाऊंची सुवर्णतुला केली. अशा या राजमातेचा मृत्यू दिनांक 17 जानेवारी 1674 ला झाला. धन्य ती माता!

    ReplyDelete
  6. छ. शिवाजी महाराज हिंदू होते काय?
    छ. शिवाजी महाराज हे हिंदू होते, इतकेच नव्हे तर ते गो-ब्राम्हण प्रतिपालक होते असा दांडगा प्रचार कांही हितसंबंधी लोक गेली १००-१२५ वर्षे नेटाने करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पोवाडे लिहिले, कथा-कादंबर्‍या-नाटके लिहिली, सिनेमे काढले. आता ते अधिकचा प्रचार टी.व्ही. वरून आणि इंटरनेटवरूनही करत आहेत.

    पण विचार करण्यासारखी बाब ही आहे की छ. शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदू नावचा धर्म अस्तित्वात होता काय? तसा तो आजही अस्तित्वात नाही, पण आज निदान बरेच लोक स्वत:ला हिंदू समजतात. शिवकालातील लोक स्वत:ला हिंदू समजत होते अस कसलाही पुरावा नाही. धर्म या अर्थाने त्यावेळी कोठेही हिंदू शब्द वापरला गेलेला नाही.

    ब्रम्ह हत्या हे 'हिंदू' धर्मात सगळ्यात मोठे पाप आहे
    त्या काळात शैव धर्म, वारकरी धर्म, सनातन धर्म/वर्णाश्रम धर्म, इस्लाम धर्म हे दख्खनेतील मुख्य धर्म होते. छ. शिवाजी महाराज हे धर्माने शैव होते. तसेच त्यांची वारकरी धर्माशीही चांगलीच जवळीक होती. शैव व वारकरी हे दोन्ही समतावादी धर्म. छ. शिवाजी महाराजांना हिंदू ठरवणार्‍या मेंदूंना ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. पण हे मेंदू गोबेल्सच्या मेंदूशी स्पर्धा करणारे असल्याने ते महाराजांना हिंदू या नावाच्या बुरख्याखाली विषमतावादी सनातन वर्णाश्रम धर्माच्या चौकटीत बसवून त्यांना गो-ब्राम्हण प्रतिपालक ठरवत असतात तसा प्रचार करत असतात.महाराजांना कट्टर हिंदू ठरवतात. ’हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ अशा प्रकारची पुस्तके लिहून घेतली जातात. पण महाराज हिंदू नव्हते हे पुढील गोष्टींवरुन सहज दिसून येते:

    १. महाराजांनी शुद्र आणि अतिशुद्रांच्या हाती शस्त्रे दिली.
    २. महाराजांनी स्वत:चे आरमार उभे केले, व स्वत: समुद्री मोहिमांमध्ये भाग घेतला.
    ३. महाराजांनी जिजाऊला शहाजी राजांचा मृत्युनंतर सती जावू दिले नाही.
    ४. महाराजांनी अनेक ब्रम्हहत्या केल्या. ('हिदू' धर्मात हे फार मोठे पाप आहे. )
    ५. महाराजांनी म्लेंछ लोकांशी मैत्री केली, आपल्या सैन्यात मुस्लीमांना मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला.
    ६. महाराजांनी नेताजी पालकर व इस्लाम स्वीकरलेल्या इतर अनेकांना शैव धर्मात परत आणले. ('हिदू' धर्मात शुद्धी करणाचा अधिकार फक्त ब्राम्हनांनाच आहे. )
    ७. महाराजांनी आपल्या दुसर्‍या राज्याभिषेकाच्या वेळी एक दलीत स्त्रीशी लग्न केले.
    (य़ा विषयावरील माझा सविस्तर इंग्रजी लेख ’हाऊ शिवाजी डिमॉलिशड मनुस्मृती’ वाचावा: http://maratha-history.blogspot.com/... )

    वरील सगळ्या गोष्टी सरळ-सरळ हिंदू धर्माच्या विरोधात जातात. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांना हिंदू ठरवणे हे केवळ चुकीचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. शेवटच्या मुद्द्यावर अजून प्रकाश टाकला तर बरे होईल...म्हणजे कोणत्या दलीत स्त्री सोबत विवाह केला आणि का?

      Delete
    2. तुझी जात कुठली ?तुझा बाप कोण? तुझा धर्म कोणता? जन्माला आला म्हणून तुला सांगितले हा तुझा बाप तर विश्वास ठेवला ना? हिंदू धर्म तेव्हा ही होता आता ही आहे आणि पुढे ही असणार पाटील नाव म्हणे तुझा dp ला कोणता बाबा आहे त्याला विचार तो कुठून आला त्याचा धर्म कोणता इतिहास शाळेत शिकला की नाही शिकला बे ..
      बावळट पुन्हा बोलला ना यर जीभ हासडून टाकेल

      Delete
  7. ‘छत्रपती शिवरायांनी हिंदवी राज्याची, म्हणजेच आदर्श हिंदू राष्ट्राची स्थापना केली. हे राष्ट्र निर्माण व्हावे, यासाठीचे बाळकडू जिजाऊंनी त्यांना बालपणातच पाजले, त्यांच्यात जाज्ज्वल्य धर्माभिमान आणि राष्ट्राभिमानही निर्माण केला. जिजाऊंनी त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील क्षात्रवृत्ती जागृत केली आणि त्यांच्या मनात अन्याय अन् अत्याचार यांविषयीची चीड निर्माण केली. बालपणातच त्यांच्यात भक्तीचे आणि हिंदु धर्माचे बीज पेरून जिजाऊंनी सर्वार्थांनी शिवरायांना घडवले. यामुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली आणि याचेच फलस्वरूप म्हणून आज आपण हिंदू म्हणून जीवन व्यतीत करू शकत आहोत.

    यावरून आपल्या लक्षात आले असेल की, माता हीच हिंदू राष्ट्राच्या निर्मितीची खरी शिल्पकार आहे. जिजाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त सर्व मातांनी आता संकल्प करायला हवा, ‘आम्ही आमच्या मुलाला शिवरायांसारखा घडवण्याचा प्रयत्न करू आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेच्या ईश्वरी कार्यात सहभागी होऊ ! असे केल्यानेच हिंदू राष्ट्राची पहाट लवकर येईल.

    ReplyDelete
  8. महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.

    ReplyDelete
  9. काही पश्चिमात्य इतिहासकार शिवाजी महाराजांची तुलना सिकंदराशी व नेपोलियन बरोबर करतात .शिवाजी महाराज त्यांना या दोघांच्या तोडीचा योद्धा वाटतात . परंतु शिवाजी महाराजांच्या जवळ जीवन विषयक तत्वज्ञान होते जीवन विषयक चिंतन होते ते सिकंदराशी व नेपोलियन या दोघांच...्या जवळ त्याचा अभाव होता त्यामुळे महाराजांची तुलना सिकंदराशी व नेपोलियन बरोबर करता येणार नाही .महाराजांमध्ये हे संस्कार निर्माण झाले ते त्यांना लाभलेल्या सत्व संप्पण माता जिजाऊ ,त्यांचे थोर पराक्रमी वडील शहाजी राजे ,त्यांना घडलेला साधुसंतांचा सहवास ,जीवाला जीव देणाऱ्या गरीब मावळ्यांमध्ये त्यांना मानवी मनाच्या नव्या पैलूचे दर्शन घडले याशिवाय त्यांचे स्वताचे जीवन विषयक चिंतन या साऱ्यांचा तो परिपाक होता ,या सगळ्या गुणांचा सिकांदारामध्ये आणि नेपोलीयांकडे अभाव होता................... जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete
  10. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नाव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

    ReplyDelete
  11. आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]

    स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.

    जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

    ReplyDelete
  12. कोकाटे म्हणतात "शहाजीराजेंचा मृत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत ,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा नव्हतीच पण जिजाऊ माता देखील सतिप्रथच्या विरोधात होत्या "
    अहो कोकाटे, शहाजीराजंचा म्रृत्यूची बातमी आईकल्यानंतर जिजाऊ सती जाण्यास निघाल्या होत्या पण राजेंनी आग्रह करून त्यांचे मन वळविले मग जिजाउनि आपला निर्णय बदलला असे इतिहासात वाचले आहे आणि भोसले घराण्यात जर सतीप्रथा नव्हती तर शिवाजीराजेंच्या मृत्युनंतर पुतळाबाई रायगडावर का बरे सती गेल्या ?
    अर्थात सतीप्रथा अत्यंत वाईट व चुकीची आहे याबद्दल कोणाचेही दुमत होणार नाही पण वस्तुस्तीथी तुम्ही सांगता तशी नाही
    कोकाटे पुढे म्हणतात "जिजाऊ शिवराय जर ग्रंथ-प्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता ."
    अहो कोकाटे महारष्ट्रातील ब्राह्मण लोकांचा विरोध पत्करून काशीहून ब्राह्मण बोलावून त्यास प्रचंड प्रमाणावर दक्षिणा देवून त्याकाळातील कोट्यावधी रुपयॆ खर्च करून राज्याभिषेक करवून घेतला यावरूनच हे सिद्ध होते कि महाराज ग्रंथ-प्रामाण्य मानणारे होते
    आत्ता राज्याभिषेक म्हणजे काय?ब्राह्मण मंत्र म्हणतात निरनिराळ्या नद्यातून आणलेल्या पाण्याने अभिषेक करतात यज्ञ करतात मिरवणूक काढतात सिंहासनावर विधी पुर्वक बसवितात उपस्तिथ लोक त्यांना आहेर करतात आणि राजे त्यांना प्रतिअहेर करतात हे सर्व कर्मकांड आहे समजा हे कर्मकांड केले नसते तर काय फरक पडला असता ? काहीही बिघडले नसते राजे राजेच राहिले असते राजे ग्रंथप्रामाण्य मानणारे होते म्हणूनच त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला
    अहो कोकाटे इतिहास हा इतिहास असतो तुम्हाआह्माला जे घडावेसे वाटते यापेक्षा काय घडले ते महत्वाचे असते
    जिजाऊ शिवराय हि माणसे विश्ववंद्य आहेतच पण ब्राह्मणद्वेषासाठी काहीही खोटे लिहू नका

    ReplyDelete
    Replies
    1. जिजाऊ आणि शिवरायांना विश्ववंद्य म्हणून मान्य केल्याबद्दल धन्यवाद...आपल्याला किती यातना झाल्या असतील हे माझ्यासारख्या पामराला कल्पना करणे जरा अवघडच आहे..असो..

      ग्रंथाप्रमाणे राज्याभिषेक करून कोणी राजा होत नाही तर तो आधीपसून कर्त्रुत्वावर असावा लागतो. पण शिवरायांना हे माहीत असूनही की ते कर्त्रुत्ववान आहेत तरीपण राज्याभिषेक सोहळा साजरा केला.यावरून काय स्पष्ट होते ?

      जिजाऊंनी सती जाणार्या कितीतरी स्त्रीयांचे मन वळवले आहे..हे तुम्ही विसरता ??

      Delete
    2. त्या वेळी जिजाऊनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले.खऱ्या अर्थाने त्याच्या अनुकरण भारतीय समाजाने केले असते तर आज महिला फार पुढे गेल्या असत्या.जिजाऊंचे आचार,विचार कृतित आणण्याची गरज आहे.
      जय जिजाऊ. जय शिवराय
      _________________________-_________
      बाळासाहेब बोराडे

      Delete
  13. Replies
    1. जय जिजाऊ जय शिवराय.
      लेख सामाजिक संकेतस्थळावर प्रसारीत करा

      Delete
  14. जिजाऊंच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा.सिंधखेडराजामध्ये भेटू.
    जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete
    Replies
    1. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमॉंसाहेबांच्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
      जय जिजाऊ जय शिवराय

      Delete
  15. The easy is very helpful for mi. Thank you for this help

    ReplyDelete
  16. मला वाट्टे ब्राम्हणद्वेष तिथी पंचाग या कडे लक्ष न देता महाराजांचे राजकारण, नेतृत्व,कर्तृत्व नियोजन जलसंवर्धन बांधकाम कौशल्य मावळ्याचे कौतुक सत्कार करणे स्ञीचा आदर सन्मान परराष्ट्रीय व्यवहार असे अनेक विषय आहे माहितीसाठी त्यावर लक्ष दिले तर पुन्हा स्वराज्य निर्माण होईल...

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.