2 June 2012

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !

मूळ लेखक : प्रिं.अमरसिंह राणे
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील 
"कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच.निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते.....पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता.हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे..... पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी... कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता."

           इतिहास हा व्यक्तिंभोवती फ़िरतो. व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुनर्छाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध, ओघवते विवेचन दिसले पाहीजे सत्याचा अपलाप न करता काल्पनिक,पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तीचित्रणे असता कामा नयेत. तटस्थ व्रुतीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज,गैरसमज आणि अपसमज आढळुन येतात. इतिहासलेखण देखील व्यक्तीच करतात.छत्रपती संभाजी,सुर्याजी पिसाळ, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, दुसरा बाजीराव,आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, छ.शाहु आदी; एवढेच काय छत्रपती शिवरायांच्या बाबतही आपल्या काही लेखकांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायलाच नको.त्यातले सत्य शोधणे/ घेणे आवश्यक.

वाडःमयाची घुसखोरी 
           वास्तवाशी फ़ारकत घेतली आणि काल्पनिकतेस प्राधान्य दिले की इतिहासाची प्रासादिक कादंबरी होते.तसे पाहता ऐतिहासिक कादंबरीनेही इतिहासाशी प्रामाणिकपणा राखला पाहीजे आणि म्हणूनच श्रीमान योगी, छावा, राजेश्री आदी ग्रंथ, ऐतिहासिक कादंबरी न राहता कादंबरीमय इतिहास किंवा इतिहासमय कादंबर्या झाल्या आहेत.ग्रंथाच्या तिनीही  नामवंत लेखकांनी सत्य, ऐतिहासिक घटना अनेकवेळा पाठीमागे ठेवून स्वत:च्या प्रासादिक फ़ुलोर्यास अतिमहत्व दिले आहे.परंतु सर्वसामान्य वाचक  आणि प्रेक्षक त्या प्रसंगांना सहजपणे सत्य मानतो.त्यावरील चित्रपटात तेच दाखवले जाते.म्हणून अशा कादंबर्या, चित्रपट आणि नाटके ऐनैतिहासिक ठरतात. मग लेखनपरत्वे अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्यावर अन्याय होतो.समजापसमजास वाव मिळ्तो आणि तेच सत्य म्हणून समाजात वर्षानुवर्षे, शतकानुशतके प्रचलित होत राहते.हा एक दैवदुर्विलासच.याच द्रुष्टिकोनातुन "सुर्याजी पिसाळ" या इतिहासकालीन देशमुखावर अन्याय झालेला आहे.
सुर्याजी पिसाळ आणि राजकारण
          ’सुर्याजी पिसाळ’ म्हणजे ’फ़ितूर’ हे समीकरण जे झाले आहे, ते निखालस खोटे.इतिहासात आणि  राजकारणातले फ़ितूर व गद्दार हे शब्द अगदीच सापेक्ष असतात.आजचा फ़ितूर हा उद्याचा जीवस्चकंठस्च मित्र होऊ शकतो.मतभेदांपायी कोणी दुर गेला तर गद्दार होतो.मग गद्दाराचा विजय झाला तर त्याला तसे म्हणणारा करंटा होऊ शकतो.कुटील नीती अथवा राजनीतीचा तो अपरिहार्य  भाग असतो. नाही तरी राजकारण हे बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थान असे कोणी आंग्ल  लेखकाने गमतीने खरेच लिहून ठेवले आहे.त्या उक्तिचा उपयोग देखील आपण एक ठाम सत्य म्हणुन सरसकट वापरात आणतोच.तसे पाहीले तर रामायनकालीन रावन हा एक सोन्याच्या लंकेचा चांगला राजा होता.त्याचा पराभव झाल्यावर लेखकांनी त्यास दहा तोंडे चिकटवली.तो क्रुर, दुसर्याची पत्नी पळवणारा,घाणेरडा रावण झाला.जेत्यांनी त्याच्या प्रतिमा करवून तिचे वार्षिक अग्निदहन, हेटाळणी सुरु केली.आजही चालु आहे.
रावणराजा
            क्षणभर कल्पना करा, रावणराजाचा विजय झाला असता तर राम भले एकपत्नी,एकवचनी, एकबानी खरोखर असुनही रामायनाच्या ऐवजी जे महारावणायण लिहिले गेले असते, त्यात राम-लक्ष्मण कसे दाखवले असते ? त्यांना क्रुर,गद्दार, फ़ितूर, खंजीर खुपसणारे ही विशेषणे ग्रंथकर्त्यांनी प्रासादिकरीत्या चपखलपणे बसविली असतीच नाही का ? म्हणून शब्दांचा वापर,प्रसंगानुरुप जित-जेत्यांच्या संदर्भातही तपासुन पाहिला पाहिजे. हजारो  वर्षे रामराजांची परीक्षा होऊन ते आज देवत्वाला पोहोचले आहेत ते नि:संशय. एरव्ही बिभीषणाने रावणाच्या पाठीत खंजीर खुपसलाच.रामाचा विजय झाला म्हणून तो सुटला.
आलमगीर
            आलमगीर (औरंगजेब) जितका आपणास वाईट, जिझिया कर बसविणारा,हिंदूद्वेष्टा वाटतो, तितका तो इतर सर्व बाबतीत होता का ? तो स्वधर्मपरायण होता.दिवसातून पाच वेळा नमाज पढे, तो ऐषआरामी नव्हता, चटईवर झोपे वगैरे. आमच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी ’आलमगीर’ या विषयावर पंचवीस वर्षापुर्वी मिरजेत जोरकस व्याख्यान देऊन औरंगजेब काही गोष्टीत कसा चांगला होता, हे पटवून द्यायचा सोदाहरण प्रयत्न केला.
        ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ साली प्रसिद्ध केलेल्या ले.शां.वि. आवळसकरांच्या रु.४ किमतीच्या पुस्तकात त्यांनी रायगड प्रकरणी सुर्याजी पिसाळ (१९८९) आणि रा.य.नाईक (१८१८) हे दोघेही मोघलांस व इंग्रजांस फ़ितूर झाले या गोष्टी संशयातीत आहेत, दोघेही निर्दोष आहेत,असे सांगितले आहे. त्यांचे व अस्मादिकांचे तसे पक्के मत झाले आहे.
घटनाक्रम असा-
संभाजीराजे गिरफ़्तार 
राजारामांचे मंचकारोहण
१ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या  नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले.संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी  ठार झाले.रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली.त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.
          रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकरने कैदेतील मानाजी मोरे इ. ना सोडले तर यसजी व सिदोजी फ़र्जंद यांचा कडेलोट केला.म्हणजे रायगडावर सुर्याजी पिसाळ त्यावेळी किल्लेदार नव्हते.राजप्रतिनीधी म्हणुन राजाराम राज्यकारभार १२ फ़ेब्रुवारी १६८९ पासुन शाहू लागले.कारण शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ सात वर्षाचे होते.हा दुरदर्शीपणा येसूबाईंचा.मराठ्यांची राजधानी व नविन राजा यांना ताब्यात घेण्यास आसदखानपुत्र इतिकादखानने रायगडला २५ मार्चला वेढा घातला.

17 प्रतिक्रिया :

 1. धन्यवाद ! अभिजित पाटील लेख खूप छान लिहिलाय. आणि हे गरजेचं होतं कारण अजूनही या योद्ध्याला फितुरच म्हणतात हा त्यांचा अपमान आहे. प्रत्येक सिनेमा मध्ये नाटका मध्ये हे पात्र गद्दार म्हणूनच दाखवले जाते.पण खऱ्या इतिहासाची दखल कोणी घेत नाही हेच दुर्दैव आहे आपल्या लोकांचं. नको त्याला डोक्यावर घेऊन नाचतो पण खऱ्या मावळ्याला विसरतो. अजूनही कुठल्याही इतिहासकाराला याचे संशोधन करावे वाटले नाही.त्यामुळेच हा योद्धा कलंकित राहिला आजतोवर.

  ReplyDelete
  Replies
  1. अगदी बरोबर बोललात यासाठी इतिहासाची पुनर्रनिर्मिती होणे गरजेचे आहे.आणी जे काही बखरी , नाटके, कादंबर्या, पोवाडे प्रथम बंद करावेत कारण हेच जबाबदार आहेत या सर्वाला. बाबा पुरंदरेने तर लुटले लोकांना शिवरायांच्या नावाने आणि शिवरायांच्या नावाने मिळवलेला पैसा सावरकराच्या चित्रपटाला दान केले अशी हि विक्रुती.

   Delete
 2. अभिजित - सूर्याजी पिसाळ, खंड्या खोपडे, गण्या शिर्के हे फितूर नव्हतेच मुळी. ब्राम्हणांनी छ. शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या जातीला बदनाम करायला म्हणून ह्या मराठ्यांच्या नावावर खोट्यानाट्या भाकड कथा प्रसिद्ध केल्या. खरे शिवद्रोही दादोजी कोंडदेव, चिमाजी देशपांडे (महाराजांचा लहानपणाचा मित्र), सखारामपंत बोकील, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, झाशीची राणी हे खरे देशद्रोही आहेत, हा संभाजी बी-ग्रेडचा प्रचारच बरोबर असावा. शेवटी थोर इतिहासकार संडासश्री गरीबराव कोकाटे ह्यांचे म्हणणे असेच आहे की ब्राम्हणांनी फक्त शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे काम केले. एकजात सगळे ब्राम्हण कापून काढले पाहिजेत असे खेड्या म्हणतो (पण ते इतर मराठ्यांनी करा म्हणतो, छक्क्यात एकही बामणाच्या केसाला धक्का लावायची अजूनही हिम्मत झालेली नाही).

  त्यामुळे अभिजित आता - बाजीप्रभूंच्या शिवद्रोहाची गोष्ट प्रसिद्ध कर पाहू लवकर. तुला जास्त लांब बघण्याची पण गरज नाहीये - जिजाऊ प्रकाशनने किंवा वामन्याच्या मूलनिवासी प्रेसने नक्कीच एखादे प्रचंड यशस्वी झालेले संडासश्री. मदन पाटील किंवा गरीब कोकाटे ह्यांचे विक्रीचा उच्चांक गाठलेले पुस्तक नक्कीच प्रसिद्ध केलेले असेल. तेथे तुला असला स्फोटक मसाला नक्कीच मिळेल. नाहीतर तुझा नवीन सखा संदीप पाटील ह्याला विचार.

  हे असले नवीन संशोधन आमच्या सर्वांशी शेयर केल्याबद्दल खेड्या, वामन्याबरोबर तुलाही पद्मश्री देऊन टाकायला पाहिजे.

  तुझा मित्र (आणि संभाजी ब्रिगेडच्या व्याख्येनुसार देशद्रोही, भट, शिवद्रोही, कापून मारायला पाहिजे असा)
  कोहम महोक

  ReplyDelete
  Replies
  1. कोहम मित्रा:
   पहीला मुद्दा : तुझे लिखाण वाचल्यावर असे वाटते की सूर्याजी पिसाळ हे फ़ितूर नव्हते हे समजल्यावर याचं तुला खुप वाईट वाटले आहे किंवा राग आला असेल.
   २. बाजीप्रभू देशपांडे[सी.के.पी.(क्षत्रिय)] शिवद्रोही होते हा तुझा समज आहे.
   ३. आता हेच बघ मराठ्यांना खंड्या काय आणि गण्या काय , पन दादू कोंडदेव आणि चिमा देशपांडे यांना "जी" लावतोस. स्वराज्यातले जंत यांना दादोजी आणि क्रुष्णाजी काय आणि शिवरायांचे प्राण वाचविणार्या वीरांना "जिवा" आणि "शिवा" असा एकेरी बोलतोस.
   ४.मी कोनतीही पोस्ट मोफ़त मिळाली म्हणून टाकत नाही ती दहा वेळा विचार करून टाकतो.
   ५.आता ब्राह्मणांनी मराठ्यांच्या भाकडकथा लिहिल्या ह तुझा समज आहे. सूर्याजी पिसाळ यांचा इतिहास ब्राह्मणांनी खोटा लिहिला असे तुझे मत आहे माझे नाही.तिनिहि पाने वाच म्हणजे समजेल की फ़क्त सूर्याजी पिसाळ हेच नाहीत तर अजुन कोनावर अन्याय झाला आहे लिहिले आहे.
   ६.तु संभाजी ब्रिगेड ला किंवा मेश्राम यांना शिव्या घातल्यास तर तुला समाधान मिळत असेल पण मला मात्र तिळमात्र वाईट वाटत नाही.
   ७.आता तुला मी ते का शेअर केलं ? कारण "खरी माहीती अद्न्यान नष्ट करते" येवढ्यासाठी पण तुझा गैरसमज झाला.
   ८.{संभाजी ब्रिगेड च्या व्याख्येनुसार} त्यांची व्याख्या काय आहे ब्राह्मणांविषयी याची मला गरज नाही.कारण माझे जिवाभावाचे मित्र ब्राह्मण आहेत आणी माझ्यासारखे बरेच मराठे आहेत त्यामुळे त्यांच्याशी नाव जोडु नको.
   ९.अती महत्वाचा मुद्दा : कोहम एक गोष्ट पक्कि करुन ठेव कि माझा कुठल्याही संघटनेशी संबंध नाही.
   माझे बरेच मित्र ब्राह्मण आहेत आणी ब्राह्मणांचे विषयी माझे काय विचार आहेत ते तुला लिहु नाही शकत कधि भेटलात तर सांगेन किंवा चाटींग ला भेटलास तर सांगेण तुझा, माझ्याविषयी गैरसमज दुर व्हावा म्हणून.

   अभिजीत पाटील.

   Delete
  2. अमोल कळेकरSunday, 03 June, 2012

   कोहम साहेब आपले विचार वाचले आप्ल्या ब्लोग वर. खुप छान आहेत पण आपण मराठा लोकांचा द्वेष करता तेवढाच किंवा जास्त मराठे करतात पण आपण मराठी माणसांला एकेरी बोललात (यश्या,येड्या)हे खटकले असो ज्याची त्याची मर्जी.
   कोहम साहेब आणि अभिजीत साहेब आपले दोघांचे ब्लोग वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्या जातीबद्द्लचा प्रचंड अभिमान आणी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.पण अभिमान बाळगताना ब्राह्मणांनी हा विचार करायला पाहिजे की शिवरायांच्या राज्यामध्ये अनेक मंत्री ब्राह्मण होते आणी मराठ्यांनी हा विचार केला पाहिजे की असा जातियवाद शिवरायांनी केला असता तर स्वराज्य उभं राहिलं असता का ?
   एकेकाळी मराठ्यांनी महाराष्ट्र घडवला आणी पेशव्यांनी ती परंपरा जोपासली, तेच मराठे आणी पेशवे जर एकत्र आले तर कोन हरवु शकेल का तुम्हाला ?
   तेंव्हा वाईट गोष्टीचा निषेद करा मग ती व्यक्ती कोणत्याही समाजाची असो.

   धन्यवाद !!

   Delete
  3. कोहम जी
   या पेज पर जाऊन माझी प्रतिक्रिया वाचा आणी आपली प्रतिक्रिया द्या, मग तो निषेद असुदे अगर समर्थन.
   http://marathikattaa.blogspot.in/2012/05/blog-post_8892.html

   Delete
  4. @अभिजित
   मुद्दा #२ - बाजीप्रभू CKP म्हणजे क्षत्रिय.
   चूक साफ चूक. माझ्या मेव्हण्याची बायको आणि माझ्या सख्ख्या मावस भावाची बायको CKP आहेत. CKP हे ब्राम्हण पोटजातीतले आहेत. CKP लोक मुंज पण करतात.

   मुद्दा #३ - खंड्या आणि गण्या
   खंड्या खोपडे ला छ. शिवाजी महाराजांनी फितुरीबद्दल चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. तर गण्या शिर्केने आमच्या छ. संभाजी राजांना अटक/ हत्या करायला मदत केली होती. त्यामुळे ह्या दोघांबद्दल आदर शून्य.
   चिमाजीने महाराजांबरोबर शाहिस्तेखानाची मोहीम फत्ते केली होती, आणि शहीद झाला होता. तर दादोजींनी (जरी गुरु आहेत की नाही ह्याबद्दलचा मतभेद आपण क्षणभर विसरलो) हयातभर शिवाजी महाराजांबरोबर काम केले. बाजीराव ह्याने मराठी सल्तनत सांभाळली, लढाया मारल्या. हे सर्व आमच्यासाठी पूज्य, आदरणीय, खंड्या आणि गण्या ह्यांना दादोजींच्या जुन्या फाटक्या जोड्याची पण किंमत नाही.
   तुला मी कधीही प्रतापराव गुजर, तान्हाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद, मदारी मेहतर, जिवाजी महाले अश्या कित्येक शूरवीर (मराठा आणि इतर ब्राम्हणेतर) लोकांबद्दल वाईट बोललेले दिसणार नाही कारण मला त्यांच्या बाबत अतिशय आदर आहे. कोंडाजी आणि तान्हाजी ह्यांच्या अनुक्रमे पन्हाळा आणि सिंहगड कसा घेतला किंवा जिंकला, ह्याची गोष्ट ऐकून अजूनही अंगावर काटा येतो. सिंहगडावर ती जागा पाहून ये जिथून तान्हाजी सिंहगडावर चढले, तेही स्वतःच्या मुलाचे घरी लग्न काढलेले असताना. अगदी माझ्यासारखा कोणीही म्हणता की लग्न झाले की मग करतो मोहीम फत्ते.

   मुद्दा ७ आणि ८ - खरे तर मला कल्पना आहे की तू ब्राम्हणद्वेषी नाहीस किंबहुना संभाजी बी-ग्रेड किंवा बामसेफच्या धर्तीचा द्वेषी नाहीस. पण मागे तू त्यांच्या बद्दल सहानुभूती सुद्धा व्यक्त केलेली आहेस. तेव्हा त्याबद्दल माझ्याकडून तुला थोडासा बोल हा लागणारच. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करून त्यांच्या विरुद्ध लढणारे मराठे (फक्त मराठे म्हणून) थोर, का आपल्या राजाबरोबर राहून त्यांना साथ देणारे दादोजी, अन्तोजी, बाजी आणि मुरार मोठे किंवा ब्राम्हण म्हणून त्यांचा द्वेष करायचा? शिवाजी राजांवर वार करणारा अफझुल्याचा वकील कृष्णाजी भास्कर हा ब्राम्हण असून त्याच्याविषयी ब्राम्हण इतिहासकार (भट :-) ), किंवा माझ्यासारखे कित्येक रंगरूट कधीही चांगले बोलल्याचे लिहिल्याचे पाहिलेले नाही.

   @अमोल कळेकर - अमोल - मी मराठाद्वेषी नाही. मी मराठा सेवा संघ, संभाजी बी-ग्रेड, मूलनिवासी नायक ह्या असल्या अतिरेकी मराठा संघटनांच्या विरोधात आहे. त्यांच्या शिवराळ नेत्यांच्या विरोधात आहे. ब्राम्हण हत्येच्या धमकीच्या विरोधात आहे, आणि धमकी प्रत्यक्षात आणण्याची वाट बघत बसणारा नाहीये तर त्याआधीच समाजात जागृती करणारा आहे.

   Delete
  5. @ koham
   Kayastha is a caste community of Kshatriyas.
   आता आपण हिंदू धर्माचा अभ्यास केला असेलच त्यामुळे हे हि माहित असेल कि मुंज हे हिंदू धर्मात केले जाते पण ते फक्त ब्राह्मणाच करत होता. आपल्या सारख्या विचारी माणसाला अर्धवट सत्य शोभत नाही.

   Delete
  6. कोहम तु कोण तुमचे छ.संभाजी ? ज्यांना मनुस्म्रुती प्रमाणे ठार करण्यात आले ?
   आणि तु सर्वधर्मसमभाव प्रमाणे वागणारा आहेत तर मग छ.शिवरायांचा अपमान केला तेंव्हा आणि लेन मार्फ़त बाबा पुरंदरेने जी जिजामातांवर चिखलफ़ेक केली तेंव्हा काय मुग गीळून बसला होतास ? तेंव्हा तुला निषेद करावा वाटला नाही. तुम्ही कितिही आव आणा समभावतेचा तुमचा द्रुष्टीकोन बहुजन ओळखुन आहेत.
   पुर्ण बहुजन समाजाने निषेद केला पण एकही भट पुढे आला नाही हाच जातियवाद (ब्राह्मणवाद).

   Delete
  7. नितीन शिंदेFriday, 15 June, 2012

   अगदी बरोबर आहे तुमचा खरतर हे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी केला आहे आणि दादू कोंडदेव शिवद्रोही आहे हे अगदी बरोबर आणि त्यासाठी एकही ब्राह्मणाला जिवंत ठेवता कामा नये

   Delete
 3. एक मराठी माणूसMonday, 11 June, 2012

  खुप छान लेख आहे,. आणि हा लेख मी वाचला होता पेपर मध्ये. आणि जसी च्य तसी मंडणी केली आपण त्याबद्दल धन्यवाद!
  आसेच लिहित रहा आता खरा इतिहास जगसमोर येत आहे ते आपल्यासारख्या लोकंमुळेच आणि संभाजी ब्रिगेड मुळेच.
  ॥ जय मुलनिवासी ॥

  ReplyDelete
 4. एखादे असत्य वारंवार सांगितले, की ते सत्यच वाटू लागते. इतिहास वाचताना हे अनेकदा दिसून येतं. मराठ्यांच्या इतिहासातलं असं एक प्रकरण म्हणजे सूर्याजी पिसाळ याची फितुरी. या माणसाने देशमुखीसाठी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या घशात घातली, असा त्याच्यावर आरोप आहे. आज फितुरीचं दुसरं नाव म्हणून त्याचंच नाव घेतलं जात आहे.

  या फितुरीची आख्यायिका रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठी रियासतीच्या दुस-या, 'स्थिरबुद्धी राजाराम' या खंडात दिली आहे. (पृ.156-157). त्यात म्हटले आहे, -

  "शौर्यादि गुणांत मराठे कोणासही हार जाणारे नाहीत; त्यांचे मरण गळेकापू स्वभावात आहे, हा प्रकार रायगड किल्ल्याचे बाबतीत चांगला निदर्शनास आला. किल्ला इतका दुर्भेद्य की लढून तो बहुधा मोगलांस प्राप्त झाला नसता. वेढा घालून आठ महिने झाले, तथापि ईतिकादखानाचे (जुल्फिकारखानाचे) पाऊल यत्किंचित् पुढे पडेना. बादशहाने सारखी त्यास निकड लाविली; आणि त्याच्या मागणी प्रमाणे सामान फौजा सर्व काही तयार करून पाठविले. तेव्हा खानाने कपटविद्येचा प्रयोग केला. सूर्याजी पिसाळ हा एक हुशार गृहस्थ वर किल्ल्याचे बचावास होता. त्यास वाईची सुभेदारी देण्याचे आमिष दाखवून खानाने फितूर केले. किल्ल्याचे दरवाजे उघडून सूर्याजीने मार्गशीर्ष शु. 2 रविवार ता. 3-11-1689 रोजी मोगलांचा आत प्रवेश करून दिला. त्यावेळी येसूबाईची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. जिवास अपाय करणार नाही अशी खानाकडून शपथ घेववून नशिबाला बोल लावीत ती मुलामंडळींसह खानाचे स्वाधीन झाली."

  ही झाली आख्यायिका. वास्तविक सू्र्याजी पिसाळ वतनलोभी होती. संधीसाधू होता. स्वराज्य स्थापनेमागे शिवछत्रपतींचे जे हेतू होते, ते कळूच न शकणारा दगड होता. पण त्याने फितुरी केलेली नाही.

  हा गृहस्थ वाई परगण्यातील ओझर्डे गावचा पाटील. संपूर्ण वाई परगण्याचा देशमुख वतनदार बनण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. शिवाजी राजांच्या कारकीर्दीत वाईच्या देशमुखीवर दत्ताजी केशवजी पिसाळ होता. याचा पुत्र केशव. त्याच्या पत्नीने दीर गंगाजी याचा पुत्र दत्ताजी यास दत्तक घेतले होते. संभाजी राजांच्या काळात, 1688 मध्ये स्वराज्यावर मोगलांनी जोराचा हल्ला केला. वाई परगणा मोगलांच्या ताब्यात गेला. तेव्हा स्वराज्याशी एकनिष्ठ असलेला दत्ताजी परागंदा झाला. त्याचे देशमुखी वतन वाईचा अंमलदार न्याहरखान याने बळकावले. या धामधुमीत सूर्याजीच्या मनाची चलबिचल सुरू होती. त्याने गावचा वसूल सरकारात भरला नव्हता. त्यासाठी रायगडावरून तगादा लावला गेला, तेव्हा सूर्याजी गाव सोडून जो पळाला तो थेट जुल्फिकारखानाच्या फौजेत आला. यावेळी जुल्फिखारखान रायगडावरील मोहिमेवर चालला होता. त्याच्याबरोबर सूर्याजीही रायगड परिसरात आला. याचा अर्थ संभाजीराजांच्या बलिदानापूर्वीच हा माणूस मोगलांना मिळालेला होता.

  ReplyDelete
 5. रायगडाचा वेढा गडावरील मंडळींना अगदीच सोसवेना झाला. सर्वत्र निराशेचा अंधार पसरला. अशावेळी येसूबाई आदी मंडळींनी गड मोगलांच्या स्वाधीन करण्याचा निश्चय केला. त्यानुसार उभयपक्षी वाटाघाटी सुरू झाल्या. यावेळी सूर्याजी खानाच्या फौजेत होता. जुल्फिखारखानाने त्याच्यातील 'गुण' ओळखून त्याच्याहाती वाटाघाटीची सूत्रे सोपविली. त्याने ही भूमिका योग्यरीत्या पार पाडून खानाची मर्जी संपादन केली. सूर्याजीची ही कामगिरी वर्णन करणारा एक उतारा आढळतो. -
  "तेथे रायगडचे मसलतेमुळे मनसबा करून (सूर्याजीने) मावळीयांची सरदारी केली. गडास मोर्चे लावले व दरामतीत (मध्यस्तीत) पडोन खानास गड हस्तगत करून दिल्हा. ये गोष्टीकरिता खान मशारनिल्हेची कृपा त्यावरी विशेष जाली. खान हजरतीच्या (औरंगजेबाच्या) दर्शनास आले. तेव्हा सूर्याजीची स्तुती हजरतीपावेतो करून सिरनाहाणी करविली. हा अस्करा (ख्याती) लष्करात बहुत जाला..."

  एकंदर सूर्याजीची रायगडाच्या पाडावामधील भूमिका मध्यस्थाची आहे. फितुराची नाही. त्याला फितूर म्हणावे, तर तो आधीच शत्रूला जाऊन मिळाला होता. तो स्वराज्याचा शत्रूच होता. आणि याच्या जोरावर त्याने नंतर वाईची देशमुखी बळकावली.

  सूर्याजी पिसाळ फितूर नव्हता याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे रायगड मोगलांच्या हाती गेल्यानंतर काही काळात तो पुन्हा राजाराम महाराजांच्या सेवेत रूजू झाला. एवढेच नव्हे, तर राजाराम महाराजांनी त्याला वाईची देशमुखी दिली.

  त्याचे असे झाले, की रायगड मोगलांच्या हाती लागल्यानंतर बादशहाने जुल्फिकारखानास जिंजी किल्ल्याच्या मोहिमेवर पाठविले. (30 नोव्हेंबर 1689) त्यावेळी सूर्याजी पिसाळही त्याच्याबरोबर गेला. जिंजीच्या वाटेवर असतानाच त्याने वाईच्या पूर्ण देशमुखीचे वतन मिळविले. पण ते जिंजीला पोहचेपर्यंत परिस्थिती बदलली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी व धनाजी यांच्या फौजांनी मोगलांनी जिंकलेले गडकोट व ठाणी पुन्हा ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. त्यात वाई परगणाही पुन्हा एकदा मराठ्यांच्या अंमलाखाली आला. आणि पुन्हा एकदा दत्ताजी पिसाळ याला वाईची देशमुखी देण्यात आली. जिंजीचा वेढा सुरू असताना ही बातमी सूर्याजीला समजली असावी. येथपावेतो त्याच्या लक्षात वारा फिरल्याचे आले असावे. त्यामुळे मग त्याने राजाराम महाराजांशी संधान बांधले आणि जुल्फिकारखानास आणि मोगली लष्करास गुंगारा देऊन तो किल्ल्यात छत्रपतींच्या दर्शनास गेला. तेथे त्याने राजाराम महाराजांना त्याच्याकडील जुनी आदिलशाही फर्माने दाखविली. ती पाहून राजाराम महाराजांनी त्याला वाईच्या निम्म्या देशमुखीच्या सनदा दिल्या. त्या घेऊन तो महाराष्ट्रात आला. पण रामचंद्रपंत आदी प्रधान व अधिका-यांना वाईच्या देशमुखीचा सर्व इतिहास माहित असल्याने तेथे सूर्याजीची डाळ शिजली नाही. तेव्हा तो पुन्हा कर्नाटकात जिंजीला गेला.

  ReplyDelete
 6. तेथे त्याने आता निराळेच डाव लढविण्यास सुरूवात केली. राजाराम महाराजांची सगुणाबाई नावाची अत्यंत सुंदर नाटकशाळा होती. राजा कर्ण हा तिचा मुलगा. तिला आणखी एक मुलगीही होती. या कन्येबरोबर आपल्या मुलाचा विवाह लावण्याचा प्रस्ताव सूर्याजीने महाराजांजवळ मांडला. सूर्याजीसारखा घरंदाज मराठा आपल्या पुत्राचे लग्न दासीकन्येशी लावण्यास तयार झाल्याचे पाहून राजाराम महाराजांनी त्याला आता वाईची सगळीच देशमुखी दिली.

  राजाराम महाराजांनी दत्ताजीकडील देशमुखी काढून घेतल्याचा जो रोखा उपलब्ध आहे, त्यात ते म्हणतात - "सूर्याराऊ पिसाळ... हे मोगलाईतून स्वामीसंनिध येऊन आपल्या वतनाचे वर्तमान विदीत केले.... सूर्याराऊ पिसाळ याणी ... मोगलाईमध्ये मबलग पैके खर्च करून दिवाणात सीरणी देऊन फर्मान करून घेतले, अलीकडे स्वामीच्या पायापासीही येकनिष्ठा धरून संनिध येऊन सेवा करीत आहेत...."

  पण यानंतरही देशमुखीची वाद काही मिटला नाही. राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर ताराबाईंनी दत्ताजीस त्याचे वतन परत केले. तेव्हा मग सूर्याजी पुन्हा मोगलांना जाऊन मिळाला. मोगलांनी वाईचे ठाणे पुन्हा जिंकले असावे. त्यावर इस्माईलखान मखा याची ठाणेदार म्हणून नेमणूक झाली. तेव्हा सूर्याजीने त्याला हाताशी धरले. परगण्याचे देशपांड्यांसारखे वतनदार व दत्ताजी यांना बोलावून त्यांना कैद केले आणि त्यांच्याकडून सूर्याजीच्या निम्म्या वतनाचा महजर तयार केला. याच महजरात सूर्याजीने वतन सोडविण्यासाठी एक लक्ष बावीस हजार सातशे रूपये खर्च केल्याचा उल्लेख आहे.

  या काळात औरंगजेब बादशहाची छावणी विशाळगडाच्या पायथ्याशी होती. दत्ताजीने तेथे जाऊन फिर्याद नोंदविली. औरंगजेबाला त्याची बाजू न्याय्य वाटल्याने त्याने सूर्याजीने केलेल्या सेवेकडे न पाहता दत्ताजीला त्याच्या वतनाचे फर्मान दिले, एवढेच नव्हे, तर इस्माईलखान मखा याची वाईच्या ठाणेदारपदावरून बदली करून तेथे यासीनखान याला पाठविले. दत्ताजी वाईस येऊन वतनदारी अनुभवू लागला.

  इकडे सूर्याजीही इरेस पेटला. छावणीत जाऊन त्याने खूप लटपटी-खटपटी केल्या. मुसलमान धर्म स्वीकारल्यास बादशहाची मर्जी प्रसन्न होते हे त्याला माहित होते. तेव्हा बादशहाची मेहेरबानी मिळविण्यासाठी तोही मुसलमान झाला. पण दत्ताजीची बाजू इतकी न्याय्य होती, की औरंगेब बादशहाने सूर्याजीने धर्मांतर केले तरी त्याला वतन काही दिले नाही.

  ReplyDelete
 7. हे प्रकरण नमूद करून ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, "जी गोष्ट मराठ्यांच्या छत्रपतींना (राजाराम महाराजांना) जमली नाही तो औरंगजेबाने करावी, आणि तीही सूर्याजीने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर करावी, याची मराठ्यांच्या इतिहासकारांनी खास दखल घेतली पाहिजे.

  सूर्याजीचा हा वतनलोभ, त्यासाठी त्याने केलेली कारस्थाने हे सर्व तेव्हाच्या मराठा वतनदारांच्या प्रवृत्तीवर चांगलाच प्रकाश टाकणारे आहे.

  आणि अखेरीस येथे एक बाब नमूद करायलाच हवी, की भलेही सूर्याजी पिसाळ रायगडचा फितूर नसेल, पण तो त्याच्यासारख्या अनेक वतनदारांप्रमाणे स्वराज्यद्रोही मात्र निश्चित होता.

  संदर्भ -
  - मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, प्रथमावृत्ती, नोव्हे. 1993, पृ. 109 ते 120.

  ReplyDelete
 8. लेख पुर्ण वाटत नाही त्याचा अंतही नीट समजून येत नाही .लेखकांनी त्यामध्ये दुरुस्ती करुन शेवट समजेल असा प्रपंच मांडला तर बरे होईल जेणेकरुन आमच्या ज्ञानात भर पडण्यास अधिक मदत होईल.

  ReplyDelete
  Replies
  1. सगळे भाग वाचा समजेल हे पहिले पान आहे

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.