एक कथा आहे चिमणी आणि कावळ्याची की एक जंगल होते त्या जंगलात विविध प्राणी राहत होते.एक दिवस जंगलाला आग लागली सर्व प्राणी,पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग कशी विझवायची.त्यावेळी चिमणी चोचीमध्ये पाणी भरून ती त्या आग आगीवर आणुन टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली. तिथेच असलेला कावळा त्या चिमणीला पाहुन हसत होता.तेंव्हा त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला."चिऊताई चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली आग विझेल का ?" असे म्हणून तो कावळा हसला.चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या कामात ती गर्क राहीली.चिमणीने धडपड करून चोचीत जेवढे मावेल तेवढे पाणी आणुन त्या घरट्यावर ओतत होती.ती आग वाढतच चालली होती.पण चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसू लागला.त्याचे ते हास्य कुत्सित होते.पुन्हा तो कावळा चिमणीला म्हणाला-"चिऊताई चिऊताई तु वेडी आहेस का ? तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का ? ". आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी त्याला म्हणाली- " अहो कावळेदादा, या जंगलाला आग लागली आणि या जंगलाच्या आगीला विझविण्याचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्यात माझे नाव नक्कीच आग विझवणार्यांच्या यादीत असेल, आग लावणार्यांच्या किंवा त्याच्या समर्थकांच्या यादीत माझे नाव नसेल".
ही कथा सांगण्याचे कारण हे आहे की आज सर्वत्र जातीयवाद,वर्चस्ववाद, ब्राह्मणवाद वाढला आहे. कोणत्याही अडाणी लोकांना हाताशी धरून महापुरुषांचा अपमान करणे ,इतिहासाचे विक्रुतीकरण करणे याचे प्रमाण वाढले आहे.इतिहासाचे विक्रुतीकरण करणे हे काही लोकांचे धंदेच बनले आहेत.त्यातील एक वाद म्हणजे जेम्स लेन आणि दादू कोंडदेव प्रकरण.आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की जेंव्हा जेम्स लेन ला हाताशी धरून काही वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला तेंव्हा फ़क्त संभाजी ब्रिगेड सारख्या शिवप्रेमी संघटनाच पुढे सरसावल्या निषेद नोंदवायला.संभाजी ब्रिगेड ने जेंव्हा दादू कोंडदेव यांचा पुतळा काढला तेंव्हा ते शुभ क्रुत्य सर्व जाणव्यांना झोंबले.कुणीही असो ते क्रुत्य त्यांना झोंबण्याचे कारण देखील होते.कारण हे इतिहास शुद्धीकरणाचे संकेत होते.याचे कारण म्हणजे दादू कोंडदेव यांच्या प्रती असलेले प्रेम.पण जे कार्य संभाजी ब्रिगेड ने केले त्याबद्दल समाजामध्ये मोठी चर्चा सुरु झाली.संभाजी ब्रिगेड ही एक शिवप्रेमी संघटना आहे हे विचार रुजू लागले.संभाजी ब्रिगेड गावोगावी पसरली.समाजामध्ये चित्र स्पष्ठ झाले की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही प्राच्यविद्या संस्थेतील त्या १४ भटांनीच केली आहे.
आज पर्यंत इतिहासाला वाचविण्याचे आणि शुद्ध करण्याचे काम संभाजी ब्रिगेड ने केले.खरे तर समाज काय आहे किंवा जातीपाती काय आहेत? सगळ्या जाती-धर्मा मधले लोक आपले बांधव आहेत हे विचार समाजात संभाजी ब्रिगेड मुळेच पसरले.आपले खरे शत्रु कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे संभाजी ब्रिगेड मुळेच समजले. नाहीतरी वर्णवर्चस्ववादी लोकांनी सगळ्यांना अंधारात ठेवून जाती - धर्मात फ़ुट पडण्याचे काम केले होते.शिवप्रेमी कोण आणि शिवद्रोही कोण हे सर्व बहुजनांना संभाजी ब्रिगेड मुळेच कळले.आज अशा बर्याच गोष्टी होत्या त्यामुळे महापुरुष बदनाम होत होते,इतिहास विक्रुत होत होता पण संभाजी ब्रिगेड ने त्यावर गदा आणली.आपल्या इतिहासाला वाचविण्याचे महत्वाचे काम संभाजी ब्रिगेड ने केले आहे.संभाजी ब्रिगेड नसते तर काय अवस्था झाली असती इतिहासाची, कल्पना ही करवत नाही.उदा.दादू कोंडदेव हा शिवरायांचा गुरु म्हणूनच बोंबाबोंब झाली असती आणि पावलो-पावली शिवराय दादू कोंडदेव मुळे कर्त्रुत्ववान झाले, नाही तर कुठ्ले ! हे ऐकावे लागले असते.इथेच हे थांबले नसते तर यापुढे जेम्स लेन च्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय अपमान कारक इतिहास आपल्या माथ्यावर मारला गेला असता जर संभाजी ब्रिगेड नसते तर. हे तर संभाजी ब्रिगेडचे आभार मानले पाहिजेत.
संभाजी ब्रिगेड हा बहुजन महापुरुषांच्या स्वाभिमानाचा त्यांच्या चळवळीचा मुद्दा आहे.त्यामुळे वरील बोधकथा येथे सुद्धा लागू होते.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान झाला त्या इतिहासामध्ये बदनामी करणार्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले असा इतिहास होईल ना की समर्थकांच्या यादीत त्यांचे नाव असेल.भांडारकर प्राच्यविद्या संस्था ही संशोधनाचे किंवा ज्ञानाचे केंद्र राहीले नसून ते मनुवाद्यांच्या नालायकपणाचा आणि षडयंत्राचा अड्डा बनले आहे.ही बाब तेंव्हा नोंदविली जाईल.ज्याप्रमाणे चिमणीने आपल्या क्षमते प्रमाणे आग विझवण्यासाठी धडपड केली म्हणूण तीचे नाव आग विझवण्यार्यांच्या इतिहासात अव्वल राहील.तसेच आज ज्या भांडारकर नावाच्या बौद्धिक वेश्यागिरी केंद्राने जी घाण किंवा जे षडयंत्र केले त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले हा इतिहास लिहिला जाईल.त्या इतिहासात संभाजी ब्रिगेड चे नाव अमर होईल यात तीळमात्र शंका नाही.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान करणार्या मनुवाद्यांना संभाजी ब्रिगेड चांगलाच धडा शिकवेल अशी अपेक्षा करुया.मराठ्यांनो आपला तेजस्वी इतिहास जीवंत ठेवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडला पर्याय नाही हे लक्षात घ्या. तो इतिहास त्याचा पुरावा राहील.हे होणार आहे ते निश्चित होणारच आहे.