इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा भारतीय इतिहासकारांनी "भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा" म्हणुन खुपच उदो उदो केला आहे आणि त्या उठावातील काहीजणांचे इतके उदात्तीकरण करण्यात आले आहे की, एका विशिष्ट समाजापलिकडे भारतीय स्वातंत्र्याबाबत कुणालाही जाणीव नव्हती असे वाटू लागले.खारे पाहता प्रत्यक्ष १८५७ उठाव हे भारतीय स्वातंत्र्यासाठी केले बंड होते की धार्मिक भावना दुखावल्याने निर्माण झालेले बंड होते याचा मागोवा घेतला पाहिजे.इतिहासाचा निरपेक्षपणे अभ्यास केला तर स्पष्ट्पणे जाणवते की भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि भारतीय स्वातंत्र्याचे तोरण बांधले.म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे तोरण इ.स.१६४६ मध्ये तोरणगड जिंकुणच बांधले गेले."साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली. - मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया)"
शिवरायांच्या इ.स.१६४६ मधील इस्लामी राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणुन संबोधावे लागेल.कारण अखेर इस्लामी राजवट ही अभारतीय होती, परकीय होती.भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था (सत्ता) अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात.परकीय राजवटीतून भारताची व भारतीयांची मुक्तता करण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्यासाठीच झालेला प्रयत्न ठरतो.इंग्रज परकीय होते.म्हणूण त्यांच्या विरोधातील उठाव भारतीय स्वातंत्र्यासाठी ठरतो तर मग त्या इंग्रजांच्या आधी आलेले आणि नंतर प्रशासक म्हणून प्रस्थापित झालेले परकीय ठरत नव्हते काय ? परंतू वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना छत्रपती शिवरायांना "पहिले भारतीय स्वातंत्र्य योद्धा" ठरवणे अडचणीचे गेले असावे.कारण त्यातून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रारंभाचे श्रेय मराठ्यांकडे गेले असते.मग काहीही न करता स्वातंत्र्याचे श्रेय लाटता येत नसते.
छत्रपती शिवरायांनी अभारतीय राजवटी विरोधात तोरणा किल्यावर स्वातंत्र्याचे निशाण फ़डकवले.ही घटना भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नातील पहिली घटना होय.असे नमुद केल्यावर काहीजन दुखावतील हे निश्चीत त्याबद्दल क्षमस्व !.यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की त्यावेळी राज्य व राजवटी होत्या.तशी महाराष्ट्रातही मराठी राज्य स्थापन करण्यासाठी ,एक राजवट स्थापन करण्याचा शिवरायांनी प्रयत्न केला.तथापि त्याला सकल भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न कसा म्हणता येईल ? या प्रश्नाचे उत्त्तर अगदीच सोपे आहे.भारतात वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्र स्थानावरून दिल्लीवरून होणारा कारभार हा अखेर अभारतीय राजवटीखालीच होत होता जिच्या विरोधात शिवरायांचा उठाव होता.शिवरायांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्य स्थापन करण्याइतके सीमित नव्हतेच. त्यांच्यावर तसा आरोप करणे कमालीचे संकुचितपणाचे होईल.शिवाय महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा याही प्रदेशावर स्वार्या करतात आणि दिल्लीशहाच्या भेटीला जाण्यात त्यांचा हेतू असाही असू शकतो की उद्या अखील भारतावर करण्याची संधी मिळाली तर दिल्लीवर स्वारी करण्यासाठी ज्या मार्गाने जावयाचे आहे.तो मार्ग आधीच नजरेखालून घातलेला बरा.या उद्देशानेच ते दिल्लीला गेले व आग्र्यावरून सुटका करून घेतल्यानंतर बिहार मार्गे परतले असण्याची शक्यता आहे.
भारतीयांचे विशेषत: महाराष्ट्रिय जनतेचे दुर्दैव की शिवरायांसारख्या महापुरुषांना दिर्घायुष्य लाभले नाही,स्वजनांचे सहकार्य लाभले नाही.
सर्वधर्म समभाव की धर्मांधता ?
धार्मिक व राजकीय स्वार्थापुरता विचार करणारे "विचारवंत" छत्रपती शिवरायांच्या सामाजिक उल्लेखाकडे दुर्लक्ष करतानाच शिवरायांच्या धर्मविषयक द्रुष्टीकोनाकडेही अत्यंत पुर्वाग्रहदुषीत व उपेक्षीत द्रुष्टीनेच बघतात.शिवराय सर्वधर्मसमभाव पाळत होते की धर्मांध होते ?.
यशस्वी राज्यकर्या हा धर्मांध असून चालत नाही,हा संदेशच जणू शिवरायांनी आपल्या चरित्रात दिलेला आहे.शिवरायांच लढा हा इस्लाम धर्म व सर्व सामान्य मुसलमान याच्या विरोधात नव्हताच.त्यांचा लढा स्वराज्यासाठीचा होता.तो इस्लामी राजवटी विरोधात होता.भारतात हिंदू धर्मातील छळाला कंटाळून शुद्र वर्णातील अनेकांनी मध्ययुगीन काळात बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता.भारतामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होण्याची कारणे ही सुद्धा शुद्र वर्णातील लोकांना मिळणार्या हिनसकतेच्या वागणुकीमध्येच होती.शुद्रांना हिनसकतेमध्ये ठेवण्यासाठी ज्याप्रकारे ज्ञान संपादनाची मनाई करण्यात आली होती,त्याचप्रमाणे कर्मकाडांदी निराधार प्रकारांची निर्मीती करण्यात आली होती.वैशिष्ट्ये म्हणजे साराच प्रकार धर्माच्या नावाखाली चालत होता.अशा धर्मात शिवरायांनी जन्म घेतला होता हे सत्य असले तरी त्या धर्माची धर्मांध भुमिका स्विकारून त्यांनी व्यवहार केल्याचे एकही उदाहरण संपुर्ण शिवचरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही.याउलट त्यांची अन्य धर्माबाबतची भुमिका ही आदराची व सर्वधर्मसमभावाचीच आढळते.
अजुन महत्वाचे म्हणजे शिवकालीन संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही नव्हता.त्यांचे मुळ कारण त्यापुर्वी सुमारे सहाशे वर्षे अगोदर आलेले मुस्लिम हे या मातीशी समरस झालेले होते.सुफ़ी संप्रदायाने तर निखळ मानवतावादाची पेरणी केली होती.जगदगुरु संत तुकाराम महाराजां प्रमाणेच कुळशी येथील मुस्लिम संत बाबा याकुत हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थानी होते.काशीनाथ आठल्ये यांनी "महाराष्ट्राचा राजा : छ.शिवरायांचे चरित्र" या पुस्तकाच्या प्रुष्ठ २१९ वर शिवरायांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे.त्यात बाबा याकुत केळशीकर या नावाचा उल्लेख आहे.इतकेच नव्हे प्रुष्ठ २२५ वर बाबा याकुत यांस आपले गुरु केले असे नमुद केले आहे.क्रुष्णराव केळूसकर लिखित शिवचरित्रातही बाबा याकुतांचा उल्लेख आहे.रियासतकार यांच्या "न्यू हिस्ट्री ऑफ़ द महाराज" या ग्रंथातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र तीरावर बागकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गांवचे बाबा याकुत असल्याचा उल्लेख आहे.(प्रुष्ठ १३ ) या सर्व बाबीवरून समजून येईल की शिवराय व त्यांचे पुर्वज यांचे इस्लाम धर्म आणि सर्व सामान्य मुस्लिम यांच्याशी वैर नव्हते आणि स्वातंत्र्याचा उठाव हा इ.स.१८५७ मध्ये नसून इ.स.१६४६ मध्येच झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचे पहिले योद्धे विश्ववंद्य कुळवाडीभुषण छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत.
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र