इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा भारतीय इतिहासकारांनी "भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा" म्हणुन खुपच उदो उदो केला आहे आणि त्या उठावातील काहीजणांचे इतके उदात्तीकरण करण्यात आले आहे की, एका विशिष्ट समाजापलिकडे भारतीय स्वातंत्र्याबाबत कुणालाही जाणीव नव्हती असे वाटू लागले.खारे पाहता प्रत्यक्ष १८५७ उठाव हे भारतीय स्वातंत्र्यासाठी केले बंड होते की धार्मिक भावना दुखावल्याने निर्माण झालेले बंड होते याचा मागोवा घेतला पाहिजे.इतिहासाचा निरपेक्षपणे अभ्यास केला तर स्पष्ट्पणे जाणवते की भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि भारतीय स्वातंत्र्याचे तोरण बांधले.म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे तोरण इ.स.१६४६ मध्ये तोरणगड जिंकुणच बांधले गेले."साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली. - मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया)"
शिवरायांच्या इ.स.१६४६ मधील इस्लामी राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणुन संबोधावे लागेल.कारण अखेर इस्लामी राजवट ही अभारतीय होती, परकीय होती.भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था (सत्ता) अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात.परकीय राजवटीतून भारताची व भारतीयांची मुक्तता करण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्यासाठीच झालेला प्रयत्न ठरतो.इंग्रज परकीय होते.म्हणूण त्यांच्या विरोधातील उठाव भारतीय स्वातंत्र्यासाठी ठरतो तर मग त्या इंग्रजांच्या आधी आलेले आणि नंतर प्रशासक म्हणून प्रस्थापित झालेले परकीय ठरत नव्हते काय ? परंतू वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना छत्रपती शिवरायांना "पहिले भारतीय स्वातंत्र्य योद्धा" ठरवणे अडचणीचे गेले असावे.कारण त्यातून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रारंभाचे श्रेय मराठ्यांकडे गेले असते.मग काहीही न करता स्वातंत्र्याचे श्रेय लाटता येत नसते.
छत्रपती शिवरायांनी अभारतीय राजवटी विरोधात तोरणा किल्यावर स्वातंत्र्याचे निशाण फ़डकवले.ही घटना भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नातील पहिली घटना होय.असे नमुद केल्यावर काहीजन दुखावतील हे निश्चीत त्याबद्दल क्षमस्व !.यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की त्यावेळी राज्य व राजवटी होत्या.तशी महाराष्ट्रातही मराठी राज्य स्थापन करण्यासाठी ,एक राजवट स्थापन करण्याचा शिवरायांनी प्रयत्न केला.तथापि त्याला सकल भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न कसा म्हणता येईल ? या प्रश्नाचे उत्त्तर अगदीच सोपे आहे.भारतात वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्र स्थानावरून दिल्लीवरून होणारा कारभार हा अखेर अभारतीय राजवटीखालीच होत होता जिच्या विरोधात शिवरायांचा उठाव होता.शिवरायांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्य स्थापन करण्याइतके सीमित नव्हतेच. त्यांच्यावर तसा आरोप करणे कमालीचे संकुचितपणाचे होईल.शिवाय महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा याही प्रदेशावर स्वार्या करतात आणि दिल्लीशहाच्या भेटीला जाण्यात त्यांचा हेतू असाही असू शकतो की उद्या अखील भारतावर करण्याची संधी मिळाली तर दिल्लीवर स्वारी करण्यासाठी ज्या मार्गाने जावयाचे आहे.तो मार्ग आधीच नजरेखालून घातलेला बरा.या उद्देशानेच ते दिल्लीला गेले व आग्र्यावरून सुटका करून घेतल्यानंतर बिहार मार्गे परतले असण्याची शक्यता आहे.
भारतीयांचे विशेषत: महाराष्ट्रिय जनतेचे दुर्दैव की शिवरायांसारख्या महापुरुषांना दिर्घायुष्य लाभले नाही,स्वजनांचे सहकार्य लाभले नाही.
सर्वधर्म समभाव की धर्मांधता ?
धार्मिक व राजकीय स्वार्थापुरता विचार करणारे "विचारवंत" छत्रपती शिवरायांच्या सामाजिक उल्लेखाकडे दुर्लक्ष करतानाच शिवरायांच्या धर्मविषयक द्रुष्टीकोनाकडेही अत्यंत पुर्वाग्रहदुषीत व उपेक्षीत द्रुष्टीनेच बघतात.शिवराय सर्वधर्मसमभाव पाळत होते की धर्मांध होते ?.
यशस्वी राज्यकर्या हा धर्मांध असून चालत नाही,हा संदेशच जणू शिवरायांनी आपल्या चरित्रात दिलेला आहे.शिवरायांच लढा हा इस्लाम धर्म व सर्व सामान्य मुसलमान याच्या विरोधात नव्हताच.त्यांचा लढा स्वराज्यासाठीचा होता.तो इस्लामी राजवटी विरोधात होता.भारतात हिंदू धर्मातील छळाला कंटाळून शुद्र वर्णातील अनेकांनी मध्ययुगीन काळात बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता.भारतामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होण्याची कारणे ही सुद्धा शुद्र वर्णातील लोकांना मिळणार्या हिनसकतेच्या वागणुकीमध्येच होती.शुद्रांना हिनसकतेमध्ये ठेवण्यासाठी ज्याप्रकारे ज्ञान संपादनाची मनाई करण्यात आली होती,त्याचप्रमाणे कर्मकाडांदी निराधार प्रकारांची निर्मीती करण्यात आली होती.वैशिष्ट्ये म्हणजे साराच प्रकार धर्माच्या नावाखाली चालत होता.अशा धर्मात शिवरायांनी जन्म घेतला होता हे सत्य असले तरी त्या धर्माची धर्मांध भुमिका स्विकारून त्यांनी व्यवहार केल्याचे एकही उदाहरण संपुर्ण शिवचरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही.याउलट त्यांची अन्य धर्माबाबतची भुमिका ही आदराची व सर्वधर्मसमभावाचीच आढळते.
अजुन महत्वाचे म्हणजे शिवकालीन संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही नव्हता.त्यांचे मुळ कारण त्यापुर्वी सुमारे सहाशे वर्षे अगोदर आलेले मुस्लिम हे या मातीशी समरस झालेले होते.सुफ़ी संप्रदायाने तर निखळ मानवतावादाची पेरणी केली होती.जगदगुरु संत तुकाराम महाराजां प्रमाणेच कुळशी येथील मुस्लिम संत बाबा याकुत हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थानी होते.काशीनाथ आठल्ये यांनी "महाराष्ट्राचा राजा : छ.शिवरायांचे चरित्र" या पुस्तकाच्या प्रुष्ठ २१९ वर शिवरायांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे.त्यात बाबा याकुत केळशीकर या नावाचा उल्लेख आहे.इतकेच नव्हे प्रुष्ठ २२५ वर बाबा याकुत यांस आपले गुरु केले असे नमुद केले आहे.क्रुष्णराव केळूसकर लिखित शिवचरित्रातही बाबा याकुतांचा उल्लेख आहे.रियासतकार यांच्या "न्यू हिस्ट्री ऑफ़ द महाराज" या ग्रंथातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र तीरावर बागकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गांवचे बाबा याकुत असल्याचा उल्लेख आहे.(प्रुष्ठ १३ ) या सर्व बाबीवरून समजून येईल की शिवराय व त्यांचे पुर्वज यांचे इस्लाम धर्म आणि सर्व सामान्य मुस्लिम यांच्याशी वैर नव्हते आणि स्वातंत्र्याचा उठाव हा इ.स.१८५७ मध्ये नसून इ.स.१६४६ मध्येच झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचे पहिले योद्धे विश्ववंद्य कुळवाडीभुषण छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत.
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र
अफ़लातून! छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याची पहिली मुहुर्तमेढ रोवली.तेच पहिले स्वातंत्र्य योद्धा आहेत.
ReplyDeleteजय शिवराय । जय महाराष्ट्र
धन्यवाद चंदु प्रतिक्रियेबद्दल
Deleteअसा अजुन बराच इतिहास आपल्याला बाहेर काढायचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतवर्षाचे श्रेष्ठ युगपुरूष, त्यांचे प्रेरणादायी जीवनकार्य म्हणजे नवसंजीवनी.
ReplyDeleteमला आभिमान आहे की मी हिन्दवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजांच्या सहवासाने पवन झालेल्या मातीत जन्माला आलो!!!जय भवानी जय शिवाजी !!!
ReplyDeleteऔरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
ReplyDeleteअडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत
होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग
म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना
बसून त्यानं दख्खनच्या भूमींत
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव त्याचं ”छत्रपती शिवाजी”
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
ReplyDeleteनिधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."................................................!!
"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन..
ReplyDeleteशिवबा म्हणजे पवित्रता ..शिवबा म्हणजे सुंदरता
ReplyDeleteशिवबा म्हणजे संपन्नता ..शिवबा म्हणजे स्वातंत्र
शिवबा म्हणजे साहस ..शिवबा म्हणजे खास
शिवबा म्हणजे एकी ..शिवबा म्हणजे नेकी
शिवबा म्हणजे श्वास ..शिवबा म्हणजे ध्यास
शिवबा म्हणजे विश्वास ..शिवबा म्हणजे पापाचानाश
शिवबा म्हणजे स्वराज्य ..शिवबा म्हणजे आयुष्याचा भाग अविभाज्य
ना मोठेपणासाठी ना स्वार्थासाठी ,
जीव तडापतो फ़क्त रयतेसाठी.
"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत असाल मला,
ReplyDeleteपण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच राहिले नाहीत हो,
आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो,
"आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप गडावर पोहोचु "
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल का आबासाहेब?
पण ते हातही उरले नाहीत आता,
अन् तुम्हाला "आबासाहेब!!!" अशी साद घालायला जीभही उरली नाही हो,
पण एक सांगतो आबासाहेब,
रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र होणार असेल,
आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार असेल,
तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन
"हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे"
जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत
मरायच कसं हे मी शिकवेन..."
जाता जाता वदलं,माझं शंभूराजं,
जय रौद्र शंभो...
मला कोण सांगेल का की बामनांनी आयुष्यात येऊन कोणते चांगले काम केले आहे का ?नुसती नालायकी केली आहे असं पक्क आहे बघा सावध रहा..
ReplyDeleteमीत्रा ब्राह्मणांनी बरेच चंगले काम केले आहे पण ते ब्राह्मण असल्यामुळे ते आता कर्त्रुत्व शुन्य झाले आहेत.आजकाल नवीन ट्रेंड आहे की ब्राह्मण म्हंटला की चुकीचे लिहिणाराच, मग ही प्रतिमा कधी सुधारणार काय माहीत.
Deleteसह्याद्रीपुत्र आम्ही उगाच कुणाच्या वाटेला जात नाही
ReplyDeleteआलाच जर कोणी आडवा उभा चीरल्याशिवाय सोडत नाही.
|| जय हो शिवराया ||
|| जय जय शंभूराया |
शिवराय निधर्मी होते असे म्हणणार्यांना सवाल..
ReplyDeleteशिवरायांनी स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात का घेतली ?
महाराजांची युद्ध गर्जना हर हर महादेव का होती ?
महाराजांनी भवानी देवीची उपासना का केली ?
महाराजांच्या प्रत्येक पत्रव्यवहारावर श्री मोरया का म्हटले आहे ?
महाराज सर्व-धर्म समभावी होते , पण त्या आधी ते स्व-धर्माभिमानी होते ..
म्हणूनच त्यांनी आपल्या स्वराज्याला हिंदवी स्वराज्य म्हटले आहे ..
तुमच्या व्होटबँकसाठी आणि सेकुलरपनाच्या बुरक्यासाठी महाराजांची प्रतिमा बदलू नका ..
जय शिवराय ! जय शंभूराजे !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदूपातशाहीचा पाया घातला. रयतेचे स्वराज्य निर्माण केले. अखंड भारत वर्षामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली. शिवरायांनी कशाच्या बळावरती हे स्वराज्य, स्वतंत्र साध्य केले? तलवारीच्या ? नाही ! ती तलवार पकडणाऱ्या बाहूंच्या बळावर अशक्यप्राय ते शक्य करून दाखवले. पण ते बल त्या बाहूंमध्ये आले कुठून? हृदयामधून . प्रेमाशिवाय माणसे एक होणार नाहीत आणि माणसे एकत्र आल्याशिवाय समाज निर्माण होणार नाही. जर समाजच नसेल तर धर्माचे कार्य काय राहते? शिवरायांनी हे बरोबर ओळखले होते. प्रेम व जिव्हाळा हे राजांच्या धर्मसंस्थापनेमधील प्रमुख सूत्र होते. " ज्ञानेश्वर माऊलीने पाया रचला, तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला आणि या भागवत धर्माच्या मंदिरात स्वातंत्रदेवतेची प्रतिष्ठापना केली ती युगपुरुष शिवाजी महाराजानी." स्वराज्य निर्मिती प्रेमाच्या अधिष्ठानावर झाली होती. द्वेषाच्या नव्हे. याउलट सुलतानी सत्ता व फिरंगी सत्ता ही द्वेषावर आधारित होती. भायावार आधारित होती.
ReplyDeleteजय देव, जय देव, जय जय शिवराया ।
ReplyDeleteया, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥
अर्थ :- हे शिवराया तुझा जयजयकार असो.तुझ्याशी अनन्य शरण झालेल्या आर्यांचे (भारतीयांचे) तारण करण्याकरता, त्यांच्यावरील आलेल्या संकटांचे निवारण करण्याकरता तु ये.
मोहिते - तुम्ही इथे दिलेली आरती कोणी लिहिलीये माहित्ये का ? किव्वा कोणत्या गीत संग्रह मधली आहे माहित्ये का ? सध्या सर्वात जास्त ज्याचा द्वेष होतो त्या ब्राह्मण समाजाच्या लोकांनी लिहिलेला हा संग्रह आहे. माहित नसेल तर सांगतो -
Deleteसंग्रह - शिवकल्याण राजा
लेखक - संत रामदास स्वामी, कवी भूषण, स्वातंत्र्यवीर सावरकर गोविंदाग्रज (म्हणजेच राम गणेश गडकरी), कुसुमाग्रज (म्हणजेच वि वा शिरवाडकर), शंकर वैद्य
संगीतकार - ह्रीदाय्नाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर आणि इतर
तुम्ही कीतीह आव आणून म्हणा कि आम्ही ब्राह्मण लोकांचा द्वेष करत नाही, आम्ही फक्त विकृत ब्राह्मणांचा निषेध करतो पण हे सगळे वरवरचे आहे. ज्या प्रकारे संत रामदासस्वामींचे चारित्र्य हनन आणि टीका केली जाते त्याला काही मर्यादा नाहीत सध्या. असो.
आणि हो एक जाता जाता सांगतो. आपण लोक इथल्या ब्लोग्वारचे , धाकला पाटील धरून, चुकीचे अर्थ आपल्या सोयीने काढण्यात पटाईत आहात. तर सांगायचे असे कि छत्रपति शिवाजी महाराज आहे निर्विवाद आणि निसंशय उत्तुंग व्यक्तिमत्व होते आणि म्हणूनच सर्व जातिभेदाच्या भिंती पाडून लोक त्यांना पूजतात . आज लोक आप आपले अजेंडा पुढे सर्काव्ण्यासाठी नेमक्या त्याच भिंती परत उभारू पाहत आहेत
आम्हाला माहीत आहे की ब्राह्मणांनी शिवरायांच्यावर बरेच लिखान केले आहे.परंतू आम्ही अशा थोड्या लोकांमुळे सर्वांना माफ़ करू शकत नाही.राहिला प्रष्न द्वेषाचा तर हा द्वेष तुम्ही समजत असाल तर आम्हाला काही फ़रक पडत नाही कारण हा द्वेष नसून विरोध आहे लक्षात घ्या
Deleteप्रतिक्रियाबद्दल धन्यवाद !
खान लव्हा लव्हा बोलिला । खानाचा लव्हा बेगीन आला ।।
Deleteअफझलखान झाला पुरा । कृष्णाजी ब्राह्मण उठविला ।।
शिवाजीराजा बोलला । ब्राह्मणा मारू नये तुला ।।
तुजसी मारता शंकर हसे आम्हला । ना ऐकता ब्राह्मणाने,हात दुसरा मारिला ।।
ब्राह्माणा मारू नये तुला । क्रिया शहाजीची आम्हाला ।।
कृष्णाजी ब्राह्मणे हात तिसरा टाकीला । तरी होईल ब्रह्...महत्त्या भोसल्यांसी ।।
म्हणून शिवाजीने राखिला । शेवटी कृष्णाजी ब्राह्मण कापिला ।।
ब्राह्मणाला मधी मधी आणणं गरजेचं आहे का ? प्रत्येक लेखामध्ये आपण ब्राह्मण का घुसडता तेच मला समजलं नाही.इतिहासकारांनी चुकिचे लिहिले ते फ़क्त ब्राह्मण म्हणून द्वेष करणे चुकीचे नाही का ? असे ब्राह्मण समाजावर आरोप करणे सभ्यपनाचे लक्षण आहे का ? विचार करा आम्हिही अशा विक्रुत इतिहासकारांचे समर्थन न करता निषेदच करतो
ReplyDeleteजय शिवाजी । जय भवानी
शिवराय हे स्वातंत्र्याचे पहिले योद्धा आहेत हे तर आम्ही सगळे मान्य करतोच पण यासाठी आपण ब्राह्मण इतिहासकारांचे नाव घॆणं बरं नाही कुठंपर्यंत आपण ब्रह्मण बांधवांचा अपमान करत रहायचं ? हे मान्य की ब्राह्मण इतिहासकारांनी चुकीचा पण सगळा नही थोडाच लिहिला मग काय त्याचे दोष सगळ्या ब्राह्मणांना कधीपर्यंत सोसावे लागणार ?
ReplyDeleteबाकी लेख अद्भुत्म......
๑۩۞۩๑ || जय शिव प्रभू || ๑۩۞۩๑
ReplyDelete|| ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहेत्या घरात कुणाच्याही आब्रुला धोका नाही.....पाहिलतं गेल्या साडे तिनशे वर्षा नंतर ही माझ्या शिवाजी राजा बद्द्ल जनमाणसांमध्ये जी प्रतिमा आहे...ती हिच प्रतिमा आहे शिवाजी राजे स्मरणात आहेत ते फक्त एव्हढ्या साठी... ........त्यांचा जय जयकार आहे तो फक्त एव्हढ्या साठी... ||
ll एक आवाज एकच पर्याय ll
๑۩۞۩๑ ॥ जय जिजाऊ जय ॥ ๑۩۞۩๑
๑۩۞۩๑ ॥ जय शिवराय जय ॥ ๑۩۞۩๑
๑۩۞۩๑ ॥ जय शंभुराजे जय ॥ ๑۩۞۩๑
नाद खुळा मित्रा
Deleteप्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार असेच वाचण सुरु ठेवा.
@peshwa paya namdevane rachala dnyandevani nahi
ReplyDelete@peshwa
ReplyDeletenamdevane rachila paya dnyndevane nahi
adhi jati bahishkrut karayche ani nantar fayada disalatar udo-udo karaycha
मित्र मी ब्राह्मण आहे आणि मी कधी मराठ्यांचा अपमान किंवा द्वेष केला नाही.मग तुम्ही का करता आणि ज्ञानेश्वर यांची काय चुक झाली.की तुम्ही वारकरी सांप्रदाय पासून तुम्ही त्यांना वेगळे का करता ?
Delete@prabhune
Deletemitra dnyneshwarala khara adhar ha bahujan samajane dila aahe ani varti mi fakt varkari sampradayacha paya namdevani rachala ase sagitale dnyneshwar varkari sampradayt navate aae mhanalo nahi fakt tumchy jith tith brahmanala sarvpratam ananach jo tumhi prayatna karta tya baddal bolloy
मित्रा हे जगजाहीर आहे की पाया हा ज्ञानेश्वरांनी रचला आणि तुकाराम महाराज कळस झाले .आज वारकरी सांप्रदाय त्यांच्या भक्तिवरच चालतो क्रुपया अशा विक्रुतीकरणाच्या प्रतिक्रिया देऊ नये.का ते निव्वळ ब्राह्मण आहेत म्हणुन तुम्ही त्यांना दुय्यम स्थान देताय?
DeleteAre dnyneshwar maharajana duyyam sthan he tumchatil vikrut lokani tyana valit takun dile. Tyana kare prem va aadhar ha bhaujan samajane dila. Aani bhahinabai cha to abhang mala mahit aahe. Namdeo maharaj he dnyneshwar maharajahun vayane jestha aahet.
Delete