9 March 2013

इतिहासातील अनमोल रत्न : बळीराजा

            शेतकर्यांच्या द्रुष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास नीट समजून घेणे आवश्यक आहे.भारतातील समाजाचा सांस्क्रुतीक, सामाजिक, वगैरे प्रकारचा इतिहास जाणुन घेण्यासाठी प्रस्तुत लेखाचा प्रपंच महात्मा जोतिराव फ़ुले यांनी दस्युचा पोवाडा लिहिला आहे.त्यांच्या तिसर्या कडव्याची सुरुवात "बळी राजादि कुळ स्वामीला" या शब्दांनी केलेली आहे.याचाच अर्थ बळीराजाला ते आपल्या अत्यंत आदरणीय पुर्वज मानतात.बळी ! एक लोक कल्याणकारी राजा,मानवतावादाचा महान पुजारी,दानशूर,विश्वबंधुत्वाचे आचरण करणारा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी होऊन गेलेला बहुजन समाजाचा एक महासम्राट बळीराजा.ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले,पण तत्वांशी तडजोड केली नाही.आपल्या जीवात जीव असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.बहुजन समाजावर कोणतेही अत्याचार होऊ दिले नाहीत.पण आपण मात्र धन्य की आपण आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच राजाचा अपमान सहन करत आलो आणि सहन करत आहोतच. आपण आज खॊट्या नाट्या पुराण कथांना बळी पडलो आहोत.स्वत:चे डोके कधी वापरतच नाही.आपण आपल्या राजासाठी कायमची ह्रुदये बंद करून टाकलीत.
बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता.आपल्याकडे सुपीक शेतीमध्ये सर्व जनतेला ज्ञान होते.शेतकर्यांना सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती.प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती.कुठलाच अधर्म नव्हता.शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट होते.स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असे.अत्यंत सुरेख आणि सम्रुद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी वसवली होती.दस्युचे स्वत:ची सम्रुद्ध नगरे होती.याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत सम्रुद्ध आणि संपन्न व विकसित होते.असं हे सुखी व सम्रुद्ध राज्य परकीय आक्रमकांनी नष्ट केले.
महात्मा जोतिराव फ़ुले यांनी केलेली या कथेची चिकित्सा :-
चिकित्सा करताना फ़ुले समग्र वाड:मयात म्हणतात वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता.प्रुथ्वी व आकाशातील अंतर करोडो मैल आहे.माणसाचा एक पाय जमिनीवर असल्यास तीन फ़ुट अंतरावर जाता येत नाही कारण त्याच्या पायाची लांबी व दोन पायातील अंतर मर्यादित असते.वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात असता तर वामनाची ....फ़ाटून गेली नसती काय ? (फ़ुले समग्र वाड:मय) डॉ.आ.ह.साळूंखे - बळीवंश या पुस्तकात प्रुष्ठ क्रमांक २०१ वर म्हणतात वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते.लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता.तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते.म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल  आणि इतरांनी लिहिणे, वाचणे , बोलणे  या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला.तात्पर्य यज्ञाने भुमी व्यापणे,वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे.
याचात अर्थ आजची आपली स्थिती सर्कशीतल्या वाघाप्रमाणे आहे.तुम्हाला ट्रेनिंग दिलय, तुम्ही तुमच्यात भांडणे करा पण चुकुनही आमच्यावर वार करू नका.तुमची नखे काढून टाकलीत.तुमच्या दाताला रक्ताची चव लागू नये म्हणून तुम्हाला पिंजर्यात कोंडून ठेवलय.एका विशिष्ट चौकटीत आपण बंदिस्त आहोत.जन्मापासून तर मरे पर्यंत आपल्याला बामन चिकटलाय.अरे आठवा आपल्या पुर्वजांचा इतिहास आणि तोडा सर्व गुलामीच्या चौकटा. कोणाच्या आदेशावर कशाला चालता.आपल्याला डोकं आहे ना ? काय खरं आणि काय खोटं तपासून घ्या.अरे कॊण दिड फ़ुट असलेला वामन आपल्या बळीराजाला मारणारा आपला देव अवतार कसा ? आजही शेतकरी बळीप्रतिपदेला "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" असं म्हणतात. याचाच अर्थ बळीराजा महान असला पाहिजे आणि वामन वाईट असला पाहिजे.तेंव्हा प्रत्येक बहुजनांने बळीराजाचे गुणगान गायले पाहिजे.इतिहासातील एका अनमोल रत्न असलेल्या महात्मा बळीराजाला खरे अभिवादन हेच ठरेल.
"इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे"  ॥ "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" 

11 प्रतिक्रिया :

  1. खूपच उपयुक्त माहिती आहे.आणि खूप छान प्रयत्न आहे तुमचा.बळीराजाविषयी आजपर्यंत कधी वाचलं नव्हतं

    ReplyDelete
  2. ! बळीराज्य !
    बळीराजा हा भारतीय आद्य सिंधू संस्कृतीचा महानायक,महासम्राट होता.आपल्या उच्च-उदात्त संस्कृतीचा जागर करण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजा घडविण्यासाठी आपल्याला बळीराजा महोत्सव घेणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  3. सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस ‘माणूस’ ! आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता !! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर !!!
    बळी – हिराण्याकाशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व ! सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता !
    या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे - आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे ! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.

    ReplyDelete
  4. हे लोक इराणी नसावेत कारण इराण मध्ये इस्लाम धर्म होता युरेशियन आहेत असे धरले तर घरे गोरे लोक म्हणायचे . घरे गोरे लोक फक्त कोकणात, काश्मीर आणि थोडे फार पंजाब मध्ये. बाकी दक्षिणेत सावळे अथवा अति सावळे. म्हणजे इथलेच लोक.
    इस्लाम धर्माने भारतामध्ये प्रेम, सौहार्द, शांती आणली. ख्रिस्चन धर्माने प्रगती आणली. पारशी लोकांनी चिकाटी आणली. ज्यू धर्माने बुद्धी धैर्य आणि बुद्धी आणली.

    ReplyDelete
  5. युरेशियन लोकांचा पगडा तुमच्यावर किती आहे !. तुमच्या ब्लोग वर तुम्ही दिवाळी, संक्रांत आणि गुढी पाडवा चे शुभेच्छापत्र टाकले आहे. ते सगळे युरेशियन लोकांचे प्रतिक आहे. गुढी पाडवा ला संभाजी महाराजांची हत्या काही करून घेण्यात आली आणि काही मोजक्या समाजाची लोकांनी पेढे वाटले असे ब्रिगेड च्या अभ्यासू लोकांनी निष्कर्ष काढला आहे.असे असताना बहुजन नेत्यांचा अपमान होऊ नये असे वाटते
    दिवाळी हा देखील युरेशियन लोकांचा सन आहे. लक्ष्मी पूजा, वगैरे ह्या गोष्टीला किती महत्व देत धाकला पाटील.
    संक्रांतीला पण असेच काहीतरी घडले युरेशियन लोकांसाठी. नेमके काय ते लक्षात नाही. पण ब्रिगेड च्या काही चिंतनशील नेत्यांचा अभ्यास झाला आहे ह्यावर . आपण ह्यावर विचार कराल आणि ब्लोग शुद्धी कराल अशी अपेक्षा

    ReplyDelete
  6. मित्रहो,अजूनही आपली बहिण भाऊबीज ला ओवाळताना म्हणते की "ईडा पीडा जावो, बळीच राज्य येवो ! " म्हणजे बळीच राज्य चांगल होत .महात्मा फुलेंनी ह्याच म्हणीद्वारे बळीराजाचा इतिहास जगासमोर मांडला होता .तेव्हातर सिंधू संस्कृती च उत्खनन ही झालेलं नव्हत पण "तुका म्हणे झरा मूळचाच आहे खरा "या अभंगानुसार मुळची सिंधू संस्कृती/ बळी संस्कृती होतीच त्यामुळे लोकांनी ती म्हणी ,गाणी,वाणी ,द्वारे जपून ठेवलीय .सिंधू संस्कृती च उत्खनन झाल्यावर तर अख्ख्या जगाला माहित झाल कि वैदिक संस्कृती म्हणजे आर्य,हि भारताची आद्य संस्कृती नसून मातृसत्ताक बळीवंशीय सिंधू संस्कृती हि भारतीयांची मुळ संस्कृती आहे .

    ReplyDelete
  7. बळीला वामनाने का मारले -
    बळी अत्यंत सदगुणी होता,पराक्रमी,प्रजाहितदक्ष ,संविभागी होता.मानवाच्या इतिहासात शेती सर्वात जास्त भरभराटीला आली होती.बळीराजा शेतीला जीवापाड जपणारा होता ,म्हणूनच शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. शेतीची शेतकऱ्याची सर्वात जास्त काळजी वाहली ती याच लाडक्या बळीराजाने.बळीराज्यामध्ये लोक सुखी संपन्न होते.दु:ख काय असते हे कोणालाही माहित नव्हते.शेतकरी सुखी तर देश सुखी हे प्रत्यक्ष बळीराज्यात होते.अश्या या राज्यात लोक मेहनत करायचे तर मेहनतीत फळ & अत्यंत समाधानकारक परमोच्च आनंद मिळायचा.लोक आळशी नव्हते,दुखी नव्हते.कुठलाही भेदाभेद नव्हता.कर्मकांड नव्हते.अंधश्रद्धा
    नव्हत्या .बळीराजाने यज्ञ-संस्कृती नाकारली होती.मुळचे रहिवासी नसलेले आर्य मात्र याच गोष्टीमुळे दु:खी होते.बसल्या बसल्या आयत मिळत नव्हत .लोकांना यज्ञ कर्मकांडात गुंतवाव तर बळीचा विरोध .म्हणून वामनास बळी वर आक्रमण करायला आर्यांनी पाठवले .वैदिकांनी उर्फ आर्यांनी उर्फ ब्राम्हणांनी आजपर्यंत समोरासमोर युद्धात कुणाचा पराभव केलेला नाही.समोरासमोर नाही मग कपट करून मारणे सोपे म्हणून यांनी हाच मार्ग वापरला .

    ReplyDelete
  8. वामन नावाच्या ब्राम्हणाने बळीराजा च्या राज्यात प्रवेश केला .बळीराजाचा अतिशय दानशूर म्हणून भारतखंडात नावलौकिक होता.वामनाने ३ पावले जमीन बळीराजाला मागितली ,बळीराजा दानशूर असल्याने बळीराज्याने ३ पावले जमीन देण्यास होकार दर्शविला .वामनाने १ ले पाउल जमिनीवर ठेवले पूर्ण जमीन व्यापली गेली ,२ रे पाउल टाकले ते आकाश व्यापले मग वामनाने बळीराजाला विचारले "आता ३ रे पाउल कोठे ठेवू ", दानशूर बळीराजा म्हणाला"माझ्या डोक्यावर ठेव " आणि त्यानुसार वामनाने ३रे पाउल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले & आणि वामनाने बळीराजाला पाताळात घातले.

    ReplyDelete
  9. सर आपले लेख खूप छान आहेत खूप जनजागृती करू शकतात. आपले काही लेख जसेचे तसे मी http://sangharshmitrmandaldeogaon.blogspot.in/2016/04/blog-post_82.html येथे आपल्या नाव आणि आपल्या ब्लोग निशी आमच्या मित्र मंडळीसाठी ...पोस्ट केले असून आपली यावर हरकत असेल तर कळवावे.

    ReplyDelete
    Replies
    1. बहुजन समाजाच्या प्रबोधनासाठी तुम्ही माझे लेखन वापरू शकता.
      आपला ब्लोग वाचता येत नाही फ़क्त आमंत्रित लोकच वाचु शकतात सर्वांसाठी खुला करा वाचण्यासाठी

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.