पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती.या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता.परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते.या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की "पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? " ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती.
संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त "मराठा" शब्दाचा आधार घेतला जातो.याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच.तो फ़क्त पेशवाईचा असतो.
आमच्याच समाजातील लोक जेंव्हा पानिपतच्या लढाईबाबत बोलू किंवा लिहु लागतात,तेंव्हा ते गळा काढून रडतात की ,"मराठ्यांचा पानिपत मध्ये पराभव झाला, मराठे पानिपतमध्ये हरले" तर काही महाभाग असेही म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही ते हुतात्मे झाले ".या दोन्हीही प्रकारे रडणे म्हणजे यांचा हेतू एकच असतो तो म्हणजे पानिपतच्या लढाईचा संबंध मराठा या शब्दाशी जोडणे! या लढाईच्या वेळी सत्ता आणि नेत्रुत्व हे दोन्हीही पेशव्यांचे होते.पण पराभवाची व्याख्या मात्र "मराठा" या शब्दाच्या आधारे करायची, आहे की नाही चालूबाजी.स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर मराठ्यांच्या नावावर फ़ोडायचे! यालाच म्हणतात इतिहासाचे विक्रुतीकरण!. दोषी आहेत पेशवे पण आरोपी मात्र मराठ्यांना केले जाते.हा किती अत्याचार आहे! ब्राह्मणी व्यवस्था बहुजनांना आरोपीत करते हे एक वेळ ठीक आहे पण आपणच आपल्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल अरोपीत करून घेण्यात काय अर्थ आहे.? आणि काय शहाणपणा आहे ? यालाच महात्मा फ़ुले यांनी गुलामगिरी असे म्हंटले आहे.तर डॉ.बाबासाहेब म्हणतात की "गुलाम लोकांमध्ये जन्माला येणे गुन्हा नसून ,गुलामी सहन करणे हा खरा गुन्हा आहे!.
मराठा या शब्दामुळे नक्की काय घडते ?
१] पेशव्यांना लपण्याची संधी मिळते! जे पेशवे या पराभवाचे खरे सुत्रधार आहेत.
२] पेशव्यांच्या ऐवजी मराठ्यांचा संबंध लढाईशी जोडता येतो.
३] एकदा का पराभवाची व्याख्या मराठा शब्दाच्या आधारे गेली पराभवाचे धनी मराठेच आपोआप होतात.
४] मराठ्यांना ऐतिहासिक द्रुष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
५] व्यवस्था मराठ्यांमध्ये पराभवाचा न्युनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
६] पानिपतच्या संपुर्ण घटनेचे विक्रुतीकरण करणे शक्य होते.
पानिपतच्या सर्व लढायांचा संक्षिप्त इतिहास
पानिपत मध्ये एक नाही तर तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या आहेत.या तिन्ही लढायांना पानिपतची लढाई याच नावाने संबोधित केले जाते.
१] पहिली पानिपतची लढाई - २१ एप्रिल १५२६ , मोघल सेना विरुद्ध लोधी सुलतान सेना
नेत्रुत्व - बाबर विरुद्ध सुलतान ईब्राहिम लोधी, विजयी - मोघल सेना
२] दुसरी पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर १५५६ , मोघल सेना विरुद्ध सम्राट हेमचंद्र सेना
नेत्रुत्व - इटांगा खान विरुद्ध सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, विजयी - मोघल सेना
३] तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी १७६१ , दुररानी सेना विरुद्ध पेशवे(ब्राह्मण)
नेत्रुत्व - अहमदशहा अब्दाली विरुद्ध सदाशिव भाऊ, विजयी - दुररानी सेना
मराठ्यांना पानिपतच्या सर्व लढायांची किमान माहीती असणे गरजेचे आहे.यापैकी तिसर्या लढाईत पेशवाई व्यवस्था गळा काढून रडत असते आणि ते स्वाभाविक आहे कारण पानिपतच्या तिसर्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला आहे.
मराठ्यांनी जस्टीफ़िकेशन (Justification)का म्हणून द्यावे
युद्धातील पराभव असो किंवा कब्बडी या खेळतील पराभव असो,या पराभवाची जबाबदारी ही घ्यावी लागते आणि त्यानंतर पराभवाच्या कारणांचा विचार करावा लागतो.पानिपतच्या लढाईमध्ये पराभव हा पेशव्यांचा झालेला आहे.त्यामुळे पर्यायाने या पराभवाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.पेशव्यांचे वारस मात्र या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेऊ इच्छित नाही.याउलट ब्राह्मणी व्यवस्था या पराभवाला ’जस्टिफ़ाय’(Justify) करण्याचा बेगडी प्रयत्न करत असते आणि तो सुद्धा मराठ्यांना बदनाम करूनच.!
पेशव्यांचे वारस म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही, मराठे पानिपत मध्ये हुतात्मे झाले" हा या पराभवाला जस्टीफ़ाय करण्याचा केवीलवाना प्रयत्न आहे.इथे पेशव्यांचे वारस सफ़ाई देण्याचा प्रयत्न करत असतात.पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता हे जगजाहीर आहेच त्यामुळे काय जस्टिफ़िकेशन द्यायचे ते त्यांनी द्यावे त्यासाठी मराठ्यांना बदनाम करण्याची गरज नाही.पेशवाई व्यवस्था असे का म्हणत नाही की "पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला नाही तर पेशवेहुतात्मे झाले ! असे म्हंटले तर संपुर्ण भारतामध्ये कोणालाही वाईट वाटणार नाही. याउलट पेशवाई व्यवस्थेचे हसू येईल! हे पेशवाई व्यवस्था जाणुन आहे.म्हनुन ही व्यवस्था या पराभवाला "मराठा" शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करते.यामुळे या व्यवस्थेला पराभवातून लपण्याची संधी मिळते.
हे दुसर्या उदाहरणाद्वारे सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल की पेशवाईव्यवस्था मोठ मोठ्याने गळा काढून म्हणते की "गर्व से कहो हम हिंदू है !" जर आम्ही हिंदू आहोत तर सांगायची गरज काय आहे ? याचप्रमाणे पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला असता सांगायची गरज नसते,पण पराभव मराठ्यांचा झालेलाच नाही तर सांगावयाची गरजच काय आहे ? यामुळे मराठ्यांना या लढाईबाबत कोणतेही जस्टीफ़िकेशन देण्याची गरजच नाही.