"मनुष्य" सुद्धा उमललेल्या फ़ुलासारखा असतो. मनुष्य जन्माला येतो तो अस्तित्वाचा भाग म्हणून.चैतन्य त्याच्या नसानसातून धवत असतं .दु:खातून आनंदाकडे जाणारा हा प्रवाह अनेक दु:खी,कष्टकरी जनतेच्या अंत:करणात भरून जातो.ते भरणं त्यांच्या कष्टाचं सार्थक असतं.जन्माचं कल्याण करतं , आनंदाची , चेतनेची ज्योती चेतविण्याकरीताच हे अस्तित्वाचं लेणं आकार घेतं.
"शेणगांव" एक लहानसं खेडं.गावात शंभर - सव्वाशे कौलारू झोपड्या.ह्या खेड्यात परीट जातीचं एक घर,समोर दोन - तीन मडकी,सारवून स्वच्छ केलेलं अंगण.घराचा मालक झिंगराजी.त्यांच्या बायकोचं नाव सखुवाई, कष्ट करणारी. या मायमाउलीच्या पोटी १८७६ साली जन्माला आलं मुल नाव ठेवलं ’डेबू’.’डेब’ झाला तुकोबांचा कर्मयोगी ,सार्या कुळाचा उद्धार केला.डेबुंचे कार्य महान सारी मानवता खुश झाली.दीनांचा कैवारी मानवतेच्या अपंगाचा आधार..अमाप कार्य महाराष्ट्रावरच नव्हे तर सर्व भारत मातापिता त्यांच्या कार्यावर धन्य झाली.
संत गाडगेबाबांना संत तसेच कार्यवीर म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.कोणत्याही प्रकारच्या चमत्काराचा स्पर्ष न होता हे व्यक्तिमत्व येवढे थोर कसे ? अंगठेबहाद्दर डेबूजी बघता बघता अनेक स्वनामधन्य विद्वानांचा बाप कसा झाला ? आजुबाजुला पसरलेल्या हजारो निरक्षर , अडाणी , देवभोळ्या व अंधश्रद्ध लोकांच्या ज्ञानाचा दिप चेतविण्यासाठी गाडगेबाबांनी ग्रुहत्याग केला आणि तथागत बुद्ध गाडगेबाबांच्या रुपाने पुन्हा समाजात वावरले.
संत गाडगेबाबांमध्ये तथागत बुद्धांची करूणा, तुकोबांची अहिंसा यांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. जेंव्हा तिकडे सावकरांनी डेबुजींच्या मामाची जमीन फ़सवणुकीने गिळंक्रुत करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा डेबुजींनी त्याला विरोध केला.सावकाराला शेतातून पळवून लावले.सावकाराने डेबुजींच्या आजोबांना व मामेभावाला गाठले आणि धाकदपटशा दाखवून पुन्हा जमीन गिळंक्रुत केली.आपण दाताच्या कण्या करून, हाडाचे काडे करून सावकाराचे कर्ज फ़ेडले आणि तरीही इथल्या व्यवस्थेमुळे आपल्या बापजाद्यांच्या निरक्षरतेमुळे आपला आणी आपल्या कष्टाचा बळी गेला हे बाबांच्या मनाला फ़ार लागले.त्या दिवसापासून बाबा संसार पराड:मुख झाले आणि ग्रुहत्याग केला.
" बाबा घरातून बाहेर पडल्यावर जेंव्हा वर्षभराने त्यांची आई, बायको व मुलाबाळांची भेट झाली त्यावेळी त्यांच्या आईने आता आम्ही कुणाच्या भरवश्यावर जगावे ?" असा प्रश्न केला.त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे.ते म्हणतात "ज्याच्या घरचा माणुस मेला त्याचे काय होते त्याच्या वाचून अडते काय ? " असे समजा की डेबुजी मेला, मग जसे जगले असते तसे जगा.ग्रुहत्याग केलेला माणुस वेगळ्या अर्थाने घरच्यांसाठी मेलेलाच असतो.डेबुजीला स्वत:च्या अंगातला आळस झडावा म्हणून कोणाच्याही शेतात काबाडकष्ट कर.कोणाच्या घरची लाकडे फ़ोडून दे, कधी स्वत:ला महार मांग म्हणवून घेवून विहिरीला स्पर्श, मालकाचा बेदम मार खा, जिभेचा लोभ झडला पाहिजे म्हणुन केवळ पुरणपोळीची मागणी करायची आणि काटेरी फ़ांदिने स्वत:ला झोडपून घ्यावे.ही सगळी क्रुत्ये वेडेपणाची लक्षणे होती काय ? नक्कीच नाही!
आपल्या अस्तित्वाचे विश्व चैतन्याशी विलीनीकरण झाले पाहिजे म्हणून स्वत:च्या देहावर केलेला तो उपचार होता ! अंगावर सतरा ठिगळांचे कुडते.एका कानात कवडी तर दुसर्या कानात बांगडीचा तुकडा, डोक्यावर कापर हा सगळा वेश,म्हणजे गबाळेपणा काय ? सतरा ठिगळांचे कुडते सर्वधर्मसमभावाचे निदर्शक, कानातली कवडी माणसाचे जीवन कवडीमोल आहे हे दाखविणारे ,तर फ़ुटक्या बांगडीचा तुकडा जिवनाचे क्षणभंगुरत्व निर्देशित् करणारा, डोक्यावर खापर म्हणजे जीवनाच्या फ़ुटक्या मडक्याचा अन्वयार्थ स्पष्ट करणारे ! म्हणुनच आपण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या डेबुजींना गाडगेबाबा म्हणतो.संसारात लिप्त असलेल्या ग्रुहस्थाला नाही.
बाबांना अहंकाराचा वारा लागलाच नाही. त्यांच्या अहंकाराची राख झाली होती.ज्यांचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला.बाबा म्हणत "मी काही वेगळं करत नाही. मी करतो ती मानचाची सेवा होय. गरजवंतांकरीता झिजणं हा मानवता धर्म आहे.मी तो धर्म पाळतो आहे.हा देह सेवेत खर्च व्हावा एवढेच मला वाटते."जसं बाबांची सेवा आणि बाबा म्हणजे विलक्षण आश्चर्य होते.त्यांचा शब्द म्हणजे मोत्याचं पाणी.बाबा म्हणजे सन्मार्गाची वाट.त्यांची प्रत्येक क्रुती माणसाला वळणशील बनवी. त्यांची कार्यपद्धती आणि कार्य अचाट होते.
समाजोपयोगी अनेक कार्याची बाबांनी उभारणी केली.सारा महाराष्ट्र त्यांच्या कार्याने उजळून निघाला. त्यांच्या कार्याची साक्ष म्हणजे त्यांनी बांधलेल्या टोलेजंग धर्मशाळा.शिक्षणावर त्यांचं नितांत प्रेम होतं.ते नेहमी डॉ.बाबासाहेबांचं उदाहरण देत.शिक्षणाशिवाय माणुस आंधळा होतो.परिस्थितीमुळं माणसाला शिक्षण मिळत नाही,अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.गरिबांना शिक्षण कसं मिळेल याची बाबांना सदैव चिंता.त्याकरीता बाबांनी शाळा काढल्या, वसतीग्रुहे काढली, आश्रमशाळा सुरु केल्या, जागोजागी अन्नछत्रे उभी केली.उपाशी माणसं जेवायला लागली.आंधळे,पांगळे आशेने फ़ुलुन गेले.बाबा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.जिवाचं रान करून हे हिमालयाएवढे मोठे कार्य बाबांनी उभं केलं.
कोहिनुर हिर्याला पहावं रत्नात, सिंहाला पहावं वनात, तसं बाबांना पहावं कीर्तनात. बाबा खराट्याने गावातील घान साफ़ करीत.बाबांनी आपल्या जीवनातील शेवटचे कीर्तन मुंबई पोलीस ठाण्यात करून नोकरदारांच्या डोक्यातील वेडगळ समजुती व अंध:श्रद्धारुपी घान साफ़ केली.गोपाला ॥ गोपाला ॥ देवकीनंदन गोपाला ॥.........गजरात मोटार नागरवाडीच्या मार्गावर असताना पेढीनदीचे पुलावर मोटार आली अन बाबांचे महापरीनिर्वाण झाले.तो दिवस होता २० डिसेंबर १९५६ त्यांच्या स्म्रुतीस मन:पुर्वक अभिवादन !