22 September 2012

शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

            महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊरावांचा जन्म झाला. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची छाप त्यांच्या जीवनावर पडलेली दिसून येते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी सत्यशोधक चळवळीत प्रचारक म्हणून काम केले. हे काम करत असतानाच ''बहुजन समाज सुधारायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही'' हे त्यांना कळून चुकले होते. आणि म्ह्णूनच सन १९२४ मध्ये त्यांनी "शाहू बोर्डिंग हाऊस" ची स्थापना केली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री होती. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
            महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले. महात्मा गांधींच्या खुनानंतर आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १० वर्षात पूर्ण केली.भाऊरावांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. वसतिगृहयुक्त शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता. श्रममहात्म्य, राष्ट्रीयबंधुत्व, आणि एकतेचा प्रचार त्यांनी केला. व त्याप्रमाणे ते स्वतः  वागले. स्वाभिमान व स्वत्व यांची जोपासना, अन्यायाबद्दल चीड, न्यायाची चाड, आपल्या भूमातेशी इमान, गोरगरीब समाजाविषयी करूणा व आपुलकी, सामाजिक बांधिलकीची जाण या सर्व गुणांचा संगम  भाऊरावांमध्ये होता. 
             भाऊरावांना पुणे विद्यापीठाची 'डि. लिट.' ही पदवी व शासनाचा 'पद्मभूषण 'हा किताब  मिळाला होता. ९ मे १९५९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. खरच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या कोल्हापुरच्या जन्मभुमीत आम्ही जन्मले याचा आम्हाला आज खुप अभिमान वाटतॊ.त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

9 प्रतिक्रिया :

  1. अतिशय सुंदर लेख आहे.
    शिक्षणमहर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानाचा मुजरा

    ReplyDelete
    Replies
    1. अनामित प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
    2. छान लेख आहे आमच्या बहुजन लोकांनी बर्याच शिक्षणाच्या सोयी करून ठेवल्या आहेत आमच्या साठी पण आम्ही नको त्यांच्या नादाला लागून भरकट्त गेलो पण आता असे होणार नाही...

      Delete
    3. आपला ब्लोग खुप छान आहे प्रत्येक विषयावर लेख वाचायला मिळतात इथे
      असेच प्रबोधन करत रहा.धन्यवाद

      Delete
    4. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांना मानाचा मुजरा

      Delete
  2. अगदी छान लेख लिहिलात मस्त आहे.
    भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा प्रत्येकाच्या घरादारापर्यंत पोहचवली.
    त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन !

    ReplyDelete
  3. आमचे स्फ़ुर्ती स्थान
    आमच्या शिक्षणासाठी झगडणारे महापुरुष यांना मानाचा मुजरा..

    ReplyDelete
  4. chan lekha aahe
    amachya saarakhya dalitanchya kaivaarinna manavha mujara
    jay shivay | jay jijaau

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.