राष्ट्रपिता महात्मा फ़ुले हे जसे अभ्यासक होते तसेच ते प्रबोधनकारही होते.ते भारतीय सामाजिक सुधारणेचे आंदोलन छेडणारे पहिले क्रांतीकारक होते.त्यांचे आंदोलन खर्या अर्थाने मानव मुक्तीचे आंदोलन होते. सामाजिक परीवर्तनासाठी प्रबोधनाची गरज ओळखून त्यांनी आपले लिखाण केले सामान्य जनास सहज समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत केले म्हणुन महात्मा फ़ुले सामाजिक क्रांतीचे जनक मानले जातात.
धर्मग्रंथातील रुढी,सामाजिम अन्याय,अंधश्रद्धा आणि उच्चनिचतेच्या भेदभावांनी शुद्रातिशुद्रांना व स्त्रियांना गुलाम बनविले म्हणून महात्मा फ़ुलेंनी लेखणीचा आसूड बनवून धर्मग्रंथ आणि चातुर्वण्य व्यवस्थेवर प्रखर प्रहार केले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
क्रांतीकारी राजपुरुषाचा उदय :-
जोतिराव फ़ुलेंच्या लेखणीच्या फ़टकार्यांनी निर्माण केलेलं वादळ अजुन शमले नाही.कारण दि.२१-११-१८९० रोजी क्रांतीसुर्य मावळल्यानंतर उदयास आलेले करवीर रियासतीचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फ़ुलेंनी सुरु केलेली "सत्य शोधक समाज" ही क्रांतीकारी चळवळ पुढे चालू ठेवली.राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचे वंशज होते.ते एक सुंदर आणि वैभवशाली संस्थानाचे राजे होते.त्यांच्याजवळ सत्तासंपत्ती होती.त्यांना ऐशारामात जीवन जगता आले असते.तरीसुद्धा ते एक क्रांतीकारक कसे बनले ? हे जाणुन घेणे गरजेचे आहे.राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे समाजातील जातीव्यवस्था,अस्प्रुष्यता,उच्चनिचता,शुद्रादिशुद्र आणि स्त्रीयांवर लादलेली गुलामगिरी नाकारणारे क्रांतीकारी राज पुरुष होते.त्यांनी आपले सारे आयुष्य प्रजेच्या हितरक्षणासाठी व्यथीत केले.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सात्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे ,त्यांच्या हातचे पाणी पीत असत.शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले.ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले.
महारोग्यांची काळजी घेणारे शाहू :-
महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे.म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते.
राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले,त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे,कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा,त्यांच्या वेदना जाणणारा,त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
शाहू-आंबेडकर प्रथम भेट :-
एके दिवशी मुंबईमध्ये शाहू महाराजांनी वर्तमान पत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वाचुन मन प्रसन्न झाले. महाराजांनी तात्काळ डॉ.बाबासाहेबांच्या निवास्थानी सौहार्दपुर्ण भेट दिली.करवीर संस्थानाचे राजे यांच्याशी अचानक भेट झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उर आनंदाने भरून आले.
शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घॆऊन सांगितले की मी आता काळजीमुक्त झालो.अश्प्रुश्यांना त्यांची काळजी घेणारा पुढारी मिळाला.या भेटीला आंबेडकर चळवळीमधील मैलाचा दगड संबोधले तरी वावगे ठरू नये.
फ़ुले-शाहूंचे वारसदार भिमराव :
महात्मा फ़ुले यांनी पेटविलेली सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवून दि.६/५/१९२२ रोजी छत्रपती शाहूंची प्राणज्योत मावळली.शाहू छत्रपतींच्या नंतर ती क्रांतीज्योत प्रज्वलित ठेवण्याची शक्ती केवळ बाबासाहेबांमध्येच होती आणि फ़ुलेंचा आणि शाहूंचा वारसा भिमरावांनी यशस्वीरित्या पुढे चालू ठेवला.
म्रुत पावलेल्या स्वाभिमानाला जाग्रुत केले:-
डॉ.बाबासाहेब हे एक असे क्रांतीकारक होऊन गेले की ज्यांनी गुलामीच्या विरुद्ध बंड करावे म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली.अस्प्रुश्य समाजातील म्रुत पावलेल्या स्वभिमानाला जग्रुत केले आणि वर्णवर्चस्ववादी लोकांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांच्याशी बोलण्याची शक्ती निर्माण करुन चातुर्वण्य व्यवस्थेच्या चिंढड्या चिंढड्या केल्या.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा :-
बहुजन समाजाला या देशाची शासनकर्ती जमात होण्यासाठी "शिका-संघटित व्हा-संघर्ष करा" बाबासाहेबांनी करून दिलेली ही शिकवण विसरून त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बहुजन समाज दिशाहिन झाला.अशा परिस्थितीत बहुजन चळवळीच्या क्रुतीशील नेत्रुत्वाची जबाबदारी मा.म. देशमुख ते आ.ह.साळूंखे व इतर बहुजन संघटनांनी संभाळली.
भारत हा अनेक जाती,धर्म,भाषा आणि रीतिरिवाजांचा देश आहे.संपुर्ण बहुजन समाज संघटित करणे अशक्य आहे असेच सर्वांना वाटत असे.परंतू संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी मात्र हा समज चुकीचा ठरविला.त्यांनी सर्व बहुजन समाजास संघटित करून आपल्या कामाची सुरुवात केली.बहुजन समाजासाठी त्यांनी अविश्रांत काम केले.अशा संघटनांची आज गरज आहे.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा !.