3 June 2013

महानायक : राष्ट्रपिता जोतिराव फ़ुले

           १८५१ साली घडलेली एक घटना ! एक जोडपे आपापसात चर्चा करत होते, अहो आपल्याला स्व:चे मुलबाळ नाही, मेल्यावर आपल्या समाधीवर फ़ुले वाहण्यासाठी आपल्या रक्ताचा वारस असावा ! असे पत्निने विचारताच पती म्हणाला,अग ! भले आज आपल्या रक्ताचा वारसदार नाही, परंतू आपण जे समाजोद्धाराचे काम करीत आहोत यातून आपण पेरलेल्या क्रांतीकारी विचारांचे हजारो,लाखो वारस तयार होतील आणि आपल्या समाधीवर फ़ुले वाहतील. विचारांचे वारस निर्माण होतील असे म्हणणारे ते ग्रुहस्त कोण ? ते होते महात्मा फ़ुले.१६० वर्षापुर्वीची भविष्यवाणी जोतिरावांनी केली होती त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे किती वारस निर्माण झाले ? याची समीक्षा आम्ही केली तर लोककल्याणकारी राजर्षी छ.शाहू महाराज आणि युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन नावाच्या पलीकडे नावे आम्हाला सापडत नाहीत.
मग यांच्या शिवाय फ़ुलेंच्या विचारांचे वारसदार आम्हाला का सापडत नाहीत ? तरीही त्यांची जयंती आपण उत्साहाने साजरी करतो.वारसदार नसताना जयंती का साजरी होते ? कारण जयंती साजरी करणे एवढंच वारसदारांचे काम आहे, असे महापुरुषांचे भक्त समजतात परंतू महापुरुषांना त्यांच्या कार्याला,विचारांना भक्तांची नसूण अनुयायांची गरज आहे.
जयंती कोणाची व कशासाठी साजरी करतो ?
                जे ध्येयासाठी जगतात,ध्येयपुर्तीसाठी जीवन समर्पित करतात त्यांना आपल्या स्म्रुती जपतो.हे जे महापुरुष आहेत त्यांनी जीवन काळात एक निश्चित असा मोठा संघर्ष चालवला त्यामुळे ते आज समाजाचे आदर्श बनले आहेत आज त्यांना जपन्याचे,पुजा करण्याचे अभियान जोरात चालू आहे.त्यांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधात काम केले ती व्यवस्था आजही समाजाचे शोषण करीत आहे.ज्या समाजाचे आंदोलन चालवले त्या समाजाच्या समस्या आजुनही कायम आहेत.मग ज्या महात्मा फ़ुलेंनी शेतकर्यांच्या हातात आसूड देऊन त्याला बैलाप्रमाणे माजलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेला वटणीवर आणायला शिकवले तोच शेतकरी आज आत्महत्या का करीत आहे ?
ज्या हातात छत्रपती शिवरायांनी तलवार देऊन त्यांच्या करवी बहुजनांचे छत्र निर्माण केले,टिपरीची तलवार करून ज्यांनी पराक्रम घडविला ती मनगडे आज इतकी लाचार का झाली,की पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी दुसर्यापुढे हात पसरू लागली ?ज्याचे हात देण्यासाठीच निर्माण झाले होते तो बळीराजा आज स्वत:च मागणार्याच्या दारात उभा आहे.ज्या जमातीला  राज्यकर्ती जमात व्हा म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या पंखात गरूडाचे बळ देऊन त्यांना भरारी घ्यायला शिकवली तीच जमात ते गरूडाची उंची गाठणारे आज इतके लाचार का झाले ? 
असे एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.क्रुषीप्रधान देशामध्ये शेतकर्यालाच आत्महत्या करावी लागते याचे नेमके कारण काय ? हे पहिला शोधावे लागेल. मग आपल्याला आठवेल की जे ध्येय जो मार्ग अपल्याला आपल्या महापुरुषांनी दिला ते ध्येय ,तो मार्ग आपण सोडून दिला ? आज आपला समाज प्रचंड भ्रमित झालेला आहे, गोंधळात आहे.हजारो समस्या डोळ्यावासून उभ्या आहेत.पण समाधानाचा रस्ता आपल्या समोर नाही.उलट ज्यांनी या समस्या निर्माण केल्या  त्यांच्यावरच त्याने समाधानाची जबाबदारी सोपविली म्हणून ही अशी अवस्था !
ह्या अशा अवस्थेत पुन्हा आपल्याला गरज पडेल ती आपल्या महापुरुषांच्या विचारांची त्यांच्या सत्यवादी मार्गाची.ती समजून घेतली तरच समाधान होईल अन्यथा नाही.बळीराजाने आपल्या पदरात भरभरून माप दिलं होतं, अगदी सोन्याचा धुर निघावा अशी आमची परिस्थिती होती त्या बळीराजावर ही परिस्थिती का आली ? आधुनिक भारताच्या इतिहासापासून जरी पाहिले तरी स्पष्ट पणे या बाबी आपल्यासमोर येतात की, आज या शेतकर्याची,बहुजन समाजाची काय अवस्था झाली आहे ?महात्मा फ़ुलेंच्या काळापासून परिस्थिती जर डोळ्यासमोर घेतली तर काय दिसते.
तो काळ एका संक्रमन अवस्थेचा होता.पेशवाई नुकतीच संपली होती.जरी पेशवाई संपली होती तरी पेशवाई ज्यांच्या अंगात रुजली होती त्यांची धुंदी, मस्ती उतरली नव्हती जे राज्य क्षेत्र निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्या मराठा स्वराज्याचे पेशव्यांनी पेशवाईत रुपांतर केले होते.परीणामी नंगानाच पेशवाईत सुरु झाला.पेशवाई म्हंटले की एकच आठवते ते म्हणजे गळ्यात गाडगे आणि कमरेला खराटा !शिक्षणावर केलेली बंदी म्हणजे धर्म बुडतो जेंव्हा क्षुद्र शिक्षण घेतो.
विद्या नाकारणे हा काय धर्म असू शकतो का ? असे प्रश्न उभे करून त्यांनी ठरवले ही व्यवस्था आमच्या शेतकर्याला न्याय देऊ शकत नाही.त्यासाठी ही व्यवस्था बदलावी लागेल.शेतकर्यांना या अवस्थेतून मुक्त करावे लागेल.त्यासाठी सर्वात प्रथम शेतकर्याला मुक्त करायचे असेल तर वामनाने गाडलेल्या बळीराजाला पाताळातून बाहेर काढावे लागेल.त्याशिवाय आमच्या समस्यांचे समाधान होणार नाही.त्यासाठी ब्राह्मणांनी केलेल्या आपमतलबी धर्मग्रंथातील लांडी-लबाडी महात्मा फ़ुलेंनी आपल्या गुलामगिरीतून जगासमोर मांडली.या ग्रंथामध्ये शेतकर्याला आपल्या सांस्क्रुतीक संघर्षाचा इतिहास समजावून दिला.महात्मा फ़ुले जाणीवपुर्वक या देशाला बळीस्थान मानतात.बळीराजाची क्रुषीप्रधान संस्क्रुती नष्ट करून ब्राह्मणी धर्माने निर्माण केलेली  संस्क्रुती अशी बनावटी,ढोंगी,आपमतलबी आहे हे जगाला समजावून दिले.एवढ्यावरच थांबले नाहीत तर शिक्षणाची बंदी उठवली,मनुस्म्रुतीचे उल्लंघन केले.ज्ञानाच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या कमरेला होत्या त्या काढून आपल्या ज्ञानाची कवाडे खुली केली.
जे काम छत्रपती शिवरायांच्या तलवारीने केले तेच काम महात्मा फ़ुले यांच्या लेखणीने केले.त्यांची धार तेवढीच होती.आज मात्र ती धार बोथट झाली आहे.ब्राह्मणांनी सांगितले उत्त्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी.महात्मा फ़ुलेंनी सांगितले की उत्तम शिक्षण, याच शिक्षणामुळे फ़ुलेंचा अनुयायी ब्राह्मणांना आव्हान देऊ शकेल.यातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.ज्या दिवशी शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला त्याच दिवशी २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा फ़ुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्याला प्रमाण मानणारा ,असत्याला जुगारून देऊन सत्याची कास धरणारा समाज,प्रामाण्यवादी समाज.याच समाजाची चळवळ एवढी मोठी होती की यातूनच शाहू महाराजांसारखे नेत्रुत्व तयार झाले.त्या आधारावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले.सत्यशोधक चळवळीची धुरा मराठा बांधवांनी दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, जाधवांसारखी मंडळी यांनी सांभाळली.
महात्मा फ़ुले यांनी आपल्या शेतकर्याचा आसुड मध्ये १८८३ मध्ये जी शेतकर्याची दयनीय परिस्थिती वर्णन केली आहे तीच आजही लागू आहे.शेतकर्यांचे परिस्थितीचे वर्णन करताना महात्मा फ़ुले म्हणतात की शेतकरी हा भ्रष्ट नोकरशाही आणि सावकारशाही यांनी पिळला जात आहे.आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे.आत्महत्या करत आहे.पण हे कर्ज काही त्यांनी शेतीच्या कामासाठी काढलेले नाही.९०% कर्ज हे धार्मिक कारणासाठी काढलेले आहे.हे सर्व कशामुळे होते ? कारण महात्मा फ़ुलेंनी शिकवलेला शेतकर्याचा आसूड शिकवला गेला नाही.जोतिरावांनी समाजाला तयार करण्यासाठी २५ वर्षे मेहनत घेतली,शेवटी त्यांचा समाज रस्त्यावर आला. त्यांच्या या सार्वजनिक आंदोलनाचे प्रमुख पाच टप्पे होते.१.शिक्षण, २.साहित्य, ३. महिलांचे प्रबोधन, ४.शिवजयंती, ५.सत्यशोधक समाज.
पहिला टप्पा शिक्षण : शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फ़ुलेंनी एक मंत्र दिला होता.
विद्येविना मती गेली । मती विना नीती गेली ॥
नीती विना गती गेली । गती विन वित्त गेले ॥
वित्ताविना शूद्र खचले । एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ॥
           विद्येच्या या मंत्रात महात्मा फ़ुलेंनी जो मार्ग सांगितला आहे तो विद्या,मती-नीती-गती-वित्त असा होता.परंतू आजच्या शिकलेल्या लोकांनी विद्येवरून जी उडी मारली ती थेट वित्तावर.विद्येचा जो संबंध मतीशी, तर्काशी होता तो थेट वित्ताशी जोडला.शिक्षणाची फ़ार सोपी व्याख्या महात्मा फ़ुलेंनी केली होती.आमच्या लोकांना इतकं शिकवा इतकं शिकवा की त्यांना खरं काय नि खोटं काय हे समजेल.ते खर्याचं समर्थन करतील.परंतू आज परिस्थिती काय आहे.
या शिक्षण- साहित्य- महिला प्रबोधन-शिवजयंती- सत्यशोधक समाज या टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा म्हणजे सत्यशोधक समाज.या समाजातून याच्या आंदोलनातून शाहू महाराजांनी प्रेरणा घेतली.सत्यशोधक चळवळ चालविण्याचे काम मराठा बांधवांनी केले.यामधुनच बाबासाहेबांनी राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले.परंतू महात्मा फ़ुले-शाहू महाराज-बाबासाहेब यांच्यामधील ही नाळ सुसंगत सुत्रबद्धता आमच्या लोकांपर्यंत पोहचली नाही.म्हणूनच त्यांना मानणारे आपापसात भांडतात.आज जे सत्यशोधक आहेत त्यांनी सत्यशोधकाचा अर्थ सत्ताशोधन असा घेतला आणि सत्ताशोधनाच्या नादाने स्वत:चा व समाजाचा सत्यानाश कधी झाला हे त्यांना कळलेच नाही.हा सत्यानाश जर थांबवायचा असेल तर महापुरुषांचा जयजयकार करण्याने तो थांबनार नाही त्यासाठी आम्हाला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे आणि महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही चाललो तरच आज आम्ही आमच्या समस्यांचे समाधान करू शकतो.म्हणूनच आजपासून स्वत:ला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार मानून त्यांचे कार्य आणि विचार जगभर पसरविणे हीच खरी फ़ुले-शाहू-आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.हेच खरे विनम्र अभिवादन ठरेल. 
शिका !                                                संघटित व्हा !                                      संघर्ष करा !

6 प्रतिक्रिया :

  1. महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले

    ReplyDelete
  2. मामा परमानंद यांस पत्र.....................
    मुक्काम पुणे त|| २ माहे जून १८८६ ई||
    राजमान्य राजेश्री नारायणराव माधवराव परमानंद मु|| आंबेर

    ......................... साष्टांग नमस्कार वि.वि. आपले त|| ३० माहे गुदस्तचे कृपापात्र पावले. त्याचप्रे|| पुण्याचे हायस्कुलातील भागवतमास्तर यांनी शंकर तुकाराम यांनी छापलेला पवाडयाचे पुस्तकातील काही शाहिरांची एक याद मजला आणून दिली, यावरून मी त्यास येक वेळी कळवले कि, सदरचे पवाडयाची प्रत मजजवळ नाही आणि ती पाहिल्याशिवाय मला याविषयी काही कळविता येत नाही. नंतर त्यांनी ते पुस्तक मला आणून दिले नाही. सबब त्याविषयी मला काही आपल्यास लिहून कळविता आले नाही.

    ..................... फितुरी गोपिनाथपंताचे साह्याने शिवाजीने दगा करून अफजुलखानाचा (वध?) केला. तान्हाजी मालूसऱ्याने घोरपडीचे साह्याने सिंहगड किल्ला काबीज केला व शिवाजीने पुण्यात दरोडा घालून मुसलमान लोकांस कापून काढले. या सर्वाच्या कच्च्या हकीकतीचे खरे पोवाडे माझे पाहण्यात आले नाहीत. आज दिनपावेतो युरोपियन लोकांनी जे काही इतिहास तयार केले आहेत , ते सर्व क्षुद्र आणि अतिक्षुद्रांची वास्तविक स्थिती ताडून न पाहता +++ झाकून आर्यं भटब्राह्मणांचे ग्रंथावर व भटकामगारांचे सांगण्यावर भरवसा ठेऊन इतिहास तयार केले आहेत. व अलीकडे भटब्राह्मणांची विद्वान पोरेसोरे नवीन पवाडे करून हळूच मैदानात आणीत आहेत. त्यापैकी माझे पाहण्यातही बरेच आले आहेत आणि त्यातील क्षुद्रानी कमावलेल्या मोत्यापोवळ्यांचा चारा चरणारे भागवती, गोब्राह्मनासह दादोजी कोंडदेवास फाजील आगन्तुकी करावयास लावल्यामुळे तसल्या बनावट पवाड्यांचा मी संचय केला नाही.
    .........आठ वर्षी जेव्हा मी मुंबईत आपले घरी भेटावयास आलो होतो, तेव्हा पांचगणीचे पाटील रामपासमक्ष आपल्यास क्षुद्र शेतकऱ्यांचे दैन्यवाण्या स्थितीचा काही देखावा जगापुढे आणणार, म्हणून कबूल केले होते. ते त्या देखाव्याचे असूड या नावाचे तीन वर्षापूर्वी एक पुस्तक तयार केले होते व त्याची एकेक प्रत आपले कलकत्याचे हरभास व अष्टपैलू गवरनर जनरल (साहेब?) श्रीमान महाराज बडोद्याचे गायकवाड सरकारास पाठविल्या आहेत. आमच्या क्षुद्रांत भेकडबाहुले छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूर्त एके बाजूला ठेविले आहे. असुडाची प्रत आपल्यास पाहण्याकरिता पाहिजे त्याप्रमाणे लिहून आल्याबरोबर त्याची नकळ करण्यास लेखक बसवितो. नकल होण्यास सुमारे एकदोन महिने लागतील असा अदमास आहे. कळावे लोभ असावा हे विनंती.

    ReplyDelete
  3. महात्मा फुल्यांनी त्यांच्या ग्रंथात ब्राम्हणी देव-देवतांचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला लागलेला जातिभेदाचा रोग इतका गंभीर आहे की त्या रोगाने आमच्या हजारो पिढ्या बरबाद केल्या. एखाद्या अनुवांशिक रोगाप्रमाणे हा रोगही एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत आहे. अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार हे समाजशास्त्राच्या डॉक्टर महात्मा फुलेंनी ओळखले. त्यासाठी त्यांनी ब्राम्हणी गुलामगिरीच्या मुळावरच घाव घातला. ज्या धर्म ग्रंथांच्या आधारे ब्राम्हणांनी आजपर्यंत बहुजन समाजाला गुलामीत ठेवले त्या धर्मग्रंथांनाच फुल्यांनी लक्ष बनवले. धर्म ग्रंथातील थोतांड, अवतार कल्पना यांची चिरफाड केली. इतकी केली की ब्राम्हणांना कुठे कुठे सावरावे तेच कळेना झाले. महात्मा फुल्यांनी समाजाला सत्यशोधनाची दिशा दिली. समाजाच्या हलाखीचे मूळ जे गोडबोल्या ब्राम्हणांच्या धर्मग्रंथात आहे ते दाखवले आणि चिकित्सक इतिहास समाजासमोर ठेवला.

    ReplyDelete
  4. ब्राह्मण महिलांना स्त्री असल्याचा आज जो अभिमान वाटत आहे, तो फक्त सावित्रीमाई फुलेंमुळे आहे. याचे भान जर या आपल्या शुद्र बहिणीला आले असते, तर हि आपली बहिण, ब्राम्हणवादाचे गोडवे गाताना आज दिसली नसती. काय करणार? , " विनाश काले, विपरीत बुद्धी !

    मला एक प्रश्न कायम पडत असतो कि, बुद्ध पर्वाच्या अस्ता नंतर आणि सावित्री माई फुलेंच्या उदया पर्यंत या देशातील स्त्री, अज्ञानी राहावी असे भविष्य कोणत्या सटवीने लिहिले होते? ब्राम्हण स्त्रियांनी हा प्रश्न कधीतरी स्वतःला विचारला पाहिजे. रूपा ताईंचे ज्ञान तोकडे, आणि अज्ञान महान आहे यात तीळमात्र शंका नाही …………………………………………….. ब्राम्हणी धर्मा नुसार ब्राह्मण स्त्रिया. या शुद्र आहेत, पापयोनी आहेत आणि नरकाचे द्वार आहेत, हे यांना माहित आहे का? यांच्याच धर्माने यांना काय म्हटले आहे, याचा यांनी आपल्या धर्माला जाब विचारला पाहिजे. शुद्र कोण? मराठा, ओबीसी, हे सगळे शुद्र आणि सगळ्या वर्णातील स्त्रिया हि शुद्र, असे यांचे धर्मग्रंथच सांगतात. कारण ब्राम्हणी धर्मानुसार कलियुगात फक्त दोनच वर्ण अस्थित्वात आहेत. ब्राम्हण आणि शुद्र.

    ReplyDelete
  5. आजकाल बराच लोकांना हिंदू धर्मावर टीका करण्यात आनंद मिळतो.
    लक्षात ठेवा बाप आहे हा धर्म सर्वांचा. एवढी आक्रमणे झाली ह्या धर्मावर, पण हा धर्म नष्ट झाला नाही. जगाचा इतिहास पहा, मोठमोठ्या संस्कृत्या नष्ट झाल्या, हा धर्म आहे तिथे आहे. वेळ आली कि श्री कृष्ण जन्म घेतो ह्या धर्मात, कधी विष्णू रुपात, कधी राजाच्या रुपात, कधी समाज सुधारकाच्या रुपात...

    ReplyDelete
  6. हे ब्रिगेडी नेहमीच महात्मा फुलेंना ब्राम्हणविरोधी रंगवतात, पण खरच ते तसे होते का ?? त्यांच्या जीवनातही त्यांना बऱ्याच ब्राम्हणांचा सहवास लाभला. ते ब्राम्हण नव्हे तर ब्राम्हणवादाच्या, कर्मठ ब्राम्हणांच्याच फक्त विरोधात होते.

    हे वाचा ,

    जोतिबांचे प्राथमिक शिक्षण हे पंतोजींच्या शाळेत झाले होते, तसेच त्यांचे कितीतरी मित्र हे ब्राह्मण होते.
    मुलींच्या शाळेची सुरुवात त्यांनी भिडे वाड्यात केलेली होती.
    त्यांनी घडवलेला सर्वात पहिला विधवा विवाह हा गोखले बागेत झालेला होता.
    स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यातून मिरवणूक काढण्यासाठी जोतिबांनी मदत केली होती. स्वामी दयानंद सरस्वती हे जन्माने ब्राह्मण होते.
    जोतिबांनी एक ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला होता आणि मृत्युसमयी आपली सर्व संपत्ती हि त्या मुलाला दिलेली होती.
    जोतीराव फुलेंचे बालपणापासूनचे मित्र भांडारकर यांचे फुलेंनी ‘शिवाजी महाराजांच्या पोवाडय़ात’ जाहीरपणे आभार मानले.
    ‘‘हा पोवाडा एकंदर तयार करतेवेळी माझे लहानपणीचे मित्र भांडारकर यांनी इतर दुसऱ्या लोकांसारख्या पायात पाय न घालता मला या कामात नेहमी हिम्मत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे.’’ (म.फु.स.वा. पृ. ४४) असे कृतज्ञतेने १८६९ साली नमूद करणाऱ्या जोतीरावांनी आपल्या या जिवाभावाच्या नि आयुष्यभराच्या मित्राची स्वत:च्या मृत्युपत्रावर १८८७ साली साक्ष घेतलेली आहे. (म.फु.स.वा. पृ. ६४८) साक्षीदार म्हणून जवळच्याच व्यक्तीची निवड केली जाते, कुणा ऐर्यागैर्याची नाही. (संदर्भ - प्रा. हरी नरके)

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.