संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा .......
शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.
रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा सलाम........!!!
“ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे
excellent patilsaheb ! Santani-Dhanji have carved a niche position in the history of marathas. Their contribution to the freedom fight and swarajya is indeed impeccable. Thanks for bringing up another great figure in history
ReplyDeleteधन्यवाद
Deleteमाझा हेतू हाच आहे की आपल्या स्वराज्यातील सर्व मर्द मावळ्यांची माहीती समोर आली पाहिजे.जे मावळे उपेक्षीत राहिले त्यांची माहीती मी लोकांसमोर आणनार आहे.आजपर्यंत मी बरेच शुरविरांची माहीती समोर ब्लॉग वर लिहिली आहे अणि अशीच लिहित राहिण.
ब्लॉग वाचत रहा
धन्यवाद.
जय महाराष्ट्र
By the way I forgot to mention; the glorious history can be brought to light for educating the masses today by stating unbiased incidents and pure facts; not by bashing brahmins just for the sake of enjoyment. Unfortunately your writings sometime back were only and only directed to that agenda. I don't have any problems in stating that, but over a period of time that just becomes single point agenda. All I can wish you is all the best for your good work and intention of contributing to the society.
ReplyDeleteआपण आज पर्यंत बरेच असे माहीतीपर लेख लिहित आहात आपल्यासारखा ब्लोग मी पाहिलेला नाही अजुन पर्यंत जो खरा इतिहास आणि माहीती मांडत आहे.आपले प्रयत्न नक्की सफ़ल होतील आपल्या सारख्य लोकांची सत्यवादी चळवळीला नितांत गरज आहे.
ReplyDeleteजय हिंद जय शिवराय
धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे.घोड खिंड ही पावन झाली ती बाजीप्रभु देसपांडेंच्या मुळे नव्हे धनाजी जाधव यांच्या वडील संभाजी जाधव यांच्या मुळे.खरा इतिहास मांडा पाटील साहेब आपले वचण तर आहेत तसे मग यावरही लिहा काहीतरी.ब्राहमनांनी जे काही खॊटे लिहिले आहे ते खॊडून स्वच्छ इतिहास समोर आणा.
ReplyDeleteआप्ल्या कार्यात आम्ही समील आहोत
आपला आभारी आहे.
मित्रा खरा इतिहास हाच आहे की संभाजी जाधव आणि बाजीप्रभु देशपांडे यांनी खिंड लढवली.या दोघंच्या कार्याला मानाचा मुजरा.संभाजी जाधवांनी खींढ लढवली हे खरे असले तरी बाजीप्रभुंना डावलता येणार नाही.त्यांचे प्राण गेले ते स्वराज्यासाठी ते विसरता कामा नये.पहिल्यापासूण शेवटपर्यंत स्वराज्याशी टिकून राहण्याची ही शिक्षा ? नको.
Deleteमराठा साम्राज्यासाठी अनेक महाप्रराक्रमी सैनिकांनी आयुष्य दिले.त्यामधील एक म्हणजे संताजी घोरपडे आहेत
ReplyDeleteमोघलांनी यांचे नाव जरी ऐकले तरी आंगावर शहारे येत असत
जय धनाजी जय संताजी
आपल्या ब्लोग मुळे आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे त्यबद्द्ल धन्यवाद .आपला ब्लोग असाच चालू रहावा हिच इश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही
ReplyDeleteजय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद मित्रा
Deleteही सुरुवात आहे अजुन बरेच समजुन घ्ययचे आहे आपल्याला. त्यासाठी ब्लोग वर येत चला रोजच्यारोज
हिंदवी स्वराज्याचे धुरंदर रक्षणकर्ते संताजी घोरपडे यांना त्रिवार अभिवादन
ReplyDeleteजय संताजी घोरपडे
छान लेख आहे पाटील साहेब
ReplyDeleteरणधुरंदर महापराक्रमी संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा.
khup chana lekh ahe patil saheb aapan asech lihit rahave aani aamha vachakanchi bhuk bhagavaavi
ReplyDeletejay shivray jayostu maratha jay maharashtra
संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर येसूबाई आणि बाल शाहू मोंगलांच्या हातात सापडले. रायगडची गादी जिंजी ला गेली !. स्फुरण पावलेली मोंगल सेना ज्या त्या दुर्गावर हिरवे निशाण फडकवू लागली ! ति वेळ मोठ्या आणिबाणीची होती. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे या रण झुंजारांनी प्रल्हाद रावजी सारख्या राजकारण्यांनी महाराष्ट्र राज्याची इमारत कृती निश्चयाने सावरली. संताजी घोरपडेनी तर आपल्या घोडदलाच्या साह्याने औरंगजेबाला अगदी घाबरून सोडले होते.
ReplyDeleteसंताजी आणि धनाजी जाधव यांचे नाव इतिहासात अमर जाहले
ReplyDeleteजय महाराष्ट्र