30 June 2013

वेदोक्त : एक धार्मिक युद्ध

          "प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता" या वेदवाक्याचा अर्थ सांगताना म्हंटले जातेे की "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदु" या "हिंदू" शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ असताना बाह्मणांनी स्वार्थाप्रमाणे त्याचा अर्थ लावला व हिंदूंच्या माथ्यावर वेदोक्त आणि पुराणोक्त हे वेगवेगळे विधी लादून स्वत:चे श्रेष्ठ्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आजही भटजी धर्मकार्यातून "पुराणोक्त विधी करून इतरांना दुय्यम वागणूक देतात. धर्मकार्याला बसलेल्या व्यक्तीला चाललेली विधी पुराणोक्त आहे की वेदोक्त आहे याची मुळीच कल्पना नसते त्यामुळे भटजी सांगेल त्याप्रमाणे तो विधी करत असतो"
         वस्तुश: जातीभेद हे वर्ण वर्चस्ववादी लोकांनी समाजव्यवस्था व संरक्षण यासाठीच निर्माण केले. संरक्षणाचे काम करणार्याला "क्षत्रिय", व्यवसाय करणार्याला "वैश्य",सर्वांची सेवा करणार्याला "क्षुद्र" आणि संस्कार करणार्याला "ब्राह्मण" संबोधित असत. "चातुर्वण्य मया स्रुष्टं गुणकर्मविभागश:" अर्थात चार वर्णाची ही रचना गुणकर्मावर आधारीत होती. त्यावेळी एकाच परीवारात एक ब्राह्मण तर दुसरा क्षत्रिय ,तिसरा वैश्य तर चौथा क्षुद्र असे. कालांतराने आर्यांच्या मुळ हेतूला बगल देऊन जन्माधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करून ब्राह्मणांनी आपले श्रेष्ठ्त्व समाजावर लादले. "नंतर सामाजिक व्यवस्थेत मानाचा जो अनुक्रम लागला त्यात दुसर्या क्रमांकाचे स्थान ब्राह्मणांना मिळाले, त्यांना क्षत्रियांबद्द्ल आसुया निर्माण झाली." रावाला खेचल्याशिवाय पंताला वर चढता येणार नाही, हे त्यांनी जाणले. म्हणुनच वरील विचारांचे पालन करून राजर्षींना खेचण्याचे कार्य केले. पण राजर्षी शाहू महाराज शेरास सव्वा शेर होते. निश्चयाचे महामेरू होते.
         राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमुलाग्र क्रांती करणारे प्रकरण म्हणून या "वेदोक्त प्रकरणा" कडे पहावे लागेल. सनातनी ब्राह्मणांनी करवीर राज्यात आपल्या अहंकारी वर्णवर्चस्वाच्या प्रव्रुत्तीमुळे अक्षरश: हैदोस घातला होता."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥" ही त्यांची विचार व आचारधारा होती. अशा या ब्राह्मणांचे वर्णन महालिंगदासांनी मार्मिक शब्दात केले आहे.

"ऐसा तो ब्राह्मण । म्लेंच्छ होय चौगुण । ऐसा पापिष्ट तेणे । जन पीडीले ॥
तया षटकर्माचा विसर । कारकोनी पडिभर । गायत्री मंत्रांचा अधिकार । थोडा तयासी ॥
दग्धचि बोलणे तेणे । सखा सोईरा मित्र नेणे । लाभावरी तेणे । ठेविले चित्त ॥"

अशा या सनातनी ब्राह्मणांनी उठविलेल्या "वेदोक्त प्रकरण" या वादळात राजर्षी शाहू महाराज जिंकले आणि विरोधकांचा फ़ज्जा उडाला याचा आढावा घेवू.
             नोव्हेंबर १८९९ मध्ये पंचगंगेवर  नेमाने स्नान करण्यास जात असताना एके दिवशी स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणार्या नारायण भटाच्या तोंडून जे मंत्र बाहेर पडत होते ते पुराणोक्त होते, नारायण भट स्वत: आंघोळ करूण आले नाहीत व पुराणोक्त मंत्र उच्चारत आहेत. ही गोष्ठ राजारामशात्री भागवत यांनी महाराजांच्या नजरेस आणली. शाहू महाराजांनी त्या नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सुनवले. नारायण भटाने "महाराज शुद्र आहेत" असे स्पष्ठ उत्तर दिले. उत्तर प्रत्युत्तरे झाल्यानंतर नारायण भटाने, "धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्या साठी शुद्रच" असे सांगितले. येथुनच वेदोक्त वादास प्रारंभ झाला.
             महाराजांचा संयम दांडगा होता. विषारी फ़ुत्कार काढणार्या नारायण भटाला त्याच क्षणी चाबकाचे फ़टके लगावले असते तर कोणीही, का ? म्हणुन देखील विचारले नसते. तरीदेखील राजे शांत होते. पण त्यांच्या सोबत असणार्यांची मने क्रोधांनी पेटून उठून, हात शिवशिवत होते. "प्रत्यक्ष राजांचा अपमान, आमच्या देवाचा अपमान ? आम्ही या भटाला जिवंत ठेवणार नाही. हा नारायण भट काही सज्जन पुरुष होता असे नाही. अशा या लबाड भटाने एका चारित्र्यसंपन्न, संयमी व सर्व प्रजेला प्रिय असलेल्या राजांचा घोर अपमान करावा, यापेक्षा अन्य घोर पाप तरी हा भट कोणते करणार ? महाराजांची वृत्ती संतांची होती. संत तुकोबारायांच्या शब्दात शाहू महाराजांचे थोरपण उमगते"
"दया,क्षमा,शांती । तेथे देवाची वसति ।
भूतांची दया । हेचि भांडवल संता ॥"
          महाराजांच्या अपमानामुळे संपुर्ण "बहुजन समाज" एक झाला  व त्यांच्या मनात ब्राह्मणाविषयी रोष खदखदू लागला. त्यावेळी कोल्हापुर नगरपालिका ब्राह्मणमय होती. पंचगंगेवर ब्राह्मणांसाठी वेगळा घाट राखीव ठेवला होता नगरपालिकेने. महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली. ऑगस्ट १९०० मध्ये बहुजन समाजाने हातात बंडाचा झेंडा घेतला, हा सारा समाज भल्या पहाटे "छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, ब्राह्मणांचा धिक्कार असो" अशा आकाशगामी घोषणा देत पंचगंगेवर चालून आला. सनातनी ब्राह्मणांना-भटांना धडा शिकवला पाहिजे, या विचाराने पेटून उठलेला समस्त बहुजन समाज पंचगंगेच्या घाटावर जमा होऊ लागला. ब्राह्मणांसाठी राखीव ठेवलेल्या घाटावरील बोर्ड काढून तोडून टाकू लागला. त्या ब्राह्मणी घाटावर जमलेल्या शाहू प्रेमींना बघून घाबरून पळ काढू लागला. नाहीतर यापलीकडे ते करणार तरी काय ?

वेदोक्त मध्ये लो. बाळ गंगाधर टिळक
        या वेदोक्त वादात सनातन्यांचा पक्ष घॆऊन टिळक मैदानात उतरले. टिळकांचा "केसरी" शाहू राजांच्या विरोधार विष ओकू लागला. २२ आणि २९ ऑक्टोंबर १९०१ च्या केसरीत टिळकांनी "वेदोक्ताचे खुळ"  या नावाने दोन अग्रलेख लिहून शाहू राजांवर जहरी टीका केली व सनातनी ब्राह्मणांना जोरदार पाठींबा दिला. टिळकांनी लिहिले "धर्मशास्त्रातील जे प्रसिद्ध आणि सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण पुर्ण नष्ट झाले आहेत व फ़क्त ब्राह्मण आणि शुद्रच अस्तित्वात आहेत. टिळकांनी शाहू राजांना सरळ सांगितले की "तुम्ही खुशाल स्वत:ला उच्चवर्णीय समजा, परंतू तुम्ही शुद्रच आहात". टिळकांच्या या म्हणण्यामागे परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी निक्षत्रिय केली त्यामुळे प्रुथ्वीवर क्षत्रिय शिल्लकच उरले नाहीत हे ब्राह्मणांचे आवडते तत्वज्ञान होते. तसेच एका पुराणार म्हंटले आहे की, 
"ब्राह्मणा: क्षत्रिया वैश्या:शूद्रा वर्णास्त्रयो द्विजा:।
युगे युगे स्थिता: सर्वे कलावाद्यंतयो: स्थितीरिति: ॥"
अर्थात : ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य़ आणि शूद्र हे चार वर्ण आणि यातील तीन आर्य वर्ण सर्व प्रत्येक युगात असतात, पण कलीमध्ये पहिला आणि अखेरचा असे दोनच वर्ण राहतात.
         बाळ टिळकांनी वेदोक्ताची मागणी करणार्या मंडळींची हवी तशी टिंगल आणि उपहास करण्यासाठी आपली लेखणी झिजवली."अलिकडे इंग्रजी विद्येने व पाश्चात्य शिक्षणाने सुसंस्क्रुत झालेल्या मराठा मंडळींच्या मनात जी काही खूळे शिरली आहेत,त्यापैकी वेदोक्त कर्माचे खूळ हे होय." बाळ टिळकांनी आणखी एक युक्तिवाद पुढे केला. "वेदोक्त मंत्र म्हंटल्याने कोणत्याही जातीस आधिक श्रेष्ठपणा येतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे आणि ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तिही निरर्थक आहे. वेदोक्त मंत्र म्हंटले तरी मराठे हे मराठेच राहतील, हे लक्षात ठेवले पाहिजे." असे म्हणुन बाळ गंगाधर टिळकांनी मराठ्यांना क्षत्रिय मानण्यास विरोध केला.

कमिशनची नियुक्ती
          टिळकांनी ब्राह्मणांची बाजू उचलून धरल्यामुळे या "वेदोक्त" प्रकरणाला उलटी कलाटणी मिळण्याचा संभाव्य धोका ऒळखून महाराजांनी या वेदोक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका हुकुमान्वये न्यायमुर्ती पंडीतराव गोखले, न्यायमुर्ती विश्वनाथराव गोखले व खुद्द आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचे एक कमिशन नेमून त्यांना अहवाल सादर करण्याची आज्ञा दिली. तसेच हे तिघेही ब्राह्मण होते तरी त्यातील पंडितराव गोखले हे निस्प्रुह, विद्वान व नि:पक्षपाती होते.
        १६ एप्रिल १९०२ रोजी कमिशनने आपला अहवाल महाराजांना सादर केला. त्या अवहालात नमुद करण्यात आले होते की, "रुद्राभिषेक होत असे याचा अर्थ ज्यांची ही देवस्थाने होती ते द्विज वर्गातील आहेत. म्हणजे छत्रपती हे क्षत्रियच आहेत. "या अहवालावर अखेरपर्यंत राजोपध्ये यांनी सही केली नाही. हा राजोपाध्येदेखील नारायण भट्टाचा दुसरा अवतार होऊन त्याने आपला थयथयाट चालू ठेवला. पण त्याकडे दुर्लक्ष करून द्विज वर्गातील म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार असलेले शाहू छत्रपती हे क्षत्रिय आहेत असा निर्वाळा कमिशनने दिला. 
        या वेदोक्त प्रकरणाची एकूण फ़लश्रुती शोधताना एका महत्वाच्या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. तिची स्पष्ट नोंद इथे करणे योग्य ठरेल. वेदोक्त प्रकरणात एकूण न्याय शाहूराजांच्या बाजूने होता. त्यांनी हा न्यायाचा लढा मोठ्या जिद्दीने लढविला. अखेर न्याय आणि आपला वेदोक्ताचा अधिकार त्यांनी प्रस्थापित करून घेतला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक थोर माणूस समाजाला जाग आणावी,म्हणुन धडपडत होता. वेदोक्त आणि पुराणोक्तच्या फ़ाटक्यात पाय अडकलेला ब्राह्मण वर्ग तर त्यांना विरोधक म्हणुन उभा राहिलाच. पण त्या द्रुष्टीने वेदोक्त प्रकरणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा संपुर्ण विजय झाला. ब्राह्मण वर्चस्वाचा (अगदी टिळक आणि टिळककंपुंसकट) संपुर्ण पराभव झाला.


संदर्भ ग्रंथ : 
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ
शाहुंच्या आठवणी (प्रा. नानासाहेब सांळुंखे,मराठा भुषण)
राजर्षी शाहू चरित्र (श्री. ग. क्रु. कुर्हाडे)

30 प्रतिक्रिया :

  1. आपण आपल्या या ब्लोग वर बर्याच विषयांना स्पर्ष केला आहे.हा स्तुत्य प्रयत्न आपणाकडून उत्तरोत्तर घडो हिच यातना माता जिजाऊ यांच्या चरणी.कौशल्यवान लेखकांची समाजाला नितांत गरज आहे.खरे लिहिणे हा आपला स्वभाव असल्यामुळे कोणीही आपल्यापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.खरी लेखणी झिजवल्याशिवाय गौरवशाली इतिहास समाजापुढे येणार नाही.त्यासाठी संत तुकाराम महाराज म्हणतात..
    शुद्ध बीजापोटी फ़ळे रसाळ गोमटी
    याचाच अनुभव वरील लेख किंवा आपले ब्लोगचे अध्ययन केल्यानंतर मला आला.सडेतोड व्रुत्तीचा एक अल्प वयातील मुलगा व्यवस्थेला आव्हान करतो.म्ह्णुनच मला आपल्याबद्दल अतार्थ अभिमान आहे.यातच आपले सौख्य सामावलेले आहे.
    ब्लोग विषयी मला बरेच काही लिहायचे होते पण ते आता नको इथुन पुढे प्रत्येक लेख वाचुन मी प्रतिक्रिया देयीन.आपल्याकडून अशाच सडेतोड विद्रोही लेखणीची भविष्यात चाल असावी अशी अपेक्षा करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो ,सुयश चिंतितो.
    जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete
  2. लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज हे त्या युगातील थोर पुरुष होते.त्यांनी सांगितलेली शास्वत मुल्ये नव्या पिढीने समजून घेतली पाहिजेत.अन्यायाविरोधात लढलेल्या परिस्थितीची जाणीव ठेवून आपण वागले पाहिजे.आजच्या घडीला वेदोक्ताचा जो वाद घातला जातो त्यातील आज काय शिल्लक राहते बरे ? जस्टीस माडगावकर-पाटकरांनी क्षत्रियांना वेदोक्ताचे अधिकार दिलेत व बाकिच्यांना उपनयन यज्ञोपवी अशीच संगोत्न विवाह आदी पाहून अधिकार ठरवावेत असा निर्णय दिला.आज उपनयन हा संस्कारापेक्षा समारंभ जास्त झाला आहे.

    ReplyDelete
  3. Patil Saheb ---> I deeply appreciate your courage and willingness to write the words of power. I can sense your intensity to work on removal of caste system whereby society can be integrated. In many of your posts you say that brahmins are severely poisonous and are spreading hatred within society. I would also appreciate you to kindly look at this news and advise as to how these incidents can be minimised.

    नाशिक- पोटच्या लेकीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्यावर चिडून असलेल्या बापाने विवाहित मुलीला आईला भेटायला नेण्याच्या बहाण्याने घरी नेतांना रस्त्यात रिक्षात तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रमिला दीपक कांबळे (वय 22) असे हत्या झालेली गरोदर विवाहितेचे नाव आहे.

    गरोदर विवाहितेच्या खून प्रकरणी संशयित आरोपी असलेल्या तिच्या बाप एकनाथ किसन कुंभारकर (वय 47) याला पोलिसांनी अटक केली आहे. लेकीचा खून करणाऱ्या पतीला फाशी द्यावी अशी मागणी मृत मुलीच्या आईने केली
    आहे.

    महात्मानगर परिसरातील कामगारनगर पासून जवळच एका बांधकाम साइटवर काशिनाथ कांबळे यांचे कुटुंब राहते. बांधकाम साइटवर मजुरी करणाऱ्या कुटुंबात दीपक (वय 23) या मुलाचे एकनाथ कुंभारकर यांच्या प्रमिला या मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी साधारण वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. प्रमिला सध्या गरोदर होती. सासरी राहणाऱ्या प्रमिला हिच्या घरी आज पहाटे तिचा बाप आला व त्याने तुझी आई गंभीर आहे. तिला भेटायला चल असे सांगून रिक्षाने घरी नेण्याच्या बहाण्याने रिक्षा प्रवासात खून केला.

    संशयित एकनाथ पहाटे उठला. आवरून त्याने घराशेजारी राहणाऱ्या प्रदीप आहिरे या रिक्षाचालकाला मुलीकडे जायचे म्हणून रिक्षा (एमएच 15 जे 2595) रिक्षा ठरविली. सासरी जाऊन मुलीला घेतले. सावरकरनगर परिसरात रिक्षा आल्यावर तेथील हॉस्पिटलसमोर रिक्षा उभी करून रिक्षाचालकाला हॉस्पिटलमधून माझ्या मामाला बोलावून आण असे सांगून रुग्णालयात पाठविले. त्यानंतर रिक्षात तो आणि त्याची मुलगी प्रमिला हे दोघेच असताना, तिचा गळा आवळून खून केला. रिक्षाचालक जेव्हा परतला तेव्हा या खुनाचा उलगडा झाला.

    आंतरजातीय विवाहातून खून
    पोटच्या मुलीचा खून करण्यामागे कारण जातीयवाद हेच असल्याचे पुढे आले आहे. मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाह एकनाथ कुंभारकर याचा विरोध होता. त्यातून दीपकच्या घरचे लोक प्रमिला हिला माहेरी पाठवीतही नव्हते, असे दीपकच्या आईने सांगितले. आज अचानक आई आजारी असल्याचे पहाटेच तिचा बापच दारात आल्याने, संशय आला नाही.

    साहेब याला फाशीच द्या
    मृत विवाहितेची आई अमृता कुंभारकर हिला नवऱ्यानेच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समजल्यावर तिला शोक अनावर झाला. एकुलती मुलगी गेल्याचे ऐकून तिने पोलिस ठाण्यात पतीला फाशी देण्याची मागणी केली. कुठलेही कामधंदा न करणाऱ्या नवरा दारू प्यायचा. त्याला आपणच कामधंदा करून सांभाळत असल्याचे सांगून तिने नवऱ्याला फाशी देण्याची मागणी केली.

    ReplyDelete
    Replies
    1. जातीमुळे असे अनेक मुलं-मुली मेली आहे आणि पुढेपण मरतील त्याला जवाबदार या देशाचा धर्म आणि ब्राम्हणी विचारधारा आहे !!

      ब्राह्मणशाहीचे उत्पादक ब्राह्मणच असले तरी तिची मर्यादा ब्राह्मण समाजापर्यंत नाही.
      -डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
      (१२ फेब्रुवारी १९३८ रेल्वे कामगार परिषद मनमाड.)

      हिंदू हा धर्म नसून एक रोग आहे आणि हिंदू धर्मातील याच खुळचट कर्मकांडी धर्माकल्पनामुळे हा भारत देश भिकेला लागला …
      [ डॉ बाबासाहेब आंबेडकर ]

      जातीव्यवस्थेचे निर्माते ब्राम्हणच आहेत ! आणि हि घाणेरडी विषमतावादी अन्यायी व्यवस्था डोक्यावर घेऊन नाचणारे,या दलदलीत लोळून आनंद मानणारे "वराह" हि घाण जोपासण्यात अग्रेसर आहेत !

      Delete
  4. हा ब्लॉग चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या,सामान्य माणसांच्या,राष्ट्राच्या,तरुणांच्या अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करतो.मराठीकट्टा या ब्लॉग वर लेखकाने आपल्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे विषय हाताळले आहेत.खोट्या इतिहासाने बरबटलेल्या ब्राह्मणवाद्यांच्या मर्मावरच व्यवस्थापकाने बोट ठेवले आहे.आज इतिहासाची का गरज आहे आणि तॊ कोणता इतिहास आहे याबद्द्ल केलेले विश्लेषण अतिशय सुंदर आहे.नवा मानवतावाद लेखक या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे.त्यांना दिसणारे दोष त्यांनी अत्यंत सडेतोडपणे आपल्यासमोर ठेवलेत.यात वाचक अंतर्मुख कोईल यात तर शंकाच नाही.
    खरं तर माझं मत आहे की प्रत्येक वाचकाने कुठलीही पुर्वग्रह दुषित भावना न ठेवता स्वच्छ मनाने हा ब्लॉग पडताळावा आणि स्वत: विचार करून पहावं.
    धाकले पाटील आपल्या कार्यास सलाम आणी लक्ष लक्ष शुभेच्छा.
    जय जिजाऊ जय शिवराय

    ReplyDelete
  5. महाराष्ट्रातील त्यावेळेच्या शस्त्रीपंडीतांनी आणी प्रतिष्टीत ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणात त्यांना साथ दिली असती तर आज वैदिक परंपरेचा जो झपाड्याने सार्वत्रीक लोप पावत आहे तो इतक्या झपाट्याने होऊ लागला नसता.शाहू महाराज वैदिक उद्धाराकरीता पुढे आले होते.त्यांना झिडकारल्यामुळे आता वैदिक परंपरेचा आंतकाळ अत्यंत समीप आला आहे

    ReplyDelete
  6. हिंदू धर्मातील ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व नष्ठ करण्याचा त्यांचा द्रष्टेपणा पाहिला म्हणजे त्यांची तुलना फ़क्त महात्मा गौतम बुद्धांशीच करावीशी वाटते.महाराष्ट्रातील इतर समाज सुधारक आणी शाहू महाराज यांच्यात जो मोठा फ़रक आहे तो हाच.त्यांना जातीभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सहिष्णुतेने सामावूण घ्यायचे नव्हते तर ती जातीभेदाची चौकटच मोडायची होती.म्हणुन शाहू महाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत.
    लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन !!

    ReplyDelete
  7. वाईचा ब्राह्मणवर्ग हा कोल्हापुरकर शाहू महाराजांच्या आणि सयाजीमहाराजा यांच्या वेदोक्ताविरोधात होता.कोल्हापुर,पुणे इत्यादि पुराणमताभिमानी वर्ग हा वाईकरांच्या नेत्रुत्वाखाली मराठ्यांच्या वेदोक्ताधिकारास विरोध करत होता.कोल्हापुर आणि पुणे,मुंबई इथले अनेक व्रुत्तपत्र वेदोक्त अधिकाराच्या विरोधी होता.एकंदरील तुम्ही म्हणताय ते खरे आहे संपुर्ण ब्राहम्ण जातीच्या लोकांमुळेच हिंदू धर्माचे काळ संपणार आहेत

    ReplyDelete
  8. पाटील साहेब आपल्या लिखानाचे कौतुक कसे करावे.अगदी अफ़लातून लेखणी चालवता.असे इतिहास सर्वांसमोर येणे गरजेचे आहे.शाहू महाराजांचे कार्य खुप मोठे आहे.ते तुम्ही बर्याच लेखांतून मांडले आहे अनुयायी असावे तर आपल्यासारखे असावे.
    डॉ.बाबासाहेब यांनी म्हंटले आहे की शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या पेक्षा श्रेष्ठ होत.

    ReplyDelete
    Replies
    1. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही त्यांच्या सारखे श्रेष्ठ तेच पण बाबासाहेबांनी असं म्हंटलं होतं की ब्राह्मणशाही उध्वस्त करण्यात शाहू महाराज शिवरायांपेक्षा श्रेष्ठ होत.आणि ते खरे आहे.

      Delete
    2. शाहू महाराज हे डॉ अम्बेडकर यांना जे हवय म्हणजे जातिभेद निर्मूलन ते त्यानी केले ,म्हणून ते बाबासाहेबांना कदाचित मोठे वाटतिल ही परन्तु शिवाजी महाराजनपेक्षा मोठे होते म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे, महाराजांचा काळ वेगळा ,गरज वेगळी शिवजी महाराज एकमेवद्वितीय

      Delete
  9. हिंदू धर्माच्या समाजरचनेत व्यवसाईक वर्ग आणि जाती यांच्या सामाजिक प्रतिष्टेची उच्च आणी नीच एक सोनपरंपरा आहे.त्यातील मुळ भेद म्हणजे आर्य अनार्य हा होय.आर्य ही आर्यत्तरांपेक्षा उच्च व अर्येत्तर ही आर्यांपेक्षा खालची श्रेणी होय.आर्य म्हणजे ज्यांना शास्त्रश: वेदपठणाचा आधिकार आहे.त्याचप्रमाणे ज्यांना धार्मिक संस्कार वा धार्मिक विधी वेदोक्त मंत्रांनी पर पडतात किंवा वेदोक्त मंत्रांनी धार्मिक विधी व संस्कार करण्याचा ज्यांना अधिकार आहे ते होत.आर्य हे विदेशी आहेत जे युरेशीया आणि सुमेरू प्रांतातून आलेत.

    ReplyDelete
  10. कसब, गुण, कर्त्रुत्व यांविषयी शाहू महाराजांच्या अतिशय आस्था होती आणी समाजातल्या रंजल्या- गांजल्या कणव होती.त्यांचे शरीर जसे अवाढव्य होते तसेच त्यांचे मनही होते.यामुळे समाजातील गुणी,कर्त्रुत्ववान यांना महाराजांचा आधार होता.त्याचप्रमाणे लहानशा खेड्यातील लहानशा माणसालाही आधार होता.सत्ताधारी हा असा असावा लागतो. गांजलेल्या,पीडीतांना तो अपील कोर्टासारखा वाटावा आणि कर्त्रुत्ववानांना त्यचा आधार वाटावा.शाहू महाराज तसे होते आणि म्हणुन ते एक केंद्रबिंदू बनले होते.लोहचुंबकाकडे लोखंडाचे कण धाव घेतात,त्याप्रमाणे त्यांच्याकडे धाव घॆत.राजर्षी शाहू महाराज हे केवळ वारसा हक्काने राजा नव्हते,तर ते लोकांचे ,रयतेचे राजे होते.
    अशा या लोकांच्या राजास मानाचा मुजरा.

    ReplyDelete
  11. जातीभेदाच्या व्यवहाराखाली सुरक्षित असलेल्या दुर्ग्रहांनी जेंव्हा शाहू महाराजांना डंक माराण्याचा धारिश्ट्य केले.त्यांनी तेंव्हा त्या धारिष्ट्याचे पाळेमुळे खणून काढण्याचे निश्चय केले.ब्राह्मण्य हा सामाजिक विषमतेचा मुलाधार(ब्राह्मण्य येथे समुहवाचक आहे गुणवाचक नाही) तो नष्ट केला की लढाई जिंकली हा हेतू मनात बाळगून शाहू महाराज आपली पाऊले टाकू लागले.शाहू महाराज विजयी झाले आणि ब्राह्मण्य संपले.

    ReplyDelete
  12. शाहू महाराजांच्या काळातले सगळे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके बहुसंख्य संस्थानिक आणि ब्राह्मण इंग्रजांनी टाकलेल्या तुकड्यांवर किती चैनित जगत होते.रेसिडेंटसाहेबांची आणि त्यांच्या मॅडमेची तब्यत सांभाळत होते.अंगाखांद्यावर दागदागिण्याच्या झुली घालून मिरवीत होते.आणि हा राजा मात्र गळ्यातल्या कवड्यांच्या माळेशी आपण जास्तीत जास्त कशे इमान ठेवू याची चिंता करत होता.यालाच म्हणता थोरपण आणि ते फ़क्त महाराजांकडेच असू शकते.
    बहुजनांचे उद्धारकर्ते राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो.

    ReplyDelete
  13. हिंदू समाजरचना ही एक गळक्या भांडयच्या उतरंड्यासारखी आहे.परंपरेचा डबक्यातून भरलेले पाणी ब्राह्मणवर्गापासून थेट खालपर्यंत गळत असे.त्या दुर्गंधीचे बळी असनारे लोक खालच्या भांड्यावर त्याच पाण्याचा प्रयोग करत असतात.ब्राहम्णांनी मराठ्यांना शुद्र लेखावे,मराठ्यांनी ९६ कुळी लोकांना शुद्र लेखावे.
    पु.ल.देशपांडे

    ReplyDelete
  14. पाटील साहेब अनेक प्रकरणामध्ये आपण म्हणतो की ब्राह्मण जातीयवादी आहेत किंवा हिंदू जातीयवादी अहेत.पण जातीयवाद म्हणजे काय हे अजुन बर्याच जनांना माहीत नसावा त्यातीलच एक मी.मी जतीयवाद कधी केला नाही पण तरीही मला शिव्या खायची वेळ आज आलिये कशामुळे माहीत आहे ? निव्वळ ब्राह्मण असल्यामुळे.

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदू धर्म हा चार वर्णावर आधारलेला,माणसांमाणसांमध्ये भेद करनारा.जन्मानेच उच्चता-निच्चता ठरविणारा धर्म,जातिभेद कमालिचे जातीभेद.कुत्र्याला शिवलेले चालेल पण माणसाला नाही.चुकून स्पर्ष झालाच तर स्नान केल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही.एकाने दुसर्याबरोबर जेवायचे नाही.एकाने दुसर्याच्या बारश्याच्या व बाराव्याचा सोहळ्यात बंधू म्हणून सामिल व्हायचे नाही.एकाचे पिंडदान दुसर्याला करता येणार नाही.एकाची मुलगी अथवा मुलगा दुसर्यांच्या मुलगा अथवा मुलगीला देता येणार नाही.आणी हे सगळे कशामुळे तर जन्मामुळे.ही विषमता आणि भेद जावा म्हणुन सुधारकांनी किंवा क्रांतिकारकांनी प्रयत्न केले.तो एका जातीचा दुसर्या जातीविरुद्धचा झगडा होता,श्रेष्ट मानल्या गेलेल्या ब्राह्मण जाती विरुद्ध कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीविरुद्ध म्हणजेच ब्राह्मणेत्तर जातींचा झगडा होता आणि याला एकदम सोपे नाव "जातियवाद".

      Delete
  15. वेदोक्त आणि पुराणोक्त असल्या पोथ्यांचे आधार गुंडाळण्यास टिळकासारख्या बुद्धीमंतांनी आणि महान राष्ट्रधुरीनांनी आपला वेळ घालवून बहुजनास " वेदोक्त मागणीचे विचार हे पुर्वपरंपरा, इतिहास व निर्णय लक्षात घेऊन अवनितीचे नि आणी अविचारीपणाचे आहे असा निर्णय द्यावा आणी जन्मसिद्ध पनाच्या रुढीचे निर्मुलण करून अडाण्यांचे हात चार अक्षरांनी धडे करणारे असावेत यासाठी प्रयत्न केला नाही हेच खरे दुर्दैव.

    ReplyDelete
  16. भटमान्य टिळकाने आपली राजकीय नेत्याची,देशनेत्याची भुमिका सोडून त्यावेळी ब्राह्मण नेत्यासारखे वर्तन केले. आणी सर्व वाद स्वत:हुन आपल्यावर ओढवून घेतला आणी जे उभय पक्षी घडले आणि पुढे टिळकांच्या म्रुत्युपर्यंत व नंतरही पुढे घडत राहिले त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा व समाजकारणाचा पुरता विचका-विचका होऊन गेला.त्या वादात जाण्याचे हे स्थळ नव्हे आणि त्याला इथे तितका आवकाशही नाही.पण शाहू छत्रपती आणि त्यांचे छत्रपतीपद आणि टिळक व त्याच्या नेत्रुत्वाखालील ब्राह्मणी मर्यादा यांमुळे एकून गुंतागुंत वाढण्याला मदत झालो.लोकमान्य टिळक हे उघड उघड राजद्रोही आणि शाहू छत्रपती रेशिडेंटाच्या खाली काम करणारे राज्यकर्ते या दोन परस्पर विरोधी राजकीय भुमिकांमुळे ही या एकून प्रकरनातील गुंतागुंत निर्माण व्हायला आणि त्यामुळे वर्षानुवर्षे परिस्थिती आधिकाधिक चिघळत जायला कारणीभुत ठरली

    ReplyDelete
  17. शाहू महाराज कायम म्हणायचे की दोन सवयी मला जडल्या आहेत.अंग रगडून घॆणे नि बामणी व्रुत्तपत्रांतील शिव्या खाणे.
    ब्राह्मणद्वेष्टे हा शाहू महाराजांवर केलेल्या अरोपांतील एक आरोप होता.ब्राह्मणद्वेष हा एकच आहे जसा क्षात्रद्वेष आणि वैश्यद्वेष पहायला मिळत नाही.

    ReplyDelete
  18. महाराष्ट्रात राजकारणार लोकमान्य टिळक आणी शाहू छत्रपती यांचे संबंध जमले नाहीत ही मोठी दुर्दैवी गोष्ट होती.पण कोल्हापुरची गादी ही शिवाजी महाराजांची गादी यास्तव लोकमान्य टिळक यांना अभिमान व गादीवरील वारसाबद्दल आदर होता.उलट लोकमान्य टिळकांशी वेदोक्त वगैरे प्रकरणावरून कितीही मतभेद असले तरी इंग्रजांशी निधडेपणाने लढणार्या लोकमान्य टिळकांबद्दल शाहू महाराजांना आदर होता.लोकमान्य टिळक वारल्याची जेंव्हा बातमी कळाली तेंव्हा शाहू महाराज जेवत्या ताटावरून उठले.

    ReplyDelete
    Replies
    1. लोकमान्य (?) टिळकाचा असला कसला जगावेगळा अभिमान पहिल्यांदाच पाहतोय.आदर असेल तर मग व्रुत्तपत्रातून बदनामी का करत होता टिळक ? शाहू महाराज आणि टिळक हे शत्रू होते असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही

      Delete
    2. टिळकाने शाहू महाराजांना स्वराज्य द्रोही असे संबोधून केसरी मध्ये बातमी प्रसारीत केली होती.

      Delete
    3. ह्या लेखात बरीच माहिती ही खोटी दिलेली आहे, आणि त्या प्रकरणाला थोडंस चढवून वाढवून सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे... टिळकांनी शाहू महाराजांच्या क्षत्रियत्व ला कधी ही अमान्य केले नाही, शाहूंना वेदोक्त मंत्र हवे असतील तर त्यांनी ते स्वीकारावे असे देखिल लोकमान्यांनी केसरीत लेखात सांगितले होते, ही गोष्ट तर वरच्या पोस्ट मध्ये नाहीये...

      Delete
  19. भारताशिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही.दुर्दैवाने भारतात मात्र जातीववाद इतका तिव्र आहे की मांजर,कुत्री किंवा शेणापेक्षादेखील कमी अशाप्रमाणे आम्ही आपल्या देशबांधवास वागवितो...नुसते तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हाला नको आहेत.क्रुतीने जो माणसाला माणसाप्रमाणे वागवतो तो पुढारी
    जय शाहू महाराज.

    ReplyDelete
  20. जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला । ज्ञानरवी झाला ॥
    शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार ।
    म्हणुन शाहू प्रभु देव अवतार.

    ReplyDelete
  21. पेशव्यांनी बंद पाडलेला शिवशक चालू करून शिवाजी महाराजांनंतर तीनशे वर्षे खंडीत झालेले राजर्षी शाहूंनी पुन्हा एक जबरदस्त उलटा फ़िरका देऊन फ़िरवले.

    ReplyDelete
  22. शाहू महाराजांनी महाराष्ट्राची चेहरेपट्टी बदलण्यासाठी आपले कर्त्रुत्व आणि राज्यसत्ता पणाला लावली.दुर्दैवाने त्यांना दिर्घायुष्य़ लाभले नाही.वयाच्या ४८ व्या वर्षी आणि महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील त्यांची फ़ार मोठी आवश्यकता भासत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्यावर म्रुत्युलेख लिहिताना "टाईम्स ऑफ़ इंडिया" ने म्हंटले होते "कोल्हापुरचे शाहू छत्रपती हे दुसर्या कालखंडात जन्माला आले असते तर त्यांनी साम्राज्य स्थापन केले असते." अस्प्रुष्य़ जनतेबद्दल त्यांना एवढा कळवळा वाटत असे की जनता त्यांना आपला देव मानत असे.महात्मा फ़ुले यांच्यानंतर महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे यांना अपवाद वगळता शाहू महाराजांसारखा जातीभेद गाडून टाकणारा दुसरा पुढारी झाला नाही.एका महान हेतूने प्रेरीत झालेला हा राजा त्याच्या निरीच्छ व्रुत्तीने राजर्षीपदाला पोचला.शाहू राजा केवळ राजा नव्हता,केवळ छत्रपती नव्हता,केवळ समाजसुधारक नव्हता,केवळ लोकनेता नव्हता तर इतिहासाला कलाटणी देणारा आणि एक नवा इतिहास घडविणारा महान समाजपुरुष होता.

    ReplyDelete
  23. राजर्षी शाहू महाराज हेच खरे देशभक्त होते.जन्मभर त्यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगिन उन्नतीचे कार्य केले.त्यांच्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्ती केली करून शाळा काढल्या.वसतीग्रुहे स्थापन केली.त्यांना विद्यादान करून त्यांची अस्मिता जाग्रुत केली.अहंकारी बामनांच्य गुलामगिरीतून सोडविण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले.चातुर्वण्य व्यवस्थेवर मुळावर घाव घातला.जातीजातीतील विषमता संपवून सर्वांना समतेच्या आसनावर मानवतेची दिक्षा दिली.
    जयोस्तु राजर्षी जयोस्तु बहुजन

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.