शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते.
शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा "हंबीरराव" हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.ही स्वारी यशस्वी करून खानदेशातील मोघलांची खानदेश,बागलाल,गुजरात,बर्हाणपूर,वर्हाड,माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला होता.यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबिररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या येलबुर्गा येथे मोठा पाडाव करूण त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.हुसेनखान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येवून मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते.मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही.पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहिम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.नंतर हंबिरराव सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोघालांना जाऊन मिळणे पुन्हा स्वराज्यात येणे यानंतर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला.त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले.यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते.
थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे.संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे.संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
एकंदरीत सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्मामीनिष्ठा दिसून येत असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्वाची होती हे ही दिसून येते. हंबीररावांच्या ठायी शत्रुशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतुनच हंबीररावांना मिळाल्या होत्या. इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापतीची निवड अगदी योग्य होती.अशा या मर्दमराठ्यास मानाचा मुजरा.
कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले.व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते.दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला.विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले.याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली.प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले.व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते. पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.हे युध्द १६ नोव्हेंबर,१६७७ साली झाले.यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला(२२ जुलै, १६७८).
ReplyDeleteहंबीरराव मोहिते हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती..
ReplyDelete१६७४ – छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब
देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली.छत्रपती शिवाजी महाराज
यांचे राज्यभिषेका नंतरचे प्रमुख सेनापती. शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला असता,
हंबीरराव मोहित्यांना हिंदवी स्वराज्याचा सेनापती घोषित करण्यात आले.
महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या हंबीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या.
हंबीररावांच्या कन्यका महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी
होत्या.
एका चांगल्या लेखाबरोबर पुनरागमन
ReplyDeleteछान लेख आहे बर्याच काळानंतर कट्ट्यावर आलास.
हंसाजी ‘हंबीरराव’ मोहिते – हंबीरराव माणूस तसा रांगडा परंतु स्थिर बुद्धीचा.शंभूकालात जी मोगली वावटळ उठली त्यात सगळ्यात महत्वाची कामगिरी कुणी केली असेल तर ती हंबीरराव मोहित्यांनी. प्रतापरावांच्या नंतर कुणास सरनौबती द्यावी या विचाराने शिवाजी महाराज चिपळूणला असणाऱ्या आपल्या फौजेचा कौल घेऊन आले आणि त्यांनी हंबीरराव यांना सरनौबत केले.हे शिवाजीराजांच्या अखेरपर्यंत घोडदळचे सरनौबत होते.हंबीरराव पुढे शंभूकाळात शर्जाखानाच्या लढाईत वाई इथे गोळा लागून पडले
ReplyDeleteस्वराज्याचे शिल्पकार "हंबीरराव मोहिते " या मर्द मराठ्याला मानाचा मुजरा.
ReplyDeleteएका शाहिरने म्हंटले आहे
ReplyDeleteशिवाजीच्या तळ्यात पाणी पिती सर्व जीव ,नाही भेदभाव॥
असे अनेक मावळे जमवून स्वराज्य घडवले राजांनी अशा या शुरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा.
पाटील साहेब आणखीन एक भन्नाट लेख आपण मालिका जी सुरु केली आहात स्वराज्याचे शिलेदार खरच सांगतो एकदम झकास आहे.असं लिखान चालू ठेव आणि आम्हाला ज्ञान दान करत चला.
ReplyDeleteजय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
शिवराय हे राष्ट्रपुरुष होत त्यांनी घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा असू शकत नाही जे काही मावळे शिवरायांनी कमावले होते ते अगदी स्वामिनिष्ठ होते त्यामुळेच आम्हाला हिंदवी स्वराज्य बघता आले
ReplyDeleteजय शिवराय जय भवानी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे एक दुधारी शस्त्र होते ते म्हणजे त्यंची जीभ,, शिवराय कोणाच्याही खांद्यावर हात ठेवायचे आणि कानात दोन शब्द बोलायचे आणि लगेच तो माणूस शिवरायांचा होऊन जायचा.
ReplyDeleteअशा मावळ्यांमधीलच एक म्हणजे हंबीरराव मोहिते एक कर्तव्यनिष्ठ मराठा.
जय शिवराय जयोस्तु मराठा
जय जिजाऊ जय शिवराय
ReplyDeleteलेख छान आहे पाटील धाकले आसंच लिखान ठेवा आम्ही आपल्याला सुभेच्छा देतो.
आपला ब्लोग वाचुन खुप आनंद झाला.संपुर्ण ब्लोगचे मी निरिक्षण केलेले आहे.काही ब्राह्मणविरोधी सुद्धा लेख आहेत.पण सांगायचा मुद्धा हाच की आपण नि:पक्षपातीपणे लेखन केले पाहिजे.जे आपल्या लिखानातून दिसत आहे.खरं सांगायचं म्हणजे ब्लोगचे लेख अत्यंत वैचारिक आणि अभ्यासिक आहेत आणि असे लेख वाचकांसमोर ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे नव्हे काळाची गरज आहे.आपल्या सारख्या अल्प आयु असलेल्या प्रतिभावांत युवकाने अशा प्रकारचा द्रुढ संकल्प करणे हे फ़ार मोलाचे कार्य आहे.
ReplyDeleteआपण आपल्या महत्वाकार्यात यशस्वी व्हावे आणि अशाच प्रकारे भावी काळात विचारांची प्रगल्भता वाचून एक यशस्वी साहित्यिक व्हावे हिच अभिलाषा
जय शिवराय जय महाराष्ट्र जयोस्तु मराठा बहुजन हिताय बहुजन सुखाय
धाकले पाटील आपले प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे पण आपण इथे एक विचार केला पाहिजे की सर्व जातीजमतीचे लोक शिवरायांच्या राज्यात लढले होते मग आज हा भेदभाव का ? का ब्राह्मणांना शिव्या दिल्या जातात ? का त्यांचा अपमन केला जातो.खरं तर हे काम आपल्या सारख्या लेखकांचे आहे की दोन्ही समाजामधले संबंध जुळले पाहिजेत.पण आपणच ब्राह्मणविरोधी लिहित असाल तर कसं होणार समाजाची एकता ?
ReplyDeleteहंबीररावांच्या पराक्रमाला विनम्र अभिवादन...
जय महाराष्ट्र
पाटीलसाहेब आपले लेख खरोखर चांगले आहेत.आपण उत्क्रुष्ठ अशी माहीती पुरवत आहात याचा आम्हाला अभिमान आहे.आज एकाही संतांची.महापुरुषांची माहीती प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत नाही.आपण आपल्या ब्लोग च्या माध्यमातून ते चरित्र प्रसारीत करत आहात ही खुप मोठी गोष्ठ आहे.असेच प्रबोधनाचे कार्य चालू ठेवा आम्ही आपल्या सोबत आहोत.
ReplyDelete@ व्यवस्थापक तुम्ही एक विज्ञानवादी विचारधारा समजावून सांगत आहात. महापुरुषांच्या चरित्रातून जीवन जगण्याची नितीमुल्य तत्वे तुम्ही समाजाला देऊ पाहात आहात.अत्यंत निर्भयपणे नितळपणे हिताचं काम करत आहात.
ReplyDeleteआपल्याला भवीष्यातील वाटचालीस लाख लाख शिवेच्छा..
माता जिजाऊ तुम्हाला प्रेरणा देऒ आपण "वादळातील दिवा" आहात सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देत चला.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदीरातील भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. या तलवारीला येथे ठेवायचे कारण म्हणजे अफझलखानाशी झालेल्या लढाईत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी केलेला पराक्रमामुळे त्या तलवारीला मंदिरात ठेवले आहे. या लढाईत त्यांनी ६तासात ६०० शत्रूंना मारले. ह्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के दिसून येतात. त्या काळात शिवाजी महाराजांनी प्रथा चालू केली होती. एखाद्या मावळयांने १०० शत्रू एकाच लढाईत मारले तर त्या मावळयांच्या तलवारीवर शिक्का ऊमटवला जायचा. सरसेनापती हंबीरराव मोहितेच्या तलवारीवर ६ शिक्के आहेत. असा पराक्रम कोणीही गाजवू शकला नाही. ही तलवार भवानी मातेच्या समोर ठेवलेली आहे. भवानी मातेसोबत या तलवारीची पूजा केली जाते
ReplyDelete१० वर्षाच्या राजारामला सिहासनावर बसून ब्राह्माण मंत्री सत्ता ताब्यात गेऊ इच्छित होते. म्हणून त्यांनी १० वर्षाच्या राजारामाच्या राज्याभीषेकाची बातमी फुटू न देता उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्यभिषेक चोरून लपून केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे (अटक) करण्याचे आदेश पत्र हंबीरराव मोहिते यांना दिले
ReplyDeleteपण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते.
राजाराम हा १० वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य ब्राह्माण मंत्रांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्रांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. हे हि सिद्ध करते कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छात्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो.
हंबीरराव मोहिते- याचें मूळ नांव हंसाजी मोहिते असे असून इसवी सन १६७४ पावेतों हा शिवाजीच्या सैन्यांत पांच हजार फौजेवरील एक सरदार होता. परंतु त्या वर्षी विजापूरच्या सैन्यावर शिवाजीचा मुख्य सेनापति प्रतापराव गुजर तुटून पडला असतां तो प्राणास मुकून त्याची फौज फुटली. तेव्हां त्यानें पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैन्यावर हल्ला करुन मुसुलमानांचा पराभव केला म्हणून शिवाजीनें त्यावर खूष होऊन यांस 'हंबीरराव' असा किताब दिला; व प्रतापरावाच्या जागीं यास सेनापति नेमलें. १६७५ सालीं हंबीररावानें बऱ्हाणपुरावरून थेट माहूरपर्यंत मोंगलांचा मुलूख लुटला, व भडोच जिल्ह्यातून खंडणी गोळा करून सर्व पैका रायगडास सुरक्षित आणला. पावसाळा संपल्यावर तो पुन्हां मोंगलांच्या मुलुखांत शिरला व त्याचें बरेंच नुकसान केलें. पुढच्या वर्षी यादगिरीजवळ हुसेनखान मायणाचा पराभव केला व पुष्कळ लूट मिळविली. इ.स . १६७८ त शिवाजी कर्नाटकांतून महाराष्ट्रांत परत आला तेव्हां त्यानें हंबीररावास व्यंकोजीजवळ ठेविलें होतें. तेथें त्याची व व्यंकोजीची एक लढाई झाली होती. शिवाजी व व्यंकोजी यांच्यामध्ये तडजोड झाल्यावर हंबीरराव मोठ्या त्वरेनें महाराष्ट्रांत यावयास निघाला. मार्गात त्यानें कृष्णा व तुंगभद्रा यांच्या दुआाबांत विजापूरच्या सैन्याचा पराभव केला, व सर्व दुभाब प्रांत आक्रमण करून कित्येक बंडखोर देशमुखांस वठणीस आणलें (१६७८). इ. स. १६७९ त शिवाजीनें मोंगलांकडे पळून गेलेल्या संभाजीचा पाठलाग करण्याकरितां याची रवानगी केली. परंतु संभाजी दिलेरखानाच्या छावणींत पोंचल्याचें कळल्यावर यास विजापुराकडे मोंगलाविरुद्ध आदिलशहाच्या कुमकेस पाठविलें. कांहीं दिवसांनीं हंबीररावानें मोंगल रणमस्तखान याला गाठून त्याचा पराभव केला. यानंतर हंबीरराव विजापुरास आला, व वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाच्या सैन्याभोंवतीं घिरट्या घालून त्यानें मोंगलांच्या सैन्यांत अन्नाची इतकी टंचाई पाडली कीं, पावसाळा संपल्याबरोबर दिलेरखाननें विजापुरचा वेढा उठविला (१६७९). शिवाजीच्या पश्चात हा संभाजीच्या पक्षास येऊन मिळाला. आणि त्याच्यामुळेंच संभाजीस ताबडतोब गादी मिळाली. यानेंच मोरोपंत व अण्णाजी या सोयराबाईच्या बाजूच्या प्रमुख कटवाल्यांस संभाजीच्या स्वाधीन केलें. पुढें बऱ्हाणपुरावर हल्ला करून (१६८०) कोल्हापुराजवळ सुलतान शहाअलम याचा हंबीररावानें पराभव केला (१६८०) इसवी स. १६८४ मध्यें औरंगझेबानें आपली छावणी अहमदनगरास आणल्यामुळें खानदेशप्रांत मोकळा पडला आहे असें, पाहून हंबीरराव अचानक वऱ्हाणपुरास गेला, व त्या शहरीं कित्येक दिवसपर्यंत खंडणी गोळा करून तो मिळविलेल्या खंडणीसह त्वरेनें परत आला. येत असतां वाटेंत त्यानें बऱ्हाणपूरपासून नाशिकपर्यंत मार्गांतील सर्व प्रांतांत चौथ-सरदेशमुखी वसूल केली. इ. स. १६८७ मध्यें हंबीरराव व मोंगलांना सरदार सरझाखान यांची वाईजवळ लढाई होऊन तीत मोंगलांचा पराभव झाला. परंतु या लर्ढाईंत हंबीरराव घायाळ होऊन मरण पावला. (जिथें शकावली, मराठा रियासत भा. १; डफ.)
ReplyDeleteआदिलशाही सरदार बहलोलखान याच्याबरोबरच्या लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले.प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच,प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिंमत निर्माण करून, बहलोलखान वर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले.
ReplyDeleteबहलोलखानाविरूध्द पराक्रमाने महाराजांना हंबीररावामध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला.चिपळून जवळच्या श्रीक्षेत्र परशूराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले.सभासद म्हणतो,'प्रतापराव पडले ही खबर राजियांनी ऐकून बहूत कष्टी जाले,सरनोबत कोण करावा?अशी तजवीज करून,आपण स्वस्थ लष्करांत येऊन,लष्कर घेऊन कोकणांत चिपळून जागा परशूरामाचें क्षेत्र आहे,तेथें येऊन राहिले.मग लष्करची पाहाणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजीना फोडून वाटणी केली,आणि सरनोबतीस माणूस पाहातां हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्यें जुमला होता;बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास 'हंबीरराव' नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली.कुल लष्कराचा गाहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले.
मी तळबीळला गेलो होतो. तिथे हंबीरराव मोहीत्यांबाबत माहिती घेण्याचा बराच प्रयत्न केला, विशेषतः त्यांच्या पुढील वंशजांबाबत. पण माहिती मिळाली नाही.विनंती आहे की ही माहिती असल्यास प्रकाशीत करावी.
ReplyDeleteसेनापती मुजरा
ReplyDeleteसेनापतींची समाधी
ReplyDeleteसेनापतींची समाधी बांधण्यासाठी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी खूप मोठं सहकार्य केलंय
ReplyDeleteनरेन्द्र मोहिते परिवार
ReplyDeleteनागपूर
तर्फे
मानाचा
मुजरा
नरेन्द्र मोहिते परिवार
ReplyDeleteनागपूर
तर्फे
मानाचा
मुजरा