"प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता" या वेदवाक्याचा अर्थ सांगताना म्हंटले जातेे की "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदु" या "हिंदू" शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ असताना बाह्मणांनी स्वार्थाप्रमाणे त्याचा अर्थ लावला व हिंदूंच्या माथ्यावर वेदोक्त आणि पुराणोक्त हे वेगवेगळे विधी लादून स्वत:चे श्रेष्ठ्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आजही भटजी धर्मकार्यातून "पुराणोक्त विधी करून इतरांना दुय्यम वागणूक देतात. धर्मकार्याला बसलेल्या व्यक्तीला चाललेली विधी पुराणोक्त आहे की वेदोक्त आहे याची मुळीच कल्पना नसते त्यामुळे भटजी सांगेल त्याप्रमाणे तो विधी करत असतो"
वस्तुश: जातीभेद हे वर्ण वर्चस्ववादी लोकांनी समाजव्यवस्था व संरक्षण यासाठीच निर्माण केले. संरक्षणाचे काम करणार्याला "क्षत्रिय", व्यवसाय करणार्याला "वैश्य",सर्वांची सेवा करणार्याला "क्षुद्र" आणि संस्कार करणार्याला "ब्राह्मण" संबोधित असत. "चातुर्वण्य मया स्रुष्टं गुणकर्मविभागश:" अर्थात चार वर्णाची ही रचना गुणकर्मावर आधारीत होती. त्यावेळी एकाच परीवारात एक ब्राह्मण तर दुसरा क्षत्रिय ,तिसरा वैश्य तर चौथा क्षुद्र असे. कालांतराने आर्यांच्या मुळ हेतूला बगल देऊन जन्माधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करून ब्राह्मणांनी आपले श्रेष्ठ्त्व समाजावर लादले. "नंतर सामाजिक व्यवस्थेत मानाचा जो अनुक्रम लागला त्यात दुसर्या क्रमांकाचे स्थान ब्राह्मणांना मिळाले, त्यांना क्षत्रियांबद्द्ल आसुया निर्माण झाली." रावाला खेचल्याशिवाय पंताला वर चढता येणार नाही, हे त्यांनी जाणले. म्हणुनच वरील विचारांचे पालन करून राजर्षींना खेचण्याचे कार्य केले. पण राजर्षी शाहू महाराज शेरास सव्वा शेर होते. निश्चयाचे महामेरू होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमुलाग्र क्रांती करणारे प्रकरण म्हणून या "वेदोक्त प्रकरणा" कडे पहावे लागेल. सनातनी ब्राह्मणांनी करवीर राज्यात आपल्या अहंकारी वर्णवर्चस्वाच्या प्रव्रुत्तीमुळे अक्षरश: हैदोस घातला होता."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥" ही त्यांची विचार व आचारधारा होती. अशा या ब्राह्मणांचे वर्णन महालिंगदासांनी मार्मिक शब्दात केले आहे.

"ऐसा तो ब्राह्मण । म्लेंच्छ होय चौगुण । ऐसा पापिष्ट तेणे । जन पीडीले ॥
तया षटकर्माचा विसर । कारकोनी पडिभर । गायत्री मंत्रांचा अधिकार । थोडा तयासी ॥
दग्धचि बोलणे तेणे । सखा सोईरा मित्र नेणे । लाभावरी तेणे । ठेविले चित्त ॥"
अशा या सनातनी ब्राह्मणांनी उठविलेल्या "वेदोक्त प्रकरण" या वादळात राजर्षी शाहू महाराज जिंकले आणि विरोधकांचा फ़ज्जा उडाला याचा आढावा घेवू.
नोव्हेंबर १८९९ मध्ये पंचगंगेवर नेमाने स्नान करण्यास जात असताना एके दिवशी स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणार्या नारायण भटाच्या तोंडून जे मंत्र बाहेर पडत होते ते पुराणोक्त होते, नारायण भट स्वत: आंघोळ करूण आले नाहीत व पुराणोक्त मंत्र उच्चारत आहेत. ही गोष्ठ राजारामशात्री भागवत यांनी महाराजांच्या नजरेस आणली. शाहू महाराजांनी त्या नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सुनवले. नारायण भटाने "महाराज शुद्र आहेत" असे स्पष्ठ उत्तर दिले. उत्तर प्रत्युत्तरे झाल्यानंतर नारायण भटाने, "धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्या साठी शुद्रच" असे सांगितले. येथुनच वेदोक्त वादास प्रारंभ झाला.
महाराजांचा संयम दांडगा होता. विषारी फ़ुत्कार काढणार्या नारायण भटाला त्याच क्षणी चाबकाचे फ़टके लगावले असते तर कोणीही, का ? म्हणुन देखील विचारले नसते. तरीदेखील राजे शांत होते. पण त्यांच्या सोबत असणार्यांची मने क्रोधांनी पेटून उठून, हात शिवशिवत होते. "प्रत्यक्ष राजांचा अपमान, आमच्या देवाचा अपमान ? आम्ही या भटाला जिवंत ठेवणार नाही. हा नारायण भट काही सज्जन पुरुष होता असे नाही. अशा या लबाड भटाने एका चारित्र्यसंपन्न, संयमी व सर्व प्रजेला प्रिय असलेल्या राजांचा घोर अपमान करावा, यापेक्षा अन्य घोर पाप तरी हा भट कोणते करणार ? महाराजांची वृत्ती संतांची होती. संत तुकोबारायांच्या शब्दात शाहू महाराजांचे थोरपण उमगते"
"दया,क्षमा,शांती । तेथे देवाची वसति ।
भूतांची दया । हेचि भांडवल संता ॥"
महाराजांच्या अपमानामुळे संपुर्ण "बहुजन समाज" एक झाला व त्यांच्या मनात ब्राह्मणाविषयी रोष खदखदू लागला. त्यावेळी कोल्हापुर नगरपालिका ब्राह्मणमय होती. पंचगंगेवर ब्राह्मणांसाठी वेगळा घाट राखीव ठेवला होता नगरपालिकेने. महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली. ऑगस्ट १९०० मध्ये बहुजन समाजाने हातात बंडाचा झेंडा घेतला, हा सारा समाज भल्या पहाटे "छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, ब्राह्मणांचा धिक्कार असो" अशा आकाशगामी घोषणा देत पंचगंगेवर चालून आला. सनातनी ब्राह्मणांना-भटांना धडा शिकवला पाहिजे, या विचाराने पेटून उठलेला समस्त बहुजन समाज पंचगंगेच्या घाटावर जमा होऊ लागला. ब्राह्मणांसाठी राखीव ठेवलेल्या घाटावरील बोर्ड काढून तोडून टाकू लागला. त्या ब्राह्मणी घाटावर जमलेल्या शाहू प्रेमींना बघून घाबरून पळ काढू लागला. नाहीतर यापलीकडे ते करणार तरी काय ?
वेदोक्त मध्ये लो. बाळ गंगाधर टिळक
या वेदोक्त वादात सनातन्यांचा पक्ष घॆऊन टिळक मैदानात उतरले. टिळकांचा "केसरी" शाहू राजांच्या विरोधार विष ओकू लागला. २२ आणि २९ ऑक्टोंबर १९०१ च्या केसरीत टिळकांनी "वेदोक्ताचे खुळ" या नावाने दोन अग्रलेख लिहून शाहू राजांवर जहरी टीका केली व सनातनी ब्राह्मणांना जोरदार पाठींबा दिला. टिळकांनी लिहिले "धर्मशास्त्रातील जे प्रसिद्ध आणि सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण पुर्ण नष्ट झाले आहेत व फ़क्त ब्राह्मण आणि शुद्रच अस्तित्वात आहेत. टिळकांनी शाहू राजांना सरळ सांगितले की "तुम्ही खुशाल स्वत:ला उच्चवर्णीय समजा, परंतू तुम्ही शुद्रच आहात". टिळकांच्या या म्हणण्यामागे परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी निक्षत्रिय केली त्यामुळे प्रुथ्वीवर क्षत्रिय शिल्लकच उरले नाहीत हे ब्राह्मणांचे आवडते तत्वज्ञान होते. तसेच एका पुराणार म्हंटले आहे की,
"ब्राह्मणा: क्षत्रिया वैश्या:शूद्रा वर्णास्त्रयो द्विजा:।
युगे युगे स्थिता: सर्वे कलावाद्यंतयो: स्थितीरिति: ॥"
अर्थात : ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य़ आणि शूद्र हे चार वर्ण आणि यातील तीन आर्य वर्ण सर्व प्रत्येक युगात असतात, पण कलीमध्ये पहिला आणि अखेरचा असे दोनच वर्ण राहतात.
बाळ टिळकांनी वेदोक्ताची मागणी करणार्या मंडळींची हवी तशी टिंगल आणि उपहास करण्यासाठी आपली लेखणी झिजवली."अलिकडे इंग्रजी विद्येने व पाश्चात्य शिक्षणाने सुसंस्क्रुत झालेल्या मराठा मंडळींच्या मनात जी काही खूळे शिरली आहेत,त्यापैकी वेदोक्त कर्माचे खूळ हे होय." बाळ टिळकांनी आणखी एक युक्तिवाद पुढे केला. "वेदोक्त मंत्र म्हंटल्याने कोणत्याही जातीस आधिक श्रेष्ठपणा येतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे आणि ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तिही निरर्थक आहे. वेदोक्त मंत्र म्हंटले तरी मराठे हे मराठेच राहतील, हे लक्षात ठेवले पाहिजे." असे म्हणुन बाळ गंगाधर टिळकांनी मराठ्यांना क्षत्रिय मानण्यास विरोध केला.
कमिशनची नियुक्ती
टिळकांनी ब्राह्मणांची बाजू उचलून धरल्यामुळे या "वेदोक्त" प्रकरणाला उलटी कलाटणी मिळण्याचा संभाव्य धोका ऒळखून महाराजांनी या वेदोक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका हुकुमान्वये न्यायमुर्ती पंडीतराव गोखले, न्यायमुर्ती विश्वनाथराव गोखले व खुद्द आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचे एक कमिशन नेमून त्यांना अहवाल सादर करण्याची आज्ञा दिली. तसेच हे तिघेही ब्राह्मण होते तरी त्यातील पंडितराव गोखले हे निस्प्रुह, विद्वान व नि:पक्षपाती होते.
१६ एप्रिल १९०२ रोजी कमिशनने आपला अहवाल महाराजांना सादर केला. त्या अवहालात नमुद करण्यात आले होते की, "रुद्राभिषेक होत असे याचा अर्थ ज्यांची ही देवस्थाने होती ते द्विज वर्गातील आहेत. म्हणजे छत्रपती हे क्षत्रियच आहेत. "या अहवालावर अखेरपर्यंत राजोपध्ये यांनी सही केली नाही. हा राजोपाध्येदेखील नारायण भट्टाचा दुसरा अवतार होऊन त्याने आपला थयथयाट चालू ठेवला. पण त्याकडे दुर्लक्ष करून द्विज वर्गातील म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार असलेले शाहू छत्रपती हे क्षत्रिय आहेत असा निर्वाळा कमिशनने दिला.

या वेदोक्त प्रकरणाची एकूण फ़लश्रुती शोधताना एका महत्वाच्या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. तिची स्पष्ट नोंद इथे करणे योग्य ठरेल. वेदोक्त प्रकरणात एकूण न्याय शाहूराजांच्या बाजूने होता. त्यांनी हा न्यायाचा लढा मोठ्या जिद्दीने लढविला. अखेर न्याय आणि आपला वेदोक्ताचा अधिकार त्यांनी प्रस्थापित करून घेतला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक थोर माणूस समाजाला जाग आणावी,म्हणुन धडपडत होता. वेदोक्त आणि पुराणोक्तच्या फ़ाटक्यात पाय अडकलेला ब्राह्मण वर्ग तर त्यांना विरोधक म्हणुन उभा राहिलाच. पण त्या द्रुष्टीने वेदोक्त प्रकरणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा संपुर्ण विजय झाला. ब्राह्मण वर्चस्वाचा (अगदी टिळक आणि टिळककंपुंसकट) संपुर्ण पराभव झाला.
संदर्भ ग्रंथ :

राजर्षी शाहू गौरव ग्रंथ
शाहुंच्या आठवणी (प्रा. नानासाहेब सांळुंखे,मराठा भुषण)
राजर्षी शाहू चरित्र (श्री. ग. क्रु. कुर्हाडे)