विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मणप्रतिपालक" ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे.[की जाणुनबुजुन प्रसिद्ध केली गेली ?]. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण."गायींचा" आणि "ब्राह्मणांचा" प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते.मग प्रश्न असा आहे की शिवराय याच दोहोंच्या रक्षणासाठी आयुष्यभर लढले काय ? गाय पवित्र आहे कारण तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणे! पण गायींना कोण मानतात पवित्र ? ब्राह्मण मानतात का पवित्र ? गाय पवित्र आहे असे म्हणण्यापेक्षा उपयुक्त आहे असे म्हणणे योग्य ठरेल.पण आज गायींना पवित्र बनवण्याआधी गायींसंदर्भात आदराने,प्रेमाने कोण वागले आहे हे एकदा तपासून बघितले पाहिजे.गाय समस्त शेतकर्याला पुजनीय आहे. त्यामुळे प्राचिन काळापासून शेतकरी सामान्य रयतेने गायी पाळल्या आहेत. गायींची पुजा केली आहे; गायींचे रक्षण केले आहे.
ब्राह्मणांनी आयुष्यात कधीही शेती केली नाही,न नांगरलेली जमीन जिथे राहतो ब्राह्मण तिथे, असे ओळखावे असे म्रुच्छकटिक नाटकात म्हंटले आहे. ब्राह्मणांच्या धर्मशास्त्राने सांगितलेले काम शिक्षण घेणे व देणे; पुजा-यज्ञविधी करणे, दक्षिणा घेणे हे आहे. प्राचिन काळी ब्राह्मणांची यज्ञसंस्क्रुती होती. यज्ञाचे एक विषेश असे आहे की पशूचा बळी दिल्याशिवाय यज्ञ पुर्णच होऊ शकत नव्हता. प्राचीन काळी गोमेध नावाचा एक यज्ञही होता. .जुण्या पौराणिक कथेत ब्राह्मणांना शेकडॊ गायी दान दिल्याचा उल्लेख आढळतो.ब्राह्मण या गायींचे काय करायचे, याचा असा सहज उलघडा होतो. (आजही ब्राह्मण मुंजीसारख्या काही विधीत कणकेची गाय करून कापतात म्हणे !).
या उलट गायींचे रक्षण केल्याचे अनेक पुरावे आजही गावागावात आढळतात. (केवळ) मुसलमान गायी कापून खातात म्हणूण छत्रपती शिवरायांनी गायींचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले असे ब्राह्मणवादी म्हणतात. मात्र मुसलमान भारतात येण्यापुर्वी गायींचे रक्षण करण्यासाठी अनेकांना हुतात्मा व्हावे लागले. त्या काळी गायचोर कोण होते, असा प्रश्न सहज निर्माण होतो. मग बौद्धांच्या नंतर अहिंसाच्या मागे लोक लागतील आणि सामान्य लोक तिकडे लागलेले आहेत मागे त्याला ओढायचे असेल तर आपल्या कडे अहिंसा घ्यायची आणि गायीला पवित्र मानायची ही नवीन प्रथा निर्माण करायची. तीर्थकर आणि बुद्धांच्या अहिंसा तत्वाने ब्राह्मणी संस्क्रुतीची पिछेहट झाली. तेंव्हा ब्राह्मणांनी गायींमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे घोषीत केले. या सर्व गोष्टींचा अर्थ इतकाच की आज जे ब्राह्मण गोहत्या संदर्भात व गायीच्या पावित्र्या संदर्भात ज्या दंगली घडवून आणत आहेत, त्यामागचा त्यांचा हेतू वेगळाच आहे. "चोर तो चोर, वर शिरजोर" म्हणतात तो प्रकार हाच!
छ.शिवराय ब्राह्मणप्रतिपालक होते का ?
छत्रपती शिवराय हे कुळवाडी शेतकरी परंपरेतील असल्यामुळे त्यांनी गायींच्या रक्षणाचे आदेश दिले, हे योग्यच आहे. पण त्यांनी कधीही ब्राह्मणांच्या रक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. छ. शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवरायांनी स्वत:स ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेतलेले नाही. छ.शिवरायांच्या समकालीनांनी शिवरायांना लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवरायांना ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणत नाहीत. उलट छ.शिवरायांची राज्याभिषेक शक असलेली २९ पत्रे उपलब्ध आहेत.या सर्व पत्रांत ते स्वत:स "क्षत्रियकुलवतंस श्रीराजाशिवछत्रपती" असे म्हणवून घेतात,ते कधीही स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कोठून ?. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक होते असा गैरसमज कोणी व का पसरविला ?.
छत्रपती शिवराय हे गोब्राह्मणप्रतिपालक होते असे छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर कमाई करणार्या बाबासाहेब पुरंदरेने म्हंटले आहे. त्यासाठी शिवचरित्र साधने खंड ५,क्र.५३४ व ५३७ असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की, "५३४ क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत तर त्या पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो बाह्मण त्यास तशी पदवी देतो. ५३७ क्रमांकाच्या लेखात तर "गोब्राह्मणप्रतिपालक" असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सगळे "भटी गौडबंगाल". शिवाजी राजांनी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला आलेला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तु आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विषेश काय आहे ? ब्राह्मण तर शहाजान बादशहाला "जगदिश्वरो वा दिल्लीश्वरो" म्हणायचे फ़ायद्यासाठी ब्राह्मण स्तुती करतात हे इतिहासप्रसिद्ध आहेच.
मग शिवरायांना लावलेली किंवा बळेच चिकटवलेली "गोब्राह्मणप्रतिपालक" बिरुदावली कुणी लावली असेल ? गायीने लावणे शक्यच नाही त्यामुळे उत्तर स्वच्छच आहे. ग्रॅंड डफ़ आपल्या ग्रंथात "गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस बंदी केली होती." असे नमूद केले आहे.त्याला इतरही आधार आहेत.पण मग गायी, रयत आणि स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेले शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक कसे केले गेले ? रयत आणि स्त्रिया यांना बाजुला सारून त्याठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाणार नाही.
छ.शिवरायांच्या राज्यात ब्राह्मणांस खास सवलतीसुद्धा कोठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसबंधी शिवराय लिहितात, "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे बजावून धमकावतात की, "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार".काही ब्राह्मण शिवरायांच्या बरोबर होते तसे काही ब्राह्मण शिवरायांच्या विरोधातही होते त्यामुळे शिवराय ब्राह्मणप्रतिपालक अशी बिरुदावली घॆणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नाही.
काही महाभाग छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथाचा दाखला देताना म्हणतात की संभाजी राजांनी शिवरायांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुधभूषण ची मुळ प्रत सध्या उपलब्ध नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे तरीही सध्याची प्रत मुळची संभाजी राजेंनी लिहिलेलीच आहे असे मानले तरीही काही गोष्टी जाणुन घेणं गरजेचे आहे. संभाजी राजांनी पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून ग्रंथ रचला आहे, हे त्यांनीच नमुद केले आहे. पुराणं असो वा इतर धार्मिक साहित्य या सगळ्याचाच तत्कालीन समाजावर प्रभाव होता. असे साहित्य ब्राह्मण वर्चस्वाने ग्रासलेले होते , त्यामध्ये क्षत्रियांचे कार्य गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करणे असे सांगितली आहेत. याच साहित्याचा प्रभाव संभाजी राजांच्या लिखानावर पडला असला तर नवल नाही, कारण शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवताना त्यांनी एकही प्रमाण दिलेले नाही तथा या काळात संभाजी राजेंनी हा ग्रंथ लिहिला त्या काळात व त्याच्या आधी आणि नंतरच्या काळात कधीही शिवरायांनी ब्राह्मणप्रतिपालन केल्याचे एकही प्रमाण, तथा पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या मिथ्या बिरुदावलीपेक्षा प्रत्यक्ष कार्यच महत्वाचे असते हेच सत्य आहे.
काही महाभाग छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथाचा दाखला देताना म्हणतात की संभाजी राजांनी शिवरायांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुधभूषण ची मुळ प्रत सध्या उपलब्ध नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे तरीही सध्याची प्रत मुळची संभाजी राजेंनी लिहिलेलीच आहे असे मानले तरीही काही गोष्टी जाणुन घेणं गरजेचे आहे. संभाजी राजांनी पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून ग्रंथ रचला आहे, हे त्यांनीच नमुद केले आहे. पुराणं असो वा इतर धार्मिक साहित्य या सगळ्याचाच तत्कालीन समाजावर प्रभाव होता. असे साहित्य ब्राह्मण वर्चस्वाने ग्रासलेले होते , त्यामध्ये क्षत्रियांचे कार्य गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करणे असे सांगितली आहेत. याच साहित्याचा प्रभाव संभाजी राजांच्या लिखानावर पडला असला तर नवल नाही, कारण शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवताना त्यांनी एकही प्रमाण दिलेले नाही तथा या काळात संभाजी राजेंनी हा ग्रंथ लिहिला त्या काळात व त्याच्या आधी आणि नंतरच्या काळात कधीही शिवरायांनी ब्राह्मणप्रतिपालन केल्याचे एकही प्रमाण, तथा पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या मिथ्या बिरुदावलीपेक्षा प्रत्यक्ष कार्यच महत्वाचे असते हेच सत्य आहे.
छ.शिवरायांना कुळवाडीभुषण रयतेचा राजा म्हणणे आधिक गौरवास्पद आहे. छ.शिवराय फ़क्त गायी आणि ब्राह्मणांच्या रक्षणाकडे विशेष लक्ष देत होते, असे गोब्राह्मणप्रतिपालक शब्दावरून वाटू शकते. पण खरे पाहता छ.शिवरायांनी आपल्या अठरा पगड जातींच्या प्रजेसह, प्रजेची शेती, प्रजेने वाढवलेली झाडे यांचेही रक्षण केले. त्याचबरोबर मुस्लिम व इतर धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागवले. म्हणूनच शिवराय "गोब्राह्मणप्रतिपालक" नव्हते तर "कुळवाडीभुषण रयतेचे राजे" होते.
संदर्भ:
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].
मनुस्म्रुती-अध्याय१,श्लोक ८८.
भारद्वाज श्रौतसूत्र ६.१३.१०.
छत्रपती संभाजी महाराज(प्रुष्ठ क्र.८५) - [वा.सी.बेंद्रे].
शिवाजी आणि शिवकाळ (प्रुष्ठ क्र.२०५-२०६,२११-२१३) - [जदुनाथ सरकार].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
व्याख्यान(धर्म : बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा) - [प्राध्यापक राजेंद्र कुंभार]