रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे.त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मव्रुंद आहोत हे तो विसरलेला नाही.सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. पण वास्तव सर्वांना समजले पाहिजे. आज रामदासांच्या गुरुत्वाबद्दल (शेवटचा) पुरावा म्हणून रामदास भक्तांकडून वापरले जाणारे अस्त्र म्हणजे शिवरायांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र.या पत्रामध्ये रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे पत्राच्या वरच्या उजव्या कोपर्यात श्रीरघुपती, श्रीमारुती असे शब्द लिहिलेले आहेत. असे शब्द शिवरायांच्या अन्य कोणत्याच पत्रात नाहीत. शिवरायांच्या इतर पत्रांमध्ये श्रीसांब,श्रीजगदंबा असे शब्द आढळतात. फ़क्त या एका पत्रातच रघुपती आणि मारुती हे शब्द आहेत. रघुपती आणि मारुती ही रामदासांची प्रेरणास्थाने आहेत ही गोष्ट येथे महत्वाची आहे. शिवरायांनी पत्र पाठविणे, रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त करणे या क्रुती जर शिवरायांनी केली असती तर शिरायांच्या आणि रामदासांच्या जीवनातील महत्वपुर्ण घटना ठरली असती. मग तिचे प्रतिबिंब शिवकालीन ग्रंथामध्ये निश्चितच उमटले असते. पण तसे काहीही घडलेले नसल्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे निश्चित होते.
शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी म्हणजे स्वतंत्र राज्याच्या घोषणेवेळी ६ जून १६७४ ला रामदास हजर नव्हते. शिवराय १६७६ ते १६७८ दक्षिणेत होते.यादरम्यान रामदासांचा व त्यांचा संपर्कही होणे शक्य नव्हते. मग अचानक या मोहिमेवरून आल्यावर शिवराय रामदासांना गुरुचा दर्जा देतात व त्यांच्या झोळीत राज्य अर्पन करतात ही गोष्ट अनाकलनीय आहे. हे सर्व खोटे असून संपुर्णत: कल्पोकल्पित आहे. हे पत्र बनावट आहे असे शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहंदळे यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये नमुद केले आहे. "चाफ़ळची सनद" म्हणून ज्याचा फ़ारच उदो उदो केला गेला त्या पत्राबद्दल त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, "शिवाजीने रामदासाला राज्य अर्पण करण्याची गोष्ट घडलीच असली पाहिजे असे अनुमान करणे अनैतिहासिक आहे. जर अशी गोष्ट प्रत्यक्ष घडली असती तर तीचा उल्लेख कोणत्यातरी शकावलीत, बखरीत आवश्यक आला असता. तो नाही यावरून आणि मिळालेले पत्रही रामदासांच्या भक्तमंडळींतच उपलब्ध झाले आहे हे पाहता त्याबद्द्ल मन साशंक होते. "या सर्व भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यावरून व इतिहास संशोधकांच्या निष्कर्षावरून हे पत्र खोटे असल्याचे सिद्ध होते.
पार्थ पोकळे म्हणतात "रामदासांसारख्या वैदिक संतांनी महाराष्ट्र उभारला.बहुजनांच्या शिवाजीला मदत केली. अशा प्रकारचा प्रचार करून त्यांचे उदात्तीकरन केले गेले. या उदात्तीकरणाचा हेतू शुद्ध नाही. बहुजन समाजातील श्रेष्ठ मंडळींना गौणत्व येईल व त्यांचे कार्य गौण ठरेल आणि रामदासांसारखे कसे श्रेष्ठ ठरतील, त्यांचे कार्य कसे श्रेष्ठ होते हे भासविण्याचा प्रयत्न गेली दोनशे वर्ष महाराष्ट्रात झाला आहे" आज रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापणेस रामदासांची कसलीच प्रेरणा नाही हे स्पष्ट असताना आणि न.र.फ़ाटक, कुरुंदकर आणि त्र्यं.शेजवलकर यांसारख्या विद्वानांनीसुद्धा निर्वाळा दिला असताना सुद्धा अद्यापही रामदासांना शिवरायांचे गुरु दाखवून त्यांनीच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली असे जेंव्हा मनोरुग्न मंडळी म्हणतात तेंव्हा त्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते.
शेजवलकर शिवरायांविषयी म्हणतात, "शिवाजीच्या राज्यस्थापनेचे मुख्य श्रेय त्यांच्या स्वत:च्या स्पुर्तीला, कल्पनेला व पराक्रमाला देणे योग्य आहे असे वाटते. इतिहासात अनेक शतकांनी एखादा स्वयंभू जेता जगाच्या पाठीवर केंव्हातरी, कोठेतरी एकदम उदय पावताना दिसतो, त्या जातीचा शिवाजी आहे.अशी व एवढी पराक्रमी व्यक्ती हिंदुस्तानात मुसलमानी राज्यस्थापनेपासून दुसरी झाली नव्हती. "आज सत्य इतिहास समोर आल्यामुळे रामदास आणि शिवरायांची भेटच झाली नाही हे समोर आले.आजपर्यंत आपल्या लेखणीतून रामदासांच्या उदात्तीकरणाची राजवाडी परंपरा पुढे चालविणारे पुरंदरे रामदास शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांची आणि रामदासांची भेटच झाली नाही असे म्हणत आहेत. परंतू वयाच्या ऐंशिव्या वर्षी त्यांना आलेली अक्कल आत्तापर्यंत केलेल्या इतिहासाच्या खोट्या प्रचाराचा परीणाम कसा दूर होणार ? त्यांच्या पुस्तकांच्या हजारो प्रती विकल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये इतिहासाचा खोटा प्रचार केला आहे. शिवराय हे रामदासांच्या जवळ दाखवले आहेत ते चित्र कसे बदलणार ? आजही तेच चित्र बरेच मनोरुग्न प्रसारित करत असतात. आता जागरुत जनतेमुळे पुरंदरेने माघार घेतली हे खरे.पण पुरंदरेंना जर सत्य इतिहास समजण्यासाठी आयुष्यातील पाऊन शतक लागले तर त्यांनी उर्वरीत आयुष्य आपण नेमका कोणता अभ्यास केला याचे विंतन करण्यात घालवावे आणि चुका सुधारून आपल्याला अक्कल असल्याची जाणीव करून द्यावी.
खरंतर रामदासांच्या उदात्तीकरणाच्या खटपटीत रामदासांचे कर्त्रुत्व शिवरायांच्या गुरुत्वावरच अवलंबून राहिले आणि मर्यादित राहिले. ज्यावेळी रामदास शिवरायांचे गुरु नाहीत हे सत्य बाहेर येईल आणि रामदास कर्त्रुत्वशुन्य ठरतील तेंव्हा मोठी अडचण होणार हे जाणुन पेशवेकालीन बखरींना ऐतिहासिक पुरावा म्हणुन पुढे आणले गेले आणि कहान्या रचल्या.शेकडो पुस्तके लिहिली आणि पुर्ण वेळ खोटा प्रचार केला असाच खोटा प्रचार आजही सुरुच आहे.
छत्रपती शिवराय आणि रामदास यांच्यातील फ़रक साधायचा झाल्यास छत्रपती शिवराय हे शिवभक्त होते व भवानी मातेचे भक्त होते. तर रामदास हे रामभक्त होते.शिवाजी महाराजांची घोषणा होती "हर हर महादेव" तर रामदासांची घोषणा होती "जय जय रघुवीर समर्थ". शिवराय मस्तकी शिवगंध धारण करायचे,त्यांनी रायगडावर बांधलेले जगदिश्वराचे मंदिर या सर्व शिवभक्तीची साक्ष देतात तर प्रतापगडावरील भवानी देवी, त्यांच्या पत्रामधील भवानी देवीचे उल्लेख ते भवानीदेवीचे भक्त असल्याचे स्पष्ट करतात.शिवरायांनी कोठेही रामाचे एखादे मंदीर बांधल्याचा किंवा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख नाही. या साध्या गोष्टीवरून देखील रामदास हे शिवरायांचे गुरु होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध मुर्खपणाच आहे हे सिद्ध होते. जातीश्रेष्टत्वाच्या तोर्यामुळे निर्माण केलेले कुटील षडयंत्र आहे. नाहीतरी बा. र. सुंठणकर म्हणतातच, "शिवाजीच्या राज्यस्थापनेत रामदासाच्या कर्त्रुत्वाचे फ़ाजील स्तोम माजविण्यात आले आहे. त्याला इतिहासात काढीचा आधार नाही."
संदर्भ :
श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन [सुनिल चिंचोलकर]
श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन [सुनिल चिंचोलकर]
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेकर शिखरे]
शिवाजी महाराज की सत्ता बहुजन समाज के लिये थी ब्राह्मणों के लिये नही,बहुजनोंका बहुजन भारत (साप्ताहिक)
वर्ष ३ रे अंक २७ दि.७ मार्च २००४.प्रुष्ठ क्र.८८ ते ९१.
छ.शिवाजी महाराजांची पत्रे [प्र.न.देशपांडे].
श्री राजाशिवछत्रपती (प्रुष्ठ क्र. ४५ ते ४६,५२)[त्र्यं.शं.शेजवलकर].
बहुजनांचा सांस्क्रुतीक संघर्ष (पृष्ठ क्र.२७९)[पार्थ पोकळे]
महाराष्ट्रीय संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य (आवृत्ती पहिली,पृष्ठ क्र.१३६)[बा.र.सुंठणकर]
पेशवाई काळात हळुच घुसवलेल्या इतिहासाचे फलीतच म्हणजे रामदास गोसावी आणि दादु कोंडदेवला गुरु करण्याचा नीच प्रयत्न हा आहे.ते आपण कित्येक वर्षे डोक्यावर घेऊन मिरवत होतो.आपल्यातील काही इतिहास अभ्यासणाऱ्या लोकांनी हा मुद्दा उचलला म्हणुन आपल्याला ह्या गोष्टी कळल्या.नाही तर आपणही रामदास आणि दादुलाच शिवरायांच्या गुरुपदी बसवुन,शिवरायांऐवजी रामदास आणि दादुचेच गोडवे गात बसलो असतो.आजही आपल्यातील काही ब्राह्मण्यग्रस्त मंडळी तेच करत आहेत.आजुबाजुला त्याची उदाहरणे दिसुन येतीलच.त्यामुळे निदान तुम्ही तरी सावध रहा.आपल्या मराठ्यांच्या मागे उभे रहा.त्यांच्या कडुन मार्गदर्शन घ्या.इतिहासाचा अभ्यास स्वतः करा.चुकीच्या अफवांना सडेतोड उत्तरे द्या आणि चुकीचा इतिहास पसरवनाऱ्या ब्राह्मणी कळपाविरोधात उभे रहा.संघटीत व्हा.
ReplyDeleteतुकोबा शिवरायांचे खरे गुरु आहेत रामदासाचे उदात्तीकरण करण्यात आले कारण ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसू नये म्हणुन.राजवाडेने राष्ट्रगुरु रामदास हा लेख लिहुन वाद उभा केला आहे.राजवाडे हा पक्का रामदासी होता.त्याचे म्हणने होते की हिंदवी स्वराज्याला रामदासाची प्रेरणा होती
Deleteत्र्यं.शं.शेजवलकरांनी सुद्धा म्हंटलं आहे की रामदासाचा पंथ खरोखरीच शिवाजीच्या कार्याला पोषक असता तर त्याचे कार्य एका पिढीतच खल्लास झाले नसते
Deleteतसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते
Deleteरामदास म्हणतो :
ReplyDeleteअंतर एक तो खरे | परी सांगाते घेऊन येती महारे|
पंडित आणि चाटी पोरे | एक कैसी ||3||
मनुष्य आणि गधडे | राजहंस आणि कोंबडे |
राजे आणि माकडे | एक कैसी ||4||
भागीरथीचे जल आप | मोरीसंवदानी तो हि आप |
कश्चीळ उदक अल्प | सेवेवेना ||
अर्थ : रामदास म्हणतो
ब्राह्मण म्हणजे विद्वान आणि बहुजन म्हणजे गाढव
ब्राह्मण म्हणजे राजहंस आणि बहुजन म्हणजे कोंबड्या
ब्राह्मण म्हणजे राजा आणि बहुजन म्हणजे माकडे
ब्राह्मण म्हणजे गंगेचे पाणी आणि बहुजन म्हणजे गटाराचे पाणी
असाजो बहुजनांना नालायक म्हणतो तो शिवरायांचा गुरु होऊ शकतो काय ? कदापि नाही
रामदास शिवरायांचे गुरु होणे तर लांबच पण रामदासाची आणि शिवरायांचू भेट झाली नाही तेच बरे झाले नाहीतर शिवरायांनी रामदासाची खांडोळी केली असती शिष्यांच्या बरोबर संबंध ठेवल्याबरोबर.नुसते छेडछाड करणार्याचे हात पाय तोडणारे शिवराय शिष्यीनीला फ़सवून तिच्याशी संबंध ठेवल्याप्रकरणी ठार केले असते रामदासाला
Deleteरामदासांनी वरील श्लोक मध्ये बहुजन शब्द वापरला नाही.त्यांनी बोलले असेल तर तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करूनच विचार केला पाहिजे.
Deleteछत्रपती आणि रामदास स्वामी यांचे अतिशय निकटचे संबंध होते. शिवाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचे जे कार्य हाती घेतले होते, त्यामागील प्रेरणा समर्थांची होती. यास आधार म्हणून शिवाजी महाराजांनी रामदासांना लिहिलेले एक पत्र सादर करण्यात येते. चाफळची सनद म्हणून ते पत्र ओळखले जाते
ReplyDeletehttp://khattamitha.blogspot.in/2008/03/blog-post_15.html इथे याबाबत सांगण्याता आले आहे.
http://dhobipachhad.blogspot.in/2008/10/blog-post.html या ब्लॉगवर लक्ष द्या
ब्राह्मण समाजाने आजपर्यंत हेच उद्योग केले आहेत.नुसती बनवा बनवी
ReplyDeleteइतिहासकारांच्या द्रुष्टितून रामदास ह.वी.राजमाने म्हणतात,"शिवाजी महाराजांच्या यश किर्तीचा प्रताप महिमा मध्यानिच्या सुर्याप्रमाणे तळपत असलेला समर्थ पाहत होते,पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही.ते ज्या भागात वावरत होते तो भाग शिवरायांच्या दुश्मनाच्या भागात होता.त्यामुळे शहाणा माणूस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचा मुर्खपणा करणार नाही "नरहर कुरुंदकर म्हणतात,"रामदासी पंथ आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवरायांचे शत्रु होते "न.र.फ़ाटक लिहितात," विजापुर पातशाहीच्या दोन बड्या हिंदू अंमलदारांनी रामदासांच्या नव्या देवस्थानाला काही जमीनी इनाम दिल्याची माहीती आहे,मुरार जगदेवराव आणि बाजी घोरपडे हेच ते अंमलदार होते.तेंव्हाच्या अनेक हिंदू सरदारांना कोणी ना कोणी गुरु असे.यांनी रामदासाला गुरु केले व विजापुर दरबारापैकी थोडीशी जमीन चाफ़ळच्या देवस्थानाला इनाम केली." हे सर्व सरदार शिवरायांच्या शत्रुपक्षातले होते.शहाजीराजांना कैद करण्यास मुस्तफ़ाखानाला मदत करणारा बाजी घोरपडे आणि पुण्यावरून गाढवाचा नांगर फ़िरवणारा मुरार जगदेव यांचा गुरु रामदास
Deleteहोता इरादा रामदासांचा पक्का आता पाहिजेल फ़क्त वेणू आणि आक्का
Deleteरामदास शिवरायांचा किंवा संभाजी राजांचा गुरु होते हे सांगणे कितपत योग्य आहे हे दिसते इथे शिवरायांचे खरे गुरु हे मासाहेब जिजाऊ होत्या हे त्रिवार सत्य आहे आणि ते कोणी हि खोडू शकत नाही
ReplyDeleteबहुजनानो......वाचा....! ज्या दिनकरराव जवळकरांवर राजश्री शाहूनी अपार माया,प्रेम केले ते सत्यशोधक दिनकरराव जवळकर आपल्या छत्रपति पद्य संग्रह या पुस्तकात रामदासाच्या गुरु पदाचा बुरखा आपल्या तिखट लेखणीने टर्कवताना लिहतात,
ReplyDeleteही भटे माजली फार ! खर्याला कोण जगि पुसणार !! ध्रु !!
शिवबाच्या गुरुपदी बसविती ! रामदास भंगडभाई ! कुठे शिवाजी तो रणगाजी ! कुठे शिष्यानीयार !!१!!
शिवबाला हे शुद्र ठरवुनि ! आडवे पडले अभिषेका ! त्या समयला हा गोसावड़ा ! झाला होता गार !!२!!
खान बजाजी खरा मराठा ! बाटून गेला पार ! श्री शिवबाने शुद्ध करविले ! केला देशोध्दार !!३!!
या शुद्धीच्या समयी नव्हता ! रामदास तो काय जीता ? ! भगवाभंडग खान्यापुरता ! भूमीला तो भार !!४!!
राज्य कमविले श्री शिवबाने ! शुर मराठे लढवोनी ! हा गोसावड़ा मठित बैसे ! गांजा खेची फार !!५!!
कुठे सिंह तो शिवबा राजा ! कुठे रामदासी कोल्हा ! कुठे मराठे ते लढवय्ये ! कुठे लाडू खाणार !!६!! श्री शिवबाने राज्य कमविले ! हातावर शिर घेवोनी ! हा गोसावड़ा दारोदारी ! झोळीसह फिरणार !!७!!
असे हजारो कुबड़ीवाले ! राखुंडीतिल संन्यासी ! राज्य कमाऊ जरी लागले ! कशाला मग तलवार !!८!!
रामदासी भटांच्या सांगण्यानुसार रामदासाचे शिष्य आक्काबाई, कल्याण,भीमास्वामी,उद्धव,दिवाकर,वेणाबाई, आत्माराम इत्यादी होते.परंतू ब्राह्मणी साहित्यात छत्रपती शिवराय रामदासांचे शिष्य असल्याचा पुरावा सापडत नाही.त्याचप्रमाणे रामदासी भटांच्या म्हणण्यानुसार (लिहिण्यानुसार) "रामदासाचे शिष्य दिर्घायुषी ठरले.स्वत: समर्थांनी ७५ व्या वर्षी स्वेच्छेने देह ठेवला. " आक्काबाई ८६ वर्षे जगल्या,कल्याण ८५ वर्षे जगले,भीमस्वामी ९९ वर्षे जगले,उद्धव ८२ वर्षे जगले,दिवाकर ७६ व्या वर्षी निवर्तले.शिष्यांना आरोग्याची काळजी घ्यावयास सांगितल्याने हे शक्य झाले.(संदर्भ : पान.क्र.४४ "समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद",सुनिल चिंचोलकर विवेकानंद प्रकाशन केंद्र).भटांच्या बोंबलण्याप्रमाणे जर शिवराय रामदासाचे शिष्य असतील तर रामदासी साहित्यात ज्या ज्या ठिकाणी रामदासाच्या शिष्यांचा उल्लेख आढळतो त्या त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे नाव मात्र सापडत नाही.त्यामुळेच रामदासी भट शिवरायांचे गुरु रामदास असल्याचे दिशाभुल करणारे शब्द प्रयोग करत असतात.पण हे मनाला पटण्याजोगे पण नाही.
ReplyDeleteसुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे.चला नसतील रामदास शिवरायांचे गुरु पण मग साधू किंवा संत तर असतील ना..??
ReplyDeleteरामदासाची समाधी आयताकृती का आहे ???
ReplyDeleteआयताकारी असली काय नि गोल काय फ़रक पडणार आहे ? नको त्या विषयावर भरकटने ब्रिगेड्ला जमते चांगलेच.तुम्ही तुमच्या धर्माच बघा.
Deleteमुस्लिम आक्रमक समाधीस्थळे उध्वस्त करतात असा त्यांचा समज झाला असावा म्हणून मुस्लिम टाईप आयताकारी समाधी असावी.(हे माझे वयक्तिक मत आहे)
Deleteसर श्रीसांब,श्रीजगदंबा ह्या शब्दांबद्दल हितिहास सांगावा
ReplyDeleteजय जिजाऊ जय शिवराय
श्रीसांब,श्रीजगदंबा ह्या दोन शब्दचा इतिहास काय आहे कृपया महिती द्यावी
ReplyDeleteजय जिजाऊ जय शिवराय
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या चाफळ सनदेविषयी श्री गजानन मेहेंदळे सरांची प्रतिक्रिया
ReplyDelete------
प्रति
श्री अजित पटवर्धन
नमस्कार
मला आपण "श्री कौस्तुभ कस्तुरे ह्यांनी "इतिहासाच्या पाऊलखुणा" वर आज चाफळ सनदे विषयी लिहीलेला विस्तृत लेख" हा लेख इ-मेलने पाठविलात. याविषयी मला आणखीही काही फोन आले आणि दोन बातम्यांची छायाचित्रेही मेलने आली. मी सध्या दुसऱ्या पुस्तकाच्या कामात गुंतलो आहे. म्हणून या पत्राविषयी सविस्तर लिहिण्यास सवड नाही, पण त्या संबंधीचे माझे म्हणणे थोडक्यात सांगतो. आणखी तीन-चार जणांना ही मेल फॉरवर्ड करीत आहे. कोणीही ही मेल फॉरवर्ड करण्यास किंवा प्रसिद्ध करण्यास माझी काही हरकत नाही. माझे म्हणणे थोडक्यात असे आहे:
पत्राचा प्रारंभ "श्री सद्गुरुवर्य श्री सकळतीर्थरूप श्री कैवल्यधाम श्री महाराज श्री स्वामी स्वामींचे सेवेसी चरणरज सिवाजीराजे चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना जे" असा असल्याचे बातमीत म्हटले आहे. बातमीसोबत जे छायाचित्र छापले आहे त्यात पत्राच्या शेवटच्या काही ओळी आहेत आणि मोर्तबही आहे. या मायन्याचे, किंवा साधारण अशा मायन्याचे, पत्र यापूर्वी प्रकाशित झाले आहे आणि त्याच्या काही नकलांची छायाचित्रेही प्रकाशित झाली आहेत.तेच हे पत्र आहे असे मी तूर्त गृहीत धरतो. पत्राच्या खरेपणाविषयीचे काही आक्षेप असे आहेत:
१. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी तपशील पत्राच्या प्रारंभी मायन्यातच असतो. प्रस्तुत पत्रात तो पत्राच्या शेवटी आहे. ही गोष्ट छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
२. राज्याभिषेक शक घातलेली छत्रपतींची जी पत्रे असतात त्या पत्रांमध्ये तारखेचा राज्याभिषेक शक इत्यादी जो तपशील असतो त्यात वारही असतोच.प्रस्तुत पत्रात राज्याभिषेक शक आहे, पण वार मात्र नाही. ही गोष्टही छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रलेखनपद्धतीस सोडून आहे. मी छत्रपतींच्या, आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या, पत्रांविषयी बोलतो आहे, पंडितरावांच्या किंवा मोरोपंत पेशव्यांच्या किंवा अन्य कोणाच्या पत्रांविषयी नाही.
३. प्रस्तुत पत्राची भाषा शिवकालीन पत्रांच्या भाषेशी, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांच्या भाषेशी जुळणारी नाही. मी या विषयावर पुढे केव्हातरी अधिक सविस्तर लिहीन, सध्या लिहायला वेळ नाही.
४. छत्रपती शिवाजी महाराजांची जी अस्सल पत्रे, किंवा त्यांच्या अस्सल पत्रांची जी छायाचित्रे, आजवर प्रकाशित झाली आहेत त्यांच्याशी प्रस्तुत पत्रावरील मोर्तब जुळत नाही असे वाटते. हे मी वृत्तपत्रातील छायाचित्रावरून बोलत आहे. माझ्या दृष्टीने वरील तीन आक्षेप या आक्षेपांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. पण ते आक्षेप विचारात घेतले की याही आक्षेपाचे महत्त्व वाढते.
या पत्रावर यदाकदाचित शिवाजी महाराजांच्या अस्सल पत्रांवरील मोर्तबाशी मिळता-जुळता मोर्तब असता तरीही हे पत्र खरे ठरले नसते इतके पहिले तीन आक्षेप बलवत्तर आहेत. श्री राजा शिवछत्रपती या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पृष्ठ ६७ वर मी म्हटलेच आहे की: " एखाद्या पत्रावरील शिक्का जरी खरा असला तरी केवळ तेवढ्यावरून ते पत्र खरे असेलच अशी ग्वाही देता येत नाही." या वाक्यात "खरा असला" या शब्दांच्या जागी "खरा असला किंवा खरा वाटला " असे शब्द घालण्यासही हरकत नाही.
हे सर्व आक्षेप विचारात घेतल्यावर हे पत्र बनावट आहे अशी माझी खात्री पटली आहे. "या पत्रातील अक्षर हे शिवकालीन प्रसिद्ध बाळाजी आवजी चिटणिसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे, असे कार्लेकर यांनी सांगितले" असे एका बातमीत म्हटले आहे. त्यांना तसे मनापासून वाटत असेलही. त्यांचा जुनी मोडी कागदपत्रे वाचण्याचा अनुभव जसजसा वाढेल तसतसा त्यांचा या बाबतीत भ्रमनिरास होईल असे वाटते.
या निमित्ताने आणखी एक गोष्ट स्पष्ट करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांना परस्परांविषयी आदर होता असेच उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. मात्र, रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे म्हणण्यास कोणताही विश्वसनीय पुरावा नाही; ते शिवाजी महाराजांचे गुरू होते असे ज्या कागदपत्रांवरून काहीजणांना वाटते ती कागदपत्रे बनावट आहेत, किंवा विश्वसनीय नाहीत.
श्री कार्लेकर यांचा पत्राविषयीचा लेख भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत वाचला गेला, मात्र त्याचा अर्थ त्यातील प्रतिपादनाला भारत इतिहास संशोधक मंडळाची मान्यता आहे असा होत नाही. ते एक व्यासपीठ आहे इतकेच.
गजानन भास्कर मेहेंदळे
मेहंदळे असोत वा इतर इतिहासकार. अनेकांनी शिवराय आणि रामदास यांचा काही संबंध नसल्याचे लिहिले आहे पण हे रामदासी भक्त काही केल्या मानायला तयार नाहीत. काय नेमकी योजना त्यांच्या उकिरड्यात पिकत आहे समजत नाही. कस्तुरे काय पेशवाई किडाच आहे. त्याने शिवरायांपेक्षा पेशव्यांचा महिमा गाण्यातच आयुष्य घालवले त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार ?
Delete