रामदास स्वामींवरील आक्षेपाचे खंडण करण्यासाठी सुनिल चिंचोलकर नामक लेखकाने "श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन" हे पुस्तक (चिंचोलकरांच्या मते ग्रंथ) लिहिले आहे.त्यामध्ये अनेक संघटना रामदासांवर करत असलेले आक्षेप आणि आरोप काहीअंशी खोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आपण ब्रह्मव्रुंद आहोत हे तो विसरलेला नाही.सुनिल चिंचोलकरने त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र दिलेले आहे आणि त्या पत्राच्या आधारे तो रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरुपदी बसवतो. पण वास्तव सर्वांना समजले पाहिजे. आज रामदासांच्या गुरुत्वाबद्दल (शेवटचा) पुरावा म्हणून रामदास भक्तांकडून वापरले जाणारे अस्त्र म्हणजे शिवरायांनी रामदासांना सन १६७८ मध्ये लिहिलेले पत्र.या पत्रामध्ये रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे पत्राच्या वरच्या उजव्या कोपर्यात श्रीरघुपती, श्रीमारुती असे शब्द लिहिलेले आहेत. असे शब्द शिवरायांच्या अन्य कोणत्याच पत्रात नाहीत. शिवरायांच्या इतर पत्रांमध्ये श्रीसांब,श्रीजगदंबा असे शब्द आढळतात. फ़क्त या एका पत्रातच रघुपती आणि मारुती हे शब्द आहेत. रघुपती आणि मारुती ही रामदासांची प्रेरणास्थाने आहेत ही गोष्ट येथे महत्वाची आहे. शिवरायांनी पत्र पाठविणे, रामदासांमुळेच राज्यप्राप्ती झाल्याचे व हे राज्य रामदास चरणी अर्पण करण्याचा मनोदय व्यक्त करणे या क्रुती जर शिवरायांनी केली असती तर शिरायांच्या आणि रामदासांच्या जीवनातील महत्वपुर्ण घटना ठरली असती. मग तिचे प्रतिबिंब शिवकालीन ग्रंथामध्ये निश्चितच उमटले असते. पण तसे काहीही घडलेले नसल्यामुळे हे पत्र बनावट असल्याचे निश्चित होते.
शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी म्हणजे स्वतंत्र राज्याच्या घोषणेवेळी ६ जून १६७४ ला रामदास हजर नव्हते. शिवराय १६७६ ते १६७८ दक्षिणेत होते.यादरम्यान रामदासांचा व त्यांचा संपर्कही होणे शक्य नव्हते. मग अचानक या मोहिमेवरून आल्यावर शिवराय रामदासांना गुरुचा दर्जा देतात व त्यांच्या झोळीत राज्य अर्पन करतात ही गोष्ट अनाकलनीय आहे. हे सर्व खोटे असून संपुर्णत: कल्पोकल्पित आहे. हे पत्र बनावट आहे असे शिवचरित्राचे अभ्यासक गजानन भास्कर मेहंदळे यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये नमुद केले आहे. "चाफ़ळची सनद" म्हणून ज्याचा फ़ारच उदो उदो केला गेला त्या पत्राबद्दल त्र्यं. शं. शेजवलकर म्हणतात, "शिवाजीने रामदासाला राज्य अर्पण करण्याची गोष्ट घडलीच असली पाहिजे असे अनुमान करणे अनैतिहासिक आहे. जर अशी गोष्ट प्रत्यक्ष घडली असती तर तीचा उल्लेख कोणत्यातरी शकावलीत, बखरीत आवश्यक आला असता. तो नाही यावरून आणि मिळालेले पत्रही रामदासांच्या भक्तमंडळींतच उपलब्ध झाले आहे हे पाहता त्याबद्द्ल मन साशंक होते. "या सर्व भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यावरून व इतिहास संशोधकांच्या निष्कर्षावरून हे पत्र खोटे असल्याचे सिद्ध होते.
पार्थ पोकळे म्हणतात "रामदासांसारख्या वैदिक संतांनी महाराष्ट्र उभारला.बहुजनांच्या शिवाजीला मदत केली. अशा प्रकारचा प्रचार करून त्यांचे उदात्तीकरन केले गेले. या उदात्तीकरणाचा हेतू शुद्ध नाही. बहुजन समाजातील श्रेष्ठ मंडळींना गौणत्व येईल व त्यांचे कार्य गौण ठरेल आणि रामदासांसारखे कसे श्रेष्ठ ठरतील, त्यांचे कार्य कसे श्रेष्ठ होते हे भासविण्याचा प्रयत्न गेली दोनशे वर्ष महाराष्ट्रात झाला आहे" आज रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापणेस रामदासांची कसलीच प्रेरणा नाही हे स्पष्ट असताना आणि न.र.फ़ाटक, कुरुंदकर आणि त्र्यं.शेजवलकर यांसारख्या विद्वानांनीसुद्धा निर्वाळा दिला असताना सुद्धा अद्यापही रामदासांना शिवरायांचे गुरु दाखवून त्यांनीच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली असे जेंव्हा मनोरुग्न मंडळी म्हणतात तेंव्हा त्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते.
शेजवलकर शिवरायांविषयी म्हणतात, "शिवाजीच्या राज्यस्थापनेचे मुख्य श्रेय त्यांच्या स्वत:च्या स्पुर्तीला, कल्पनेला व पराक्रमाला देणे योग्य आहे असे वाटते. इतिहासात अनेक शतकांनी एखादा स्वयंभू जेता जगाच्या पाठीवर केंव्हातरी, कोठेतरी एकदम उदय पावताना दिसतो, त्या जातीचा शिवाजी आहे.अशी व एवढी पराक्रमी व्यक्ती हिंदुस्तानात मुसलमानी राज्यस्थापनेपासून दुसरी झाली नव्हती. "आज सत्य इतिहास समोर आल्यामुळे रामदास आणि शिवरायांची भेटच झाली नाही हे समोर आले.आजपर्यंत आपल्या लेखणीतून रामदासांच्या उदात्तीकरणाची राजवाडी परंपरा पुढे चालविणारे पुरंदरे रामदास शिवरायांचे गुरु नव्हते आणि शिवरायांची आणि रामदासांची भेटच झाली नाही असे म्हणत आहेत. परंतू वयाच्या ऐंशिव्या वर्षी त्यांना आलेली अक्कल आत्तापर्यंत केलेल्या इतिहासाच्या खोट्या प्रचाराचा परीणाम कसा दूर होणार ? त्यांच्या पुस्तकांच्या हजारो प्रती विकल्या गेलेल्या आहेत. ज्यामध्ये इतिहासाचा खोटा प्रचार केला आहे. शिवराय हे रामदासांच्या जवळ दाखवले आहेत ते चित्र कसे बदलणार ? आजही तेच चित्र बरेच मनोरुग्न प्रसारित करत असतात. आता जागरुत जनतेमुळे पुरंदरेने माघार घेतली हे खरे.पण पुरंदरेंना जर सत्य इतिहास समजण्यासाठी आयुष्यातील पाऊन शतक लागले तर त्यांनी उर्वरीत आयुष्य आपण नेमका कोणता अभ्यास केला याचे विंतन करण्यात घालवावे आणि चुका सुधारून आपल्याला अक्कल असल्याची जाणीव करून द्यावी.
खरंतर रामदासांच्या उदात्तीकरणाच्या खटपटीत रामदासांचे कर्त्रुत्व शिवरायांच्या गुरुत्वावरच अवलंबून राहिले आणि मर्यादित राहिले. ज्यावेळी रामदास शिवरायांचे गुरु नाहीत हे सत्य बाहेर येईल आणि रामदास कर्त्रुत्वशुन्य ठरतील तेंव्हा मोठी अडचण होणार हे जाणुन पेशवेकालीन बखरींना ऐतिहासिक पुरावा म्हणुन पुढे आणले गेले आणि कहान्या रचल्या.शेकडो पुस्तके लिहिली आणि पुर्ण वेळ खोटा प्रचार केला असाच खोटा प्रचार आजही सुरुच आहे.
छत्रपती शिवराय आणि रामदास यांच्यातील फ़रक साधायचा झाल्यास छत्रपती शिवराय हे शिवभक्त होते व भवानी मातेचे भक्त होते. तर रामदास हे रामभक्त होते.शिवाजी महाराजांची घोषणा होती "हर हर महादेव" तर रामदासांची घोषणा होती "जय जय रघुवीर समर्थ". शिवराय मस्तकी शिवगंध धारण करायचे,त्यांनी रायगडावर बांधलेले जगदिश्वराचे मंदिर या सर्व शिवभक्तीची साक्ष देतात तर प्रतापगडावरील भवानी देवी, त्यांच्या पत्रामधील भवानी देवीचे उल्लेख ते भवानीदेवीचे भक्त असल्याचे स्पष्ट करतात.शिवरायांनी कोठेही रामाचे एखादे मंदीर बांधल्याचा किंवा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख नाही. या साध्या गोष्टीवरून देखील रामदास हे शिवरायांचे गुरु होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध मुर्खपणाच आहे हे सिद्ध होते. जातीश्रेष्टत्वाच्या तोर्यामुळे निर्माण केलेले कुटील षडयंत्र आहे. नाहीतरी बा. र. सुंठणकर म्हणतातच, "शिवाजीच्या राज्यस्थापनेत रामदासाच्या कर्त्रुत्वाचे फ़ाजील स्तोम माजविण्यात आले आहे. त्याला इतिहासात काढीचा आधार नाही."
संदर्भ :
श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन [सुनिल चिंचोलकर]
श्री समर्थ चरित्र : आक्षेप आणि खंडन [सुनिल चिंचोलकर]
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेकर शिखरे]
शिवाजी महाराज की सत्ता बहुजन समाज के लिये थी ब्राह्मणों के लिये नही,बहुजनोंका बहुजन भारत (साप्ताहिक)
वर्ष ३ रे अंक २७ दि.७ मार्च २००४.प्रुष्ठ क्र.८८ ते ९१.
छ.शिवाजी महाराजांची पत्रे [प्र.न.देशपांडे].
श्री राजाशिवछत्रपती (प्रुष्ठ क्र. ४५ ते ४६,५२)[त्र्यं.शं.शेजवलकर].
बहुजनांचा सांस्क्रुतीक संघर्ष (पृष्ठ क्र.२७९)[पार्थ पोकळे]
महाराष्ट्रीय संत मंडळांचे ऐतिहासिक कार्य (आवृत्ती पहिली,पृष्ठ क्र.१३६)[बा.र.सुंठणकर]