पुण्यात लालमहालाच्या पश्चिम बाजुला शिवाजी राजे सोन्याच्या नांगराने मशागत करत आहेत आणि शेजारी जिजामाता, शिवबा आणि कोंडदेव यांची शिल्पे दाखवली आहेत. त्या ठिकाणी शहाजी राजेंचे शिल्प नाही. ही शिल्पे महापालिकेची परवानगी न घेता पुरंदरेनी निनाद बेडेकर आणि त्याचा पंत यांच्या साह्याने उभारली आहेत. जेजुरीला शिवाजी राजे - शहाजी राजे भेट होत आहे. अशी शिल्पे आहेत. मतितार्थ हा सांगायचा आहे की, पुण्याहुन शिवाजी राजे, जिजामाता आणि कोंडदेव हे जेजुरीपर्यंत आले आहेत आणि शहाजी महाराज बेंगलोर वरून जेजुरी पर्यंत आले आहेत. जणूकाही पहिल्यांदाच शिवाजी राजे आणि शहाजी महाराजांची भेट होत आहे, हे पुरंदरे यांनी सूचित केले आहे. वरील सर्व ठिकाणी शिल्पे उभारण्याचे कारस्थान पुरंदरेनी केलं आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करत असताना ते शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या सहवासात राहिले होते. शहाजी महाराजांनी या दोघांनाही मार्गदर्शन केलेले आहे. (डॉ.जयसिंगराव पवार)
महाराष्ट्रात पुरंदरेनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्याचे अनेक प्रयोग केले. विषेश करून प्रयोगास मराठा सरदार, जहागिरदार, शिवाजी राजांचे वंशज, आमदार, खासदार मंत्री या सर्वांचे सहाय्य घेतले. शिवरायांच्या नावाने ललकार्या दिल्या. प्रयोगाच्या सुरुवातीस उपस्थित असलेल्या थोरामोठ्यांवर स्तुतीसुमने उधळली. त्यांच्यासमोर आपल्या डोक्यातील इतिहास कथन केला. किर्तनकारांप्रमाने अधुनमधुन प्रेक्षकांना वेठीस धरून शिवाजीराजे आणि जिजामातेच्या नावाने घोषना केल्या. श्रोते डोलू लागले. लगेच व्यासपीठावर घोडे येऊन नाचू लागले. असा हा त्यांच्या महानाट्याचा कोट्यावदी रुपये मिळवण्याचा महान प्रयोग आहे.
पण या प्रयोगातील महत्वाच्या घटनांचे पुरंदरे वर्णन करत नाही. अफ़जलखान वधाचे वर्णन : अफ़जलखान - शिवाजी राजे यांच्या युद्धाचे वर्णन करताना दोन्ही बाजुचे दहा-दहा संरक्षक, सय्यद बंडा, जिवा महाला, संभाजी कावजी, शिवरायांचे चुलते मंबाजी भोसले या सर्वांचे पुरंदरे वर्णन करतात; पण एक गोष्ट लपवतात, ती म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर हल्ला करणारा अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी. ते द्रुष्य पुरंदरे दाखवतच नाही. अशा अनेक सत्य घटना पुरंदरे सांगत नाहीत. पुरंदरे मराठी माणसाला फ़सवत आहेत. तरुणांना त्यांच्या महानाटकांत त्यांनी बळीचा बकरा केले. ते राबराब राबले आणि पुरंदरे यांनी त्यांच्या हातावर चणे, चिरमुरे ठेवले. स्वत: मात्र पैशाला चिकटून बसले. पुरंदरे अनेक राजकीय व्यक्तिंच्या जवळ गेला आणि कार्यभाग पुर्ण झाल्यावर त्यांच्यापासून दुर गेला. आपल्या मधाळ भाषणाने त्यांच्यावर मोहिनी घालून आपलेसे करून त्यांना वापरून फ़ेकून दिले.
पण या प्रयोगातील महत्वाच्या घटनांचे पुरंदरे वर्णन करत नाही. अफ़जलखान वधाचे वर्णन : अफ़जलखान - शिवाजी राजे यांच्या युद्धाचे वर्णन करताना दोन्ही बाजुचे दहा-दहा संरक्षक, सय्यद बंडा, जिवा महाला, संभाजी कावजी, शिवरायांचे चुलते मंबाजी भोसले या सर्वांचे पुरंदरे वर्णन करतात; पण एक गोष्ट लपवतात, ती म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर हल्ला करणारा अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी. ते द्रुष्य पुरंदरे दाखवतच नाही. अशा अनेक सत्य घटना पुरंदरे सांगत नाहीत. पुरंदरे मराठी माणसाला फ़सवत आहेत. तरुणांना त्यांच्या महानाटकांत त्यांनी बळीचा बकरा केले. ते राबराब राबले आणि पुरंदरे यांनी त्यांच्या हातावर चणे, चिरमुरे ठेवले. स्वत: मात्र पैशाला चिकटून बसले. पुरंदरे अनेक राजकीय व्यक्तिंच्या जवळ गेला आणि कार्यभाग पुर्ण झाल्यावर त्यांच्यापासून दुर गेला. आपल्या मधाळ भाषणाने त्यांच्यावर मोहिनी घालून आपलेसे करून त्यांना वापरून फ़ेकून दिले.
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण दाखवले आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे इंग्रजीत एक वाक्य आहे - Thakare Fried the brain of brahmin. अर्थ : ठाकरेंनी ब्राह्मणांचा मेंदू तळला. उद्वेगाने त्यांना असे का म्हणावे लागले. तर ब्राह्मण लेखकांनी खोटा इतिहास लिहिण्याच्या संदर्भावरून. ब्राह्मणांनी शिवरायांचा खोटा इतिहास लिहिलाच, वर त्यांच्या डोक्यावर कोंडदेव, रामदास हे दोन गुरु बसवले; पण हे दोघेही शिवाजी राजांचे गुरु नव्हते, मार्गदर्शक शिक्षकही नव्हते.
प्रबोधनकार आपल्या "दगलबाज शिवाजी" मध्ये लिहितात की पुरंदरेचे व मेहेंदळेचे शिवाजीवरील लिखाण पौराणिक दंतकथांवर आहे. शिवाजींची स्वराज्य स्थापना ही परमेश्वराची इच्छा होती आणि त्या स्वराज्य स्थापनेला आकस्मिकरित्या रामदासांचा आशीर्वाद मिळाला. या विचारावर प्रबोधनकार हल्ला करतात. "हे केवळ ब्राह्मण लेखकांचे बिनबुडाचे पोकळ शब्द आहेत" पुढे ते लिहितात, इतिहासकारांचे कर्तव्य म्हणजे त्यांनी राष्ट्रीय महानायकांचे कार्य, त्यांचे शौर्य, त्यांचा देशाभिमान नि देशासाठी दिलेले बलिदान याचा जगात प्रसार केला पाहिजे. पण आमचे इतिहासकार राष्ट्रीय नायकांच्या कथा, पुराणं दंतकथेच्या चौकटीत बसवतात. असले इतिहासकार शिवाजी राजांना परमेश्वाचा अवतार मानतात.
उत्तम उदाहरण प्रबोधनकार कौसल्याचे देतात, "अयोध्याचा राजा दशरथ यांची पट्टराणी कौसल्या रामाच्या वेळी गर्भवती होत्या आणि त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने पडत होती", या प्रकारची दोहाळ्यांची स्वप्ने जिजाऊंना शिवबांच्या वेळी पडत होती. असले इतिहासकार छोटासा कुठला तरी धागा पकडून त्यावर कल्पनेचा भव्य राजवाडा बांधतात. त्या राजवाड्याला रुप नसते, निराळा द्रुष्टीकोन नसतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भावनांचा खरकटवाडा. शक्य, अशक्यतेचा विचार नाही. वातावरणाची आणि त्याच्या निरिक्षणाची द्रुष्टी नाही. मानवी स्वभाव जाणण्याचं ज्ञान नाही.
सर्वकष पाहता पुरंदरेंची कृत्ये या पलीकडची आहेत. हिंदुत्ववादी संघटनांना काळजी वाटते की, पुरंदरेंच्या मागे इतिहासाचे काय होणार ? महाराष्ट्राला शिवकथा कोण सांगणार ? यांचं आवडीचे साधन, अफ़जलखानाच्या कोथळ्याची पोस्टर्स की जी माजी कै.बाबासाहेब भोसले यांनी शिवून टाकली होती; पण या राजकीय संघटनांना अफ़जलखानाचा कोथळा उसवून, पुन्हा पोस्टर्स तयार करून समाजाला दाखवण्यात रस फ़ार. यामध्ये सर्वच पक्ष सहभागी आहेत.
जात्यांध पुरंदरे यांनी माता-पुत्र जिजाऊ -शिवाजी राजे यांचे चरित्रहनन केले आहे. हे त्यांच्या "राजा शिवछत्रपती" १४ व्या आव्रुत्ती मध्ये आढळते. द्रुष्य स्वरुपात लालमहालातील शिवबा - जिजाऊ शिल्पे. हे पुरंदरेनी केलेले महापाप दर्शवतात. या कारणास्तव दादोजी कोंडदेवाच्या लालमहालातील शिल्पाबाबत २६ ऑगस्ट २०१० रोजी पुण्यात विराट मोर्चा निघाला. माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत व बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली लोकशासन आंदोलनाने कष्टकरी, शेतकरी व वारकर्यांचा मोर्चा महानगरपालिकेवर नेला होता. राज्यभरातील मच्छिमार, कोळीबांधव व आदिवासीही मोर्च्यात सामील होते. शिवप्रेमी संघटेनेचे नेतेही मोर्च्यात सामील होते. महापौर मोहनसिंग राजपाल हे मोर्च्याला सामोरे गेले. चुकिच्या मार्गाने उभारलेला पुतळा २४ तासाच्या आत काढला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. नेत्यांची पोटतिडकिने भाषणे झाली. वातावरण शिवमय होऊन जिंकु किंवा मरू असे होते. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी काही आव्हाने उभी केली, अशी की पुरंदरे डाकू आहे, बाळासाहेब ठाकरे सावरकर यांच्या च्या पुतळ्याला जोडे मारतील का ?, बहुलकराचे समर्थन करणार्या ठकरेलाच काळे फ़ासायला पाहिजे.
मराठा संघटनेचे नेते श्री मानकर, अरविंद शिंदे आणि इतर नेते म्हणाले : कोंडदेवाचा पुतळा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना ते शिल्प जर लालमहालातून हलविले नाही तर आम्ही तलवारी उपसू ! न्यायमुर्ती कोळसे पाटील म्हणाले : अम्ही मराठा - ब्राह्मण वाद घालत नसून खोटा इतिहास लिहिणार्या अपप्रव्रुत्तीविरुद्ध उमटलेला हा जनतेचा आवाज आहे. मुठभर लोकांनी आपला इतिहास लिहिल्याने खरा इतिहास समोर आलाच नाही. सर्व शिक्षणसम्राट, साखरसम्राट व नेते मराठी आहेत. पण पुतळा हलविण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.(२६ ऑगस्ट २०१० - पुढारी)
आतापर्यंत शिवचरित्राचे सिंहावलोकन केल्यानंतर लक्षात येते की, लेखकांचे दोन तट, ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांचा. ब्राह्मण लेखकांनी शिवाजी राजांचे अपहरण केले आहे. त्यांच्या पाठीमागून शिवरायांना सोडवण्यासाठी ब्राह्मणेत्तर लेखक धावत आहेत. मराठा नेत्यांनी बगळ्याची भुमिका घेतली. मासा दिसतो आहे पण पकडत नाहीत. मोठा मासा तर त्यांना वाकुल्या दाखवतो आहे; पण नेत्यांनी पाण्यात उभा राहून झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्याकरीता हा बडा मासा त्यांच्या ढेंगेतून, मागुन पुढून फ़िरत त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण स्विकारत आहे. प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा असो अगर ऐतिहासिक सत्य - असत्याविषयी असो, त्या बड्या माशाशिवाय या राजकीय नेत्यांचे पान हलत नाही. शाहीर जनतेला अमृत पाजत आहेत की विष, हे राजकीय नेत्यांना समजत नाही. नेत्यांचा काडीचाही संबंध शिवरायांविषयी येत नाही; पण जेथे जेथे शिवपुतळा, तेथे तेथे हजर. त्यांना शिवरायांच्या डोळ्यातून येणारे अश्रू दिसत नाहीत. ते अश्रू सामान्य जनता पाहते आणि पुसण्याचा प्रयत्न करते.