मराठी साहित्य प्रकाशना दिवशीच रेकॉर्डब्रेक करणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" हि प्रदिर्घ प्रतिक्षा असणारी कादंबरी प्रकाशीत झाली तेंव्हा साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली. कादंबरीवरती अनेक अंगाने चर्चा सुरु झाली.कादंबरीवरती अनेक अंगाने लिहिता येईल, नेमाडेंचा देशी वाद, ब्राह्मणी जोखडातून नेमाडेंनी अस्सल कष्टकर्यांची सुटका केलेली आहे."हिंदू" मध्ये कारुण्य आहे,रंजकता आहे, ग्रामीण जीवणाचे यथार्थ दर्शन आहे, विनोद आहे.गावगाड्यातील समाजजीवनाचे जिवंत असे चित्रण केले आहे.पारावरच्या, पाराखालच्या, शेतातील. आडोशाचे,खाजगीतील बोली भाषा आहे त्यामुळे कदंबरी अधिकच अक्रुतीम झाली आहे.हिंदू वरती अनेक अंगाने लिहिता येईल भाषाशास्त्राचे, मराठी भाषेचे तज्ञ ते काम करतीलच पण इथे नेमाडेंनी ब्राह्मणी छावणीला दिलेला धक्का याबाबत विवेचन करणार आहे.वैदिक उर्फ़ ब्राह्मणी परंपरेने भारतात विषमता , अंधश्रद्धा, स्त्रीबंधन लादली याविरुद्ध अनेक महापुरुषांनी काम केले, महिलांवर तर ब्राह्मणी परंपरेने अनेक अमानुष नियम लादले.
ब्राह्मणांची कटकारस्थानं उघड करताना नेमाडे लिहितात "साले हे ब्राह्मण लोकच गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला.पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्या धरायला शहराइत, शहरी होत चालले ब्राह्मण ..(प्रुष्ठ क्र.१५७)" जातीभेदाची निर्मिती ब्राह्मणांनीच केली असे नेमाडे सांगतात.तसेच वारकरी पंथ हा जातिभेद मोडणारा होता.पण अलीकडे वारकरी पंथातच जातीभेद पाळला जातो.जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारी प्रव्रुत्ती ब्राह्मणांचीच, वारकरी पंथ हा अंधश्र्द्धा विरोधी आहे पण अलीकडे वारकरी पंथातील लोक अंधश्रद्धाळू,देवभाळे,विषमतावादी झाले आहेत, कारण ब्राह्मण त्यामध्ये घुसले आणि वारकरी पंथ नासवला. वारकरी पंथ हा ब्राह्मण विरोधी पण ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथाद्वारे लादला आणि हे काम ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केले.छत्रपती शिवरायांनी निर्मान केलेले रयतेचे स्वराज्य ब्राह्मणांनी बुडविले मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्या ब्राह्मणांनीच इंग्रजी शिकून शहरे गाठली , हेही नेमाडे यांनी निसंदिग्धपणे लिहिले आहे.भारतातील बौद्ध धर्म का संपला आणि ब्राह्मणांचा हिंदू धर्म खेड्यापाड्यात का गेला ते सांगताना नेमाडे लिहितात "खेडोपाडी कानाकोपर्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिवल्यानं हिंदूधर्म खेडोपाडी रुजला.बौद्धधर्म शहरीच होता , शहरीच राहिला त्यामुळे संपला" (प्रुष्ठ क्र. १५८,५८७)
शेतकर्यांची मुलं शिकून डॉक्टर,वकील,इंजिनीअर, प्राध्यापक , कलेक्टर झाली पण परोपकार, प्रेम, समता,विज्ञानवाद विसरत चालली.या बाबत नेमाडे लिहितात "वारकरी हिंदू धर्माचा नैतिक पाया किती भुसभुशीत झाला आहे.याचा पुरावा म्हणजे ही तळागाळातील गरीब शेतकर्यांची मुलं.शिकून वर गेली आणि शेतकर्यांचा फ़ाळ गोतास काळ बी निसूक निघाल हो हंगाम निष्टुक वाया गेला हो !"(प्रुष्ठ क्र.३०२) ब्राह्मणी धर्म वारकरी पंथात घुसल्यानेच तो नासला आणि पर्यायाने त्यांचे अनुयायी देखील नासले.ब्राह्मण जिथं घुसतो ते नासवुनच टाकतो, असेच नेमाडेंनी सुचित केलेले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय चालते ? बहुजन मुलांच्या मनावर मुस्लिमद्वेष आणि ब्राह्मणी श्रेष्ठ्त्व कसे बिंबवले जाते याबाबतचे अत्यंत धक्कादायक वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३१८ ते ३२४ वर केलेले आहे.यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विक्रुतांची टोळधार आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
महात्मा गांधी यांची हत्या ब्राह्मणांने केली असताना देखिल ती मुसलमानानेच केलेली असावी असा संशय होता.पण ती ब्राह्मणाने केली आणि त्यानंतर काय झाले याचे सविस्तर वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३२४ ते प्रुष्ठ ३२७ वर केलेले आहे.त्यातील काही भाग पुढील प्रमाने ".. हे असं (गांधी हत्येचं) राक्षसी क्रुत्य फ़क्त ब्राह्मणच ह्या देशात करु शकतो. ते खरच ठरलं.रात्री दिल्लीहुन इकडे तिकडे केलेल्या ट्रंक फ़ोनवरून खुनी माणूस गोडसे होता, अशा बातम्या मोरगावांत ("हिंदू " कादंबरीचा नायक खंडेराव पाटलांचे गांव) आल्या आणि सकाळी तर ठेंगू जोशीबुवांना दिल्लीहुन मुलाची तारच आली.-- काळजी घ्या ----राजाभाऊ अग्निहोत्री यांनी रात्री ब्राह्मणवाड्यात साखर वाटली. अशी कुजबुज होती." ब्राह्मण आळीत एकाने बायकोला हर्षभरात , अहो, पुरणपोळ्या करा , असंच काहीतरी ओरडून सांगितल्याचही काहिंना ऐकल्याचं स्पष्ट आठवत होतं " ( प्रुष्ठ क्र.३२५) सावरकर देशभक्त वगैरे नसून मुसलमानांचा द्वेष करणारा आणि देशाची फ़ाळणी करणारा असा द्वेषी माणुस होता असे नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. "याचं(सावरकराचं) देश कार्य म्हणजे द्वेषकार्य" आपल्या देशात खालच्या जातीच्या लोकांना वैदिक,ब्राह्मणी धर्माने फ़ार छळले त्यामुळेच मुसलमान धर्म लोकांनी जवळ केला, याबाबत उद्वेगाने नेमाडे लिहितात " आपला हिंदूधर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ? " (प्रुष्ठ क्र.३२९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा काय होता, याबाबत निळुभाऊच्या डायरीतील नोंदिवरून नेमाडे यांनी पुढील विवेचन केले आहे पहिल्याच पानावर.
" स्वत:च्या रक्तानं रंगवलेला भगवा झेंडा. नंतर एका पानावर एका खाली एक लिहिलं होतं
१७५७
१८५७
१९५७
काय याचा अर्थ ? याचा अर्थ तुमच्या सारख्यांना सांगुन काय उपयोग ? १७५७ पलाशीची लढाई, १८५७ तात्यांचं बंड, आणि आता १०० वर्षांनी - रक्तरंजित आसे तु हिमाचल, अखंड हिंदूस्तान, एकुण एक इंग्रज कापून काढला जाणार होता.राजधानी पुणे ठरली होती.राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत - नमस्ते सदावत्सले - स्वतंत्रते भगवते एकत्रित घटना वगैरेचा व्यय आणि घोळ कशाला ? मनुस्म्रुती आहेच."(प्रुष्ठ क्र.३३०)मनुस्म्रुतीने बहुजनांच्या हजार पिढ्यांना नरक यातना दिल्या.त्या मनुस्म्रुतीचे राज्य ब्राह्मणांना अपेक्षीत होतं. हे नेमाडेंनी मांडले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणार्या बहुजन समाजातील तरुनांचा ब्राह्मण वापरून कसा चोथा करतात हे नेमाडेंनी रेखाटलेल्या "निळुकाकाच्या " पात्रावरून लक्षात येतं.ब्राह्मण पत्रकार ,संपादक बहुजनांच्या ग्रामिण भागातील बातम्या वस्तुस्थितीला धरून देत नाहीत.याबाबत ग्रामीण भागातील शेतकर्यांची संपादकाबाबतची प्रतिक्रिया नेमाडे यांनी पुढीलप्रमाणे नोंदवलेली आहे."खरंच आहे हो, तो मायझवाड्या संपादक श्रमाची काय प्रथिष्ठा मानतो ? " (प्रुष्ठ क्र.४०८)
आजच्या वारकरी पंथात जातीभेद आहे.नुसते देवळात नाचुन अध्यात्मिक सुख मिळवण्याच्या बाता मारतात.मुसलमान तर सोडाच पण महारमांगाना देखील यांनी सामावून घेतले आहे, मुसलमान द्वेष शिकवणार्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नेमाडे सवाल विचारतात."एकादशीला मिरची,रताळ,पेरू,पपया, शेंगदाणे,खजुर, बटाटा, साबूदाणा असले म्लेंच्छ यावणी पदार्थ कसे काय चालतात ? हे तर अलीकडे बोटींनी समुद्रावरून आयात केलेले पदार्थ."(प्रुष्ठ क्र.४४१) रामदास हा शिवरायांचा गुरु नसताना , तो तसा ब्राह्मणांनी रेखाटला याउलट तो एका मुलीचे जीवण उद्ध्वस्त करून लग्न मंडपातून पळाला, याबाबत खंडेरावांचे मित्र मछिंदर , वाणखेडे , अनंतराव यांचा संवाद नेमाडे पुढील प्रमाणे रेखाटलेला आहे."(मछिंदर अनंतरावला म्हणतो ) रामदास स्वामींच्या मंडपात राहुन गेलेल्या बायकोच्या दु:खावर फ़ार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला , सुंदर ? तिकडे कोवळी पोरगी का बोडकी ठवली जन्मभर का मारली - आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ? त्यापेक्षा ती उद्ध्वस्त बाई हातात वहान घेऊन याला(रामदासाला) शोधत शिवरथकडे चाललीय अशी कविता - पेक्षा श्लोकच का नाही लिहित-
जनाचे श्लोक मनाची नको लाज ठेवू तू जरी ।
जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥
इथे मराठी कवींना तर रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नाही नै.॥" (प्रुष्ठ क्र.४५०)
ब्राह्मण पत्रकार हा अक्षरज्ञान, धुर्तपणा, कावेबाजपणा याच्या बळावर काय-काय उचापती करतो हे अनंतराव या पत्राद्वारे नेमाडेंनी अत्यंत रसभरीत वर्णन केलेले आहे, आणि हाच अनंतराव काय करायचा हे नेमाडे लिहितात. "मराठे आणि महारांमध्ये कलागती लावून त्याबद्दल कलात्मक भाषेत लिहिणं - ह्या जबाबदार्या एकटा अनंतराव जबाबदारीनं सांभाळायचा" (प्रुष्ठ क्र.४५०) मराठावाडा नामांतराचा लढा पुरोगामी ब्राह्मणांनी कसा लावून दिला, पुणे , मुंबई विद्यापिठाच्या नामांतराबद्दल न बोलणार्या पुरोगामी ब्राह्मणांचे नेमाडे यांनी पितळ उघडे पाडलेले आहे."अशा भंपक सुधारणा आपल्या पुण्यात किंवा मुंबईत न होता दुसर्या मागासलेल्या भागात झाल्या तर उत्तमच, असं वाटणार्या पुण्या - मुंबईच्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारवंतांनी सगळीकडून मराठावाडा विद्यापिठाचं नाव बदललं पाहिजे , अशी मोहिम सुरु केली "(प्रुष्ठ क्र.४६४) दशमान पद्धती हि आर्य, द्रविडपुर्व अतिप्राचिन असुन त्याबाबतचे संशोधन झाले पाहिजे आणि ब्राह्मणी व्युत्पतीवर नेमाडेंचा विश्वास नाही , त्याबाबत ते लिहितात "दहा पर्यंतचे आकडे वेगळे करायचे , अकरा- बारा-तेरा - पंधरासतरा-अठरा - ह्या सगळ्यांच्या शेवटी रा आहे. रा म्हणजे दहा -----रावणमध्येही दहा या अर्थी रा-----असावं------राव म्हणजे आवाज म्हणून रावण, असल्या संस्क्रुत बंडल व्युत्पत्त्यांवर आपला विश्वास नाही" (प्रुष्ठ क्र.५३४) ग्रेट निकोबरी सारख्या आदिवासी समाजात बायकोवर कोणत्याही स्वरुपाचा संशय घेत नाहीत्पण हिंदू संस्क्रुतीची अवस्था काय आहे याचे विवेचन करतात , "लहान मुलं ज्या निकोबारी तरुणाला सतत चिकटून असायच त्या तरूणाला मंडीने विचारले , हा कोण ? निकोबारी म्हणाला--माझ्या बायकोचा मुलगा---असं कसं ? ह्यावर तो चिडून म्हणाला , तुम्हा बायकांना हे कळायला पाहिजे, बायकोला मी सोडून दुसर्यापासून मुल नाही होऊ शकत ? आश्चर्य , अरे, इंग्लंड मध्ये सुद्धा कुठलाही नवरा असं चिंतू सुद्धा शकणार नाही.हि नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.इथे थोड्याशा संशयावरून बायकोला जाळुन टाकणारी आमची हिंदू संस्क्रुती -----" (प्रुष्ठ क्र.५३८) हिंदूधर्मात मुलींची किंमत नाही, याबाबत नेमाडे लिहितात " मुलींची काय किंमत ? गचाळ हिंदू कुटूंब व्यवस्था" (प्रुष्ठ क्र.५८३)
भालचंद्र नेमाडे यांनी अशा अनेक बाबी प्रस्तुत कादंबरीमध्ये नोंदविल्या आहेत.त्यांचे सविस्तर लेखन म्हणजे एका पुस्तकाचा विषय आहे, हे काम पुढे कोणी तरी करेलच , नेमाडे यांची भाषा लोकभाषा आहे , ती कष्टकरी , श्रमकर्यांना आपली वाटणारी आहे,नेमांडेंच्या भाषेला ब्राह्मणी निकष लावणे गैर आहे, नेमांडेंकडे जस फ़टकळपणा आहे , विनोद आहे तसेच दु:खी, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी स्त्रिया यांच्या व्यथा मांडणारे कारुण्य देखील आहे,भाषा , आशय, वाकप्रचार, म्हणी , शब्द, साहित्य, कादंबरी ही ब्राह्मणीच असली पाहिजे या ब्राह्मणी सांस्क्रुतीक दहशदवादाला गाडणारी आणि त्यांच्या व्यवस्थेला उघडी पाडणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" ही कादंबती आहे.