मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
जन्म आणि वैवाहिक जीवन
कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव "लाडूबाई" ठेवले गेले.
समुद्रावरचा शिवाजी
कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
परकियांना पुरुन उरले
सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.
शिवरायांनी आरमाराचे महत्व ओळखून निर्माण केलेले आरमारी द्ल आणखी नावारूपाला आले ते कान्होजींमुळे! त्यांचे स्मृतीस अभिवादन!
ReplyDeleteत्यांनी केलेल्या ठळक आरमारी लढायांबद्दल वाचण्यास आवडेल.
हो नक्की लिहिण "तुमच्यासाठी काय पण....."
Delete८ जुलै १७२९ ही तारीख चुकीची आहे ४ जुलै १७२९ ही तारीख बरोबर आहे.
Deleteदर्शनास आणुन दिलेबद्दल धन्यवाद.बदल केला आहे.
Deleteसरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कार्यकाळात लढलेल्या महत्वपूर्ण लढायांची माहीती, निनाद बेडेकर यांच्या "विजयदुर्गाचे रहस्य" या छोटेखानी पुस्तकात अगदि सविस्तर मिळते.
ReplyDeleteसरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीस अभिवादन. त्यांच्या बासष्ट वर्षाच्या पराक्रमी कारकिर्दीत ते जवळ-जवळ ३१ वर्षे मराठा आरमाराचे सरखेल होते.
याच निनाद बेडेकरने लालमहालसमोर शिवरायांचा अपमान करणारा पुतळा बसवला होता...
Deleteशिवद्रोही.... बेडेकर
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या स्मृतीस अभिवादन.
ReplyDeleteतुझी 'इतिहास' विषयातील रुची वाखाणण्याजोगी तर आहेच पण त्या अभ्यासाच्या साहाय्याने इथल्या सदस्यांत इतिहासाचे जे प्रेम तू निर्माण करतोस आपल्या लेखणीच्या मदतीने, त्याबद्दल खास अभिनंदन करतो
ReplyDeleteसरखेल कान्होजी आंग्रे यांच्याविषयी लिहायचेच झाल्यास ते खर्या अर्थाने 'लॅण्डशार्क' होते. हे विशेषनाम ब्रिटिशांनी कान्होजीना बहाल केले होते कारण कान्होजी केवळ 'पाण्या'चे सरदार नव्हते तर जमिनीवर देखील त्यांचा पराक्रम ब्रिटिश आणि पोर्तुगीज दोघांच्याही चिंतेचा विषय बनला होता. व्यापारी वसाहतीवर मालकी कोणाचीही असो पण त्या शतकाच्या कालावधीत कोकणच्या पाण्यावर एकट्या कान्होजींचीच सत्ता होती हे सर्वमान्य होते. थोरल्या छ्त्रपतींच्या साम्राज्याला आपल्याकडील अपरिहार्य अशा कौटुंबिक कलहाने तडा गेला असता त्याही कालखंडात दोन महासत्ताशी आपले सर्वस्व पणाला लावून पश्चिम सागरावर मराठेशाहीचीच हुकमत असल्याचे कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने सिद्ध झाले होते.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !
Deleteअशोक डफळे - पाटील
कान्होजी आन्ग्रे अजरामर आहेत
ReplyDeleteजर शिवाजी शिकलात तर आरमाराचे दृष्टिने कान्होजी आपोआपच शिकला जातो इतके त्यान्चे समकालिन ऐतिहासिक महत्व आहे.
कान्होजी आन्ग्रे हे माझे एक आवडते ऐतीहासिक व्यक्तिमत्व.. पेशवाइच्या ऊदयास कन्होजी आन्ग्रे हे अप्रत्यक्षरीत्या कारणीभुत होते. त्याच पेशव्यांच्या तीसर्या वंशजाने, नानासाहेबाने, आंग्र्यांचे म्हणजेच मराठ्यांचे आरमार ईंग्रजांच्या मदतीने बुडवले.
ReplyDeleteपेशवाईच्या अस्ताचे ते पहीले पाऊल...
मला खरच कमाल वाटते आता यातही ब्राह्मणांना ओढायचे ?
Deleteसमुद्राचा राजा "सरखेल " यांना मानाचा मुजरा
"कान्होजी आंग्रे " या पु ल देशपांडे अनुवादील पुस्तकातील मुखपृष्ठावरील चित्रावरून काढलेले चित्र आहे ते.
ReplyDeleteकान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजीत लिहिलेली कादंबरी पु लं नी अनुवादीत केलेली आहे. ओघवती भाषाशैली हे तिचे वैशिष्ठ्य आहे. मिळाली तर जरूर वाचा.
कान्होजी आन्ग्रे हे फार सुंदर पुस्तक आहे. एकतर कान्होजी सारखा कथानायक, मुळगावकरांची ओघवती भाषा, आणि त्याला पु. ल. देशपांडे नावाच्या परिसाचा स्पर्श!
ReplyDeleteस्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी आंग्रे यांना मानाचा मुजरा...
ReplyDeleteखुप छान लेख आहे.
ReplyDeleteमराठा आरमारचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांना विनम्र अभिवादन !!
" समुद्रावरचा शिवाजी " छान वाटलं.
नितीन गायकवाड
Deleteप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !
समुद्रावरच्या या राजाला मानाचा मुजरा.........
ReplyDelete। जय शिवराय ।
मराठा साम्राज्याचे आरमारचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांना विनम्र अभिवादन !!!!
ReplyDeleteजय मराठा देश
"सरखेल" . समुद्रावरील या शिवाजीस अभिवादन !
ReplyDeleteआम्हाला तुमच्या मुळेच अर्थ आहे.
धन्यवाद पाटील लेख छान लिहिलात आणि या मुळे इतिहासाला उजाळा मिळतो.
कान्होजी आंग्रे या समुद्रावरील राजास मानाचा मुजरा..
ReplyDeleteत्यांच्या स्म्रुतीस विनम्र अभिवादन !!!
कान्होजी आंग्रे यांस या हिंदवी रक्ताचा मानाचा मुजरा...
ReplyDeleteधाकलं पाटील :
आपल्या ब्लोग वरील लेख खुप छान आहे याचा इतिहास अभ्यासास मदत होते .लिखाणाची धाटणी अगदीच उत्तम आहे, लिहित राहा
धन्यवाद !
हिंदवी रक्त :
Deleteधन्यवाद ! प्रबोधनासाठी मी लिहत राहीन नेहमीच
समुद्रावरच्या या राजास मानाचा मुजरा !!
ReplyDeleteजय शिवराय | जय जिजाऊ | जय श्री राम | जय मूलनिवासी | जय भीम | जय महाराष्ट्र
स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेणारा, परकीय शत्रूंची दाणादाण करून त्यांची झोप उडविणारा मराठी सरदार, दर्याबहाद्दर कान्होजी ! पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला.
ReplyDeleteत्यांच्या कार्यास अभिवादन !
सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुद्रा - "शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी सरखेलस्य मुद्री येकम ...
ReplyDeleteत्यांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम !!
एवं पुर्तगाली नौ सेनाओं के छक्के छुड़ा देने वाले, भारत को प्रथम बार नौ सेना की महत्ता से अवगत कराने वाले एवं अपने अंत समय तक अपराजित रहे महान योद्धा कान्होजी आंग्रे उपाख्य सरखेल आंग्रे इसा योद्ध को हम जीवन भर याद करेंगे !
ReplyDeleteकान्होजी आंग्रे. 'सरखेल'कान्होजी आंग्रे_ कान्होजी आंग्रे सुमारे २५ वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरलेले 'मराठी आरमार प्रमु
ReplyDeleteया साम्राज्याला मोठी किनारपट्टी होती व कान्होजी आंग्रे व इतर दर्यासारंगांच्या मदतीने ही सीमा प्रभावीपणे ... कान्होजी आंग्रे यांनी भारतातील पहिले मोठे आरमार उभे केले व त्यामुळे त्यांना भारतीय आरमाराचे जनक म्हणले जाते.
ReplyDeleteनिर्यातदारांना मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टनंतर ( जेएनपीटी ) माल पाठविण्यासाठी जयगड येथील आंग्रे पोर्ट हा नवा ' गेट - अवे ... मराठा साम्राज्याचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे नावे बंदराला देण्यात आले आहे .
ReplyDelete१७ व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवलेले अलिबाग हे जिल्ह्याचे प्रमुख स्थान असून हे समुद्रकाठचे उत्तम विश्रांती स्थळ आहे. अली नावाच्या ... १७०६ मध्ये वरसोली येथे कान्होजी आंग्रे आणि जंजिऱ्याचा सिद्दी यांचे युद्ध झाले
ReplyDelete