हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.परंतु रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि उमाजी नाइक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू लागले. क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे.त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या आद्याक्रांतीकाराबद्दल ....
दिनांक ७ सप्टेंबर हा भारताचे पहिले आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती दिन.१७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी या गावी उमाजी नाईकांचा जन्म रामोशी जमातीत झाला.महाराष्ट्रात रामोशी जमातीस रानटी जमात म्हणुन ओळखले जायचे.चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या चौकटीबाहेर फ़ेकले गेल्याने या जमातीच्या वाट्याला असा कोणताच व्यवसाय आला नव्हता.पर्यायाने लुटमार करणे , दरोडे टाकणे त्यांना भाग पडत असे.३५० वर्षापुर्वीही हिच स्थिती होती.शिवरायांनी स्वराज्य निर्मीतीचा निर्णय घेतला, तेंव्हा त्यांनी बहुजनातील अनेक जातीचे मावळे गोळा केले होते. छत्रपती शिवराय रत्नपारखी होते.त्यांच्या सैन्यात सामावून घेण्यासाठी त्यांच्या नजरेतून ही जमातही सुटली नाही.पुरंदरच्या डोंगर कपारीत फ़िरणारे लढाऊ, धाडसी व प्रामाणिक रामोशी आपल्या सैन्यात घेतले. अनेक रामोशी जमातीच्या लोकांनी मर्दमकी गाजवली.स्वराज्यासाठी प्राण दिले.छ. शिवरायांनी त्यांच्या शौर्याचं चीज म्हणून अनेकांना वतने, इमाने, ताम्रपट देऊ केले, याचा परिणाम असा झाला की , अस्थिर रामोशी स्थिर जीवन जगू लागले.छ.शिवराय गेले तरी त्यांनी स्वराज्याशी कधीही बेईमानी केली नाही.पेशवाई संपेपर्यंत त्यांनी अनेक किल्ल्यांचे किल्लेदार म्हणुन रक्षण केले.
'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही? तर टोस म्हणतो,उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.नरवीर उमाजी नाइक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते.त्यामुळेच त्यांना नाइक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाइक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला.
छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्या खालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली. इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते. १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण घेतले होते.
१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाइक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला भोरचा सचिव कुलकर्णी याच्या सहाय्याने इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली. आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाइक हसत हसत फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाइक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले.त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.
आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन !
ReplyDeleteJay Umaji Naik, umaji naik hech aadya krantikarak ahet. Bramhanani ugich tyache shrey vasudev balawant fadake yana denyacha prayatn kela ahe. Pan tumhi karat aslelya jagrutimule samajala saty samjat ahe. Umaji naik yanchya mrutyu nantar 13 varshani fadakecha janm zala asatana fadake aadya krantikarak kasa ? LOTS OF THANKS FOR SUCH EFFORTS.
ReplyDeleteEK UMAJI BHAKT..
भारताच्या पहिल्या आद्यक्रांतीकारकाला मानाचा मुजरा !! असा शुर पुन्हा होणे नाही...
ReplyDeleteजय शिवराय !
उमाजी नाईकच खरे क्रांतिकारक कोण तो फ़डके आणि सडके कोण माहीत नाही ...कुठला.......
ReplyDeletejar desha sathi ahuti denaryacha apman kartana thodi bhan thewa
Deleteकुठले भान ? अणि कोण देशभक्त ? फ़डके ? कोणत्या देशाचा देशभक्त ?
Deleteभारताच्या पहिल्या क्रांतीकारकास अभिवादन !! जय महराष्ट्र !
Deleteफ़डके च्या आई आजारी असताना फ़डके ने त्याच्या मालकाकडे सुट्टी मागितली .....इंग्रज अधिकार्याने सुट्टी नाही दिली आणि त्याची आई मेली या रागातून त्याने इंग्रजांना मारले जर सुट्टी मिळाली असती तर चाकरी करत राहिला असता इंग्रजांची..... अणी पेन्शन घेत राहीला असता.
Deleteसमजलं का रे भटांनो.....
जय मुलनिवासी ..........
उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते.
Deleteस्वराज्याची लालसा बाळगणारा इंग्रजी सत्तेविरुध्द वादळ उठविणारे वीरपुरुष आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजींना स्वकियांनीच पकडून द्यावे हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल.
ReplyDeleteउमाजी नाईक यांना पकडून देणार्यास १० सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले. लोकांना एकत्र करून आणि गनिमी काव्याने युद्ध करत इंग्रजांसमोर मोठे आव्हान उमाजींनी निर्माण केले. १५ डिसेंबर १८३१ हा उमाजींच्या जीवनातील काळा दिवस ठरला. भोरमधील एका खेडेगावात त्यांना पकडून इंग्रज सरकारने उमाजींच्या विरोधात न्यायालयात खटला भरला.
ReplyDeleteनालायक कुलकर्णी याने पकडून दिले होते उमाजी नाईक यांना
ReplyDeletesaheb varchya lekhat tar kunitari Naik aani Chavhan fitur zale mhanun lihale aahe..... Ithe Kulkarni kuthun aale.... :(
Deleteभोरच्या सचिवाने पकडून दिले तो सचिव ब्राह्मण होता कुलकर्णी
Deleteआयला सगळे ब्राह्मण हरामीच आहेत वाटत ,,,,, नालायक कुलकर्णी
Deleteहो अगदी बरोबर आहे सगळे ब्राह्मण हरामी होते कारण आमच्या महापुरुशामध्ये कोणीही थोड जन्माला आला की त्याला आयुष्यभर त्रास द्यायचा हे काम ब्राह्मणांनी अतिशय चतुराईने पार पडले
Deleteहरामखोर ब्राह्मण ते उमाजी नाईक क्रांतिकारक आहेत असा लिहिलंय,,,,, मादारचोत भट चार बापाचा ..हरामी
Deleteआद्य क्रांतीकारक उमाजी नाईक यांना कोटी कोटी प्रणाम......!!!
ReplyDeleteआज उमाजी नाईकांची २२१ वी जयंती. भिवडी या गांवी ही जयंती रामोशी समाज समन्वय समितीतर्फे साजरी करण्यात येत असून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर, डा. बाळासाहेब हरपळे, राजु जाधव व अंकुश ढडफळे यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. उमाजी नाईकांसारख्या नरवीर व आद्य क्रांतिकारकाचे स्मरण सर्वांना स्फुर्तीदायी ठरो हीच अपेक्षा!
ReplyDeleteआद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्यपूर्व प्राचीन भारतात यवनाविरोधात लढून व इंग्राजांशी सशस्त्र लढा देऊन बंड पुकारला व स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा आद्य क्रांतिवीराला भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, या प्रमुख मागणीसाठी रामोशी, बेरड, बेडर, वाल्मीकी, तलवार या समाजाच्या वतीने बुधवार, २२ फेबु्रवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे. ‘जान देईल पण इमान सोडणार नाही’ या न्यायाने वागणा-या रामोशी समाजाला देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६४ वर्षे लोटली तरीही न्याय मिळाला नाही. ही समाजाची शोकांतिका आहे. या उपेक्षित समाजाला भटक्या विमुक्त जाती-जमाती या वर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याची शासनाने त्वरित दखल घ्यावी व समाजाचे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, या मागणीसाठी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अंगद जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
ReplyDeletenaraveer umaji naik yanna manacha mujara
ReplyDeletejay maharashtra
उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा ...त्यांच्या जयंती दिवशी मनोपूर्वक अभिवादन
ReplyDeleteभारताचे पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांना अभिवादन !!!! जय महाराष्ट्र | जय शिवराय
ReplyDeleteक्रांतीकारक उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा......जय शिवराय !!
ReplyDeleteइंग्रजांना पळॊ की सळॊ करून सोडणारे भारतचे पहिले क्रांतीकारक उमाजी नाईक यांना अभिवादन !
ReplyDelete‘आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. परंतु आपल्या इतिहासात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र क्रांती करणारे दोन-दोन आद्य क्रांतिकारक आहेत. एक आहेत उमाजी नाईक आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आता या दोघांनी सशस्त्र क्रांतीला एकत्रित सुरुवात केली असती तर या दोघानाही एकत्रितरीत्या आद्य क्रांतिकारक म्हणणे योग्य ठरले असते. परंतु या दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
ReplyDeleteउमाजी नाईक –
ReplyDeleteउमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु काही फितूर लोकामुळे १५ डिसेंबर १८३१ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.
jabaradast pratikriya dilit saaheb
Deletejay jijaau !!
वासुदेव बळवंत फडके
ReplyDeleteवासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.
दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?
या दोघांची तुलना केलेली अनेकांना आवडणार नाही. परंतु जर आपण उमाजी नाईक यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणणार असू तर या दोघांचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. कारण ज्यांच्या हातात प्रचार-प्रसाराची माध्यमे आहेत ते जातीनिष्ठ इतिहास समाजाच्या माथी मारण्याचे प्रयत्न नेहमी करतात. आपला माणूस, आपल्या जातीचा माणूस सर्वश्रेष्ठ स्थानी पाहिजे ही वर्णवर्चस्वाची गुर्मी त्यांना असे करायला भाग पाडते. आपल्या समाजाबद्दल, आपल्या माणसांबद्दल सर्वाना आदर आणि अभिमान असणार आणि तो असायलाच हवा. परंतु त्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही दुसऱ्या जातीत जन्माला आलेल्या महामानवांची उपेक्षा करायची. महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये.
ReplyDelete@ अभिमन्यू
Deleteआपण तर एक लेखच लिहिलात मोठा ,,खरच छान लिहिलात अगदी मझ्यापेक्षा पण छान आहे..
धन्यवाद ! प्रतिक्रिया / लेख लिहिल्याबद्दल /..
जय महराष्ट्र
Agadi barobar lihilet tumhi abhimanyu khupach sundar pratikriya dilit kharokhar aamacha itihaasa asach bajula rahila aani nako tyacha itihahsa baher aala tohi khota
Deleteप्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असचं ब्लॉग वाचत रहा आणि प्रसार करत रहा
Deleteजय महाराष्ट्र
नरवीर उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन !!!
ReplyDeleteलेख खुप छान लिहिला आहेस ....
ReplyDeleteधन्यवाद ! थोर इतिहास अभ्यासक धाकलं पाटील............हिहि हि हि हि ..............
धाकलं पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है दत्ता
ReplyDelete'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी नाइक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले नाहीत शिवाजी महाराजांच्या नंतर उमाजीच
ReplyDeleteखरे आहे सर इंग्रज त्यांना दुसरा शिवाजी म्हणत
Delete