२६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जन्म झाला.त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता.तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र.असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता.शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.३जानेवारी १८७६ रोजी आबासाहेबांना दुसरे पुत्ररत्न झाले.त्यांचे नाव पिराजीराव. दोन्ही देखण्या मुलांच्या कौतुकात रमलेल्या राधाबाईंना आकाश पण ठेंगणे झाले होते.१८७७ रोजी त्या निधन पावल्या आणि दोन्ही मुले आईविना पोरकी झाली.त्यानंतर आबासाहेबांवर १८७८ मध्ये कागल जहागीर सांभाळण्याची जबाबदारी आली. मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी १८८४ साली शाळा काढली.१८८० मध्ये त्यांनी "नेटिव्ह लायब्ररी" सुरु केली होती.रयतेच्या आरोग्यासाठी दवाखाने सडका व झाडे लावलीत. कागलचा कायापालट केला त्यामुळे कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणुन इंग्रजांनी त्यांची नेमनुक केली २० मार्च १८८६ रोजी आबासाहेबांचे निधन झाले.
यशवंत ते छ.शाहू
शिवरायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले.स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले.औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत.कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत.इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता.अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर छ.शाहू यांची नेमणूक झाली.कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांनाच पुढे शाहू हे नाव मिळाले.दि.१७ मार्च १८८४ रोजी "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले.त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं.
राज्यकारभार
राज्यकारभारात सर्वच जाती-धर्माच्या लोकांची नेमणुक करून समतोल साधला जावा ही शाहू छत्रपतींची इच्छा होती.कोल्हापूरचे संस्थान हाती घेतल्यावर शाहू छत्रपतींच्या लक्षात एक गोष्ट आली ती अशी की त्यावेळी प्रशासनात गोरे साहेब, पारशी आणि ब्राह्मण जातीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते. मोक्याच्या जागा विशेषत: चित्पावण ब्राह्मणांनी बळकावल्या होत्या त्यांच्या जागी हुशार व होतकरु ब्राह्मणेत्तरांना योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नोकरशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसला इ.स.१७७८ मध्ये पेशव्यांनी "शिवशक" बंद पाडुन फ़सलीशक सुरु केला होता. तो "शिवशक" छ.शाहू महाराजांनी पुन्हा सुरु केला आणि राज्यकारभारात राज्याभिषेक शकाचा वापर सुरु झाला.
त्याचशिवाय त्यांनी अनेक शाळा , वसतीग्रुहे बांधली त्यातील पहिले वसतीग्रुह हे कोल्हापूर मध्ये बांधन्यात आले त्यामुळे कोल्हापूरला वसतीग्रुहाची जननी हा मान मिळाला.अशा अनेक पद्धतीने ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात आणले व संभाजीपुत्र शाहूंनी पेशव्यांच्या हातात कारभार देऊन जी चुक केली होती ती कोल्हापूरच्या राजाने सुधारली आणि पुन्हा उभारल स्वराज्य.
आरक्षणाची घोषणा
वेदोक्त प्रकरणामुळे टिळक, शि.म.परंजपे, न.चि.केळकर, दादासाहेब खापार्डे इ. राष्ट्रीय चळवळीतील ब्राह्मण नेत्यांचे पितळ उघडे पडले.गोपाळक्रुष्ण गोखले आणि न्या.रानडे यांनीही जातीसाठी माती खान्याचा वसा घेतला.
सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभास शाहू महाराज इंग्लंड ला गेले होते. तेथे असतानाच त्यांनी एक क्रांतीकारक घोषणा केली.२६ जुन १९०२ रोजी महाराजांच्या आदेशानुसार कोल्हापूर ग्याजेट मध्ये आरक्षणाची घोषणा करणारे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले.तो जाहीरनामा असा "अलीकडे कोल्हापूर संस्थानामधील सर्व वर्गाच्या प्रजाजनांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतू विशेष मागासलेल्या जातींत हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फ़लद्रुप झाले नाहीत.या गोष्टीचा उल्लेख करताना महाराजांना मोठा विषाद वाटत आहे.या गोष्टीचा पुर्ण विचार करून महाराजांचे असे मत झाले आहे की , या निराशेचे कारण उच्च शिक्षणाची पारीतोषके विस्त्रुतरितीने विभागली जात नाहीत. ही परिस्थिती काही अंशी दुर करण्यासाठी व संस्थानमध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्चशिक्षण संपादण्यास उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्त्रुत प्रमाणात संस्थानच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा क्रुतनिश्चय झाला आहे."
" या धोरणाला अनुसरुन या हुकुमाच्या तारखेपासून ज्या मोकळ्या पडतील त्यापैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील,अशी महाराजांची अनुद्न्या झाली आहे. ज्या ज्या ओफ़िसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली शेकडा ५० पेक्षा कमी आहे, त्या त्या ओफ़िसातील इत:पर मोकळी पडणारी जागा मागासलेल्या वर्गातील इसमाला देण्यात येईल. प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी व हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे."
असे आरक्षण म्हणजे ब्राह्मणी वर्चस्वाला चपराक होती.या आरक्षणानंतरच ब्राह्मण वर्गाला हादरा बसला व त्यांनी असंतोषाचा निरर्थक उद्रेक केला.त्यामध्ये टिळक आघाडीवर होते."मागासवर्गीयांना संस्थानच्या नोकर्यात ५०% जागा राखुन ठेवण्याबाबत शाहू छत्रपतींचा निर्णय, आदेश म्हणजे भारतातील आरक्षण धोरणाचा प्रारंभ होय."
रयतेचा राजा गेला
छ.शाहूंनी बरीच समाजसुधारक कार्य केलेली आहेत. ती इथे मांडता येत नाहीत पण महाराजांचे चरित्र सविस्तर आपण वाचावे व त्यापासून काही बोध घ्यावा म्हणुन ही त्याची ओळख. आज फ़ुले-शाहू-आंबेडकर ही त्रिमुर्ती परीवर्तनाची प्रतिके आहेत.शाहू महाराज म्हणजे फ़ुले व आंबेडकर यांना जोडणारा सांधा होतातो सांधा अचानक निखळला.६ मे१९२२ रोजी सकाळी सहा वाजता त्यांना म्रुत्यु ने कवटाळले. छ.शाहू गेले पण त्यांच्या कार्याची प्रेरणा मात्र कायम आहे. त्यांच्या स्म्रुतीला कोटी कोटी प्रणाम...