सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली. दादू कोंडदेवाने सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली, हा इतिहास आहे आणि तो कसा बदलायचा , असा प्रश्नही काहीजनांना पडला आहे.पुण्यातील संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवरी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहिकात दादोजी पंती सिऊबांस शाहणे केले या मथळ्याखाली एक लेख लिहुन दादू कोंडदेव बद्दल शिवरायांस किती आदर होता, तो त्यांचा गुरु कसा होता, याची अनेक उदाहरणे दिली आहेत.पण त्यांनी दिलेल्या समकालीन पत्रांमध्ये शहाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी कुठेच दादू गुरु म्हणुन उल्लेख केलेला नाही हे मात्र स्पष्ट आहे. ज्या बखरी पेशवाईच्या उत्तराधार्त म्हणजे पळपुटा बाजीराव म्हणुन प्रसिद्ध असणार्या बाजीरावाच्या काळात किंवा त्याच्यानंतर लिहिल्या गेल्या.ज्या काळात ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वाद जोरात पेटलेला होता. तो इतका टोकाला गेला होता की पळपुट्या बाजीरावाने त्याला जेंव्हा मुलगा झाला तेंव्हा त्याचं नाव वामनराव ठेवलं. कारण त्याला वाटलं की हा वामन ब्राह्मणेत्तर बळीराजाला पुन्हा पाताळात गाडेल. पण हा वामन अल्पवयातच गेला आणि बाजीरावाचं स्वप्न अपुर्णच राहिलं.अशा काळातील अनेक चुकांनी भरलेल्या बखरींचा आधार घेऊन त्यांनी दादू ला शिवरायांचा गुरु करायचं योग्य नाही. कारण या बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत.
अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे.एवढंच नव्हे तर पुण्याचे इतिहासकार मेहेंदळे ही या बखरीमधील इतिहास टाकाऊ व खोटा समजतात ( वाचा : राजाशिवछत्रपती प्रुष्ट : १००-११२)
दादू कोंडदेवाने पुण्याच्या भुमीवर (पांढरी) सोन्याचा नांगर धरला की नाही याचाही थोडासा मागावा घेऊ या. बलकवडे आपल्या उपरोक्त लेखात लिहितात -पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फ़क्त सहा कलमी शकावलीत आहे.तीच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे : शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजेची सरदारी इदलशाहीकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्याची आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियात ठाणे गातले तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.
पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला, असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादू कोंडदेवचा स्पष्ट उल्लेख आहे.
बलकवडे या शकावलीचं सहावं कलम अपुर्ण देतात. मुळात या शकावलीत लिहिलं आहे ... शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजची सरदारी इदलशाईकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे.त्यांत पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्यानी आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियास ठाणे गातले. तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरीला. शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.कोल्याचे वषे दिल्हे.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले. कलम १.
बलकवडे या शकावलीतील शेवटचं एक वाक्यच्या वाक्यच गाळतात.कारण या वाक्यामुळे या कलमाचा स्पष्ट अर्थ समजुन येतो.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले, हे वाक्य नसेल तर सोन्याची नांगर धरलेली घटना दादू कोंडदेव नी केली असं स्पष्ट होतं आणि शेवटचं वाक्य दिलं तर सोन्याचा नांगर शहाजी महाराजांनी स्वत:च धरल्याचं स्पष्ट होतं.वर दिलेली सहा कलमी शकावली ही ऐतिहासिक द्रुष्ट्या फ़ारशी विश्वसनीय नाही. तरीही या शकावलीतील इतिहास स्वीकारून निष्कर्ष काढायचा झाला तर सोन्याचा नांगर पुण्याच्या पांढरीवर धरला असेलच तर तो शहाजी महाराजांनी धरल्याचं स्पष्ट होतं.
या सहा कलमी शकावलीतील उल्लेखावरून शिल्प करायचे झाले तर ते शहाजी महाराज सोन्याच्या नांगराने भुमी नांगरतात, आसे करायला पाहिजे. आणि सुसंगत तर्क म्हणुन त्यावेळी संभाजीराजे, बालशिवबा, व जिजाऊंना दाखवलं तर योग्य झालं असतं पण असं न करता पहिल्यांदा ऐतिहासिक साधनांचा अर्धवट उल्लेख करायचा. त्याच्या आधारावर असत्य गोष्ट सत्य म्हणुन ठासून सांगावयाची आणि वेळवखत पाहून तशी शिल्प चित्र करावयाची या मागील कावा काय होता हे जेम्स लेनच्या पुस्तकाने जाहीर केलंय.
अशा या सोन्याच्या नांगराने भुमी नांगरणार्या समुहचित्राची मुळ कल्पना लढवण्याचा मान मात्र शिवशाहीर (?) बाबा पुरंदरे यांच्याकडे जातो. त्यांनी आपल्या राजाशिवछत्रपती व महाराज या पुस्तकात पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र काढून घेऊन ती छापली.
या चित्रांच्या आधारावरच १९९७-९८ मध्ये एक समुह शिल्प करून ते पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या मागे बांधलेल्या लालमहालात बसवायचं ठरवलं. त्यासाठी पुण्यातीलच संशोधक निनाद बेडेकर याच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली एक शिल्प तयार केलं गेलं. यामध्ये नांगरधारी बैलजोडी , बालशिवबा तो नांगर धरून, शेजारी थोडं वाकून बालशिवबाला नांगर धरायला शिकवणारे दादू कोंडदेव व शिवबांच्यामागे जिजाऊसाहेब असं शिल्प तयार झालं. हे शिल्प तयार करताना मात्र पुरंदरे ने काढून घेतलेल्या चित्रातही नाहीत अशा जिजाऊसाहेबांना या शिल्पात आणलं गेलं.
२००० मध्ये या शिल्पाचं अनावरण झालं. यासाठी छत्रपतींच्या वंशजांनाही बोलाविण्यात आलं.यात कोल्हापूरकर छ.शाहू महाराज आणि सातारकर राजमाता सुमित्राराजे यांचा समावेश होता.शिवरायांचा कार्यक्रम म्हणुन या व्यक्ती हजर राहिल्या पण जेंव्हा इ.स. २००३ -०४ मध्ये जेम्स लेन चं पुस्तक प्रदर्शीत झालं आणि त्याने त्यातील दादू आणि रामदास संबंधाने जिजाऊंच्या चरित्राची विटंबना करणारे घाणेरडे उल्लेख समजले, तेंव्हा असे इतिहासाचा कोणतही पुरावा नसताना हे शिल्प का तयार केलं याचा उलगडा झाला. तेंव्हापासून या शिल्पातून दादू कोंडदेव काढावा अशी मागणी जोर धरू लागली. हे शिल्प चुकीच्या संदर्भावर तद्दन काल्पनिक व जिजाऊ, शिवराय, शहाजी महाराजांचा अपमान करणारं असल्यामुळे त्यात बदल करणं पुणे महानगरपालिकेला भाग पडल्याने २७-१२-२०१० रोजी दादू कोंडदेवाचा पुतळा काढावा लगला.
असा हा पुतळा काढल्यामुळे इतिहास बदलत नाही तर इतिहासाचं शुद्धीकरण होतं त्यातील चुका दुरुस्त होतात हे आपण समजुन घेतलं पाहिजे. असंच इतिहासाचं शुद्धीकरण शिवपुत्र संभाजी महाराजांच्या बाबतीतही काही दशकापुर्वी इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे व डॉ.कमल गोखले यांनी केलं होतं. संभाजी महाराजांची उत्तरकालीन बखरकार,संशोधक, कादंबरीकार, लेखक यांनी केलेली बदनामी वरील संशोधकांनी अस्सल पुराव्यांच्या आधारे धुवून काढली होती.त्यावेळी त्यांनाही आज दादू चा पुतळा काढायला जशा काही प्रव्रुत्ती विरोध होत्या तसा विरोध झाला होता. पण आज शिवपुत्र संभाजी महाराजांचा कर्त्रुत्वशाली इतिहास सर्वांना मान्य झाला आहे.तसाच शिवचरित्रातील दादू कोंडदेव - रामदास शिवरायांचे गुरु नव्हते हा इतिहासही मान्य होईल, आणि तो मान्य करावाच लागेल.
ब्राह्मणांची जात अशी कशी आहे तेच समजत नाही आणि मराठे त्यांना भुलतात "मराठा समाज मागे आहे यचं कारण हे आहे " बाबासाहेबांनी म्हंटलं आहे जो समाज इतिहास विसरतॊ तो समाज उज्वल भविष्य कधिच घडवु शकत नाही, आणी पांडू बलकवदे तर एक नंबर चा महाहरामी आहे मि पण बरेच लेख वाचलेत त्यामध्ये या पेशव्यांच्या भेसळी रक्ताने मुख्य मुद्दे गाळुन टाकले आहेत.
ReplyDeleteअगदी खरे आहे मराठा समाज आपला तेजस्वी इतिहास विसरला आहे त्यामुळे मागे आहे आणि अजुन ही दुसर्याने सांगायचं आणी यांनी मान डोलवायची.हेच सुरु आहे दुसर्याचा द्वेष करण्यातच वेळ न घालवता स्वत: चा इतिहास अभ्यासला पाहिजे.
Deleteछान लेख खरं तर दादोजी कोंडदेव ह शिवरायांचा गुरु किंवा शिक्षक नव्हता , त्यामुळे त्याचा पुतळा काढला ते योग्यच. पण ब्राह्मणांनी आता समजुन घ्यायला पहिजे.दादोजींचा उदो उदो करणं सोडुन द्यावे,
ReplyDeleteदादोजी शिवरायांचे गुरु नव्हते हे जून १८६९ मध्ये मांडले आहे
ReplyDelete१२ ऑक्टोंबर १९२० रोजी लिहिले कि "रामदास व दादोजी हे शिवरायांचे गुरु हि क्लुप्ती ब्राह्मणांची आहे " गुरु असल्याचा सबळ पुरावा नाही
प्रबोधनकार ठाकरेंनी १९२५ मध्ये स्पष्ट मांडले आहे कि दादोजी हे शिवचरित्रातील गौडबंगाल आहे.
त्यामुळे दादोजी कोंडदेव चा पुतळा काढला हे योग्यच झाले .
दादोजी कोंडदेव-कुलकर्णी या ब्राह्मणाचा इतिहासात कोठेही शिवरायांचा गुरु म्हणून उल्लेख नाही. जे काही लिखाण अस्तित्वात आहे त्यात या दादोजीचे कुठेही सन्मानकारक वर्णन नाही, तर बऱ्याच ठिकाणी त्याचा दादो कोंडदेव असा एकेरी उल्लेख आहे, यावरून हे सिद्ध होते कि हा दादो कोंडदेव-कुलकर्णी हा महाराजांचा गुरु नव्हताच. त्याला गुरु घोषित केलं ते ब्राह्मणांनीच. थोडक्यात काय तर ..स्वराज्याची स्थापना केली ती छत्रपती शिवारायानी, पण शिवरायांचे गुरु म्हणजे दादोजी कोंडदेव-कुलकर्णी असा दिंडोरा पिटला. म्हणजेच इतिहासाची पाने बदलून 'या दादोजी शिवाय स्वराज्याची स्थापना करणे शिवारांयाना शक्य नव्हते' असे जनतेच्या मनात बिंबवण्याचे काम केले ते या नीच ब्राह्मणांनीच.
ReplyDeleteदादोजी कोंडदेव शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवाकडे जाते. इ.स. १६३२ ते १६३६ अखेपर्यंत शाहाजीराजांच्या शत्रुपक्षाकडे दादोजी कोंडदेव नोकरी करीत होता. त्याने शिवाजीराजांचा कोकणात उतरण्याचा रस्ता बराच काळ रोखून धरून आदिलशाही खजिना भरण्याचे काम केले होते व त्याची शिक्षा महाराजांनीच त्याला दिली.
ReplyDeleteइतिहासाच्या नैतिकतेमध्ये कथा, कांदबऱ्या, आख्यायिका, कल्पना, घुसडाघुसडी याला काही स्थान नसते. परंतु कोंडदेवाने आपल्या अंगरख्याची बाही छाटली ही आख्यायिका सुद्धा नाही. ही कोंडदेवाचे उद्दात्तीकरण करण्यासाठी घुसडलेली बनावट कथा आहे.
ReplyDeleteदादोजी कोंडदेवाने बंगरूळास शाहाजीराजांच्या भेटीस जाण्याच्या निमित्ताने विजापूरची वाट धरली, जाताना त्याने जो महसूल गोळा केला होता तो विजापूरच्या खजिन्यात जमा करून शाहाजीराजांची परवानगी वा भेटही न घेता; तो पुण्यास परतला.
Deleteitihas chaghalanya peksha bhavishyat bagha. kon kase hote te baghanyat kahich tathya nahi. samarth ramdas hote mhanun raje baryach prasangatun sahisalamat sutale. jyann khote vatate tyanni dasbodh samjun ghene mahatwache ahe
Deleteबरोबर आहे आपले की इतिहास उकरून काही उपयोग नाही, पण आपण मान्य तर करा.मग बघु काय करायचं ते.
Deleteआणि हो आपल्याला इतिहासामध्ये काही रस नसेल आणि आजचे ब्राह्मण यांचे विषयी काही समजायचं असलेस हे वाचा.
आजचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद !
http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post_1033.html
जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाने लालमहाल पुढच्या समूह शिल्पातील दादोजी कोंडदेवाच्या पुतळ्याचे कारस्थान उघडकीस आणले..
ReplyDeleteदादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक असल्याचा कुठलाही पुरावा मराठ्यांच्या इतिहासात सापडत नाही. तरीही काही इतिहासकारांनी दादोजी चे उदात्तीकरण करण्यासाठी त्याला शिवइतिहासात स्थान दिले, त्यातून विकृत इतिहास निर्माण केला गेला तो खोडून काढण्यासाठी सध्या मोठी जनजागृति सुरु आहे
ReplyDeleteदादोजी कोंडदेव पुतळा हटविल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून येताच महाराष्ट्रभरात जल्लोष सुरु झाला.. ठिकठिकाणी पेढे वाटून,फटाके फोडून शिवप्रेमी आनंद व्यक्त करत होते... पुणे,मुंबई,कोल्हापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बुलढाणा,चंदपूर,नांदेड,नागपूर,यवतमाळ,उस्मानाबाद ह्या भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला..विशेष म्हणजे मराठवाड,खानदेश आणि विदर्भाच्या ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह दिसून येत होता.. शिवसेनेने ह्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेवूनही पुणे आणि औरंगाबाद येथे तुरळक घटना वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही..वेगवेगळ्या संघटना,राजकीय पक्ष आणि साहित्यिक ह्यांनी ह्या निर्णयाबद्दल भरभरून प्रतीक्रिया दिल्या आहेत..
ReplyDeleteदादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक असल्याचा कुठलाही पुरावा मराठ्यांच्या इतिहासात सापडत नाही. तरीही काही इतिहासकारांनी दादोजी चे उदात्तीकरण करण्यासाठी त्याला शिवइतिहासात स्थान दिले, त्यातून विकृत इतिहास निर्माण केला गेला
ReplyDeleteदादोजी कोंडदेव पुतळा हटविल्याची बातमी वृत्तवाहिन्यांवरून येताच महाराष्ट्रभरात जल्लोष सुरु झाला.. ठिकठिकाणी पेढे वाटून,फटाके फोडून शिवप्रेमी आनंद व्यक्त करत होते... पुणे,मुंबई,कोल्हापूर,सातारा,सांगली,औरंगाबाद,बुलढाणा,चंदपूर,नांदेड,नागपूर,यवतमाळ,उस्मानाबाद ह्या भागात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला..विशेष म्हणजे मराठवाड,खानदेश आणि विदर्भाच्या ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह दिसून येत होता.. शिवसेनेने ह्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेवूनही पुणे आणि औरंगाबाद येथे तुरळक घटना वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही..वेगवेगळ्या संघटना,राजकीय पक्ष आणि साहित्यिक ह्यांनी ह्या निर्णयाबद्दल भरभरून प्रतीक्रिया दिल्या
ReplyDeleteपुण्याच्या लालमहलातुन दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेनेने पुकारलेल्या पुणे बंदला अतिशय कमी प्रतिसाद मिळला . पुण्यातले शाळा कॉलेजेस व्यवस्थित सुरु आहेत. तसेच बस सेवा आणि रिक्षाही सुरू आहेत. सकाळी पुण्यातल्या काही भागात बसेसवर दगडफेक करण्यात आली. जवळपास बसेस फोडण्यात आल्या.अनेक भागात दुकान सुरू होत्या. पीएमटी सेवाही सुरळीत सुरु आहे.पुण्याच्या सदैव गर्दी असणार्या लक्ष्मी रोडवरची अनेक दुकान सुरु होती. इतर ठिकाणच्या बाजारपेठ चालु होती. एकंदर शिवसेनेच्या बंदला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही..."पुतळा हलविला बरे झाले.." असा सामान्य जनतेचा सूर होता..त्याच बरोबर काही दादोजी समर्थकांच्या फुसक्या आंदोलनाचा निषेधही होत आहे..
Deleteदादोजी कोंडदेवाचा पुतळा लाल महालामधून काढणे हा एक षड्यंत्राचा भाग आहे त्या पुतळ्यात दादोजी कोंडदेव शिवाजी व जिजाऊ हे सोन्याच्या भूमीने पुण्याची भूमी नांगरत आहेत असे शिल्प होते जे इतिहासावर आधारित आहे त्यात कुठेही दादोजी हे शिवाजीचे गुरु आहेत असे कुठेही म्हंटले नव्हते त्यामुळे ते काढणे हा जेम्स लेनचा विजय आहे
ReplyDeleteआणि ते काढले कशाच्या आधारावर तर वसंत पुरके यांनी एक समिती नेमली त्यात कोण इतिहाससंशोधक होते तर श्रीमंत कोकाटे बंनबेरे प्रवीण गायकवाड वसंत मोरे आणि जयसिंगराव पवार या जयसिंगरावाणी एक पुस्तक ३० वर्षापूर्वी लिहून त्यात दादोजी कोंडदेव हे महाराजंचे गुरु होते असे लिहिले होते पवार सोडले तर बाकीचे इतिहाससंशोधक असे होते कि ज्यांना मोडी येत नाही पर्शिअन भाषा येत नाही शिवाजी महाराजंचा सर्व पत्रव्यवहार मोडी भाषेत आहे औरंगजेबाचा पेर्शिअन भाषेत हे काय निर्णय देणार फिर्यादीलाच न्यायाधीश म्हणून नेमण्याचा प्रकार औरच आहे जयसिंगराव पवारांनी सांगितले कि आत्ता माझे मत बदलले आहे धन्य धन्य ते इतिहास संशोदक आणि म शासन
यामध्ये षडयंत्रनाचा भाग येतोच कोठे ? दादू कोंडदेवांचा चा पुतळा काढल्यने कोणाच्या आयुष्यात काय फ़रक पडलाय ? कोणाचे आर्थिक किंवा राजकीय फ़ायदा झाला ? यामध्ये फ़क्त इतिहास सुधारणा होते जे आधीच करायला हवं होतं .....
Deleteजयसिंगराव पवार साहेबांनी गुरु नव्हे तर शिक्षक म्हणून उल्लेख केला होता पण जेम्स लेनच्या ब्राह्मणी कार्यामुळे नवीन संशोधन करावे लागले आणि सिद्ध झाले की दादू कोंडदेव ना गुरु होते ना शिक्षक हाच खरा इतिहास आहे.