12 June 2012

मृत दादोजी करवी केले लालमहाल चे बारसे

                  पुण्यातील शिवारायांच्या या लालमहालाचं वर्णन बाबासाहेब पुरंदरेने आपल्या "राजाशिवछत्रती" या पुस्तकातही केलं आहे ते ते लिहितात- पुण्यातील वाडा बांधून पुर्ण झाला आईसाहेबांस वा शिवबास वाडा आवडला. पागा, गोशाळा, शिलेखाना, कचेरी, दफ़्तरखाना, सदर, कोठी,राहण्याचे महाल, देवघर वगैरे जागा बांधून झाल्या.मुहुर्त पाहून आईसाहेब आणि शिवबा यांना वाड्यात राहावयास पंतांनी आणलं,पंतांनी वाडा तर अगदी सायसंगीन,दणकट,पण झोकदार बांधला.वाड्याला पंतांनी नाव दिलं "लालमहाल".त्यांनी वाड्याचे जोते पूर्व पश्चिम १७॥ गज लांब व दक्षिण - उत्तर २८॥ गज रूंद (५२॥ x ८३॥)धरले होते.वाड्याची उंची १०। गज (३०॥ फ़ूट) होती.आत चौकात कारंजी तयार केली होती.कारंजाचे पश्चिमेस भव्य प्रशस्त सदर होती.सदर म्हणजे छोटासा दरबारी महालच. वाड्यात पाण्याचा मुबलक पुरवठा केला होता.तीन विहिरी बांधल्या होत्या.पंतांनी अस थाट एकूण केला होता.शिवाय लालमहालात तळघरं बरीच बांधली होती.तळघरांची खोली ४॥ गज (१२ ॥ फ़ुट) होती.
         पुरंदरेनी लालमहालाचं वर्णन मोठं बहारीचं व त्याचा भव्य विस्तार स्पष्ट करणारं केलं असलं तरी तो पंतांनी म्हणजे दादोजी कोंडदेव ने बांधला व पंतांनीच त्याला लाल महाल असं नाव ठेवलं, अशी चुकीची माहीती त्यात आहे.कदाचीत वर्णन करण्याच्या भरात आणि दादोजी कोंडदेव ला मोठं करण्याच्या कैफ़ात त्यांना शिवाजी महाराज आणि जिजाऊमांसाहेब या दादोजी कोंडदेव वारल्यानंतर (दादू इ.स.१६४७ ला वारला) दोन-तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६४८ -४९ ला पुण्यात कायम मुक्कामास आले.हे ऐतिहासिक सत्य पुरंदरे विसरले.त्यामुळे त्याने वारलेल्या दादोजी कोंडदेव पंतास लालमहाल बांधण्याचा व त्याचं बारसं घालण्याचा मान दिला.शिवाजी महाराज व जिजामाता खेडला राहात असल्या तरी ते काही काळासाठी पुण्यात येऊन राहत होते.पण ते लालमहालात नव्हे, तर पुण्याच्या झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत असत.त्यावेळी पंताच्या हयातीत लालमहाल बांधलाच नव्हता.तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.शिवाय शिवरायांना शहाजी महाराजांनी बंगरूळहून इ.स.१६४२ मध्ये पुणे जहागिरीवर पाठवलं, तेंव्हा ते पहिल्यांदा खेड ला राहिले.या संदर्भात जेधे करीन्यात स्पष्टपणे लिहिलंय - महाराजांनी (शहाजी महाराजांनी) राजश्री सिवाजीराजे यासमागमे (सोबत)  राजश्री सामराजपंत पेशवे व मानकोजी दहातोंडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वराजा जमाव देऊन पुण्यास पाठवले त्यावरी कसबे खेडेबारे येथे वाडे बांधले.या पुराव्याला पुष्टी देणार्या अनेक निंदी उपलब्ध आहेत.         

17 प्रतिक्रिया :

  1. लेखनी हातात घेतली की कहीपण खरडत सुटायचं हेच भटांच काम आहे

    ReplyDelete
    Replies
    1. हो बरोबर आणि भाकडकथा लिहिण्यात तर ब्राह्मणांचा हात कोणीच धरु शकत नाही.

      Delete
  2. You write very well, but I bet this blog is good or bad about Brahman. plz write about Sambhaji briged and the crazy khedekar. Will you face the truth we have with you. I have to write an article. About Today's state of Brahman. I'll email you soon.

    ReplyDelete
    Replies
    1. मी असं ऐकलं होतं की नावाच्या शेवटी "कर" लागलं की ते बहुतांशी भटच असतात.तु पण त्यापैकीच दिसतेस भट - ब्राह्मण.तुला काय करायचय कोन काय लिहितोय, संभाजी ब्रिगेड एक दिवस तुम्हा भटांना पळवून मारणार आहे हे लक्षात ठेवा.
      संभाजी ब्रिगेड चा आला मेळा भटा- बामनांनो पळा पळा.

      Delete
    2. @ मयुरी काटकर
      धन्यवाद , ब्राह्मणांच्या विषयी असे नाही आणखी बरेच लेख आहेत जुन्या नोंदी बघ.आणि संभाजी ब्रिगेड विषयी लिहायचे आहे पण त्यांच्या विषयी काही संदर्भ नाहि माझ्याकडे ते इतिहास शुद्धीकरण करतात एवढंच माहीत आहे सविस्तर माहीती नाही. खरं तर आजच्या ब्राह्मणांची आणी मराठ्यांची परिस्थिती हा मिच लेख लिहिनार आहे.कारण या जातींमध्ये बरेच तानतनाव दिसुन येतात .ब्राह्मांसमोर स्वत:ची प्रतिमा टिकवण्याची काळजी आहे तर मराठ्यांची अवस्था तर यापेक्षा वाईट आहे कारण आता नविन काही संघटना नविन इतिहास जगासमोर ठेवत आहेत आता कुठला इतिहास खरा हा मोठा प्रश्न समोर आहे.

      Delete
    3. अभिजीत साहेब तुम्हाला खरच वाटत का कि इतिहास शुद्ध करून किवां काही नेत्यान नुसार आमचे मुडदे पडून तुमची किव्ना आमची प्रगती होईन . तास असेन तर नक्की करा कारण जसे परशुराम आमच्यात होऊन गेलेत तसे दधीचीइ होऊन गेलेत सांगा तुमच्या सत्ताधिशांना करा म्हणा संसदेत आणि विधानसभेत कायदा ब्राह्मन्हातेचा..

      Delete
    4. @हर्षल भंडारी
      पहिली गोष्ट अशी की कुणालाही विनाकारण त्रास देणे हे चुकीचे आहे याला तर आम्ही कायमच निषेद करणार. मुडदे पाडण्याचे तर मी कधीही समर्थन करनार नाही आणि हॊ मराठे मागासलेले असले तरी जाग्रुत आहेत तसे करण्याचे मनातही आणनार नाहीत.
      राहिली गोष्ट इतिहास शुद्ध करण्याची , खरं तर इतिहास शुद्ध करून प्रगती होऊ शकत नाही पण इतिहास हा भविष्यकाळ घडवतो. इतिहास शुद्धीकरण हे आम्हाला कर्त्रुत्ववान बनवेल कारण आमचा तेजस्वी इतिहास अंधारात ठेवला गेला आहे आणि तो जगासमोर आला पाहिजेच.(यासाठी ब्राह्मणद्वेष , ब्राह्मणहत्त्या किंवा ब्राह्मणांचा खालच्या पातळीवर जाऊन अपमान हे मला कदापी मान्य नाही.)

      Delete
    5. Please email me also, my email id is shailendradkamble@gmail.com

      Delete
  3. छान लेख आहे. खरं तर वरच्या लेखावरुन असं समजतं की दादू कोंडदेव आणि लालमहालाचा तीळमात्र संबंध नाही.पण बाबा पुरंदरेने गौडबंगाल केला आहे. खरंच इतिहासाचे विक्रुती करण करण्यात भटांचा नादच करायचा नाही.पण लेख लिहिताना काय बुद्धी गहान ठेवतात की काय ? कितिही लबाडी करूद्यात शेवटी सापडतातच. आता महाराष्ट्रामध्ये जेवढे पण दादू च्या नावाने मैदाने, संस्था, आणि काहिहि जागा आहेत त्यांची नावे ताबोडतोब बदलली पाहिजे.

    ReplyDelete
  4. बरोबर आहे लालमहालाचा आणि दादोजी कोंडदेव चा काहीही संबंध नाही पण बहुजनांच्या अडाणीपणाचा फ़ायदा घेत बाबा पुरंदरेने काहितरी कारकुणकी केली आहे हे तर साधारण उदाहरण झालं,असे असा बराच कचरा काढायचा आहे. पण आता सर्व इतिहास जगासमोर येत आहे.
    ॥ जय शिवराय ॥

    ReplyDelete
  5. शिवचरित्रात दादू कुलकर्णी चा साधा उल्लेख देखील नाही.तो अदिलशहाचा मोकाशी होता.शिवचरित्राशी दादू कुलकर्णी चा काहीही संबंध नाही.ब्राह्मणांशिवाय कोणीही मोठा होऊ शकत नाही हे बिंबवण्यासाठी त्याला शिवचरित्रात घुसडले गेले.दादू कोंडदेव हा फ़क्त शिवचरित्रातील भटी गौडबंगाल आहे.त्यामुळे त्याचा लालमहालासमोरील पुतळा काढला ते बरे झाले.आमचे समर्थनच राहील कायमस्वरुपी , या सर्व कार्याबद्दल संभाजी ब्रिगेड , मराठा सेवासंघ यांचे आभार, आणि अभिनंदन.
    । जय शिवराय ।

    ReplyDelete
  6. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पाठय़पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे धडे आहेत. या पाठय़पुस्तकाला ‘शिवछत्रपती’ असे नाव दिलेले आहे. गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथीच्या इतिहा�89. जयसिंगराव पवार हे होते. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या म�रित आवृत्ती नुकतीच बालभारतीतर्फे प्रकाशित करण्यात आली आहे. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती तिचे अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार हे होते. त्यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पाठय़पुस्तक आठ भाषांत तयार करण्यात आलं.ह्या पुस्तकातून दादोजींचा गुरु म्हणून उल्लेख वगळण्यात आला आहे .

    आता फ़क्त शिवचरित्रातुन हकालपट्टी व्हायची बाकी आहे तिही होईलच एक दिवस

    ReplyDelete
    Replies
    1. दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत?

      Delete
  7. अमोल कळेकरSunday, 17 June, 2012

    चुकीचा इतिहास वाचल्यामुळे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत. इतिहासाचे मापदंड तुम्ही ठरविणे बंद करावे. शिवभारत आणि जेधे शकावली या प्रमुख पुराव्यांमधील नोंदींनुसार दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरू असल्याचा कोठेही उल्लेख नाही

    ReplyDelete
  8. काही लोक ते गुरु होते किंवा नव्हते यावर वाद घालत बसतात, महाराज त्याना काय स्थानी मानत होते हे महाराजांनाच माहिती, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला  ते कधी समजणार नहीं कारण आपली ती कुवतच नाही

    ReplyDelete
  9. प्रश्न असा पडतो की दादोजींचा नेमका इतिहास काय आहे ?

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदवी स्वराज्यात दादोजी कोंडदेवांचं स्थान हे एक नोकर म्हणून होते हेच सत्य आहे.फ़ारच उदो उदो करण्यात येतो त्यांच्या नावाचा यात अर्थ नाही

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.