12 June 2012

बहुजन समाजातील विचारवंतांचे मोलाचे कार्य

         शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले ते पाहुया.
       लाला लजपतरायांनी सिवोजी नावाचे उर्दुमधुन शिवचरित्र लिहिले. त्यामुळे राजे पंजाब, सिंध पर्यंत समजले. रविंद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे आदर्श होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले की प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेजला दिलेलं शिवाजीराजांचं नाव मी कधिच बदलनार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते. त्यांच्यामुळे शिवराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ. समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी शुद्र पुर्वी कोन होते ? या ग्रंथात शिवाजीराजांबाबत खुप सखोल माहिती लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने बदलापूर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.या प्रसंगी त्यांनी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले.त्यामुळे राजांचे अपरिचीत रुप जनतेला समजले.राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी शिवजयंती सुरु केली.त्यांचे राजांवर डोळस प्रेम होते आंधळे प्रेम नव्हते.
                शिवाजीराजांचे भांडवल करुन फ़ुलेनी समाजामध्ये धार्मिक जातीय दंगे निर्माण केले नाहीत किंवा शिवाजीराजांच्याद्वारे त्यांनी बहुजन समाजाचे दैवीकरण केले नाही. फ़ुले यांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला.
                साहीत्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक आण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन असनारा पारंपारीक गण बदलला.गणाचा प्रारंभ शिवछत्रपतींना वंदन करूनच सुरु केला.आण्णाभाऊंनी शिवरायांवर महाराष्ट्राची परंपरा हा पोवाडा लिहिला. आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी शिवचरित्रावर रशियन भाषेत लिहिनारे प्रा.चेलिशेव आण्णांना भेटले.आण्णांनी त्यांना शिवरायांबाबत खुप दुर्मिळ माहीती सांगितली म्हणजेच आण्णाभाऊं मुळेच रशियन जनतेला शिवरायांचे कार्य माहीत झाले. शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले 

6 प्रतिक्रिया :

 1. खर्या अर्थाने शिवराय हे जगाला बहुजन समाजामधील विचारवंतांमुळे समजले पण ते कुनाला माहित आहे मराठे तर व्रुथा अभिमान ठेऊन असतात पण इतिहास विसरताता आणि ज्या बामनांनी शिवरायांचे काएय मर्यादीत ठेवले त्यांना दंडवत घालतात.

  ReplyDelete
  Replies
  1. बरोबर आहे बहुजन समाजातील विचारवंतांच्या मुळेच आम्हाला खरा इतिहास माहित झाला त्यामुळे आम्ही कायमच त्यांचे ऋणी राहू.

   Delete
 2. सतीश पोळSaturday, 16 June, 2012

  खुप चांगला लेख आहे , बहुजन समाजातील लोकांनी शिवरायांचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध केलं ही आम्हा साठी अभिमानाची गोष्ट आहे. हे थोर विचारवंतच आमच्यासाठी दैवत आहेत.
  ॥ जय भिम ॥ ॥ जय शिवराय ॥

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ! सतीश पोळ

   Delete
 3. विनायक कामतSaturday, 16 June, 2012

  लेख चांगला आहे, अजुन किती तरी विचारवंत होऊन गेले ज्यांनी शिवरायांची खरी ओळख जगाला करून दिली.पण त्यांच कार्य कोणाला माहित नाही.ज्यांनी शिवरायांचा इतिहास शुद्ध केला त्यांचाच इतिहास अंधारात आहे. याकडे मराठा समाजाने लक्ष दिले पाहिजे पण त्यांनाच भटांचे तळवे चाटण्यापासून वेळ मिळत नाही, काय सांगावं या मराठ्यांना.

  ReplyDelete
  Replies
  1. अहो त्यांना त्यांचा इतिहास माहीत नाही, आणि तुम्ही त्यांच्या कडे अपेक्षा ठेवता .
   सध्याची परिस्थिती अशी आहे की त्यांना कोणताही इतिहास मान्य नाही, जुनाच अब्रुचे धिंडवडे काढलेला इतिहास च मान्य आहे ज्या इतिहासाला गौडबंगाल म्हंटले गेले आहे थोर इतिहासकारांनी.

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.