30 December 2015

छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?

       विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मणप्रतिपालक" ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे.[की जाणुनबुजुन प्रसिद्ध केली गेली ?]. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण."गायींचा" आणि "ब्राह्मणांचा" प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते.मग प्रश्न असा आहे की शिवराय याच दोहोंच्या रक्षणासाठी आयुष्यभर लढले काय ? गाय पवित्र आहे कारण तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणे! पण गायींना कोण मानतात पवित्र ? ब्राह्मण मानतात का पवित्र ? गाय पवित्र आहे असे म्हणण्यापेक्षा उपयुक्त आहे असे म्हणणे योग्य ठरेल.पण आज गायींना पवित्र बनवण्याआधी गायींसंदर्भात आदराने,प्रेमाने कोण वागले आहे हे एकदा तपासून बघितले पाहिजे.गाय समस्त शेतकर्याला पुजनीय आहे. त्यामुळे प्राचिन काळापासून शेतकरी सामान्य रयतेने गायी पाळल्या आहेत. गायींची पुजा केली आहे; गायींचे रक्षण केले आहे.
          ब्राह्मणांनी आयुष्यात कधीही शेती केली नाही,न नांगरलेली जमीन जिथे राहतो ब्राह्मण तिथे, असे ओळखावे असे म्रुच्छकटिक नाटकात म्हंटले आहे. ब्राह्मणांच्या धर्मशास्त्राने सांगितलेले काम शिक्षण घेणे व देणे; पुजा-यज्ञविधी करणे, दक्षिणा घेणे हे आहे. प्राचिन काळी ब्राह्मणांची यज्ञसंस्क्रुती होती. यज्ञाचे एक विषेश असे आहे की पशूचा बळी दिल्याशिवाय यज्ञ पुर्णच होऊ शकत नव्हता. प्राचीन काळी गोमेध नावाचा एक यज्ञही होता. .जुण्या पौराणिक कथेत ब्राह्मणांना शेकडॊ गायी दान दिल्याचा उल्लेख आढळतो.ब्राह्मण या गायींचे काय करायचे, याचा असा सहज उलघडा होतो. (आजही ब्राह्मण मुंजीसारख्या काही विधीत कणकेची गाय करून कापतात म्हणे !).
        या उलट गायींचे रक्षण केल्याचे अनेक पुरावे आजही गावागावात आढळतात. (केवळ) मुसलमान गायी कापून खातात म्हणूण छत्रपती शिवरायांनी गायींचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले असे ब्राह्मणवादी म्हणतात. मात्र मुसलमान भारतात येण्यापुर्वी गायींचे रक्षण करण्यासाठी अनेकांना हुतात्मा व्हावे लागले. त्या काळी गायचोर कोण होते, असा प्रश्न सहज निर्माण होतो. मग बौद्धांच्या नंतर अहिंसाच्या मागे लोक लागतील आणि सामान्य लोक तिकडे लागलेले आहेत मागे त्याला ओढायचे असेल तर आपल्या कडे अहिंसा घ्यायची आणि गायीला पवित्र मानायची ही नवीन प्रथा निर्माण करायची. तीर्थकर आणि बुद्धांच्या अहिंसा तत्वाने ब्राह्मणी संस्क्रुतीची पिछेहट झाली. तेंव्हा ब्राह्मणांनी गायींमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे घोषीत केले. या सर्व गोष्टींचा अर्थ इतकाच की आज जे ब्राह्मण गोहत्या संदर्भात व गायीच्या पावित्र्या संदर्भात ज्या दंगली घडवून आणत आहेत, त्यामागचा त्यांचा हेतू वेगळाच आहे. "चोर तो चोर, वर शिरजोर" म्हणतात तो प्रकार हाच!
छ.शिवराय ब्राह्मणप्रतिपालक होते का ?
          छत्रपती शिवराय हे कुळवाडी शेतकरी परंपरेतील असल्यामुळे त्यांनी गायींच्या रक्षणाचे आदेश दिले, हे योग्यच आहे. पण त्यांनी कधीही ब्राह्मणांच्या रक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. छ. शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवरायांनी स्वत:स ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेतलेले नाही. छ.शिवरायांच्या समकालीनांनी शिवरायांना लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवरायांना ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणत नाहीत. उलट छ.शिवरायांची राज्याभिषेक शक असलेली २९ पत्रे उपलब्ध आहेत.या सर्व पत्रांत ते स्वत:स "क्षत्रियकुलवतंस श्रीराजाशिवछत्रपती" असे म्हणवून घेतात,ते कधीही स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कोठून ?. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक होते असा गैरसमज कोणी व का पसरविला ?.
        छत्रपती शिवराय हे गोब्राह्मणप्रतिपालक होते असे छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर कमाई करणार्या बाबासाहेब पुरंदरेने म्हंटले आहे. त्यासाठी शिवचरित्र साधने खंड ५,क्र.५३४ व ५३७ असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की, "५३४ क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत तर त्या पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो बाह्मण त्यास तशी पदवी देतो. ५३७ क्रमांकाच्या लेखात तर "गोब्राह्मणप्रतिपालक" असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सगळे "भटी गौडबंगाल". शिवाजी राजांनी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला आलेला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तु आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विषेश काय आहे ? ब्राह्मण तर शहाजान बादशहाला "जगदिश्वरो वा दिल्लीश्वरो" म्हणायचे फ़ायद्यासाठी ब्राह्मण स्तुती करतात हे इतिहासप्रसिद्ध आहेच.
       मग शिवरायांना लावलेली किंवा बळेच चिकटवलेली "गोब्राह्मणप्रतिपालक" बिरुदावली कुणी लावली असेल ? गायीने  लावणे शक्यच नाही त्यामुळे उत्तर स्वच्छच आहे. ग्रॅंड डफ़ आपल्या ग्रंथात "गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस बंदी केली होती." असे नमूद केले आहे.त्याला इतरही आधार आहेत.पण मग गायी, रयत आणि स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेले शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक कसे केले गेले ? रयत आणि स्त्रिया यांना बाजुला सारून त्याठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाणार नाही.
        छ.शिवरायांच्या राज्यात ब्राह्मणांस खास सवलतीसुद्धा कोठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसबंधी शिवराय लिहितात, "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे बजावून धमकावतात की, "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार".काही ब्राह्मण शिवरायांच्या बरोबर होते तसे काही ब्राह्मण शिवरायांच्या विरोधातही होते त्यामुळे शिवराय ब्राह्मणप्रतिपालक अशी बिरुदावली घॆणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नाही.
           काही महाभाग छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथाचा दाखला देताना म्हणतात की संभाजी राजांनी शिवरायांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुधभूषण ची मुळ प्रत सध्या उपलब्ध नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे तरीही सध्याची प्रत मुळची संभाजी राजेंनी लिहिलेलीच आहे असे मानले तरीही काही गोष्टी जाणुन घेणं गरजेचे आहे. संभाजी राजांनी पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून ग्रंथ रचला आहे, हे त्यांनीच नमुद केले आहे. पुराणं असो वा इतर धार्मिक साहित्य या सगळ्याचाच तत्कालीन समाजावर प्रभाव होता. असे साहित्य ब्राह्मण वर्चस्वाने ग्रासलेले होते , त्यामध्ये क्षत्रियांचे कार्य गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करणे असे सांगितली आहेत. याच साहित्याचा प्रभाव संभाजी राजांच्या लिखानावर पडला असला तर नवल नाही, कारण शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवताना त्यांनी एकही प्रमाण दिलेले नाही तथा या काळात संभाजी राजेंनी हा ग्रंथ लिहिला त्या काळात व त्याच्या आधी आणि नंतरच्या काळात कधीही शिवरायांनी ब्राह्मणप्रतिपालन केल्याचे एकही प्रमाण, तथा पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या मिथ्या बिरुदावलीपेक्षा प्रत्यक्ष कार्यच महत्वाचे असते हेच सत्य आहे.
        छ.शिवरायांना कुळवाडीभुषण रयतेचा राजा म्हणणे आधिक गौरवास्पद आहे. छ.शिवराय फ़क्त गायी आणि ब्राह्मणांच्या रक्षणाकडे  विशेष लक्ष देत होते, असे गोब्राह्मणप्रतिपालक शब्दावरून वाटू शकते. पण खरे पाहता छ.शिवरायांनी आपल्या अठरा पगड जातींच्या प्रजेसह, प्रजेची शेती, प्रजेने वाढवलेली झाडे यांचेही रक्षण केले. त्याचबरोबर मुस्लिम व इतर धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागवले. म्हणूनच शिवराय "गोब्राह्मणप्रतिपालक" नव्हते तर "कुळवाडीभुषण रयतेचे राजे" होते.
संदर्भ:
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].
मनुस्म्रुती-अध्याय१,श्लोक ८८.
भारद्वाज श्रौतसूत्र ६.१३.१०.
छत्रपती संभाजी महाराज(प्रुष्ठ क्र.८५) - [वा.सी.बेंद्रे].
शिवाजी आणि शिवकाळ (प्रुष्ठ क्र.२०५-२०६,२११-२१३) - [जदुनाथ सरकार].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
व्याख्यान(धर्म : बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा) - [प्राध्यापक राजेंद्र कुंभार] 

36 प्रतिक्रिया :

 1. अजित मानेWednesday, 30 December, 2015

  मधुपर्क हा वैदिक संस्कृतीचा अविभाज्य भाग होय. मधुपर्क म्हणजे आदरातिथ्य. आपले नातेवाईक, श्रेष्ठी जण, आदरणीय व्यक्ती इ. कोणीही घरी आले तरी आपण आजही आदरातिथ्य करतो. वैदिक आर्य संस्कृतीत आदरातिथ्य विधिपूर्वक करण्याची प्रथा होती. त्याचे विशिष्ट नियम आश्वलायनाचार्याने सांगितले आहेत. प्राचीन काळचा हा मधुपर्क आता मूळ रूपात दिसून येत नाही. तथापि, त्याचे अवशेष वैदिक वाङ्मयात तसेच अलिकडेपर्यंत रूढ असलेल्या चालिरितीत दिसून येते. लग्नकार्य आणि इतर विवाह प्रसंगी मधुपर्क केला जात असे. आजही मंगलाष्टकांत +मधुपर्क पूजन+ अशी एक ओळ भटजी म्हणतो. मधुपर्क म्हणजे मध आणि दूध यांचे मिश्रण अशी दिशाभूल करणारी माहिती ब्राह्मणवादी देत असतात. वस्तुस्थिती अशी आहे की, मांसाशिवाय मधुपर्क होतच नाही. हे मांसही गायीचेच असले पाहिजे, असा स्पष्ट आदेश आश्वलायनाने दिला आहे.

  ReplyDelete
 2. मुन्ना जमादारWednesday, 30 December, 2015

  !! ईसलाम में गाय की महत्ता !! !! गौ कथा ईसलाम में गाय की महत्ता !! देश में विद्वेषपूर्ण और भ्रमक प्रचार किया जाता हैं कि इस्लाम गौवध कि इजाजत देता हैं|किन्तु ऐसा नहीं हैं निम्नलिखित उदाहरणों व तथ्यों के आधार पर यह स्पष्ट होता हैं कि इस्लाम व पैगम्बर साहब सदा गाय को आदर की नजर से देखते थे|(बेगम हजरत आयशा में ) हजरत मों. साहब लिखते हैं कि गाय का दूध बदन कीख़ूबसूरती और तंदुरुस्ती बढाने का बड़ा जरिया हैं|(नासिहते हाद्रो) हजरत मों. साहब लिखते हैं कि गाय का दूध और घीतंदुरुस्ती के लिए बहुत जरूरी हैं|और उसका मांस बीमारी पैदा करता हैं|जबकिउसका दूध भी दवा हैं|(कुरान शरीफ16 – 66 )में लिखा हैं कि बिलासक तुम्हारे लिए चौपायोंमें भी सीख हैं|गाय के पेट की चीजों से गोबर और खून के बीच में से साफ़ दूधपीने वालों के लिए स्वाद वाला हैं|हजरत मों साहब ने कहा हैं कि गाय दौलत किरानी हैं|जब भारत में इस्लाम का प्रचार शुरू हुआ,तब गौ रक्षा का प्रश्न भीसामने आया,इसे सभी मुस्लिम शासको ने समझा और उन्होंने फरमान जारी करके गाय–बैल का क़त्ल बंद किया था|जम्मू एंड कश्मीर में लगभग पांच सौ वर्षों से गाय का क़त्ल बंद हैं

  ReplyDelete
 3. हि माहिती खरी असावी कारण, शिवाजीचा नातू , संभाजी पुत्र पहिला शिवाजी उर्फ शाहू हा देखील आपल्या पत्रात ' क्षत्रिय कुलवतंस ' हि बिरुदावली लावताना आढळतो. सातारा येथे राज्याभिषेक करून घेतल्यावर हि बिरुदावली त्याने लावून घेतली. जर शिवाजी स्वतःला ' गोब्राम्हण.....' म्हणवून घेत असेल तर त्यांचा नातू देखील तीच बिरुदावली मिरवणार हे स्पष्टच आहे. कारण ' क्षत्रिय......' हे पद फक्त घेणार आणि त्याटेल ' गोब्राम्हण...' हा भाग वगळणार असा पंक्तिप्रपंच करण्याची शाहूला काय गरज होती ?
  संदर्भ :- मराठी रियासत भाग -३
  लेखक :- गो.स.सरदेसाई

  ReplyDelete
  Replies
  1. शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हणणारा एक आणि त्यांनाच ब्राह्मणांचा कर्दनकाळ म्हणणारा एक असे गट तयार झालेले आहेत.शेवटी इतिहास हा कल्पकतेवर आधारीत नसतो.सत्य संदर्भ लागतात त्यासाठी तर न्याय होतो.

   Delete
  2. म्हणुनच शिवरायांना रयतेचे राजे म्हणणे जास्त गौरवास्पद आहे.
   रयतेचे राजे छ.शिवाजी महाराजांचा विजय असो.

   Delete
 4. छान लेख आहे. प्रमुख लेखकांनी आणि इतिहासकरांनी एकत्र येवून वादग्रस्त प्रकरणांचा सोक्षमोक्ष लावुण टाकावा आणि वाद संपवावा.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद विजया
   सर्वांनी मिळुन चर्चा करण्यासाठी प्रयत्न झालेला पण नेभळट इतिहासकार तयार होत नाहीत.रामदास स्वामींच्या विषयी चर्चा करण्याचे आवाहन कोल्हापूरच्या इतिहासकारांकडून झाले तेंव्ह पुणेरी इतिहासकारांनी लढाईच्या वेळी राजिनामा दिला होता.

   Delete
 5. याविषयी लेख इथे वाचा : http://jwalant-hindutw.blogspot.in/2013/04/blog-post.html
  http://tukaramchinchanikar.blogspot.in/2015/08/blog-post_25.html

  ReplyDelete
  Replies
  1. वाचले आहेत प्रत्येकाने आपल्याला अनुकुल लिहुन ब्राह्मण शब्दाचा अर्थ आपल्या परीने लावण्याचा प्रयत्न केले आहेत.शेवटी काय छत्रपती पदा पेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक हे जास्त महत्वाचे आहे हिंदुत्ववाद्यांना.

   Delete
  2. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. ह्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होउ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मण प्रतिपालक होते किॅवा नाही हा वाद मुद्दाम पुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो नि जातीपातीचं राजकारण केलं जातं.

   Delete
  3. @ प्रकाश कुलकर्णी साहेब वाद तर तुम्ही करत आहात.आम्ही फ़क्त एवढंच म्हणतो की रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नाहीत आता तुम्ही सत्य मान्य केला तर वाद होण्याचे कारणच नाही.

   Delete
  4. आम्ही मान्य करतोय आणि केले आहे आता तुम्हाला रामदास स्वामी शिवगुरु असल्याचे कोठे आढळणार नाही पण रामदास स्वामींबदल ब्रिगेडचे लोक काय म्हणताय तुम्हाला माहीत आहेत यामुळेच वाद होतोय.खलच्या स्थरावर जाऊन ते स्वामींची पर्यायाने शिवरायांची बदनामी करत आहेत.

   Delete
 6. विनित राऊतThursday, 31 December, 2015

  रामदासांना शिवछत्रपतींचे गुरु व स्वराज्याचे प्रेरक म्हणून दाखवणे ही आणखी एक मोठी लबाडी. या दादोजी व रामदास यांच्या कारस्थानात फक्त पुरंदरेच नाहीत तर अनेक ब्राह्मण इतिहासकार सामील आहेत. रामदासांचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पुन्हा एकदा धादांत खोटा इतिहास शिवप्रेमींच्या गळ्यात मारण्यात आला.एका पत्रकार परिषदेत स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत: कबुली दिली आहे की .. “ होय रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते.” यावर उपस्थित पत्रकारांनी त्यांना विचारले की “ अनेक इतिहासकार तस सिद्ध करत आहेत मग तुम्ही स्पष्ट सांगत का नाहीत हे “ यावर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. “ ते म्हणतात ते खोट नाही. ते इतिहास जरा ताणतायत. मी रामदासांना संशयाचा फायदा देतोय.” असे चक्क हास्यास्पद उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.हरी नरके याविषयी म्हणतात पहिल्यांदा राजवाडे, ह ना आपटे, बाल टिळक, शक्र श्रीधर देव ,ल रा पांगारकर, अनंत दास रामदासी, न्या रानडे सदाशीव खंडो आळपेकर आदी अनेक मंडळींनी यावर सुपारी घेऊन १८७० ते २००४ अशी तब्बल १३४ वर्षे काम केले. धन्य ती जात निष्ठा ..धन्य तो वर्चस्ववाद.

  ReplyDelete
 7. अमित देशपांडेThursday, 07 January, 2016

  प्रौढ़प्रताप, पुरंदर गो ब्राह्मण प्रतिपालक, हिन्दवी स्वराज्य संस्थापक, क्षत्रिय कुलभूषण, सिन्हासनाधिश्वर ,राजा धिराज, महाराज, योगिराज, श्रीमंत, श्री छत्रपति शिवाजी महाराज की, जय ……..!
  जय भवानी, जय शिवाजी ……. हर हर महादेव !!!!

  ReplyDelete
  Replies
  1. दोन कुलकर्णीला ठार केल्याबद्दल छ.शिवरायांना आता कोणी ब्राह्मणांचे संहारक किंवा ब्राह्मणक्षयदिक्षित असे म्हंटले तर नवल वाटायला नको

   Delete
 8. शिवरायांना गोब्राह्मणप्रतिपालक म्हटल्यावरून बरीच आदळआपट सध्या चालू आहे. शिवराय हे जर साऱ्या जनतेचे होते तर त्यांना गो व ब्राह्मण यांचे प्रतिपालक ठरविणे गैर आहे अशी तक्रार आहे. गोब्राह्मणप्रतिपालक ह्या शब्दाचा अर्थ नीट ध्यानी न आल्यामुळे हा गोंधळ होत आहे हे सांगण्यासाठी हा लेख.शंकराचार्यांच्या गीताभाष्यात सुरुवातीला त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की (जणू) भगवंतांनीच निर्णय केला की वर्णधर्माचे पालन व्यवस्थित होण्याकरिता श्रीकृष्णांचे माध्यम वापरून अर्जुनाच्या निमित्ताने उपदेश करावा जेणेकरून ब्राह्मण्यत्वाचे रक्षण होईल.(ब्राह्मण्यत्व वा ब्राह्मण्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती हा जो समज पसरविलेला गेलेला आहे तो संपूर्ण चूक आहे. ब्राह्मण्य ही अवघड गोष्ट असून आता तसे ब्राह्मण पाहायला मिळणे कठीणच आहे.) जेव्हा मी हे पूर्वी कधीतरी कोणाच्या तरी लेखात वाचले होते तेव्हा फार धक्का बसला होता. पुढे अभ्यासासाठी गीताभाष्य हाती धरले तेव्हा कळले की आपण अर्धवट वाचले होते वा आपल्याला अर्धवटच वाचायला मिळाले होते. ब्राह्मण्याचे रक्षण केले तरच ‘ब्राह्मणादि वर्णांची’ व्यवस्था राहणार असल्याने ब्राह्मण्यरक्षणाचे महत्त्व त्यांनी सांगितले आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. हिंदुत्ववादी लोकं चाटुकारी पणा करण्याची सुवर्ण संधी अजिबात सोडत नाहीत.म्हणे ब्राह्मण ह्या शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे.तो कोणी ठरवला ? तुम्ही सांगा ब्राह्मणत्व म्हणजे काय ते.ब्राह्मणप्रतिपालक या शब्दाचा अभ्यास केला तर कळेल की ब्राह्मण हा कर्मावर आधारीत शब्द घेतला तर फ़क्त "ब्राह्मण वर्णाचे रक्षण" आणी जातीवर घेतला तर "ब्राह्मण जातीचे रक्षण" ब्राह्मणादि हा शब्दच चुकीचा आहे कारण ब्राह्मण वर्ण पहिला आहे तो असा उच्चारायला हवा ब्राह्मणशुद्रादि वर्ण.आपल्या कडे श्रेष्ठत्व ठेवण्याचा चांगला चंग बांधुन आला आहात.

   Delete
  2. आदेश अंतुलेFriday, 08 January, 2016

   हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते.यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात.ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील अगदी बरोबर पाटील साहेब.हिंदुत्ववादी चाटुकार आहेत ब्राह्मणांचे.

   Delete
 9. राजेश मुराळीFriday, 08 January, 2016

  मुंबईतील कल्याण येथे टेकडीवरील हाजीबाबा मलंगशा यांचा दर्गा आहे.त्याचा पुजारी ब्राह्मण आहे.त्याला धर्म महत्वाचा नाही पैसा महत्वाचा आहे.मग ब्राह्मणांना धर्म महत्वाचा नाहीतर हे भिकारडे हिंदुत्ववादी कशाला धर्मरक्षण धर्मरक्षण म्हणून बोंबलतात

  ReplyDelete
 10. शिवाजी महाराजांच्या जीवनात साधु संतांना विषेश स्थान होते शिवराय सर्व संतांचा मान राखत होते.त्यांनी कधीच भेदभाव केला नाही.

  ReplyDelete
 11. साक्षी जगतापSaturday, 09 January, 2016

  ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त करण्यासाठी 'प्रतिइतिहास' लिहिण्याची आवश्यकता आहे.आपले कार्य खरोखर प्रशांसनीय आहे.आपल्याला सुभेच्छा !!!

  ReplyDelete
 12. ब्राम्हानानी लिहिलेलेला धादांत खोटा इतिहास उध्वस्त करण्यासाठी 'प्रतिइतिहास' लिहिण्याची आवश्यकता आहे.आपले कार्य खरोखर प्रशांसनीय आहे.आपल्याला सुभेच्छा !!!

  ReplyDelete
 13. संभाजी राजांच्या बुधभुषणम ग्रंथात क्षत्रियांचे कर्तव्य सांगताना ब्राह्मणांचं रक्षण करने असे लिहिलेले आहे.त्यांच्याच एका पत्रात ते महाराजांना ब्राह्मणांचे रक्षण करणारे असे म्हणतात.संभाजी राजांवर किमान आपला भरोसा पाहिजे.जो सत्य इतिहास आहे त्यावर तर आपण तटस्थ राहिले पाहिजे.केवळ ब्राह्मणाला विरोध म्हनून "गोब्राह्मणप्रतिपालक" पदवीला विरोध करून चालत नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. संभाजी राजेंनी लिहिलेले आहे.विश्वास आहे की नाही.संभाजी राजेंना जास्त माहीत आहे कि तुम्हाला ? असे म्हणने म्हणजे भावनिक करण्यातला टुकार प्रकार आहे.

   Delete
  2. नारायण : मुळात संभाजी राजेंनी त्यांना जे वाटले ते लिहिले आहे.त्यांनी क्षत्रियांचे कर्तव्य सांगितले आहे पण "ब्राह्मणांचा मुलाहिजा न ठेवणार्या" महाराजांनी ब्राह्मणरक्षणाचा क्षत्रियधर्म पाळल्याचा पुरावा आहे का ? कारण शिवरायांनी स्वराज्याच्या हितासाठी बर्याच वेळा धर्माशी बगावत केली आहे. विषय हा शिवरायांच्या ब्राह्मणप्रतिपालक असण्याचा आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच पुष्टी मिळणे अत्यंत गरजेचे आहे.त्यांनी स्वत:स कधी "गोब्राह्मणप्रतिपालक" असे म्हणवून घेतले आहे का ?.ज्यांनी ज्यांनी शिवरायांचा उल्लेख ब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे त्यांनी काही दाखले दिले आहेत का ? आपण शिवरायांना "रयतेचा राजा" मानतो कारण सामान्य रयतेची, त्यांच्या आब्रुची, त्यांच्या शेतीची, पर्यावरणाची काळजी शिवरायांनी घेतली त्यांचे रक्षण केल्याचे पुरावे आपल्याला भरपूर मिळतात.रयत आणि स्त्रिया यांच्या रक्षणाचे दाखले मिळतात.पण शिवरायांनी कधी ब्राह्मणांचे खास संरक्षण करण्याचा एखादा दाख्ला आहे का ? स्वराज्यामध्ये ब्राह्मणांसाठी काही खास सवलती दिल्या होत्या का ? किंवा ब्राह्मणांचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे असे कोठे नमुद करून ठेवले आहे का ? या सगळ्याचे उत्तर "नाही" असंच येते.उलट "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार" असे बजावून "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे ठणकावले आहे.याचाच अर्थ जो न्याय इतरांना तोच न्याय ब्राह्मणांना.काही विषेश सवलत नाही किंवा पक्षपातीपणा नाही त्यामुळे शिवराय हे ब्राह्मणप्रतिपालक नसून "रयतेचे राजे" होते.

   Delete
  3. धर्माशी बगावर केली हे काही पटले नाही मला.शिवराय हिंदुधर्मरक्षक होते त्यांनी धर्माचे रक्षण केले पण बगावत करणे म्हणजे द्रोह करणे मग हे तुम्ही कशाच्या आधारावर बोलत आहात ? त्यासाठी काही प्रमाण आहे का ? विनाकारण गोंधळ नको.

   Delete
  4. छत्रपती संभाजी महाराज तर शिवरायांच्या समकालीनच ना.म्मग त्यांनी स्वत:च बुधभुशन ग्रंथात क्षत्रियांचे कर्तव्य सांगताना लिहिले आहे ते.मग आणखी काय प्रमाण पाहिजे आपल्याला ? गायीचे आणि विद्वानांचे रक्षण असा त्याचा अर्थ आहे.ब्राह्मण हा शब्द तिथे जातीवाचक नाहीये हे आधी समजून घेतले पाहिजे. हे समजले की सगळे प्रश्न सुटतील.
   जय शिवराय

   Delete
  5. एक गोष्ट महत्वाची आहेच की शिवरायांनी तसे स्वत:ला कधी म्हणवून घेतले नाहीच पण संभाजी राजेंनी जो उल्लेख केला आहे त्याचेही खास कारण आहे.संभाजी राजेंचा ग्रंथ हा पुराणावर आधारीत आहे.छ.संभाजीराजेंनी बुधभुषणमच्या सुरुवातीलाच म्हटले आहे की "पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी हा ग्रंथ रचीत आहे".पौराणिक ग्रंथाच्या आधारावर संभाजी राजांनी हा ग्रंथ लिहिला आहे आणि आपल्याला माहीत आहेच की कोणत्याही पौराणिक ग्रंथात ब्राह्मणाचे श्रेष्टत्व अबाधीत ठेवले आहे.त्याचाच परीणाम संभाजी राजेंच्या लिखानावर असेल तर नवल वाटायला नको.तसही ब्राह्मण हा शब्द कोणत्याही अर्थाने घेतला तरी तो संकुचितच ठरतो आणि संभाजी किंवा शिवाजीराजे जमातवादी तथा जातीयवादी ठरतात त्याला कारणीभुत हे गोब्राह्मणाचे सध्याचे प्रतिपाल करणारेच आहेत.

   Delete
  6. शिवरायांमुळे हा धर्म टिकला आहे.त्यांनी धर्माचे रक्षण केले कोठेही धर्माच्या नियामांचे उल्लघंन केले आहे.धर्माचे प्रेरणास्थान आहेत महाराज तुम्ही केवळ हिंदुत्ववाद्यांना विरोध करायचा म्हणून काहीती कल्पनाविलास चालवू नका.शिवराय गायीचे पालक होते पण ब्राह्मणांचे पालन केले की नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही.

   Delete
  7. @मनोज : शिवराय हे धर्मवादी नव्हते हिंदुत्ववादी तर अजिबातच नव्हते.हिंदु धर्म दुय्य्यम मानून स्वराज्याला प्रथम स्थान दिले.म्हणूनच धर्माच्या काही बाबींना त्यांनी धुडकावून लावले.अशी बरीच उदाहरणे देता येतील.धर्माने स्त्रीयांना गौन स्थान दिले होते पण शिवरायांचे स्त्री विषयक द्रुष्टीकोण आपल्याला माहीत आहेत.ब्रह्महत्या पाप मानले धर्माने पण कुलकर्णीला ठार मारून त्यांनी धर्मनियमांना दुय्यम ठरवले.धर्म सोडलेला माणुस मेल्यासमान असतो जसं मेलेला माणुन परत जीवंत होत नाही तस धर्म सोडलेल्या माणसाला धर्मामध्ये प्रवेश नाही.पण शिवरायांनी कित्येकांना धर्मांतर करून पुन्हा हिंदु धर्मात घॆतले.धर्माने समुद्रबंदी घातली होती पण मराठा आरमार उभे करून तोही नियम पायदळी दिला.हे काही मोजके दाखले आहेत.

   Delete
 14. संभाजी राजेंचा हा ग्रंळ मुळ स्वरुपात सध्या उपलब्ध नाहीये.त्यामुळे तुकोबांच्या गाथेत जशी घुसडन झाली तशी बुधभुषणम यात झाली नसेल कशावरून ? कारण संभाजीराजेंनी लिहिल्याप्रमाणे शिवरायांचे एक तरी कार्य आहे का ?

  ReplyDelete
 15. ब्राह्मणावदी तथा हिंदुत्ववादी ज्या पत्राचा दाखला देतात त्या पत्रात नेमके काय लिहलं आहे ते आपण पाहुयात. शिवाजी राजे- कारकून व देशमुख परगणे पुणे यांना लिहतात, " मोरेश्वर गोसावी यांच्याकडे दहा वीस गाई आहेत. त्यांना चरावयास रान नाही. त्यामुळे त्या ब्राम्हणास (मोरेश्वर गोसावींचे उत्तराधिकारी चिंचवडकर देव) त्यापासून काहीच फायदा नाही. शिवाजी महाराज यांच्यावर (रयतेचे पोशिंदें आणि संस्थानचे वर्षासन देणारे देणगीदार व भक्त या नात्याने) त्या गाईंचा व ब्राह्मणाचा प्रतिपाळ (सांभाळ) करण्याची जबाबदारी आहे." असे सांगून गायींच्या पालनपोषणासाठी इनामी जमीन देण्याचे आदेश त्या पत्रात आहेत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांच्यापासून हे देवस्थान भोसल्यांच्या छत्रछायेत होते.नानाविध कारणे सांगून दान पदरात पाडून घ्यायची सवय त्यावेळेस ब्राह्मणांमध्ये होती. सिंहासनावर बसलेल्या राजाला ही मागणी नाकारणे शक्यच नव्हते, म्हणून हा आदेश देण्यात आला.हा पालनासंबंधीचा उल्लेख एका ब्राह्मणासाठी आहे ज्याची जबाबदारी शिवरायांबर होती.सरसकट ब्राह्मणांसाठी नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. शिवरायांना ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे म्हणजे त्यांना जातीवादी तथा जमातवादी ठरवण्यातला प्रकार आहे.असा प्रकार हिंदुत्ववादी सर्रास करत असतात.यासाठीच सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.

   Delete
 16. छत्रपती शिवाजी महराज हे कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्यांनी आठरा पगडजाती आणि बाराबलुतेदरांना सोबत घेऊन रयतेच राज्य स्थापन केले. यामुळे शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच.

  ReplyDelete
  Replies
  1. नक्कीच शिवराय हे कुळवाडीभुषण रयतेचे राजे होते.ब्राह्मणप्रतिपालक असण्याला शिवरायांचे कोणतेही कार्य पुष्टी देत नाही.कारण ते सत्य नाही.

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.