आज समाजामध्ये अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक संघटनेचा लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी एक युक्तिवाद असतो. त्यामध्ये हिंदूत्ववादी संघटनेंचा सगळ्यात जुना युक्तिवाद म्हणजे मुसलमानांनी आपल्या धर्मावर अन्याय केला, देवळांची लुट केली म्हणून (निव्वळ) मुसलमांनांना विरोध करण्यासाठी हिंदुंनो एक व्हा !. (इथे यांना सामान्य हिंदूंशी काही देणंघेणं नसतं). यामध्ये हिंदू धर्मावर अन्याय करण्यापेक्षा देवळांची लुट केली यावर यांचा जास्त रोष असतो (कारण देशात कितीही मोठा दुष्काळ येवो पण भट-बामनांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला देवळामुळे कसलाच चिमटा बसत नाही). पण सामान्य जनतेने या लुटालूट प्रकरणापासून दुरच रहावे (कारण सामान्य जनतेला लुटण्यात देवळांचा पहिला नंबर लागतो) आणि आजही परिस्थिती काही वेगळी नाही. आज जिवंत माणसाला एक वेळचे जेवण मिळो ना मिळो पण देवांना मात्र सकाळ - दुपार - संध्याकाळ पंचपक्वान्नांची न्याहारी आहेच, शिवाय काकडआरत्या, माकडआरत्या आहेतच की. कोट्यावधी गरीब (हिंदू) जनतेला थंडीच्या कडाक्यात साधे अंग झाकण्याइतके कपडे मिळो ना मिळो पण देवांना मात्र छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांची कमी नाही.
आज हिंदुत्व, हिंदुराष्ट्र अशा घोषणा आणि भुमिकांच्या आधारावरचे राजकारण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनेंचा एक (त्यांचा) आवडता युक्तिवाद असतो व आहे, मुसलमान क्रुर होते,त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली,हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार केला, धर्म बुडाला म्हणून सर्व मुसलमान हिंदूविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेत आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत त्याअर्थी सर्व हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध असले पाहिजे.धर्माधारे हिंदुंना संघटित करणार्या संघटनांचा जसा युक्तिवाद असतो तसाच काहीसा मुसलमान संघटनेंचा असतो.
आक्रमक मुस्लीम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फ़ोडली व लुटली हा हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादाचा महत्वाचा भाग असतो. हे सत्य असले तरी पण हे पुर्ण सत्य नाही,अर्ध्य सत्य आहे. अरब, तुर्क, अफ़गाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमीत पगार दिला जात नसे, त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.
आज दर्याकपारीत आणि डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत त्या देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय ? देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी ? याचाच अर्थ की लुटीची संपत्ती मुख्य असत, तिथे धर्म दुय्यम होता. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतील मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतील लोकांचे खच्चीकरण करणे, त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे देवळे पाडण्यामागे. लोक श्रद्धाळू असतात, त्यांनी देव लुटला मग आम्हाला लुटायला काय वेळ लागणार आहे असे भय असे. त्यामुळे मुलुख जिंकणे सोपे जाई. त्याकाळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. हीच मुख्य कारणे ठरली देवळांच्या नाशाला.
आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली. त्यामध्ये ते पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की, अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का ? तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात, त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे (रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही. १७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.
अफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता, त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता ? त्याला माहीत नव्हतं का ? की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही ? तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही ? महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते. मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा ?
शिवाय फ़क्त मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत. धातूसाठी मुर्ती वितळवी, वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या "राजतरंगिणी" या ग्रंथात आहे. देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली. मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने "देवोत्पादन" हे खातेच उघडले होते. मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का ?
मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची, मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की, जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही. म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.
तात्पर्य काय ? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते. धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.
संदर्भ :
देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].
शिवाजी कोण होता ? [गोविंदराव पानसरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].
राजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].
हिंदू राजांनी सुद्धा मंदिरे लुटल्याचे उदाहरणे बरीच आहेत पण हे भिडे,एकबोटे,देसाई सांगत नाही निव्वळ मुस्लिमद्वेषापायी खोटे सांगत असतात. भिडे,एकबोटे,देसाई हे सारखे मुस्लिमांविरुद्ध भुंकत असतात पण मुस्लिमांच्या खाली या बामनांच्या पिढ्या वाढत गेल्या हे सांगत नाहीत. भिडे,एकबोटे,देसाई यांना माहीत नाही यांचे बापजादे कन्याविक्रय करायचे म्हणजे पोरींना विकायचे जसे पोर्तुगिजांना आपल्या पोरी आणि बायका पुरवायचे.याविषयी एक शब्द काढत नाही हे लांडगे
ReplyDeleteहिंदूंच्या देवळांच्या नादात भारत देशाचे अपरिमित नुकसान झालेले आहे.राम मंदिराच्या नादात तर किती हजारो लोक मारले गेलेत.मंदिर बांधून झालं की पुजारी कोण भट्बामन म्हणजे ही पण एक ब्राह्मणी गुलामगिरी आहे.बहुजनांनी शाळेकडे लक्ष द्या देवळे लुटतायेत तर लुटू द्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय
ReplyDeleteमुस्लिमांनी हिंदुंची कितीतरी मंडिरे पाडली आहेत पाटील.तुम्ही त्याचा अभ्यास करा.आम्ही मुस्लिम द्वेषातुन म्हणत नाही सत्य आहे तेच सांगतोय.
ReplyDeleteहिंदूंच्या मंदिरांना तोडण्यात आणि लुटण्यात लांड्यांचा हात होते आणि आजही बर्याच देशात हिंदुंची मंदिरे तोडत आहेत मौलवी.हिंदू देव-देवतांची विटंबना करणारे मुस्लिम आहेत.दहशत माजविणारे मुस्लिम आहेत.म्हणून हिंदुराष्ट्र निर्माण करणे प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य आहे. जयस्तु हिंदूराष्ट्र
Deleteमुस्लिम जेंव्हा हिंदूंची मंदिरे लुटत होते त्यावेळी या हिंदुंचे देव काय करत होते आत ? की बिड्या फ़ुंकित होते ? अहो साधी फ़ुंकर मारली असती या देवांनी तर मुस्लिम राजे उडून इराणच्या पलिकडे जाऊन पडले असते.पण अशा प्रश्नांकडे बामन लक्ष देत नाहीत कारण अशा प्रश्नांची उत्तरे देणे त्यांना अडचणीचे असते
Deleteखुपच अभ्यासात्मक आणि सत्य इतिहास उजेडात आणणारा लेख आहे. जय शिवराय
ReplyDeleteपाटील साहेब तुम्ही लेखामध्ये नमुद केले आहे की मुस्लिमांनी हिंदुंची मंदिरे लुटलीत पण माझ्या माहितीप्रमाणे हिंदूचे असे आपल्या मालकीचे एकही मंदीर नाही सगळी बौद्धांची आणि जैनांची लुटली आहेत.त्यामुळे लुटलेल्या देवळांना हिंदूंची म्हणने म्हनजे चुकीचे ठरेल.बाकी लेख अभ्यासपुर्ण आहे
ReplyDeleteमंदिर बांधणे म्हणजे एक मोठा व्यवसाय आहे ज्यामध्ये मंदी येत नाही.करोडो जनता भुकेने मरायला लागले तरी मंदिराचे ठेकेदार मजेत असतात खाऊन पिऊन.मंदिर तोडफ़ोडप्रकरणांमध्ये इतिहासापासून आजपर्यत मराठे मरायला आणि भट - बामन चरायला हेच समिकरण बनले आहे हे आता थांबायला पाहिजे कारण मंदिरं पडली काय नी उभे राहिली काय याचा काहीच फ़ायदा नाहीये. जय मुलनिवासी भारत.
ReplyDeleteऔरंगजेबाने हिंदू मंदिरांच्या पूजाऱ्याना आणि हिंदू महंताना संरक्षण आणि जमीनी इनाम दिल्याची उदाहरणे आहेत। अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्याने 200 गावे इनाम दिली। मथुरा आणि बनारस येथील देवस्थांनाही अनुदान दिले।म्हैसूर राज्यातील व्यंकटरमण मंदिराला औरंगजेब दरसाल नजराणा पाठवत असे। जैन धर्मियांनाही त्याने मोठी ईनामे दिली होती। देहरादून येथील शीख गुरूद्वाराला त्याने दिल्लीहून उत्कृष्ट संगमरवर आणि इतर सामग्री पाठविली। रजपूतांचा कट्टर विरोधक समजला गेलेला औरंगजेब हां उदयपूरच्या राणीचा राखीबंद भाई होता। ( हिंदू मुस्लिम मिलाफ- सय्यद अमीन/राम मनोहर लोहिया स्मृती केंद्र ' वार्तापत्र'। मार्च एप्रिल 1983)
ReplyDeleteमाहीत नसलेला औरंगजेब-5 औरंगजेबाने विश्वनाथ मन्दिर का पाडले ? औरंगजेब बंगालला वाराणसीवरून जात होता। सोबतच्या हिंदू राजांनी विनंती केली " येथे एक दिवस थाम्बावे। आमच्या राण्या गंगेत स्नान करून भगवान विश्वनाथाचे दर्शन घेतील।" विनंती मान्य झाली। सर्व राण्या पालख्या मधून गंगास्नान आणि पुजेसाठी गेल्या। कच्छची राणी सोडुन सर्व राण्या परत आल्या। संपूर्ण मंदिरात शोधले पण राणी सापडली नाही। औरंगजेबाला ही घटना कळल्यावर तो संतापला। त्याने राणीला शोधण्यासाठी सेनाधिकार्याना पाठविले। सैन्याने सम्पूर्ण मंदिर शोधल्यावर त्याना आढळले की भिंतीत बसविलेली गणपतीची मूर्ती सरकविता येते। मूर्ती सरकविली गेल्यावर तळघरात जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या। तेथे हरविलेली राणी रडत होती। तिच्यावर अतिप्रसंग झालेला होता। हे तळघर भगवान विश्वनाथाच्या बरोबर खाली होते। सर्व राजांनी या प्रसंगाचा निषेध करून कठोर कारवाईची मागणी केली। औरंगजेबाने आदेश दिला की हे पवित्र स्थान आता अपवित्र झाले असून भगवान विश्वनाथाला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जा। मंदिर पाडून टाका आणि पूजार्याला अटक करून शासन करा। ( डॉ पट्टाभिसीतारामैय्या यानी मूळ कागदपत्रे तपासून त्या आधारावर वरील घटना ' दि फेदर्स एंड द स्टोन ' या पुस्तकात लिहिला आहे।पटना म्युझियमचे माजी क्यूरेटर डॉ पी.एल.गुप्ता यानी या घटनेस दुजोरा दिला आहे। विशेष आभार : ड़ॉ राम पुनियानी )
ani asha thor Aurangjebala Shivrai ka bare virodh karit astil
Deleteविषय काय आणि प्रश्न विचारताय काय
ReplyDelete