5 November 2012

मानवतेचे महान उपासक : संत गाडगे महाराज

        "मनुष्य" सुद्धा उमललेल्या फ़ुलासारखा असतो. मनुष्य जन्माला येतो तो अस्तित्वाचा भाग म्हणून.चैतन्य त्याच्या नसानसातून धवत असतं .दु:खातून आनंदाकडे जाणारा हा प्रवाह अनेक दु:खी,कष्टकरी जनतेच्या अंत:करणात भरून जातो.ते भरणं त्यांच्या कष्टाचं सार्थक असतं.जन्माचं कल्याण करतं , आनंदाची , चेतनेची ज्योती चेतविण्याकरीताच हे अस्तित्वाचं लेणं आकार घेतं.
        "शेणगांव" एक लहानसं खेडं.गावात शंभर - सव्वाशे कौलारू झोपड्या.ह्या खेड्यात परीट जातीचं एक घर,समोर दोन - तीन मडकी,सारवून स्वच्छ केलेलं अंगण.घराचा मालक झिंगराजी.त्यांच्या बायकोचं नाव सखुवाई, कष्ट करणारी. या  मायमाउलीच्या पोटी १८७६ साली जन्माला आलं मुल नाव ठेवलं ’डेबू’.’डेब’ झाला तुकोबांचा कर्मयोगी ,सार्या कुळाचा उद्धार केला.डेबुंचे कार्य महान सारी मानवता खुश झाली.दीनांचा कैवारी मानवतेच्या अपंगाचा आधार..अमाप कार्य महाराष्ट्रावरच नव्हे तर सर्व भारत मातापिता त्यांच्या कार्यावर धन्य झाली.
          संत गाडगेबाबांना संत तसेच कार्यवीर म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.कोणत्याही प्रकारच्या चमत्काराचा स्पर्ष न होता हे व्यक्तिमत्व येवढे थोर कसे ? अंगठेबहाद्दर डेबूजी बघता बघता अनेक स्वनामधन्य विद्वानांचा बाप कसा झाला ? आजुबाजुला पसरलेल्या हजारो निरक्षर , अडाणी , देवभोळ्या व अंधश्रद्ध लोकांच्या ज्ञानाचा दिप चेतविण्यासाठी गाडगेबाबांनी ग्रुहत्याग केला आणि तथागत बुद्ध गाडगेबाबांच्या रुपाने पुन्हा समाजात वावरले.
              संत गाडगेबाबांमध्ये तथागत बुद्धांची करूणा, तुकोबांची अहिंसा यांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. जेंव्हा तिकडे सावकरांनी डेबुजींच्या मामाची जमीन फ़सवणुकीने  गिळंक्रुत करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा डेबुजींनी त्याला विरोध केला.सावकाराला शेतातून पळवून लावले.सावकाराने डेबुजींच्या आजोबांना व मामेभावाला गाठले आणि धाकदपटशा दाखवून पुन्हा जमीन गिळंक्रुत केली.आपण दाताच्या कण्या करून, हाडाचे काडे करून सावकाराचे कर्ज फ़ेडले आणि तरीही इथल्या व्यवस्थेमुळे आपल्या बापजाद्यांच्या निरक्षरतेमुळे आपला आणी आपल्या कष्टाचा बळी गेला हे बाबांच्या मनाला फ़ार लागले.त्या दिवसापासून बाबा संसार पराड:मुख झाले आणि ग्रुहत्याग केला.
            " बाबा घरातून बाहेर पडल्यावर जेंव्हा वर्षभराने त्यांची आई, बायको व मुलाबाळांची भेट झाली त्यावेळी त्यांच्या आईने आता आम्ही कुणाच्या भरवश्यावर जगावे ?" असा प्रश्न केला.त्यावेळी बाबांनी दिलेले उत्तर मार्मिक आहे.ते म्हणतात "ज्याच्या घरचा माणुस मेला त्याचे काय होते त्याच्या वाचून अडते काय ? " असे समजा की डेबुजी मेला, मग जसे जगले असते तसे जगा.ग्रुहत्याग केलेला माणुस वेगळ्या अर्थाने घरच्यांसाठी मेलेलाच असतो.डेबुजीला स्वत:च्या अंगातला आळस  झडावा म्हणून कोणाच्याही शेतात काबाडकष्ट कर.कोणाच्या घरची लाकडे फ़ोडून दे, कधी स्वत:ला महार मांग म्हणवून घेवून विहिरीला स्पर्श, मालकाचा बेदम मार खा, जिभेचा लोभ झडला पाहिजे म्हणुन केवळ पुरणपोळीची मागणी करायची आणि काटेरी फ़ांदिने स्वत:ला झोडपून घ्यावे.ही सगळी क्रुत्ये वेडेपणाची लक्षणे होती काय ? नक्कीच नाही!
             आपल्या अस्तित्वाचे विश्व चैतन्याशी विलीनीकरण झाले पाहिजे म्हणून स्वत:च्या देहावर केलेला तो उपचार होता ! अंगावर सतरा ठिगळांचे कुडते.एका कानात कवडी तर दुसर्या कानात बांगडीचा तुकडा, डोक्यावर कापर हा सगळा वेश,म्हणजे गबाळेपणा काय ? सतरा ठिगळांचे कुडते सर्वधर्मसमभावाचे निदर्शक, कानातली कवडी माणसाचे जीवन कवडीमोल आहे हे दाखविणारे ,तर फ़ुटक्या बांगडीचा तुकडा जिवनाचे क्षणभंगुरत्व निर्देशित् करणारा, डोक्यावर खापर म्हणजे जीवनाच्या फ़ुटक्या मडक्याचा अन्वयार्थ स्पष्ट करणारे ! म्हणुनच आपण जीवनाचा साक्षात्कार झालेल्या डेबुजींना गाडगेबाबा म्हणतो.संसारात लिप्त असलेल्या ग्रुहस्थाला नाही.
                बाबांना अहंकाराचा वारा लागलाच नाही. त्यांच्या अहंकाराची राख झाली होती.ज्यांचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला.बाबा म्हणत "मी काही वेगळं करत नाही. मी करतो ती मानचाची सेवा होय. गरजवंतांकरीता झिजणं हा मानवता धर्म आहे.मी तो धर्म पाळतो आहे.हा देह सेवेत खर्च व्हावा एवढेच मला वाटते."जसं बाबांची सेवा आणि बाबा म्हणजे विलक्षण आश्चर्य होते.त्यांचा शब्द म्हणजे मोत्याचं पाणी.बाबा म्हणजे सन्मार्गाची वाट.त्यांची प्रत्येक क्रुती माणसाला वळणशील बनवी. त्यांची कार्यपद्धती आणि कार्य अचाट होते.
            समाजोपयोगी अनेक कार्याची बाबांनी उभारणी केली.सारा महाराष्ट्र त्यांच्या कार्याने उजळून निघाला. त्यांच्या कार्याची साक्ष म्हणजे त्यांनी बांधलेल्या टोलेजंग धर्मशाळा.शिक्षणावर त्यांचं नितांत प्रेम होतं.ते नेहमी डॉ.बाबासाहेबांचं उदाहरण देत.शिक्षणाशिवाय माणुस आंधळा होतो.परिस्थितीमुळं माणसाला शिक्षण मिळत नाही,अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात.गरिबांना शिक्षण कसं मिळेल याची बाबांना सदैव चिंता.त्याकरीता बाबांनी शाळा काढल्या, वसतीग्रुहे काढली, आश्रमशाळा सुरु केल्या, जागोजागी अन्नछत्रे उभी केली.उपाशी माणसं जेवायला लागली.आंधळे,पांगळे आशेने फ़ुलुन गेले.बाबा त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले.जिवाचं रान करून हे हिमालयाएवढे मोठे कार्य बाबांनी उभं केलं.
            कोहिनुर हिर्याला पहावं रत्नात, सिंहाला पहावं वनात, तसं बाबांना पहावं कीर्तनात. बाबा खराट्याने गावातील घान साफ़ करीत.बाबांनी आपल्या जीवनातील शेवटचे कीर्तन मुंबई पोलीस ठाण्यात करून नोकरदारांच्या डोक्यातील वेडगळ समजुती व अंध:श्रद्धारुपी घान साफ़ केली.गोपाला ॥ गोपाला ॥ देवकीनंदन गोपाला ॥.........गजरात मोटार नागरवाडीच्या मार्गावर असताना पेढीनदीचे पुलावर मोटार आली अन बाबांचे महापरीनिर्वाण झाले.तो दिवस होता २० डिसेंबर १९५६ त्यांच्या स्म्रुतीस मन:पुर्वक अभिवादन ! 

8 प्रतिक्रिया :

  1. NICE ARTICLE!!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  2. गाडगे महाराज : (२३ फेब्रुवारी १८७६ – २० डिंसेंबर १९५६).

    एक थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. त्यांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत झाला. वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे सखूबाई. आडनाव जाणोरकार. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे असा असल्यामुळे लोक त्यांना ‘ गोधडे महाराज ’ किंवा ‘ गाडगे महाराज ’ म्हणूनच ओळखत. १९१२ मध्ये त्यांचा कुंताबाईशी विवाह झाला; परंतु संसारात त्यांचे मन रमले नाही. पुढे काही वर्षांनी घर सोडून तीर्थयात्रा करीत ते फिरू लागले. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

    संत गाडगे महाराज
    लहानपणापासूनच त्यांना भजन-कीर्तनांची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारणेसाठी व लोकशिक्षणासाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर असले, तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या एकदम हृदयाला जाऊन भिडणारी होती. महाराष्ट्रात सर्वत्र तसेच गुजरात, कर्नाटक व आंध्र प्रदेशाच्या काही भागांत त्यांनी गावोगाव कीर्तने करून लोकजागृती केली. त्यांचा नैतिक उपदेश साधा व सर्वसामान्यांना उपयुक्त ठरावा असाच होता. ‘ चोरी करू नये, कर्ज काढून चैन करू नये, दारू पिऊ नये, देवापुढे पशूंचा बळी देऊ नये ’, अशा प्रकारचा उपदेश ते आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन करीत. पारंपरिक, पारमार्थिक विषयांसोबतच व्यावहारीक व नैतिक विषयांचाही त्यांनी आपल्या कीर्तनांतून लोकजागृतीसाठी चांगला उपयोग करून घेतला.

    स्वच्छता, प्रमाणिकपणा व भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. तीर्थयात्रेच्या ठिकाणी ते जात; परंतु देवदर्शन न घेता मंदिराच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील परिसर स्वतःच्या हातांनी स्वच्छ करी. खाण्यापिण्याच्या बाबतीतही त्यांचा कमालीचा साधेपणा होता. श्रीमंत भक्तांनी दिलेले चांगले अन्न ते भिकाऱ्यांना वाटून टाकीत आणि स्वतः गरिबाच्या घरची चटणी- भाकरी मागून आणून खात.

    लहानपणापासूनच ते जातिपंथभेदातीत होते. जातिभेद नष्ट करून एकजिनसी समाज निर्माण व्हावा, असे त्यांना मनापासून वाटे व त्या दृष्टीने यांचे आचरण आणि प्रयत्नही असत. पंढरपूर, नासिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी इ. ठिकाणी यात्रेकरूंचे अत्यंत हाल होत, म्हणून त्यांनी त्यांच्या सोयीसाठी प्रशस्त धर्मशाळा बांधल्या. विदर्भातील ऋणमोचन येथे त्यांनी लक्ष्मीनारायणाचे मंदिर उभारले व नदीवर घाटही बांधला. अनेक ठिकाणी त्यांनी गोरक्षण संस्थाही उभारल्या; तसेच अनाथांसाठी व अपंगांसाठी अनेक प्रकारे कार्य केले. समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्थांनाही त्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. अनेक ठिकाणी देवाधर्माच्या नावावर चालणारी पशुहत्या त्यांनी बंद केली. अध्यात्माच्या जंजाळात न शिरताही, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली. ‘संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही ’, असे ते म्हणत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची गादी अथवा मठ कोठेही निर्माण झाला नाही. समाजात शिक्षणप्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. लोकांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती; त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यात वेचला. त्यांनी उभारलेल्या सर्वच संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळेच पाहतात. गाडगे महाराजांविषयी बहुजनसमाजात कमालीचा आदरभाव आहे. त्यांनी महाराष्ट्रात केलेले लोकजागृतीचे व लोकसेवेचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. प्रवास करीत असता अमरावतीजवळ त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची समाधी अमरावती येथे आहे.

    संदर्भ : कवडे, पां. बा. श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र, पंढरपूर, १९३९.

    ReplyDelete
    Replies
    1. @ Liha vacha
      naad khulaa likhaana kelet dhanyawaad !
      happy diwali

      Delete
  3. ब्राह्मण संपवा देश घडावा

    ReplyDelete
    Replies
    1. पाटील साहेब - वेळोवेळी आपण म्हणत आलाय कि आपण ब्राह्मण लोकांविरुद्ध नाही. तर प्रवृत्ती विरुद्ध आहात. पण आपले संकेत कायम आणि कायम फक्त ब्राह्मण लोकांकडे निर्देश करतात . प्रवृत्ती जाती मध्ये असते कि मानवी असते ? आपल्या ब्लोग चे सहव्यवस्थापक संदीप पाटील ह्यांची १३नोव्हेंबर १२-०१-०० ची एक प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आणि आपल्या भूमिकेला छेद देणारी आहे. असा पण प्रश्न उभा राहू शकतो आपली त्या भूमिकेला मान्यता आहे. त्या एक वाक्याच्या भुमिके मध्ये संदीप पाटील म्हणतात - " ब्राह्मण संपवा देश घडावा". हि अर्थात नवीन नाही. त्यांनी अनेक वेळा असे लिहिले आहे.

      Delete
    2. brahaman tar fakta 2% aahet 98% tumachyasarakhe rashtradhohi aahet mag deshachi pragati hoil kashi ??

      Delete
    3. हो बरोबर आहे मी ब्राह्मण जातीविरुद्ध नाही मराठा द्वेषीं विरुद्ध आहे.
      मला जशास तसे उत्तर द्यायला आवडते म्हणुन मी कोनतीही ब्राह्मण द्वेषी प्रतिक्रिया काढून टाकत नाही कारण मराठा द्वेषी ब्लोग वर मराठ्यांचा अपमान होतो त्याला प्रत्युत्तर म्हणुनच...
      ही तर सुरुवात आहे मराठ्यांचा अपमान थांबला नाही किंबा मराठ्यांचा अपमान करणारे लेख पुसले जात नाहीत तोपर्यंत मराठा - ब्राह्मण युद्ध सुरु राहील
      आणि इतिहास पुरावा आहे की
      शिवराय - ब्राह्मण,,, संभाजी राजे - ब्राह्मण,, शाहू महाराज - ब्राह्मण,,, महात्मा फ़ुले - ब्राह्मण,,बाबासाहेब आंबेडकर - ब्राह्मण यांच्या लढाईत ब्राह्मणांचा नाही तर विजय हा सत्याचाच झाला आहे हे विसरता कामा नये.
      वरती हर्शल भंडारी यांना प्रतिक्रिया दिली आहे ती वाचा म्हणजे आणखी जास्त जाणुन घेता येईल माझ्याविषयी
      प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.

      Delete
    4. विजय कुडतर्कर : साहेब आपण रामदास यांचे भक्त दिसता.
      त्यांचीच शिकवण आहे ही की ब्राह्मणांनी केली ती संस्क्रुती आणी इतरांची विक्रुती मग ती कितीही मोठी संस्क्रुती

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.