7 October 2012

जातीच्या वर्गात सत्यानाशच..

         "जातीसाठी माती खावी " अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. दैनंदिन जीवण जगत असताना अनेकदा आपण या म्हणीनुसार वागतो, क्रुती करतो.यामुळे आपल्याला समाधान वाटत असते.
पण खरोखरच जातीविषयक असलेला हा गर्व, अभिमान दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या सोडवू शकतो काय ? याचे उत्तर नकारार्थी असेच आहे.आपल्याला प्रश्न पडणॆ स्वभाविक आहे की जातीविषयीचा अभिमान किंवा गर्व तसेच आपल्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या याचा काय संबंध आहे ? याचा अनिष्ट संबंध आहे.
        संपुर्ण भारतात तथागत बुद्ध, सम्राट अशोक यांच्या काळात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती, तर तथागत बुद्धांनी इथल्या वर्णवर्चस्वादा विरुद्ध संपुर्ण लोकांना जाग्रुत  करून सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्क्रुतीक आदि क्षेत्रात क्रांती केली. याचा अर्थ तत्कालीन वर्ण व्यवस्थेला छेद दिला ही वर्ण व्यवस्था या देशात पसरली होती त्यामध्ये यज्ञयाग,कर्मकांड, पाप-पुण्य, पुनर्जन्म, ब्राह्मणवर्चस्व आदि विषमतावादी गोष्टी होत्या, वर्ण व्यवस्था ही उतरंडीसारखी उभी होती.सर्वात खाली शुद्र, त्यांच्यावर वैश्य, त्यांच्यावर क्षत्रिय़ व सर्वात वरती ब्राह्मण.
            आधुनिक वर्तमान परिस्थिती : वर्तमानात आज आपण आपले महापुरुष व संत यांना जाती-जातीत बंदिस्त करून ठेवलेले आहे.ज्या महापुरुष व संतांनी वर्ण व्यवस्था,जाती व्यवस्था, अस्प्रुश्यता,विषमता, स्त्रीदास्य इ. विषयांवर लोकांचे प्रबोधन केले . त्या सर्वांना इथल्या व्यवस्थेने जाती-जातीत विभाजन करून ठेवलेलं आहे.माझा प्रश्न आहे की, काय महापुरुष व संतांनी केवळ स्वत:च्या जातीपुरतेच प्रबोधन केले ? काय ते स्वत:च्या जातीच्या प्रगतीसाठी आयुष्यभर झटले ? काय त्यांना स्वत:च्याच जातीचा गर्व होता ? या प्रश्नांचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.यावर चिंतन,मनन होऊन योग्य निष्कर्ष काढला पाहिजे. निष्कर्षावरच योग्य दिशा मिळुन एकत्रितपणे संघटित होण्यासाठी प्रयत्न करता येईल,अहो जात हा बंदिस्त वर्ग आहे.या बंदिस्त वर्गानेच सर्वांना दार उघडे करून देण्यासाठी महापुरुष व संतांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले.सर्वसाधारणपणे आपण दैनंदिन व्यवहारात आमचा समाज, तुमचा समाज असा शब्द प्रयोग करतो.वास्तवीक हा समाज हा भारतीय समाज समजला पाहिजे.
           समस्येचे समाधान करण्यासाठी काय करावे लागेल ? विद्यमान प्रचलित असलेल्या जाती व्यवस्थेची पाळेमुळे जी अतिशय खोलवर रुजली आहेत.यासाठी सर्व प्रथम आपण स्वत:ची ओळख करून घेणे गरजेचे आहे.ओळख ही जातीची नाही तर रक्ताची आहे.केवळ स्वत:च्या जातीचा जर आपण विचार केला तर जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती अधिकच घट्ट होईल.म्हणून जातीचे हे मढे स्वत:च्या मन व मस्तिष्कामधुन काढून टाकावे लागेल.यामुळे जातीव्यवस्था.खिळखिळ होऊन आपल्या समोरील अनेक समस्यांना एकत्रीतपणे येवून लढा देण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल.सर्वांच्या समस्या या सारख्याच आहेत.समस्या सारख्याच असतील तर केवळ समस्येवर चर्चा करून रडून दुसर्याला दोष देऊन, त्यावर उपाय काढणे शक्यच नाही.कारण सिद्धांत म्हणतो.की जो समस्या निर्मान करतो तो समस्येचे कधीही समाधान करणार नाही.समस्या जर आपल्याच असतील तर उपाय सुद्धा आपल्यालाच संघटीत होऊन काढावा लागेल.समस्येपासून दुर जाऊन  चालणार नाही तर समस्येला तोंड दिल्यानेच समस्या सुटू शकतात.
           बंधुंनॊ जातीचा गर्व व अभिमान यांचा त्याग केल्यामुळेच आपण भविष्यात एकत्र येवून समता, स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मानवी मुलभुत तत्वावर आधारीत सम्रुद्ध भारत घडवू शकतो,अशी मला केवळ आशाच नाही तर आत्मविश्वास सुद्धा आहे.

22 September 2012

शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील

            महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका शेतकरी घराण्यात २२सप्टेंबर१८८७ मध्ये भाऊरावांचा जन्म झाला. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची छाप त्यांच्या जीवनावर पडलेली दिसून येते. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी सत्यशोधक चळवळीत प्रचारक म्हणून काम केले. हे काम करत असतानाच ''बहुजन समाज सुधारायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरूणोपाय नाही'' हे त्यांना कळून चुकले होते. आणि म्ह्णूनच सन १९२४ मध्ये त्यांनी "शाहू बोर्डिंग हाऊस" ची स्थापना केली. गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा त्यांचा उद्देश होता. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य ही त्यांच्या जीवनाची चतु:सूत्री होती. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले.. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.
            महाराष्ट्रातील लहान लहान गावात त्यांनी आनेक शाळा काढल्या. सन १९३५ मध्ये त्यांनी "महात्मा फुले ट्रेनिंग कॉलेज" सुरू केले. सन १९४० मध्ये "महाराजा सयाजीराव हायस्कूल" व सन १९४७ मध्ये "छत्रपती शिवाजी रेसिडेन्सियल कॉलेज" त्यांनी सुरू केले. महात्मा गांधींच्या खुनानंतर आपल्या संस्थांमार्फत १०० हायस्कूले उघडण्याची केलेली प्रतिज्ञा त्यांनी केवळ १० वर्षात पूर्ण केली.भाऊरावांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन पोहोचवली. वसतिगृहयुक्त शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता. श्रममहात्म्य, राष्ट्रीयबंधुत्व, आणि एकतेचा प्रचार त्यांनी केला. व त्याप्रमाणे ते स्वतः  वागले. स्वाभिमान व स्वत्व यांची जोपासना, अन्यायाबद्दल चीड, न्यायाची चाड, आपल्या भूमातेशी इमान, गोरगरीब समाजाविषयी करूणा व आपुलकी, सामाजिक बांधिलकीची जाण या सर्व गुणांचा संगम  भाऊरावांमध्ये होता. 
             भाऊरावांना पुणे विद्यापीठाची 'डि. लिट.' ही पदवी व शासनाचा 'पद्मभूषण 'हा किताब  मिळाला होता. ९ मे १९५९ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. खरच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या कोल्हापुरच्या जन्मभुमीत आम्ही जन्मले याचा आम्हाला आज खुप अभिमान वाटतॊ.त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !

21 September 2012

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गटार

               कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील वर्णवर्चस्ववादी आणि जेम्स लेन यांनी कट कारस्थान करून लिहिलेल्या "दि हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" या पुस्तकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल असलेल्या भारतीय न्यायपालिकेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका आणित मुक्त केले आहे.वास्तविक पाहता संविधानाच्या (१९/२) या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलमाचा न्यायालयाने सर्वांगिण विचारच केला नाही.मुख्य म्हणजे या न्यायालयाने या कलमांच्या आधारे न्यायच दिला नाही.खरे तर न्यायालयाने न्याय दिला तो या वर्चस्ववादी नीच अभिव्यक्तीला. आमचे स्फ़ुर्तीस्थान प्राणप्रिय राजे शिवराय आणि माता जिजाऊ यांच्या बदनामी पेक्षा न्यायालयाला अभिव्यक्ती जास्त महत्वाची वाटली.या गोष्टीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले ते म्हणजे या देशात न्याय नाही आणि तो कधीही नव्हता....
          या सर्व प्रकाराने जेम्स लेनचा खरा मेंदू बाबा पुरंदरे व त्यांचे साथीदार यांना गुद गुल्या होत नसतील  तर नवलच.एकतर स्वत:ला शिवशाहीर व शिवप्रेमी म्हणविणार्या या पुरंदरेने आपल्या हयातीत सारे शिवचरित्रच विक्रुत करून त्यांच्या जातभाईंना सोईस्कर असे शिवचरित्र अडाणी व भोळ्या समाज मनावर बिंबविण्याचे काम केले आहे.शिवरायांच्या नावावर कोट्यावदी रुपयांचा मलिदा लाटून जेम्स लेनच्या माध्यमातून शेवटी हा शिवद्रोही शाहीर जेवेलेल्या ताटातच थुकला आहे. 
          या भारतात सर्व प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था व राजकीय व्यवस्था आपल्या मेंदुच्या इशार्यावर नाचणार्या या ब्राह्मणी निधाडांची बहुजनां प्रति असलेली  व्रुत्ती तसूभरही बदललेली नाही हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
राजकीय पोळी भाजणारे यांचेच हात
           जेम्स लेन प्रकरणातून महाराष्ट्रातील तमाम परिवर्तनवादी विचार संघटनांनी केलेल्या संघर्षामुळेच महाराष्ट्रात एक जाग्रुतीची लाट निर्माण झाली आहे.या नीच अभिव्यक्ती संपन्न विद्वानांच्या पेकाटात लाथा घालण्याची कामना जनसमुदायातून उद्रेकाच्या रुपात बाहेर येत येवू लागले आहे.हा विषय राजकारणाच्या पलीकडे तमाम बहुजनांच्या अस्मितेचा असला तरी या शिवद्रोह्यांचेच राजकीय हात आपली पोळी शेकून घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.शिवसेना, मनसे यासारखे पक्ष शिवरायांच्या प्रेमाचा फ़ुसका पुळका आणत जेम्स लेन ला नाईलाजाने निषेद करत आहेत.पण या शिवद्रोही लोकांना रस्त्यावर खेचा असे म्हणताना यांच्या थोबाडातील जीभ मात्र खुपच अडखळते आहे.
         मध्यंतरीच्या काळात मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या दणक्याने भांबावलेल्या बाबा पुरंदरेची बाजू घेताना राज ठाकरे पुरंदरेंच्या केसाला धक्का लावणार्याचे हात छाटू अशी भाषा करीत होता जसे काय ? बापानेच याच्यासाठी ठेव म्हणुन महाराष्ट्राला परिवर्तनवादी मराठयांना आणि संभाजी ब्रिगेड ला खुले आम दम देत होता.आमच्या शिवरायांवरती व आमच्या आई जिजाऊ यांच्या इज्जतीला धुळीस मिळविणार्या या पुरंदरे विषयी याला प्रेमाच्या उकळ्या फ़ुटतात, त्याच्या संरक्षणाची काळजी वाटते. वारे ! शिवप्रेमी !
ह्यांच्या कुर्हाडीला आमचेच दांडे
                 शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या इज्जतीला हात घालणार्यांना हे तळ जाताच्या फ़ोडा सारखे जपतात.वर वर मात्र शिवरायांचे नाव घ्यायचे.आतून बदनामीला साथ द्यायची आणि शिवप्रेमाचा पुळका आणित आपली राजकीय दुकानदारी वाढवायची पैसा लाटायचा आणि वेळ आली की, आमच्यावरच कुर्हाडी चालवायच्या.वाईट एवढेच की या कुर्हाडीला आमचेच दांडे असतात.झेंडे तुमचे काठ्या व काठ्या पकडणारे हात आमचेच.शिवरायांचे पोस्टर लावून शिवप्रेमाची हाक दिली की ,आमचे मराठे बांधव निघालेच आपल्याच पैशाने काठ्या घेऊन राडा करायला.यांनी राडे करून आपल्या माड्या भरायच्या या जमलेल्या पैश्याच्या ताकतीवर उन्मादावर आमच्याच बाप जाद्यांच्या आया बहिनींच्या इज्जतीचे धिंडवडे काढणार्या बाबा पुरंदरे , बहुलकर, बेडेकर यांच्या संरक्षणाची भाषा करायचीच नव्हे तर ते त्यांना पुरवायचे ही.शिवरायांच्या महाराष्ट्रातून शिवरायांच्या नावावर पैसा गोळा करायचा आणि शिवरायांची बदनामी करणार्या डुकरांना तुप पोळ्या खाऊ घालून माजवायचे.कुणाला काय का वाटेना पण गेल्या घंट्या मारी.बाबा पुरंदरे याला ठाकरे परिवाराने असेच माजवून ठेवले आणि आमच्या सांस्क्रुतीक इतिहासाच्या बोकांडी बसवले.आमच्या आदर्श शिवचरित्राला हा बाबा पुरंदरे इतका उतला आहे की त्याचे कुठल्या शब्दात वर्णन करू हे मलाच समजत नाही. सर्वोत्तम घाण उपमा सुद्धा याला कमी पडते इतका नीच माणुस आहे.स्वत:ला खुले आम शिवशाहिर म्हणवुन घेतो.अरे शिवरायांचा आमच्या डोळ्यादेखत बाप बदलणारा हा विषारी साप हार,तुरे स्विकारतो.आमचेच काही मेंदू हीन राजकारणी याचे पाय धरत असतात.ह्या सारखी या महाराष्ट्रची शरमेची आणि अक्कल गहान ठेवलेली दुसरी गोष्ट नसावी.पुण्यातील (खोट्या शिवमहालात) खरा शिवमहाल शनिवार वाड्याच्या जागी होता.या ठिकाणी माता जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत नोकर दादू कोंडदेव चा पुतळा उभा करण्यामागे बाबा पुरंदरे ह्या पेशवाई किड्याचीच पुण्याई होती.खरे तर ही न्यायालयाच्या भाषेत पुरंदरेची अभिव्यक्ती आहे.बाबा पुरंदरे,निनाद बेडेकर व तमाम ब्राह्मणांनी मिळुन दादु कोंडदेव, शिवराय व जिजामाता यांचे एकत्रीत नीच ब्राह्मणी अभिव्यक्ती संपन्न शिल्प उभारले आहे.पुणे महानगरपालिका सुद्धा यांच्या पापात बेअकलीमुळे सामील झाली.
 बाबा पुरंदरे ला ही अभिव्यक्ती का सुचत नाही !
                  बाबा पुरंदरेसह , निनाद बेडेकर सारख्या ब्रह्मव्रुंदांना माझा प्रश्न आहे.तुम्हाला एखाद्या गुरुजीने शाळेत शिकवले असेलच ना ! मग तुमचा एखादा आवडता गुरुजी उदा.बाबा पुरंदरे, त्याची आई आणि तिचा नवरा दिसेल असा तो गुरुजी अशी याची एकत्रित फ़्रेम करून का लावत नाही ? अशी फ़्रेम मी स्वखर्चाने बाबा पुरंदरे व बेडेकर यांना घरात लावण्यासाठी  व जेम्स लेन ला दिसण्यासाठी देण्यास तयार आहे.इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलण्याची ही वेळ आमच्या सारख्या शिवभक्तांवर यावी याचा आम्हाला मानसिक त्रास होतोय.पण नालायकांनो तुम्हाला त्याचा काही फ़रक पडत नाही हे नक्की ! याच बदमाशगिरिचा बादशहा असलेल्या बाबा पुरंदरेला संरक्षणाची हमी व संरक्षण देनार्या राज ठाकरेसह इतर ठाकरे कुटुंबीयांच्या शिवप्रेमाची तपासनीही आता महाराष्ट्राने करायला हवी.
आमची अभिव्यक्ती इंद्रायणीत फ़ेकता ? 
               जगाचे कल्याण आणि मानवतेच्या करूणेचा उद्गार ! तसेच जगातील सर्वोच्च तत्वज्ञानाचा अंतर्भाव असलेली आमच्या तुकोबांची गाथा इंद्रायणीत फ़ेकता.त्यांना कोर्टात खेचता.त्यांच्या वर खोटा धर्म द्रोहाचा आरोप लावून त्यांना ना ना प्रकारे छळता.राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी, माता सावित्रीबाईंनी आम्हासाठी शिक्षण हे अभिव्यक्तिचे महाद्वार आमच्यासाठी खुले करू नये म्हणुन त्यांना मारेकरी घातला त्यांच्या अंगावर शेण टाकता ? शिवरायांचे चरित्र समजू नये म्हणुन कागदपत्रे जाळून टाकता ? शिवरायांची पहिली शिवजयंती साजरी करणार्या महात्मा फ़ुलेंचे संदर्भ दडवून ठेवता ? डॉ.बाबासाहेबांचे सहित्य प्रकाशित होऊ नये म्हणुन जिवाचा आटा पिटा करता.आम्ही बोललो तर जिभा छाटणारी,लिहिले तर हात तोडणारी, वाचले तर डोळे काढणारी , ऐकले तर कानात शिसे ओतणारी तुमची औलाद.जेम्स लेन व त्या १४ शिवद्रोह्यांच्या अभिव्यक्तीचा न्याय करीत आहेत.बामणांच्या चारित्राच्या इतिहासात अभिव्यक्ती गटारं तुडुंब भरली आहेत त्याची दुर्गंधी इतकी सुटली आहे की त्याची सीमा नाही.त्यांच्या या गटारघाणीयुक्त अभिव्यक्तीची घाण संस्क्रुतीच्या व धर्माच्या नावाने आता आपण किती दिवस घरात पुजायची हे सार्या मराठ्यांनी एकदाचे ठरविण्याची निर्णायक वेळ आली आहे.नाहीतर या घाणेरड्या अभिव्यक्तीची घाण घेऊन वाहणारी ह्या भटीविचाराची गटारं शिवचरित्रातच नव्हे तर आमच्या रोजच्या निर्मळ जिवनात सुद्धा वाहतच राहतील आणि परत अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ही वर्णवर्चस्ववादी डुकरं त्यात खेळायला  मोकळी आहेतच.

16 September 2012

जेम्स लेन ब्राह्मणी षडयंत्र,राजकीय पक्ष आणि शिवप्रेमींची जबाबदारी

           कुविचारी टाळक्याचे भांडार असलेल्या भांडारकर संस्थेमधील ब्रह्मव्रुदांनी जेम्स लेन द्वारे छत्रपती शिवाजीराजे आणि राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांची बदनामी करून खर्या शिवप्रेमींच्या अंत:करणावर मोठा घाव घातला आहे. त्यामुळेच पुण्यातील शिवसैनिकांनी डिसेंबर २००३ ला जेम्स लेनचा सहलेखक श्रीकांत बहुलकर याला काळे फ़ासले तेंव्हा तत्कालीन शिवसेना नेते आणि आजचे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रीकांत बहुलकरांची माफ़ी मागितली आणि शिवरायांची बदनामी  करणार्यांना संरक्षण दिले.आनंद देशपांडे याने शिवसेनेचे मुखपत्र दै.सामना मध्ये ७ सप्टेंबर २००३ रोजी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक करणारे परिक्षण लिहिले.ब.मो.पुरंदरे याने सोलापुरच्या जनता बॅंक व्यख्यानमालेत लेनचे दि.१सप्टेंबर २०३३ रोजी कौतूक केले.शिवरायांच्या बदनामी कटाचे केंद्र भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ कारवाई केली, तेंव्हा मीडियाने संभाजी ब्रिगेड वर आगपाखड  केली.तेंव्हा दै.देशोन्नती, दै.पुण्यनगरी, दै.पुढारी, दै.सम्राट यासारख्या वर्तमानपत्रांनी खरी बाजू जनतेसमोर ठेवली.ग्रुहमंत्री आर.आर.पाटलांनी त्याच दिवशी भांडारकर संस्थेला भेट देऊन हल्ला करणार्यांचा निषेद केला.पण शिवरायांची बदनामी करणारी भांडारकरी व्रुती ना. पाटील यांना समजताच त्यांनी आपली भुमिका बदलली आणि दि.१४ जानेवारी २००४ रोजी पुस्तकावर बंदी घातली , तेंव्हा दि.१६ जानेवारी तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी पुस्तकावर बंदी घालणे चुकिचे आहे असे मुंबई येथील जाहीत कार्यक्रमात सांगितले आणि त्याच वेळी बाळ ठाकरे उपस्थित होते, ते शांतच बसले. २२ जानेवारी रोजी दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पंढरपुर येथे अटलबिहारी वाजपेयींना काळे झेंडॆ दाखवून त्यांचा निषेद केला.तत्कालीन केंद्रीय ग्रुहमंत्री लालक्रुष्ण अडवानी यांनी सोलापुर येथे दि.१६ मार्च रोजी लेनच्या पुस्तकावर बंदी घालण्यास विरोध केला. तेंव्हा १७ मार्च रोजी उमरगा येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवानीचा रथ अडविला व निषेद केला.तर संभाजी ब्रिगेडने २० मार्च रोजी बीड येथे वाजपेयीची जाहीर सभा उधळली. 
            जेम्स लेन ला बेड्या ठोकुन फ़रफ़टत भारतात आणतो असे ओरडणार्या ना.आर.आर.पाटील यांनी लेनच्या पुण्यातील सुत्रधारांना साधी अटक देखील केली नाही.याउलट चौदा ब्राह्मणांना आणि पुरंदरे,बेडेकरांना ना.आर.आर.पाटील यांनी संरक्षण दिले.तर संभाजी ब्रिगेड च्या ७२ कार्यकर्त्यांवर कारवाई केली.सन २००४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकात ना.आर.आर.पाटील यांनी शिवरायांच्या बदनामीचे भांडवल करून सत्ता काबीज केली.पण न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जी  शिस्त राखायला पाहिजे होती ती राखली नाही .फ़ुले-शाहू-आंबेडरांचे नाव घेणार्या महाराष्ट्र शासनाने वकील आशुतोष कुंभकोणी या वकिलाला सरकारची बाजू मांडण्यासाठी नेमले आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टात पुस्तकावरील बंदी उठविली.रयतेला न्याय देणार्या शिवरायांना त्यांच्या महाराष्ट्रातच न्याय मिळाला नाही.याला कॉंग्रेस - राष्ट्रवादीच्या सरकारचा नालायकपणा जबाबदार आहे.महाराष्ट्रातील जनतेने कॉंग्रेस - राष्ट्रवादीला लायक म्हणुन निवडले नाही तर भाजप - शिवसेनेपेक्षा कमी नालायक म्हणुन निवडले पण हे तर त्यांच्या पेक्षा नालायक निघाले.
         महाराष्ट्र सरकार सुप्रिम कोर्टात गेले.वकील रविंद्र अडसुरे यांचेकडे सदर केस होती .पण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात्यातील जो सुप्रिम कोर्टात प्रॅक्टीस करण्यासाठीची परिक्षा अनुतिर्ण झाला आहे. अशा वकील संदीप खरडे या वकीलाला कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारने नेमले आणि खरडे यांच्या आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी सरकारच्या नालायकपणामुळे पुस्तकावरील बंदी उठली.एरवी सर्वच पक्षाच्या नेत्यांचे वैयक्तिक प्रकरण असेल तर त्या केस मध्ये लक्ष घालणार्या नेत्यांनी शिवाजीराजांच्या प्रकरणी गांभिर्याने लक्ष घातले नाही.त्यामुळे न्यायाधिशांनी पुस्तकावरील बंदी ९ जुलै २०१० रोजी उठवली खरे तर हा निकाल संविधानाला धरून दिला नाही, अभिव्यक्ती विचाराला आहे.घटनेतील कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नैतिकता, सुसंस्क्रुतपणा, जबाबदार पणा, सामाजिक स्वास्थ , राखणारे लेखन असावे असे निर्बंध घातलेले आहेत.लेनचे पुस्तक हे ब्राह्मणांच्या डोक्यातील विक्रुती आहे.न्यायाधिशांनी संविधानाचा अपमान केला आहे.सारांश महाराष्ट्रातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना - भाजप, मनसे हे सर्वच राजकीय पक्ष केवळ शिवरायांचे नावच घेतात पण व्रुत्ती तशी नाही.त्यामुळे यांच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा करणं म्हणजे हिजड्याकडून पुत्रप्राप्तीची अपेक्षा केल्यासारखे आहे.ना.आर.आर. पाटलांनी तर शिवरायांशी गद्दारी केली आहे.शिवप्रेमी त्यांना कदापी माफ़ करणार नाहीत.ना. पाटील म्हणजे शरद पवारांचा सोंगाड्या आहेत.
             शिवप्रेमींनो काळ कठीण आहे.खचून जाऊ नका, निराश होऊ नका, शिवाजी महाराजांशी गद्दारी करणार्याचा आतापर्यंत सत्यानाश झाला आहे आणि होईल.पुस्तकाचे व शिवरायांचे अपमानाचे समर्थन करणारे जेम्स लेनचे औलाद आहेत.शिवरायांसाठी सर्वस्व पणाला लावा.शिवाजी महाराज आमच्यासाठी आग्राच्या तुरुंगात ५ महिने राहिले आणि स्वराज्यासाठी रक्त सांडले त्यांचे उपकार तर फ़ेडायला तर सात जन्म पण अपुरे आहेत. मग तुम्ही काय करणार शिवरायांसाठी ? जेम्स लेन आला आणि बदनामी करून गेला असे सहजासहजी घडलेले नाही.पुरंदरे - बेडेकर या जेम्स च्या औलादिंनी कथा, कादंबर्या, नाटके, पाठ्यपुस्तके , शिल्प याद्वारे दादू कोंडदेव , रामदास यांना शिवराय व जिजाऊ यांच्या सोबत दाखवुन त्याला समांतर  जोक तयार केला व तो जोक लेनद्वारे  ब्राह्मणांनि लिहुन आणला.दादू कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु नव्हते हे ऐतिहासिक रित्या सिद्ध झालेले आहे.तेंव्हा शिवप्रेमींनो खर्या शिवचरित्राचा अभ्यास करा आणि विक्रुत आणि भटी महाभागांचे तोंड कायमचे बंद करा हेच शिवरायांना अभिवादन !

14 September 2012

जेम्स लेन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य

         "दि शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया" या जेम्स लेन लिखित वादग्रस्त पुस्तकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. भारताच्या सर्वाच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवून जेम्स च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण केली.
          हे पाहुन भारतातील तमाम सनातनी ब्रह्मव्रुंदांना आनंदाच्या उकळ्या फ़ुटल्या  नसतील तरच नवल वस्तुत: ही जेम्स लेन च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पाठराखण आहे.ही अन्यायी न्याय व्यवस्था अजुनही आमच्याच ताब्यात आहे हे ब्राह्मणांनी दाखवून दिले. जेम्स लेन  खरे तर नावाला आहे या जेम्स लेनच्या माध्यमातून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांवर तसेच जिजाऊंवर घावा घातला होता.
         तसे पाहिले शिवरायांचे कर्त्रुत्व व जाती अंताचा त्यांनी लढा हा पहिल्या पासूनच ब्राह्मणांच्या पोटात डचडचत होता.शिवरायांच्या लोकउद्धारक संकल्पना आणि विचार आज ना उद्या आमच्या जात भाईंच्या गोरख धंद्यासाठी मारक ठरणार आहेत हे ब्राह्मणांनी चांगले ओळखले होते.हि चाणाक्ष जात शिवरायांच्या हयातीतच जागी झाली होती.शिवरायांचे गुरु जगदगुरु संत तुकोबाराय आणि शिवराय हे ब्राह्मणांना त्यांच्या रस्त्यात काट्यासारखे सलत होते.म्हणुनच त्यांनी शिवरायांना त्रास दिला आणि संत तुकारामांना वैकुंठाला (?)पाठविले.पण या अज्ञानी व भोळ्या माणसांच्या या गोष्टी लक्षात येत नाही.जेम्स लेन ही एक अशीच यांची चाल होती.
        तसे पाहिले तर शिवशाही मातीत घालून पेशवाई निर्माण करणार्यांना  शिवशाहीचे काही देणे घेणे नाही ,शिवरायांचा आणि जिजाऊंचा अपमान झाला तरी चालेल पण आमची अभिव्यक्ती जपली पाहिजे . न्यायपालिका सुद्धा आमचे काही वाकडे करू शकत नाही हे यातून या सर्व मंडळींना दाखवून द्यायचे आहे.
 राष्ट्रपुरुष यांची बदनामी मनुवाद्यांचे हुकमी अस्त्र
            अजुन एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे परिवर्तनवादी राष्ट्रपुरुष नव्हे तर परिवर्तनवादी छोटे छोटे कार्यकर्ते यांची बदनामी करणे हे ब्राह्मणी हुकमी अस्त्र आहे आणि शस्त्र आहे.राष्ट्रपुरुषांची बदनामी करून समाजात गोंधळ आणि अनादराची स्थिती निर्माण करावयाची वस्तत: स्वत: अतिशय चारित्र्यहिन, नालायक आणि बदमाश असलेले हे आमच्या राष्ट्रपुरुषांची बदनामी करून पतीव्रतेचा आव आणत असतात.बुद्ध, शाहू,फ़ुले, तुकोबाराय सुद्धा यांच्या तावडीतून सुटले नाहीत.मध्यंतरी शाहूराजांविषयी ही जमात असेच घाणेरडे विनोद समाजात पसरवत होती, हाच प्रयत्न जेम्स लेनच्या माध्यमातून यांनी शिवरायांसाठी केला.
          खरे तर करून सवरून नामानिराळे राहण्याची यांची कला कोणालाही जमणार नाही  जेम्स लेन च्या माध्यमातून मात्र या ब्राह्मणांची नालायकी अक्षरबद्ध झाली आहे .तरीही वाईट याचे वाटते की आजही आपला समाज यांना शिवशाहीर, इतिहास संशोधक म्हणून पुजत असतो.भांडारकरवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केल्यावर त्या संस्थेचे नुकसान होण्याऐवजी फ़ायदाच झाला.जिजाऊंचा अपमान केल्याबद्दल त्यांचे चरित्र्य हनन केल्याबद्दल कोट्यावधी रुपये त्या संस्थेला मिळाले.ज्या जिजाऊंच्या निर्भय त्यागातून हे पुणे शहर उभे राहिले तिथेच जिजाऊंची बदनामी करणारी भांडारकर संस्था आमच्या छाताडावर पाय रोवून उभी आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य
          खरे तर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो  वर्षे ज्यांना याच ब्राह्मणांनी बोलु दिले नाही, लिहु दिले नाही , त्या व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून अत्यंत उच्चप्रतिच्या प्रतिभेवर बहुजनांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे व त्या अधिकारांचे निर्मान बाबासाहेबांनी  बहुजनांसाठी केले.नाहीतर अभिव्यक्ती ही ब्राह्मणांचीच मिजासदारी होती.आता हे हुशार आणि चाणाक्ष ब्राह्मण याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा डंगोरा पिटत आमच्या अस्मितेला व गौरवशाली इतिहासाला दडपू पाहत आहेत.
         सर्वाच्च न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक चौकटीत राहून निर्णय दिला असला तरी बहुजन समाजाच्या सर्वांगिण द्रुष्टीकोणाचा विचार केलेला दिसत नाही. याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फ़ायदा  घेत स्वत:ला तुकोबांचा वारकरी म्हणवून घेणार्या दिलीप पुरुषोत्तम चित्रे नावाच्या नालायक ब्राह्मणाची तुकोबांना "भ्योंचोद" म्हणण्यापर्यंत मजल गेली होती.दिलीप पुरुषोत्तम चित्रे आपल्या आत्मकथनात म्हणतो "तुकाराम वाण्या भ्योंचोद तु मला मराठीच्या दलदलीत खेचलेस".संदर्भासाठी (आ.ह.साळुंखे, वाद आणि वादांची वादळे).
              असले अभिव्यक्ती स्वतंत्र्य काय चाटायचे आहे आज रोजी जेम्स लेनच्या खांद्यावर बंदुन ठेवून ब्राह्मण आपला निशाणा साधत आहे.या जेम्स लेन प्रकरणातून ब्राह्मणांना एकाच दगडात १०-१२पक्षी आहेत.मुख्य म्हणजे त्यांना मराठ्यांच्या मनगटातील आणि मेंदूतील ताकद मोजायची आहे त्या करीता सर्व मराठा बांधवांनी अतिशय सावध पवित्रा घ्यायला हवा.एकुण सर्व परिवर्तनवादी विचार संघटनांनी मिळुन एक वैचारीक धोबी पछाड यांना देण्याची गरज आहे आणि शेवटी लाथोंके भुत बातोंसे नही मानते हे सार्या समाजाने समजुन घेतले पाहिजे.
          आजवर संस्क्रुतीच्या, धर्माच्या नावाने उडणारे हे कावळे अभिव्यक्तीच्या जिवावर माजणार असतील तर काय चुलीत घालायची आहे ही अभिव्यक्ती ? 

हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ

              मराठी साहित्य प्रकाशना दिवशीच रेकॉर्डब्रेक करणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" हि प्रदिर्घ प्रतिक्षा असणारी कादंबरी प्रकाशीत झाली तेंव्हा साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली. कादंबरीवरती अनेक अंगाने चर्चा सुरु झाली.कादंबरीवरती अनेक अंगाने लिहिता येईल, नेमाडेंचा देशी वाद, ब्राह्मणी जोखडातून नेमाडेंनी अस्सल कष्टकर्यांची सुटका केलेली आहे."हिंदू" मध्ये कारुण्य आहे,रंजकता आहे, ग्रामीण जीवणाचे यथार्थ दर्शन आहे, विनोद आहे.गावगाड्यातील समाजजीवनाचे जिवंत असे चित्रण  केले आहे.पारावरच्या, पाराखालच्या, शेतातील. आडोशाचे,खाजगीतील बोली भाषा आहे त्यामुळे कदंबरी अधिकच अक्रुतीम झाली आहे.हिंदू वरती अनेक अंगाने लिहिता येईल भाषाशास्त्राचे, मराठी भाषेचे तज्ञ ते काम करतीलच पण इथे नेमाडेंनी ब्राह्मणी छावणीला दिलेला धक्का याबाबत विवेचन करणार आहे.वैदिक उर्फ़ ब्राह्मणी परंपरेने भारतात विषमता , अंधश्रद्धा, स्त्रीबंधन लादली याविरुद्ध अनेक महापुरुषांनी काम केले, महिलांवर तर ब्राह्मणी परंपरेने अनेक अमानुष नियम लादले.
            ब्राह्मणांची कटकारस्थानं उघड करताना नेमाडे लिहितात "साले हे ब्राह्मण लोकच  गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून  ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला.पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्या धरायला शहराइत, शहरी होत चालले ब्राह्मण ..(प्रुष्ठ क्र.१५७)" जातीभेदाची निर्मिती ब्राह्मणांनीच केली असे नेमाडे सांगतात.तसेच वारकरी पंथ हा जातिभेद मोडणारा होता.पण अलीकडे वारकरी पंथातच जातीभेद पाळला जातो.जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारी प्रव्रुत्ती ब्राह्मणांचीच, वारकरी पंथ हा अंधश्र्द्धा विरोधी आहे पण अलीकडे वारकरी पंथातील लोक अंधश्रद्धाळू,देवभाळे,विषमतावादी झाले आहेत, कारण ब्राह्मण त्यामध्ये घुसले आणि वारकरी पंथ नासवला. वारकरी पंथ हा ब्राह्मण विरोधी पण ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथाद्वारे लादला आणि हे काम ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केले.छत्रपती शिवरायांनी निर्मान केलेले रयतेचे स्वराज्य ब्राह्मणांनी बुडविले मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्या ब्राह्मणांनीच इंग्रजी शिकून शहरे गाठली , हेही नेमाडे यांनी निसंदिग्धपणे लिहिले आहे.भारतातील बौद्ध धर्म का संपला आणि ब्राह्मणांचा हिंदू धर्म खेड्यापाड्यात का गेला ते सांगताना नेमाडे लिहितात "खेडोपाडी कानाकोपर्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिवल्यानं हिंदूधर्म  खेडोपाडी रुजला.बौद्धधर्म शहरीच होता , शहरीच राहिला त्यामुळे संपला" (प्रुष्ठ क्र. १५८,५८७)
          शेतकर्यांची मुलं शिकून डॉक्टर,वकील,इंजिनीअर, प्राध्यापक , कलेक्टर झाली पण परोपकार, प्रेम, समता,विज्ञानवाद विसरत चालली.या बाबत नेमाडे लिहितात "वारकरी हिंदू  धर्माचा नैतिक पाया किती भुसभुशीत झाला आहे.याचा पुरावा म्हणजे ही तळागाळातील गरीब शेतकर्यांची मुलं.शिकून वर गेली आणि शेतकर्यांचा फ़ाळ गोतास काळ बी निसूक निघाल हो हंगाम निष्टुक वाया गेला हो !"(प्रुष्ठ क्र.३०२) ब्राह्मणी धर्म वारकरी पंथात घुसल्यानेच तो नासला आणि पर्यायाने त्यांचे अनुयायी देखील नासले.ब्राह्मण जिथं घुसतो ते नासवुनच टाकतो, असेच नेमाडेंनी सुचित केलेले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय चालते ? बहुजन मुलांच्या मनावर मुस्लिमद्वेष आणि ब्राह्मणी श्रेष्ठ्त्व कसे बिंबवले जाते याबाबतचे अत्यंत धक्कादायक वर्णन नेमाडे यांनी  प्रुष्ठ क्र.३१८ ते ३२४ वर केलेले आहे.यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विक्रुतांची टोळधार आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
            महात्मा गांधी यांची हत्या ब्राह्मणांने केली असताना देखिल ती मुसलमानानेच केलेली असावी असा संशय होता.पण ती ब्राह्मणाने केली आणि त्यानंतर काय झाले याचे सविस्तर वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३२४ ते प्रुष्ठ ३२७ वर केलेले आहे.त्यातील काही भाग पुढील प्रमाने ".. हे असं (गांधी हत्येचं) राक्षसी क्रुत्य फ़क्त ब्राह्मणच  ह्या देशात करु शकतो. ते खरच ठरलं.रात्री दिल्लीहुन इकडे तिकडे केलेल्या ट्रंक फ़ोनवरून खुनी माणूस गोडसे होता, अशा बातम्या मोरगावांत ("हिंदू " कादंबरीचा नायक खंडेराव पाटलांचे गांव) आल्या आणि सकाळी तर ठेंगू जोशीबुवांना दिल्लीहुन मुलाची तारच आली.-- काळजी घ्या ----राजाभाऊ अग्निहोत्री यांनी रात्री ब्राह्मणवाड्यात साखर वाटली. अशी कुजबुज होती." ब्राह्मण आळीत एकाने बायकोला हर्षभरात , अहो, पुरणपोळ्या करा , असंच काहीतरी ओरडून सांगितल्याचही काहिंना ऐकल्याचं स्पष्ट आठवत होतं " ( प्रुष्ठ क्र.३२५) सावरकर देशभक्त वगैरे नसून मुसलमानांचा द्वेष करणारा आणि देशाची फ़ाळणी करणारा असा द्वेषी माणुस होता असे नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. "याचं(सावरकराचं) देश कार्य म्हणजे द्वेषकार्य" आपल्या देशात खालच्या जातीच्या लोकांना वैदिक,ब्राह्मणी धर्माने फ़ार छळले त्यामुळेच मुसलमान धर्म लोकांनी जवळ केला, याबाबत उद्वेगाने नेमाडे लिहितात " आपला हिंदूधर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ? " (प्रुष्ठ क्र.३२९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा काय होता, याबाबत निळुभाऊच्या डायरीतील नोंदिवरून नेमाडे यांनी पुढील विवेचन केले आहे पहिल्याच पानावर.
      " स्वत:च्या रक्तानं रंगवलेला भगवा झेंडा. नंतर एका पानावर एका खाली एक लिहिलं होतं
१७५७
१८५७
१९५७
          काय याचा अर्थ ? याचा अर्थ तुमच्या सारख्यांना सांगुन काय उपयोग ? १७५७ पलाशीची लढाई, १८५७ तात्यांचं बंड, आणि आता १०० वर्षांनी - रक्तरंजित  आसे तु हिमाचल, अखंड हिंदूस्तान, एकुण एक इंग्रज कापून काढला जाणार होता.राजधानी पुणे ठरली होती.राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत - नमस्ते सदावत्सले - स्वतंत्रते भगवते एकत्रित घटना वगैरेचा व्यय आणि घोळ कशाला ? मनुस्म्रुती आहेच."(प्रुष्ठ क्र.३३०)मनुस्म्रुतीने बहुजनांच्या हजार पिढ्यांना नरक यातना दिल्या.त्या मनुस्म्रुतीचे राज्य ब्राह्मणांना अपेक्षीत होतं. हे नेमाडेंनी मांडले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणार्या बहुजन समाजातील तरुनांचा ब्राह्मण वापरून कसा चोथा करतात हे नेमाडेंनी रेखाटलेल्या "निळुकाकाच्या " पात्रावरून लक्षात येतं.ब्राह्मण पत्रकार ,संपादक बहुजनांच्या ग्रामिण भागातील बातम्या वस्तुस्थितीला धरून देत नाहीत.याबाबत ग्रामीण भागातील शेतकर्यांची संपादकाबाबतची प्रतिक्रिया नेमाडे यांनी पुढीलप्रमाणे नोंदवलेली आहे."खरंच आहे हो, तो मायझवाड्या संपादक श्रमाची काय प्रथिष्ठा मानतो ? " (प्रुष्ठ क्र.४०८)
       आजच्या वारकरी पंथात जातीभेद आहे.नुसते देवळात नाचुन अध्यात्मिक सुख मिळवण्याच्या बाता मारतात.मुसलमान तर सोडाच पण महारमांगाना देखील यांनी सामावून घेतले आहे, मुसलमान द्वेष शिकवणार्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नेमाडे सवाल विचारतात."एकादशीला मिरची,रताळ,पेरू,पपया, शेंगदाणे,खजुर, बटाटा, साबूदाणा असले म्लेंच्छ यावणी पदार्थ कसे काय चालतात ? हे तर अलीकडे बोटींनी समुद्रावरून आयात केलेले पदार्थ."(प्रुष्ठ क्र.४४१) रामदास हा शिवरायांचा गुरु नसताना , तो तसा ब्राह्मणांनी रेखाटला याउलट तो एका मुलीचे जीवण उद्ध्वस्त करून लग्न मंडपातून पळाला, याबाबत खंडेरावांचे मित्र मछिंदर , वाणखेडे , अनंतराव यांचा संवाद नेमाडे पुढील प्रमाणे रेखाटलेला आहे."(मछिंदर अनंतरावला म्हणतो ) रामदास स्वामींच्या  मंडपात राहुन गेलेल्या बायकोच्या दु:खावर फ़ार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला , सुंदर ?  तिकडे कोवळी पोरगी का बोडकी ठवली जन्मभर का मारली - आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ?  त्यापेक्षा ती उद्ध्वस्त बाई हातात वहान घेऊन याला(रामदासाला) शोधत शिवरथकडे चाललीय अशी कविता - पेक्षा श्लोकच का नाही लिहित- 
         जनाचे श्लोक मनाची नको लाज ठेवू तू जरी ।
     जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥
इथे मराठी कवींना तर रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नाही नै.॥" (प्रुष्ठ क्र.४५०)
          ब्राह्मण पत्रकार हा अक्षरज्ञान, धुर्तपणा, कावेबाजपणा याच्या बळावर काय-काय उचापती करतो हे अनंतराव या पत्राद्वारे नेमाडेंनी अत्यंत रसभरीत वर्णन केलेले आहे, आणि हाच अनंतराव काय करायचा हे नेमाडे लिहितात. "मराठे आणि महारांमध्ये कलागती लावून त्याबद्दल कलात्मक भाषेत लिहिणं - ह्या जबाबदार्या एकटा अनंतराव जबाबदारीनं सांभाळायचा" (प्रुष्ठ क्र.४५०) मराठावाडा नामांतराचा लढा पुरोगामी ब्राह्मणांनी कसा लावून दिला, पुणे , मुंबई विद्यापिठाच्या नामांतराबद्दल न बोलणार्या पुरोगामी ब्राह्मणांचे नेमाडे यांनी पितळ उघडे पाडलेले आहे."अशा भंपक सुधारणा आपल्या पुण्यात किंवा मुंबईत न होता दुसर्या मागासलेल्या भागात झाल्या तर उत्तमच, असं वाटणार्या पुण्या - मुंबईच्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारवंतांनी सगळीकडून मराठावाडा विद्यापिठाचं नाव बदललं पाहिजे , अशी मोहिम सुरु केली "(प्रुष्ठ क्र.४६४) दशमान पद्धती हि आर्य, द्रविडपुर्व अतिप्राचिन असुन त्याबाबतचे संशोधन झाले पाहिजे आणि  ब्राह्मणी व्युत्पतीवर नेमाडेंचा विश्वास नाही , त्याबाबत ते लिहितात "दहा पर्यंतचे आकडे वेगळे करायचे , अकरा- बारा-तेरा - पंधरासतरा-अठरा - ह्या सगळ्यांच्या शेवटी रा आहे. रा म्हणजे दहा -----रावणमध्येही दहा या अर्थी रा-----असावं------राव म्हणजे आवाज म्हणून रावण, असल्या संस्क्रुत बंडल व्युत्पत्त्यांवर आपला विश्वास नाही" (प्रुष्ठ क्र.५३४) ग्रेट निकोबरी सारख्या आदिवासी समाजात बायकोवर कोणत्याही स्वरुपाचा संशय घेत नाहीत्पण हिंदू संस्क्रुतीची अवस्था काय आहे याचे विवेचन करतात , "लहान मुलं ज्या निकोबारी तरुणाला सतत चिकटून असायच त्या तरूणाला मंडीने विचारले , हा कोण ? निकोबारी म्हणाला--माझ्या बायकोचा मुलगा---असं कसं ? ह्यावर तो चिडून म्हणाला , तुम्हा बायकांना हे कळायला पाहिजे, बायकोला मी सोडून दुसर्यापासून मुल नाही होऊ शकत ? आश्चर्य , अरे, इंग्लंड मध्ये सुद्धा कुठलाही नवरा असं चिंतू सुद्धा शकणार नाही.हि नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.इथे थोड्याशा संशयावरून बायकोला जाळुन टाकणारी आमची हिंदू संस्क्रुती -----" (प्रुष्ठ क्र.५३८) हिंदूधर्मात मुलींची किंमत नाही, याबाबत नेमाडे लिहितात " मुलींची काय किंमत ?  गचाळ हिंदू कुटूंब व्यवस्था" (प्रुष्ठ क्र.५८३)   
           भालचंद्र नेमाडे यांनी अशा अनेक बाबी प्रस्तुत कादंबरीमध्ये नोंदविल्या आहेत.त्यांचे सविस्तर लेखन म्हणजे एका पुस्तकाचा विषय आहे, हे काम पुढे कोणी तरी करेलच , नेमाडे यांची भाषा लोकभाषा आहे , ती कष्टकरी , श्रमकर्यांना आपली वाटणारी आहे,नेमांडेंच्या भाषेला ब्राह्मणी निकष लावणे गैर आहे, नेमांडेंकडे जस फ़टकळपणा आहे , विनोद आहे तसेच दु:खी, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी स्त्रिया यांच्या व्यथा मांडणारे कारुण्य देखील आहे,भाषा , आशय, वाकप्रचार, म्हणी , शब्द, साहित्य, कादंबरी ही ब्राह्मणीच असली पाहिजे या ब्राह्मणी सांस्क्रुतीक दहशदवादाला गाडणारी आणि त्यांच्या  व्यवस्थेला उघडी पाडणारी  भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" ही कादंबती आहे.