शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा
फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ",तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं मै ही शिवाजी महाराज हूं".पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती.तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही.कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते.यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले,मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला,मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले,’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत.आता हाती लागणे शक्य नाही.छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत.जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.
सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू::::: त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल.यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही.त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही,तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ?
माझा शिवाजी राजा :: त्यांची सर तुझ्यासारख्याला यायची नाही.तू पोटार्थी हबशी:: तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे,पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला.थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला,वैसाही होगा......मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला,त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं.स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो::मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते.त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.
शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला.तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले.खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी;रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.(दिनांक - १३ जुलै १६६०).
छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून निसटले
छत्रपती शिवाजी महाराज निसटल्याचे समजल्याबरोबर जौहरने "दिलेर मसूद" याला राजांच्या पाठलागावर पाठविले.तोपर्यंत काही अवधी निघून गेला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी योजलेली रणनीती पाहून सिद्धी जौहर आणि त्याचे सैन्य कमालीचे संतापले होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मोठ्या त्वेषाने पाठलाग सुरु केला.विशाळगडापर्यंतचे अंतर खूप असल्याने मावळ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती.परंतू जिद्द कायम होती.विशाळगडापासून आठ मैल अंतरावर असणार्या गजापूर जवळील घोडखिंडीत छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आले,त्यावेळी त्या खिंडीतच शत्रुशी लढ्यासाठीची तयारी शिवरायांनी दाखवली.मात्र बाजीप्रभूंनी शिवाजी राजांना पुढे निघून जाण्यास सांगितले.आपण काही सैन्य घेऊन ही खिंड लढवतो.शरीरात प्राण असेपर्यंत एकाही गनिमास पुढे जाऊ देणार नाही.असे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंच्या हट्टापायी विशाळगडावर जावे लागले.तथापि शिवरायांनी विशाळगडावर गेल्यागेल्या ५ तोफ़ा उडविल्या जातील.अशी ग्वाही देऊन त्यानंतर ही लढाई थांबवून ताबडतोब विशाळगडाकडे बाजीप्रभूंना सर्व सैन्य घॆऊन कुच करण्यास सांगितले.
बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी प्राण त्यागले
बाजीप्रभूंना निवडक सैन्य घॆऊन घोडाखिंडीत मसुदला रोखन्यासाठी थांबविले.बाजीप्रभूंच्या शरीरावर असंख्य घाव होऊन देखील त्यांची तलवार शत्रूंची शिरे उडवित होती.बाजीप्रभू मसुदशी लढता लढता धारातिर्थी पडले.मात्र शिवाजी महाराज विशाळगडावर गेल्याच्या ५ तोफ़ा ऐकल्याबरोबर बाजीप्रभूंनी प्राण सोडला.(दिनांक - १३ जुलै १६६०).छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆणारे शिवाजी काशिद व घोडखिंड पावनखिंड बनविणारे बाजीप्रभू या शूरवीरांचे पुर्णाक्रुती पुतळे कोल्हापूरातील पन्हाळगडावर बसविण्यात आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे वीर बाजीप्रभू आणि वीर शिवाजी काशिद हे स्वराज्यनिष्ठ मावळे होते.शाहिस्तेखानावर हल्ला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून पन्हाळा २२ सप्टेंबर १६६० रोजी सिद्धी जौहरला दिला.यानंतर सुमारे १३ वर्षानंतर पन्हाळगड पुन्हा ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फ़र्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने स्वराज्यात जिंकून घॆतला.छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा कारभार महाप्रतापी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांवर सोपविला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेबापूला आगमन
छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्याग करणार्या प्रतिशिवाजी गुप्तहेर शिवाजी काशिद यांच्या घरी गेले.शिवाजी काशिद यांच्या पत्नी पारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले.शिवाजी काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारी पदी नेमले.गुप्तहेर शिवाजी काशिद यांचे नेबापूरला स्मारक उभारले.सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले.
प्रतिशिवराय गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद आणि वीर बाजीप्रभू या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा....
शिवा काशीद हा एक शिवाजीच्या सैन्यात न्हावी होता. त्याने शिवाजीवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप सटकले व विशाळगडावर पोहचले. हा शिवा काशीद हुबेहूब शिवाजीसारखा दिसत असे. त्याला पोशाखही शिवाजीचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदला, शिवाजी समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. मात्र, हा शिवाजी नाही असे कळताच जोहरने त्याचे शिर कापून टाकले. ही घटना १२-१३ जुलै १६६० या दिवशी घडली. या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी, विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे
ReplyDeleteChan mahiti
Deleteवीर शिवा काशिद: पन्हाळागडाच्या चार दरवाजातून खाली आल्यावर या स्वामीनिष्ठ विराची समाधीआहे. सिद्दी जोहरच्या वे ढ्यातून सुटून शिवराय विशाळगडाकडे जाताना त्यांच्या बरोबर शिवरायाचे रूप घेऊन या शिवा न्हावी (काशिद) यांनी दुसऱ्या पालखीत बसून शत्रूला चकविले होते. याच्यामुळेच शिवरायांना निसटून जाण्यास पुरेसा वेळ मिळाला होता.
ReplyDeleteसिद्दी जोहारने काशिदास पकडून त्यांचा व त्यांचबरोबर असणाऱ्या शूर मावल्यांळ्याचा
शिरच्छेद केला. शिवरायांच्या शिरस्त्या (नियमा) प्रमाणे आपण मारणार आहे, हे माहीत असून सुध्दा शिवारायांचे रूप घ्यायला तयार घालेल्या या वीराची समाधी बांधली गेली.
या शिवा काशिद दांचे वंशज नेबापूर या गावात अजून ही राहतात. या शिवा काशिद यांच्या गोष्ठी अजून ही सांगितल्या जातात.
पन्हाळ्यावर म्हणे बरसवु कहर.. मोगलांचा सरदार सिद्दी जौहर..
ReplyDeleteघेरती सैतान पन्हाळ्याचा पायथा.. चक्रव्युव्हात स्वराज्याचा कर्ताकरीविता..
गडाचा झोंबती अंगाला वारा.. आठवे तो विशालगडाचा आसरा..
निघाला राज्या भेदन्या चक्रव्यु.. डोळ्यात रुते फसलेला अभिमन्यू..
एक विर ऐसा.. परी छत्रपति जैसा.. छत्रपतिसाठी सांडु म्हणे रगद..
नाव तयाचे शिव काशिद.. शिवबांना लपवावे.. त्या दाखवावे..
हुबेहुब ऐसा कोणी न ओळखावे.. राजापरी प्रेम जणु विर थोपटी मांडी..
क्षणभर राजा म्हणविन्या शिर देई तोफे तोंडी.. सुखरुप पोचावा स्वराज्याचा भ्रमर..
पिळ देऊन मिशीला होईल तया मि अमर.. बेत ठरला.. प्रति शिवा मोगलानी हेरला..
मावळा राजा म्हणुनी कैद होई.. लाभली जन्मो जन्मीची पुण्याई..
खदखदुन हसे ऐसा सिद्दी.. म्हणे मि आहेच जिद्दी..
काळ भासवि स्वताःला.. पेश करा आमच्या समोर कैद्याला..
शिवा काशिद चाले तोऱ्यात.. आग लाविली जणु तुफाणी वाऱ्यात..
उभा राहीला सिद्दी समोर.. पाहुन मर्दाला सिद्दी करे घुर घुरं..
दिवठ्याच्या पेटल्या मशाली,. अंधाराचीही उजळे सावली..
नजर रोखुन सिद्दी पाही.. शंकेचा धुर करी तया लाही लाही..
आग गेली तळपायाची मस्तकात.. ओरडुन म्हणे झाला घात..
ऐकुन काशिद हसला.. मोगलांचा तर आवाज बसला..
दिसतो खरा राजा शिवछत्रपति.. ओळखले त्यास तो तर प्रति छत्रपति..
पाहुन विरा तो बोले जौहर.. मरणे का डर नही क्या काफर..
तो असे मावळा निडर.. बोलतो कसा बेफिकिर..
आलोया ईथे मृत्युला न जुमानुन भाग्य उजळन्या.. राजा म्हणुन मरण्या..
आम्हा मावळ्या असे माज.. स्वराज्यासाठी मरण्या उभीआमची फौज..
तु फक्त मारीशी देहाला,. पण हा आत्मा तृप्त होई अमरतेला..
सुटला तोल सिद्दीचा.. वेध घेई मर्दाच्या मानेचा..
त्यागीतो देहा काशिद तो स्वराज्यविर.. लाख मरती पोशिंद्यासाठी धडा वेगळे होती शिर..
ऐसा शिवछत्रपति राजा.. लाभली तया जिव्हाळ्याची प्रजा..
ऐसे जन्मले कैक विर.. झेलती स्वराज्याचे वार ..
असे त्यांना या मातिचा लळा.. शुल छातित रोवुनी सोसती शिवबासाठी कळा..
झुरती नसे मावळे सत्तेच्या गर्दित.. शिवछत्रपति होई धन्य धन्य तो शिवा काशिद शिवा काशिदला मानाचा त्रिवार मुजरा ।। एक आवाज एकच पर्याय ।। ।।जय जिजाऊ जय शिवराय।। ..ණ गजानन बोरकर
प्रतिशिवराय गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद आणि वीर बाजीप्रभू या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा....
ReplyDeleteनरवीर शिवाजी काशिद यांच्या 356व्या पुण्यतिथि
ReplyDeleteनिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा,
मानाचा मुजरा... ..
नरवीर शिवाजी काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे या शूरवीरांना मनाचा मुजरा।
ReplyDelete