स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव म्हणजे नरवीर शिवाजी काशिद. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लढवणारे गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
छत्रपती शिवरायांनी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर अफ़जलखानास व अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णीस कापल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जानेवारी १६६० मध्ये आदिलशाहाच्या ताब्यातील मिरजेला वेढा देण्यासाठी आले.आदिलशाहाने कुर्नलचा सिद्धी जौहर याला सलामतखान हा किताब देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी पाठविले.मिरजेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा दिल्यानंतर आजच्या सांगली जिल्ह्यातील तासागांव तालुक्यातील धुळगांव या छोट्याशा गावांत छत्रपती शिवाजी महाराज आल्याची व येथील रहिवाश्यांना शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्याची ऐतिहासिक नोंद आजही धुळगांवातील लोकांच्या घरी ताम्रपटाच्या स्वरुपात सापडते.आजही तेथील लोकांकडे छत्रपती शिवरायांनी दिलेले ताम्रपट उपलब्ध आहेत.
सिद्धी जौहरचा पन्हाळगडचा वेढा
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती छत्रपती शिवाजी महाराज आखणार होते.कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत.त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.
वेढ्यातून सुटण्यासाठी रणनीती
सिद्धी जौहर मुत्सद्दी सेनानी होता,मुत्सद्दी राजकारणी नव्हता,विचार न करता सरळ रेषेत धडक देणार्या रेड्यासारखे त्याचे वागणे होते.म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू शकला नाही.जौहरला छत्रपती शिवरायांची रणनीती ओळखणे जमले नाही.या पन्हाळगडाच्या वेढ्याचा चार महिन्याचा काळ ओलांडला होता.नेमके याच वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जौहरला पत्र पाठविल्यामुळे जौहर सुखावला होता.छत्रपती शिवाजी महाराजांकडून जौहरला निरोप गेला.उद्या आम्ही भेट घेण्यासाठी तळावर येऊ.छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा निरोप गेल्याने जौहरचा वेढा ढिला पडल.सैनिक बेहोश झाले.अवघ्या एका रात्रीचा प्रश्न होता.
गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद
गडाबाहेर कसे पडायचे ? या योजनेची तयारी चालू झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज या विचारात असतानाच गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले.शिवाजी काशिद हे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावचे होते.ते दिसायला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारखेच होते.
पन्हाळगडावर बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नव्हता व आतील माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता.जौहरने छत्रपती शिवाजी महाराजांना वेढ्यामध्ये अडकून ठेवल्याने स्वत: जौहरला देखील येथून हालता येत नव्हते.छत्रपती शिवाजी महाराजांनी याठिकाणची अडचण लक्षात घॆऊन नेताजी पालकरांनी विजापूरला मुबलक सैन्यासह धडका देण्यास सुरुवार केली खरी पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.
विशाळगडासही वेढा
सिद्धी जौहरने विशाळगडासही वेढा दिला.वेढा अत्यंत कडक होता.नेमक्या त्याच वेळी नेताजी पालकर विजापूरला धडक देऊन जिजाऊंच्या मार्गदर्शनासाठी राजगडावर आले होते.नेताजी पालकर समोर आलेले पाहून आई जिजाऊंना संताप आला व त्या म्हणाल्या तुमचा राजा तिकडे कैद होऊन पडला आहे आणि तुम्ही दुरवर जाऊन बसलात ? राजांची सुटका कोण करणार ? तेंव्हा राजमाता जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी हाती तलवार घेतली व राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या.हे पाहत असलेल्या नेताजी पालकरांनी जिजाऊंना विनंती केली व जिजाऊंकडील तलवार हातात घेत म्हंटले जौहरला हिसका दाखवितो आणि राजांना सोडवून आणतो आणि आई जिजाऊंचा आशिर्वाद घेऊन नेताजी पन्हाळगडाच्या मोहिमेकडे निघाले.विजापूरहून आलेले नेताजी पालकर क्षणाची देखील विश्रांती न घेता तातडीने पन्हाळगडाकडे निघाले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणार्या समकालीन दोन व्यक्ती होत्या, हिरोजी फ़र्जंद आणि शिवाजी काशिद
पन्हाळगडावर गुप्त बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांची व गुप्तहेरांची बैठक झाली.यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती आखली.पन्हाळगडावरून २४ मैल दूर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने या योजनेची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती.जाण्याचा मार्ग निवडला होता,केंव्हा निघायचं ? कसे निघायचं ? सोबत कोण कोण असणार ? शत्रूने अडविले तर कसा प्रतिकार करायचा ? शत्रूच्या गोटात कसा गोंधळ निर्माण करायचा ? सगळा तपशील या अगोदरच ठरला होता.या अनुषंगाने शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले,राजे तुम्ही सिद्धी जौहरला तहासाठी निरोप द्या.जौहरच्या भेटीला मी जातो.तुम्ही गडाबाहेर पडा,यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तुम्हाला दगा फ़टका झाला तर ? त्यावर शिवाजी काशिद म्हणाले होणार नाही आणि झालाच तर माझ्यासारखे अनेक शिवाजी काशिद निर्माण होतील पण तुमच्यासारखे शिवराय स्वराज्याला नितांत आवश्यक आहेत.शिवाजी काशिदांच्या या प्रामाणिक व निष्ठापूर्वक आवेशाच्या बोलण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना गहिवरून आले.
प्रतिरुपाचे प्रात्यक्षिक
शिवाजी काशिद यांना कोण ओळखेल काय ? याची खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा पेहराव देऊन दुपारी गडावरील अधिकारी कर्मचारी यांचे सत्कार शिवाजी काशिद यांच्या हाती पार पाडले.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांना कोणीही ओळखले नाही.जिथे आपले कर्मचारी ओळखू शकले नाहीत तिथे शत्रू तर अजिबातच ओळखू नाही शकणार अशी खात्री पटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या वाटाघाटीसाठी येत आहोत असा निरोप सिद्धी जौहरला पाठविला.
१२ जुलै १६६० चा दिवस उजाडला.छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या तयार ठेवण्यास संगितल्या.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समान पेहराव,समान सैनिक रात्री १० वाजता किल्ल्यातून दोन पालख्या खाली उतरू लागल्या.शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडला.वेढ्याच्या एका बाजूतून ते वेढ्याबाहेर पडले.सोबत वाट दाखविणारे वाटाडे होते.त्यांनी विशाळगडाचा रस्ता धरला,मार्गात राजांची माणसे अगोदर ठरल्यानुसार त्यांना येवून मिळत होती.वेढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ४ ते ५ मैल दूर पोहचले.विशाळगडावर पोहचण्यासाठी १९ ते २० मैल अंतर अद्याप बाकी होते.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत १००० मावळे होते.त्यातच शिवाजी काशिद होते.यावेळी त्यांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पेहराव होता.जणू प्रतिशिवराय राजेच.
सिद्धी जौहरला चकवा दिला
शिवाजी काशिद यांना पालखीत बसविण्यात आले.पालखीसोबत १० ते १२ हत्यारबंद मावळे होते.राजांचा निरोप घेऊन शिवाजी काशिद यांची पालखी लगबगीने मलकापूरच्या दिशेने गेली व छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने रस्त्याने निघाली.ते पन्हाळगडापासून आणखी दूर जात असताना जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले.आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले.काही वेळातच सगळा तळ जागा झाला.जौहर रागाने लालेलाल झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली.
प्रतिरुपाला शत्रुने ओळखले
सिद्धी जौहरने घोडदळाच्या तुकड्या छत्रपती शिवरायांना शोधण्यासाठी पाठविल्या.एक तुकडी मलकापूरच्या दिशेने गेली होती.या तुकडीला मलकापूरच्या रस्त्यात शिवरायांची पालखी दिसली.या पालखीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज (प्रति शिवाजी राजे: गुप्तहेर शिवाजी काशिद) दिसले.या जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.त्यांची पालखी सिद्धी जौहरच्या तंबूकडे नेली.छत्रपती शिवाजी महाराज आल्याची बातमी जौहरला समजताच तो राजांच्या स्वागताला आला.त्याने छत्रपतींच्या पेहराव्यातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांची भेट घेतली.छत्रपती शिवाजी महाराज तहासाठी गडाखाली तंबूत आलेले आहेत ही बातमी वार्यासारखी पसरली व गडाभोवती डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या सैनिकांना समजताच त्यांना आनंद झाला.पालखीत बसलेल्या शिवाजी महाराजांना(गुप्तहेर शिवाजी काशिद) जौहरच्या समोर नेण्यात आले.इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता.क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते.म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है ? अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली.
मराठ्यांसाठी प्राणपणाने झटणारे नरवीर शिवाजी काशिद या मराठ्यांच्या महानायकास मानाचा मुजरा
ReplyDeleteजय मराठा स्वराज्य
शिवा काशिद हा महाराजांचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ह…ीशिवाजी महराजांसारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजांचे कपडे घातले तरनवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या.एक महाराजांची आणी दुसरी शिवा काशिद. एक विशाळगडाकडे व दुसरी सिद्धीजोहरकडे.हे तर आपण जाणलच असेल की सिद्धी जोहरकडे गेलेला शिवाकाशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एकसामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचाराजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाइल.धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळेसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाहीपुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाईनिघाली एक फ़ोज मोठी विजापुरीमहराज होते त्यावेळी कोल्हापुरीवेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीनेउन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चारवेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पारकरुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारेफ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारेरात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेवगडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेवपाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाईगाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बातजणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघातअंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महारांजा सारखीकरुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार.
ReplyDeleteदुसरी पालखीशिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरणपण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरणप्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितोमरताना शिवा काशिद बोलतो “सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो?”
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंतस्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंतगजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहासपण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास
धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे!
ReplyDeleteसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो"
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete॑॑॑आज नरवीर शिवा काशिद यांच्याप्रमाणे युध्द-भूमीवर न जाता समाजबांधवांनी आपली निष्ठा नरवीर शिवा काशिद, जिवा महाले या शूरवीरांच्या त्यागावर ठेवून समाज संघटित करण्यासाठी आठवड्यातून दोन तास दिले आणि एकत्र बसून समाजाच्या अडीअडचणींविषयी, शासन व अन्य मार्गाने उपलब्ध होणाऱ्या सोयी, सवलतींविषयी माहिती दिली, आपल्या व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी विचारविनिमय केला, आपली मुले उच्चशिक्षित झाली पाहिजेत, यासाठी समाजाच्या माध्यमातून काही योजना तयार केल्या तर खऱ्या अर्थाने या संघटित शक्तीला राज्यकर्तेही सलाम करतील आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक गतीने होवू शकेल
ReplyDeleteछ. शिवाजी महाराज यांच्यावरील निष्ठा आणि स्वराज्याच्या प्रेमासाठी समोर मरण दिसत असतानाही 352 वर्षांपूर्वी नरवीर शिवा काशिद यांनी महाराजांच्या वेशात पालखीत बसून मोगल सेनाधिकारी व सैन्याला गुंगारा देत महाराजांना मोगल सैन्याच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी वाट मोकळी करुन देण्याचे मोठे धाडस केले. शिवा काशिद यांचा त्याग, स्वराज्य प्रेम आणि महाराजांवरील निष्ठा आत्मसात करुन त्याप्रमाणे वागणे हीच त्यांना आदरांजली ठरेल,
ReplyDeleteधन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे
ReplyDeleteसुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फौज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महारांजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किंचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो "सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो?"
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास