1 January 2013

राजर्षी छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर

               महार जातीतील डॉ.आंबेडकर नामक ग्रुहस्थाने उच्च पदवी प्राप्त बातमी राजर्षी शाहू महाराजांच्या कानावर येऊन पडली तेंव्हापासून त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही, जी व्यक्ती महाराजांना भेटायला येई त्या व्यक्तीसमोर बाबासाहेबांचे तोंडभरून कौतुक करून म्हणायचे "आता या बामनांना बौद्धीक बाबतीत शह देण्यास बहुजन समाजातील माणसे हळू हळू पुढे येऊ लागली. "एक दिवस असा उगवेल की या बामनांपेक्षा आमची बहुजन समाजातील माणसेच पुढे गेलेली असतील"शाहू महाराजांजवळ बापुसाहेब महाराज बसलेले असायचे .आंबेडकरांचे चाललेले कौतुन बघून बापुसाहेब म्हणाले, "महाराज एकदा आंबेडकरांना भेटावयास तरी बोलवा" शाहू महाराज प्रसन्न होऊन म्हणाले,"बापसाब अगदी माझ्या मनातलं बोललासा बघा"
  योगायोगाने तेथे दळवी आर्टिस्ट आले, त्यांना मुंबईचा खडानखडा माहीत असल्याने महाराजांनी आबेंडकरांना बोलविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवीली व त्यांच्या मुंबई प्रवासाची सर्व व्यवस्था करण्याची आज्ञा देऊन महाराज सोनतळीला निघून गेले.
            महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दळवी मुंबईस गेले डॉ.आंबेडकरांची भेट घेतली महाराजांचा खास निरोप दिला.पण आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार होईनात.कारण संस्थानिकांच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर आल्या होत्या.अखेर दळवींनी इतर संस्थानिकांपेक्षा महाराज कसे वेगळे असून अस्प्रुश्योद्धरांसाठी कसे काम करतात, हे सांगितल्यावर आंबेडकर कोल्हापुरास येण्यास तयार झाले व ते कोल्हापुरला आले.
              पहिल्याच भेटीत शाहू महाराज आणि बाबासाहेब यांची मैत्री जमली.मैत्री ही स्फ़ुल्लिंगासारखी असते, ती केंव्हा प्रकट होते हे सांगणे कठीण असते कित्येक वर्षाच्या सहवासानंतरही प्रकट होत नाही पण काही वेळी विश्वासाच्या वातावरणाने प्रगल्भता धारण केल्यास एकाच भेटीत ती चीरमैत्री होऊ शकते. असेच शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब यांच्या मैत्रीचे झाले. एकाच भेटीत चिरमैत्री जमली.पहिल्याच भेटीत डॉ. बाबासाहेबांनी अस्प्रुश्योद्धरांसाठी निदान एका साप्ताहिकाची गरज असल्याचे प्रदिपाद करून ’मुकनायक’ हे साप्ताहिक चालवत असलो तरी आज ते आर्थिक अडचणीमुळे ’मुक’ झाल्याचे सांगितले.’मुकनायक’ विषयी आधिक माहीती देताना आंबेडकरांनी महाराजांना सांगितले की "आपण ३१ जानेवारीला १९२० ला पहिला अंक प्रकाशित केला. या अंकावर संत तुकाराम यांचे बोधवाक्य आहे, हे बोधवाक्य असे आहे,"
  " काय करू आता धरुनिया भीडा नि:शंक हे तोंड वाजविले ।
    नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजुन नव्हे हित ।"
संत तुकोबारायांचे बोधवाक्य ऐकुन महाराज एकदम प्रसन्न झाले व म्हणाले " व्वा ! व्वा ! छान ! छान !!" असे सहजच म्हनुन गेले.
           आंबेडकरांनी महाराजांना आर्थिक अडचणीमुळे व्रुत्तपत्रे कशी बंद पडतात हे सांगत असतानाच सोमवंशीय मित्र, हिंदू नागरीक, विटाळ विद्वंसक यांची उदाहरणे दिली. तसेच त्यांनी कारणेही सांगितली. त्या काळी व्रुत्तपत्रांना फ़ारश्या जाहीराती मिळत नसत.वर्गणीसारांच्या वर्गणीतुनच अंक चालवावा लागत असत आणि वर्गणीदार आपल्या वर्गणीशी प्रामाणिक राहात नसत. महाराजांच्या ध्यानी सर्व बाबी आल्यानंतर तात्काळ त्यासाठी रू.२,५०० ची भरगोस मदत केली.या मदतीनंतर " मुकनायक" बोलु लागला.
           २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील "कागल" जहागिरीतील माणगाव या ठिकाणी अस्प्रुश्यांची पहिली ऐतिहासिक भव्य परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना भाषणाच्या सुरुवातीस शाहू राजांनी आंबेडकरांचा उल्लेख "माझे प्रिय मित्र आंबेडकर" असा करताच हजारो दलितांनी महाराज आणि बाबासाहेब यांचा अखंड जयघोष करीत टाळ्यांचा पाउसच पाडला. प्रत्यक्ष छत्रपती आंबेडकरांना "प्रिय मित्र" म्हणतात याचे त्यांना कौतुक वाटले.भाषणाच्या शेवटी आंबेडकरांना आग्रहाचे भोजनाचे आमंत्रन देताना म्हणाले, "आंबेडकरांना माझी विनंती आहे की त्यांनी जाण्यापुर्वी मेहरबानीने माझे रजपुतवाडीच्या कॅंपवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी" महाराजांच्या आमंत्रणाचा स्विकार करून आंबेडकर सोनतळीला आले. भोजनाच्या वेळी महाराजांनी स्वत: आग्रह करून त्यांना यथेच्छ भोजन करावयास लावले. त्यानंतर आंबेडकर आगगाडीने मुंबईस जाणार होते, त्यावेळी महाराजांनी स्वत: स्टेशनवर येऊन त्यांना निरोप दिला.
           डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या नेत्रुत्वामुळे दलित उद्धाराच्या चळवळीला निर्णायक उभारी आली. शाहू महाराजांनी तर निश्चयच केला होता की "माझे राज्य गेले तरी बेहत्तर पण अस्प्रुश्योद्धराचे कार्य थांबविणार नाही" महाराजांच्या अशा या कार्यामुळे अस्प्रुश्य लोक शाहुंना आपला त्राता, उद्धारक , मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानत होते. दिवसेंदिवस महाराज आणि आंबेडकर यांचा स्नेह वाढतच गेला. स्नेह माणसाला त्याग करायला शिकवतो, संकुचीत नात्याची तो सीमा पार करतो.असेच या दोघांच्या नात्यात घडत गेले.खरी मैत्री ही मोकळ्या ह्र्दयाने बोलत असते,केंव्हाही मदत करण्यास तयार असते.
            ४ सप्टेंबर १९२१ रोजी लंडनहुन आंबेडकरांनी महाराजांना एक पत्र पाठवून मदत मागितली, ते लिहितात आपली प्रक्रुती उत्तम असेलच अशी आशा करतो, आपली आम्हाला खुप आवश्यकता आहे,कारण भारतात प्रगती करत असलेल्या सासाजिक लोकशाहीच्या चळवळीचे आपण एक महान आधारस्तंभ आहात, महाराजांविषयी आंबेडकरांना किती आदर होता हे यावरून दिसून येते.आंबेडकरांच्या विनंतीप्रमाणे त्यांना आवश्यक ती मदत केली. त्यानंतर पुढे काही दिवसांनी म्हणजे २६ जानेवारी १९२२ रोजी लंडनहुन डॉ.आंबेडकरांचे महाराजांना पुनश्च मदत मागताना पत्र आले, त्या पत्रात ते म्हणतात, "मला परत येण्यास अवधी लागणार असल्यामुळे घरी खर्चाची अडचण होणार आहे, तरी हुजुरांनी क्रुपावंत होऊन रु.७५० मदत करावी, आजवर जे अनेक उपकार हुजुरांनी केलेत त्यात हाही करतील अशी आशा आहे. "हे पत्र मिळताच महाराजांनी मनिओर्डरने रुपये सातशे पन्नास पाठवून देण्याची व्यवस्था केली.
         डॉ.बाबासाहेबांना शाहू महाराजांविषयी नेहमीच आदरभाव असे. उच्च जाती आपल्या स्वार्थासाठी ब्राह्मणेत्तर आणि बहिष्क्रुत यामध्ये कधीही एकी निर्माण न होता बेकीच रहावी यासाठी प्रयत्नशील होते. तशा प्रकारे ते हिन डावपेच खेळत. प्रत्येक वेळी ते डावपेच शाहू महाराज आपल्या मुत्सद्देगिरीच्या बळावर उधळून लावत. याबाबत २२ सप्टेंबर १९२० च्या  "मुकनायक" मध्ये "प्रेम की सुड" या लेखात् आंबेडकर म्हणतात, "या विसाच्या शतकातील स्वयंनिर्णयाचा काळात राजर्षी शाहू छत्रपती यांनी ब्राह्मण जातीकडून नाडावलेल्या ब्राह्मणेत्तर व बहिष्क्रुत वर्गाच्या चळवळीचा पुरस्कार केल्यावर बहुजन समाजाकडून त्यांस मिळत असलेला धन्यवाद ब्राह्मण या जातीस न खपून त्यांनी बहिष्क्रुत व ब्राह्मणेत्तर या वर्गात् खुद्द मराठ्यांत फ़ुट पाडण्याचा अत्यंत घातक असा उपक्रम चालविला आहे".
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी  शाहू महाराज एकमेकांचा आदर करीत याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली येथे १३ व १४ फ़ेब्रुवारी १९२२ रोजी ’अखिल भारतीय बहिष्क्रुत परिषद’ आयोजित केली होती.त्या परिषदेत आंबेडकरांच्या अनुपस्थितीत त्यांच्या माघारी त्यांच्याविषयी  प्रशंसोद्गार काढताना शाहू महाराज म्हणाले होते ."भिमराव आंबेडकर तुमचे महान नेते आहेत त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा, त्यांचे अनुकरण करा व त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा.मी तर तुमच्या सेवेला वाहुन घेतले आहे, मला तुमची सेवा करू द्यावी ही विनंती." बाबासाहेब आंबेडकर अस्प्रुष्यता निर्मुलण व त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी "ऑल इंडिया डिस्प्रेड क्लासेस एज्युकेशन फ़ंड" संस्था उभी करणार होते, या संस्थेत शाहू महाराजांनी कोणत्याही लहानमोठ्या पदावर काम करण्याची इच्छा त्यांनी आंबेडकरांना रुकडी (कोल्हापुर) येथुन दि.७ जुन १९२० रोजी लिहिलेल्या पत्रावरून स्पष्ट होते.
" चांगला मनुष्यच चांगला मित्र होऊ शकतो" हे उभयतांच्या मैत्रीवरून स्पष्ट होते. 
संदर्भ  : शाहुंच्या आठवणी, शाहू गौरव ग्रंथ.

26 प्रतिक्रिया :

  1. मस्त लेख आहे
    जय शिवराय । जय भिम

    ReplyDelete
  2. अफ़लातून लेख आहे साहेब खरच बाबासाहेब आणि शाहू महाराज चांगले मित्र होते.त्यांनी एक आदर्श घालून दिला आहे समाजाला.पण आजचे त्यांचे अनुयायी म्हणविणारे लोक पुर्णपणे विसरले आहेत त्यांना नुसते आपल्य फ़ायद्यासाठी त्यांची आठवण येते.

    ReplyDelete
  3. आजच्या जातीयवादावर हेच उदाहरण उत्तम आहे की एक महार आणी एक मराठा चांगले मित्र होते आणि त्यांनी एकमेकांना कीति मदत केली यावरून बोध घेतला पाहिजे आत्ताच्या चांगल्या म्हणविणार्या लोकांनी

    ReplyDelete
  4. बाबासाहेबांनी आणी शाहू महाराज यांनी दलितांसाठी खुप कार्य केले आहेत.त्यामुळे दलितांना चांगले दिवस आले.हे दोन महान व्यक्ती मानवतेला आदर्श आहेत.त्यांचे चरित्र अगदी उत्तर होते त्यामुळे ते दोन व्यक्ती अजरामर झाले.
    या दोन क्रांतीसुर्यांना मनापासून अभिवादन ।

    ReplyDelete
  5. महाराजांच्या आयुष्यातील एक घटना म्हणजे महाराज दक्षीणेत गेले असताना लोकं त्यांच्याकेडे एकटक बघतच राहिले.त्यात भर म्हणजे छत्रपती हिंदूपद बादशहा ही मुडद्यात जान ओतणारी ललकारी ऐकुण तेथील उपस्थित जनता एकमुखाने महाराजांचा गगनभेडी जयजयकार करू लागली.दक्षीणेत स्वसामर्थ्यावर हिंदुंचे साम्राज्य निर्माण करणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार हेच ते शाहू हे कळल्यावर तर जनता अक्षरश: वेडीपिशीच झाली.

    ReplyDelete
  6. आजपर्यंत इतिहासात अनेक राजे ,महानायक होऊन गेलेत पण त्यामधील थोडेच महानायक लोकांच्या मेंदुमध्ये आणी ह्रुदयामध्ये राहिलेत त्यापैकी हे बहुजन राजे म्हणजे शिवाजी राजे, संभाजी राजे, महात्मा फ़ुले,शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर
    या सर्व महानायकांना मानाचा मुजरा.

    ReplyDelete
  7. कोल्हापुरचा राजा शाहू राजा .
    शाहू महाराजांनी करवीर नगरीत बरेच शाळा , वसतीग्रुहे काढलीत तिही कोना एका जातीसाठी नव्हे तर संपुर्ण समजासाठी.१५ पेक्षा जास्त वसतीग्रुहे बांधली आणि शिक्षणाला चालणा मिळाली.आज आपण शिक्षण घेतोय ते फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्यामुळेच हे कधीही न मिटण्यासारखे सत्य आहे.

    ReplyDelete
  8. शाहू महाराज यांच्या मुळे आज कोल्हापुर सातासमुद्रापलीअडे गेले.त्यांच्या कार्यामुळेच आज कोल्हापुरचा नकाशा जगाच्या नकाशावर पोहचला.आम्हाला अभिमान आहे आम्ही शाहूंच्या करचीर नगरीत जन्मलो.
    जय शिवराय

    ReplyDelete
  9. दलितांचे सर्वश्रेष्ट उद्धारकर्ते शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर.तसेच राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांना त्रिवार अभिवादन.
    जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभुराजे । जय शाहू राजे । जय भिम । जय क्रांतिसुर्य महात्मा फ़ुले ।जय मुलनिवासी । जय बहुजन । जय संभाजी ब्रिगेड । जय अनार्य । जय नागवंशीय । जय मुलनिवासी नायक.

    ReplyDelete
  10. खरोखर आपले कौतुक करावेसे वाटते पाटील साहेब कारण आज समाजामध्ये आमच्या महान बहुजन महापुरुषांची खरी माहीती उपलब्ध नाही जी आहे ती बदनामी कारकच आहे.आजही त्यांची बदनामी होत असते हे नाकारता येत नाही.आपले कार्य उत्तम आहे.

    ReplyDelete
  11. भारताच्या राजकीय व सामाजिक इतिहासाला ज्या थोर पुरुषांनी आपल्या कर्त्रुत्वाने नवी दिशा दिली त्या महान नेत्यांमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य फ़ार महत्वाचे आहे.त्यांना मराठी माणसाचा मानाचा मुजरा.
    शाहू महाराज हे केवळ राजे नव्हते तर ते लोकनेतेही होते.त्यांच्यामुळे अनेक दलीत लोकांना शिक्षण मिळाले.अनेकांना आत्मविश्वास आला आणि त्यांच्यातले गुणांना उभारी आली ती या रयतेच्या राजामुळे.
    छान लेख आहे बाबासाहेब आणी महाराज यांना मानाचा मुजरा.

    ReplyDelete
  12. आजतागात इतिहास पाहिला तर जो जो ब्राह्मणवादाच्या विरोधात राहिला तो महामानव बनला.प्रवाहाच्या विरोधात चालतात त्यांचेच इतिहास स्मरण करतो.

    ReplyDelete
  13. आजपर्यंत आपण बघत आलो आहोत की धर्माच्या ठेकेदाराने "ज्याच्याकडे काठी म्हैस त्याच्यासाठी" तसेच ज्याच्या "हातात लेखणी तोच इतिहासाचा धनी" या तत्वावर इतिहास लिहिला.त्यामुळे आपले महान पुरुष मागेच राहिले त्यांची नावे कोणाला जास्त समजलीत नाहीत.तुमचे प्रयत्न चांगले आहेत.

    ReplyDelete
  14. Sagar patil MUMBAIWednesday, 02 January, 2013

    पाटील साहेब आपले खुप खुप आभार लेख लिहिल्याबद्दल आणि या दोन बहुजन महापुरुषांच्या मैत्रीबद्दल लिहिल्याबद्दल.
    जय शाहूसुर्य ॥ जय भिमसुर्य

    ReplyDelete
    Replies
    1. जय जिजाऊ व्हाटसपवर बोलु 8669172193

      Delete
  15. अप्रतिम लेख आहे आपल्या ब्लोग वरील सर्वच लेख हे अगदी उत्तम्र आहेत असेच लिखाण चालू ठेवा

    ReplyDelete
  16. पाटील साहेब लेख मस्त लिहिलात हे पुस्तक मी वाचलेले आहे मला एका मित्राने भेट दिले आहे,छान आहे.
    आपला संकेतस्थळ खुप खुप पुढे जावो हीच भवानीमाते चरणी प्रार्थना.
    जय शिवाजी । जय भवानी ।

    ReplyDelete
  17. जसे शाहू महाराज ब्राह्मणांच्या विरोधात होते तसेच त्यांचे अनेक स्नेही होते ब्राह्मण.त्यामुळे या महापुरुषांनी जे कार्य केले ते द्वेषई म्हणून नव्हे तर विरोधक म्हणून.त्यांच्य कार्यास प्रणाम.

    ReplyDelete
  18. नुसते शाहू महाराज आणी आंबेडकराचे विचार सांगण्यापेक्षा डोक्यात घाला म्हणजे ठीक होईल आणि ब्राह्मणांचा विरोध सोडून द्या भले होईल नाहीतर प्रगती होनार नाही.

    ReplyDelete
  19. AJCHYA MARATHYANI HE LAKSHAT GHETALE TAR ATROCITY ACT LAWAYCHI WEL YENAR NAHI.AJCHYA MARATHA RAJ KARNYANI HE LAKSHAT GHETALE TAR

    52%ASALELYA OBC/DALIT SAMAJALA OBC/DALIT MUKHYAMANTRI MILEL.

    ReplyDelete
  20. अगदी बरोबर .

    ReplyDelete
  21. जिंकलस मित्रा !!!!!!!!!!!!!!!
    Both were great nation builders.

    ReplyDelete
  22. Excellent write up ! Great work indeed. Way to go.

    ReplyDelete
  23. ५००० वर्षे ब्राह्मण लोकांनी आरक्षण उपभोगले आणि मूलनिवासी लोकांना वंचित ठेवले. ह्याचा एक अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल. आपण अभ्यासू आहात. मला खात्री आहे, त्याचा विश्लेषण आपण नक्की करू शकाल.

    ReplyDelete
  24. राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर या महापुरुषांना त्रिवार वंदन.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.