तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा.
आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता. त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते. परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी). मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’ (तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला. तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर. तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली. (सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती. (सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नाही शंका नाही.
मंबाजी उवाच
नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तुकोबांचे घातपाती निर्वाण झाले. त्यावेळी जिजाईंच्या उदरी असणारे नारायणबुवा हे वीस-एकवीस वर्षाच्या वयात जेंव्हा देहूस आले, त्यावेळचा एक प्रसंग तुकोबांचे पणतू गोपाळबुवा यांनी "नारायणबाबाचे चरित्राख्यान" यात दिलेला आहे.
एके दिवशी नारायण । इंद्रायणीचे करूनी स्नान ।
करावया श्रीमुर्तीचे पुजन । मार्गे आपण जात असता ॥
तव भेटला ब्राह्मण । तुकयाचा द्वेष्टा पुर्ण ।
मंबाजी ज्याचे नामाभिमान । तो दुष्टवचन बोलिला ॥
म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ? नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासि जाऊन मेला । घटस्पोट केला नसता पै ।...
यावेळी पित्याची उत्तरर्क्रिया न केल्या कारणाने मंबाजीने नारायणाला मुर्तीला स्पर्ष सुद्धा करू दिला नाही. अखेर मंबाजीच्या उर्मटपणामुळे त्याला तिघा भावांनी ठोकून ’दिल्हा ग्रामांतरी लावुनिया ॥’ असे म्हंटलेले आहे. वरील प्रसंग हा गोपाळबुवांना अधिक्रुत परंपरेद्वारे अवगत होणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच "विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांनी (३१६०)" अशा मंबाजीने हा डंख मारणे देखील नैसर्गिक आहे, यात शंकेला जागा नाही. तुकोबासंबंधी मंबाजीने हा केलेला विषारी उपहास पाषाणह्रुदयी मंबाजीच्या स्वभावाची यथातथ्य कल्पना आणून देतो. सदेह वैकुंठगमनाचे ताशे कोणी कितीही बडवले असले तरी आतली खरी बात मंबाजीलाच माहीत असल्यामुळे तो वीस एकवीस वर्षनंतर सुद्धा दुष्टवचन बोलून नारायणाला सुतकी समजून मुर्तीस हातही लावून देत नाही.हे खचितच विचार करण्याजोगे नव्हे का ?
हत्येला जात जबाबदार ?
तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे. गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत. ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?. जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे. मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक, केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे. शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला. त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन. श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल". हा माणुस सामाजिक विषमता, वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!. तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७ श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७ श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]
धाकलं पाटील साहेब तुकोबांचा खुण जरी झाला असला तरी त्यांचे अमोल वचनांचा गाथा आज उपलब्ध आहे त्यातूनच हजारो तुकोबा निर्माण नाही का होऊ शकत ?येवढे सामर्थ्य या गाथेत नक्कीच आहे की ते असे अनेक तुकाराम निर्माण करील.
ReplyDeleteशुद्र गवताने जनांचे जीवनपीक असे धान्यपिकच ऐन उमेदितच नष्ट करून टाकावे,गलिच्छ ढेकनांनी स्वयंप्रभ व समर्थ्यवान असा अमोल हिरा भग्न करून टाकावा किंवा पटकीच्या घ्रुणास्पद जंतूंनी विश्वाचा शोध घेऊ शकणारे सर्वाच्च मानवी जीवन पाहता पाहता धुळीस मिळवावे तद्वत शुद्राव्रुत्ती मंबाजी आणि कंपनीने तुकोबांसारख्या महान विभुतीचा राष्ट्राच्या अगदी गरजेच्या परिस्थितीत दुष्टपणे घातपात करून जगाची केवढी हानी केली आहे याची कल्पनाच केलेली बरी.
Deleteबरोबर आहे उलट तुकोबांचे अपुर्व अलौकिक अमर तेज त्यांच्यावरील आघातांनी अजुनच उजळून निघाले आणि त्यांचे विरोधक हे पुर्णत: धुळीस मिळाले.पुर्णता संपले आहेत.
Deleteसत्य आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात "सत्तेचे दरबार उजाडले । परि राज्य चाले संतांचे ॥" याच या राष्ट्रसंतांच्या वचनानुसार मोठमोठे राजे आले नि गेले त्यांचे प्रसाद व दरबार नामशेष झाले.परंतू "एकछत्रीराज तुक्या पांडुरंगी काज" याप्रमाणे संतश्रेष्ट तुकोबारायांचे अधिराज्य मात्र आजही कोटी-कोटी सुजनांच्या ह्रुदयसिंहासनावर अबाधितपणे चालू आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरातील प्रभु पांडुरंग तुकोबांच्या पुण्यदिनानिमित्तने आजही गहिवरल्या ह्रुदयाने व ओलावल्या डोळ्यांनी सहधर्मिणी रखुमाई पुढे उद्गारत आहे.
Delete"माझा प्रेमाचा पुतळा । तुका टाकोनिया गेला ॥
माझ्या जीवी त्याचा छंद । पांडुरंग रडे फ़ुंदे ॥
काय सांगो तुज गोष्टी । दु:ख न माये ते पोटी ॥
म्हणे रुक्मिनीचा कांत । माझे संबोधाचे चित्त ॥
सर्व गुणातीत गोड । तुका लावण्याचे झाड ॥"
[आषाढस्य प्रुष्ठ क्र.४५]
तुकोबांच्या गाथामध्ये काही अभंग घुसडले गेले आहेत त्याच प्रमाणे वैकुंठगमनाचे अभंग देखील त्यातील प्रक्षिप्तच म्हणावे लागतिल.सत्य बहेर येणे गरजेचे आहे.
ReplyDeleteअप्रतिम लेख आहेत तिन्हीही.सर्वच भागात थोडे थोडे विश्लेषन छान वाटले मलाही वाटत होतेच की तुकोबांचा खुनच केला आहे भटांनी.अभ्यासपुर्ण लेख आहे धन्यवाद.
ReplyDeleteपाटील आपण खुप अभ्यासपुर्ण लेखन केले आहे पण मला वाटते की संत तुकाराम महाराजांनी वैकुंठगमनाचे अभंग लिहिले आहेत त्यातच सिद्ध होत नाही का ? तुकोबांच्या गाथेमध्ये असे अभंग आहेत त्यात वैकुंठगमनाचे वर्णन आहे आपन हे दुर्लक्षीत केले आहे का कि निव्वळ एखाद्या जातीला बदनाम करण्यासाठी हा प्रपंच ?? समजले तर बरे होईल.
ReplyDeleteपहिला मुद्दा असा की मी ब्राह्मण जातीचा उल्लेख इथे केलेला नाही आणि मीच लिहिले आहे की याला जातीयता लावणे म्हणजे तुकारामद्रोह आहे त्यमुळे असा आरोप खोटा ठरतो.
Deleteराहिली गोष्ट [क्षेपक] अभंगाची मग अशी वचणे रामदास स्वामींच्या बाबतीत नाहीत का ??? मिरज येथील बाड क्र.६२६ मधील रामदासांचे अभंग प्रयाणकालचे दिले आहे.त्यात त्यांनी देवाला ”नेई निजधामा आपुलिया” अशीच प्रार्थणा केली आहे.इतकेच नव्हे तर आत्माराम रामदासींनी रामदासांचे निर्वाण वर्णन करताना तर "जिकडे तिकडे विमान छाया" दाटल्याचेही दर्शवले आहे.(दासविश्रामधाम वर्ग ११३) रामदासांनी असे देखील म्हंटलेले आहे की "जेथुनी आलेची तेथेची जाऊ आपल्या स्थळा " रामदास म्हणे चला कोण येतो तो ? विलंब नका लावू राम वाट पाहतो.
मुळात झालेल्या घटनेचा आत्ता उलघडा करून आपण काय साध्य करणार आहोत ? ठिक आहे आम्ही मंबाजी भट आणि त्याच्या कंपनीचा जाहीर निषेद करतो
ReplyDeleteपरांजपे & परांजपे
तुकोबांच्या खुनाला बामन जातच जबाबदार आहे असे मला वाटते.जर मंबाजी बामन नसता तर त्याने आपल्या तुकोबांना मारले असते का ?
ReplyDeleteकाही दिवसांपूर्वी नगर येथे एका विकृत देशमुखने स्वताच्या 4 वर्षाच्या पुतणी वर अतिप्रसंग करून खून केला मग याला त्याची जात जबाबदार धरायची की ?????
Deleteजर त्याच्या जातीच्यानी त्या घटनेचे समर्थन केले तर .. जातच दोषी धरले पाहिजे
Delete[im]https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/t1.0-9/1495540_1516521395241500_26725745_n.jpg[/im]
ReplyDeleteसंत तुकोबाराय हे संकट प्रसंगी लढणारे होते, रडणारे नव्हते.
Deleteअसाध्य ते साध्य |
करिता सायास ||
कारण अभ्यास |
तुका म्हणे ||
प्रयत्न केल्यास जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही...म्हणून प्रयत्न करत राहा असा संदेश देणारे तुकोबाराय..विज्ञानवादी & प्रयत्नवादी होते.भाकड गोष्टींवर त्यांचा विस्वास नव्हता...त्यांनी समाजातील दांभिकपानावर कडाडून टीका केली..स्वर्ग -नरक नाकारला...या धर्तीवरील निसर्गाशी नाते जोडले.."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" सांगितले..तुकाराम महाराज्जांनी अतिउच्च "सायुज्यपद'(क्लास वन मोक्षपद) नाकारले...कधीहि भंगणार नाहीत असे "अभंग" निर्माण केले...शिवरायांसारखे वारकरी आणि धारकरी तुकोबारांच्या अभंगातून घडले...नामदेवे रचीयला पाया~तुकोबा झालासे कळस...तुका केव्हढा -केव्हढा तुका आकाशाएव्हढा !!
तुकोबारायांचे निधन झाले त्यावेळी तुकोबारायांचे वय केवळ ४२ वर्षाचे होते...हे वय काही देहत्याग करण्याचे वय नाही... आणि विमान तुकोबांनाच घ्यायला का आले ? इतरांना का नाही ? विमानाचा तेव्हा शोध तरी लागला होता का ??अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मनुवाद्यांकडे नाही...संघर्ष करू इच्छिणारे तुकोबाराय वैकुंठाचा विचार कसा करतील ???
ReplyDeleteनाही वैकुंठाला गेला ।
तुका मारूनी टाकला ।
डाव्या हाताचा कलंक ।
उजव्या हाताने झाकला ॥१॥
ऐसे बोलीले बयान । आले नेण्यासी विमान ।
त्यात बैसुनिया तुका ।
गेला निघुनी गुमानं ॥२॥
खरे काय , काय खोटे । सत्य
जाणूनी घेवावे ।
मीही सांगितले म्हणुनी । नाही विश्वासी रहावे ॥३॥
गीतेवरी भाष्य ग्रंथ ।
तुका लिही मंत्रगीता । त्याने
भडकला तेंव्हा । वेदाभिमान्यांचा
माथा ॥४॥
वर्णव्यवस्था तयाने । सारी येईल धोक्यात ।
वेदाविरोधाचे ज्ञान । कैसे भरले
तुक्यात ? ॥५॥
रामेश्वर भटा सांगे । सांगे
मंबाजी चुगली ।
मन कर्मठांची मने । तुका रोषाने फ़ुगली ॥६॥
रामेश्वराच्या दिवाणी । न्याय
मागूनी घेतला ।
तुकोबांचा ग्रंथसाठा । इंद्रायणीत
फ़ेकला ॥७॥
होते तुकाचे अभंग । बहु लोकायच्या तोंडी ।
पुन्हा आले जनलोकी । कैसी होणार
गा कोंडी ॥८॥
रामेश्वर मंबाजीने । मारियले तुकोबास ।
आणि सांगिले जगाला ।
तुका गेला वैकुंठास ॥९॥
अगदी अर्थपूर्ण
Deleteप्रिय मित्र-मैत्रिणीनो तुकाराम
ReplyDeleteमहाराजांनी आपल्या गाथेमध्ये वैकुंट ,चमत्कार आणि मोक्ष यांचा जाहीर निषेध केला आहे... १
मोक्ष तुमचा तो देवा । तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा ।
मज भक्तीची आवडी । नाही अंतरी ते गोडी ।
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे उघड गांठेळीस ।
भक्तीचे सोहाले होतील जीवासी । नवल तेविशी पुरविता ।
ज्याचे त्यासी देणे कोणते उचित । मानूनियां हित घेतो सुखे ।
तुका म्हणे सुखे देई संसार । आवडीसी थार करी माझे । २
कपट काही एक । नाही भूलायचे लोक ॥
तुमचे करितो किर्तन । गातो उत्तम ते गुण
॥ दाऊ नेणे जडीबूटी । चमत्कार उठा उठी ॥ - जगद्गुरु संत तुकाराम महाराज.
अर्थ - मला काही कपट कारस्थान येत
नाही.मी लोकांना भूलवत नाही, उलट लोकांचे,विठ्ठलाचे गुण गातो.लोकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करतो हेच माझे किर्तन आहे.मला जडीबुटी येत नाही.मी 'चमत्कार' तर अजिबातच करत नाही. प्रिय मित्र-मैत्रिणीनो तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये वैकुंट , चमत्कार आणि मोक्ष यांचा जाहीर निषेध केला आहे... माझ्या मनांत नेहमी एक प्रश्न येतो एक ही ब्राम्हनोत्तर(जातीने ब्राम्हण) संत वैकुंठा ला का गेले नाही ?? ज्या बहुजन संतांनी कर्मकांड , वर्णव्यवस्था ,जातीभेत याला विरोध केलां आहे त्याचां चमत्कारिक आणि गुढ मृत्यु झालां आहे ... आपले संत मारले
त्यांचा खून केलां पण म्हणतात ना विचार मरत नसतात. चला तर आज एक शपथ घेवू आपल्या संताच्या विचारांवर जगू कर्मकांड , वर्णव्यवस्था , जातीभेदाला विरोध करू आहात तयार ??
तुकोबारायांनी अभंगाद्वारे स्वत: वैकुंठ नाकारलेला आहे..ते म्हणतात--
Delete"सांडूनी सुखाचा वाटा |
मुक्ती मागे तो करंटा ||
का रे न घ्यावा जन्म |
काय वैकुंठी जाऊन ||
येथे मिळतो दहीभात |
वैकुंठी ते नाही मिळत ||
तुका म्हणे न लागे मुक्ती |
राहीन संगे संताचिया ||"
--संत तुकोबाराय.
१. तुकारामांची हत्या अपेक्षितही आणि अटळही; यांनी वैर ओढावून घेतले, कोणतीही तडजोड केली नाही.
Delete२. तुकारामांचा छळ काय दाखवितो?
३. छळाला धर्मग्रंथांचा पाठींबा होता
४.धुळवडीच्या दिवशी तुकारामांची धुळवड केली
५. मृत्यू नंतरच्या घटना काय दर्शवितात?
६. दुसऱ्याच दिवशी जिजाईने ब्राह्मणांना घरदार दान दिले की त्यांना हाकलून दिले ?
७. कायमच्या माहेरी का गेल्या ?
८. कान्होबा कायमचे गाव सोडून का गेले?
९. इस्टेट कोणाच्या ताब्यात गेली?
१०.मुलेही पंचवीस वर्षे फिरकली नाहीत
११.आजही तीच धर्मशास्त्रे आपल्या नैतिकतेचा आधार मानायची?
१२. विचारांची कत्तल हि शारीरिक हत्येपेक्षाही भीषण
१३.क्षमतेइतके फुलू न देणे हीही हत्याच
१४.अभंग बुडविणे हीही एक हत्याच
१५.विकृतीकरण ही आणखी एक हत्या
१६.तुकारामांच्या नावावर इतरांचे लेखन, जाणीवपूर्वक प्रक्षेप
१७.प्रक्षेपांच्या विरोधात आठ अभंग
१८.दिशाभूल करणारा अन्वयार्थ लावणे हीही हत्याच
१९.छळणारा दुराभिमानीही शुद्धच?
संत तुकाराम यांचा खून का झाला?
Delete१. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते.
२. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, यात शंका नाही.
३. पिढ्यानपिढ्या पुष्ट होत असलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला.
४. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तुकारामांचे तोंड बाद करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.
५. शुद्र असल्याकारणाने वेदाचा अधिकार नसताना तुकारामांच्या तोंडून वेदवाणी बाहेर पडणे, हे पंडितांच्या पचनी पडणारे नव्हते.
६. अनेक ब्राह्मणांनी तुकारामांना गुरुपद बहाल केल्यावर पंडितांचे पित्तच खवळले. ब्राह्मण पंडित जिवंत असताना गुरुत्व एका शुद्राकडे जात आहे, हा तर त्यांच्या दृष्टीने मोठा आघात होता.
७. धर्मशास्त्रानुसार मृत्युदंड हि एकमेव शिक्षा असल्या कारणानेच तुकारामांचा खून करण्यात आला.
संत तुकारामांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती, हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते....
लावूनि कोलित | माझा करितील घात || १ ||
ऐसे बहुतांचे संधी | सापडलो खोळेमधी || २ ||
पाहातील उणे | तेथे द्वती अनुमोदने || ३ ||
तुका म्हणे रिघे | पुढे नाही जाले धींगे || ४ || ३४२१
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन || १ ||
जीवाही आगोज पडती आघात | येउनिया नित्य नित्य करी || २ ||
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे | अवघियांचे काळे केले तोंड ||३ || ४०९१
जरी माझी कोणी कापितील मान | तरी नको आन वदो जिव्हे || ५४९.१
मरणाही आधी राहिलो मरोनी | मग केले मनीं होते तैसे || २४.१
-विश्वनाथ सांगलीकर
संत हे संतच असतात. ते आपले किंवा परके नसतात.निदान बहुजन समाज तरी असे मानतो. असे मानणारे ब्राह्मण मात्र नगण्यच. म्हणून त्यांनी आमचेच संत, आमचेच समाजसुधारक, आमचेच नायक ठार मारले असे नाही, तर त्यांचेच असे जे संत होते त्यांना सुद्धा या लोकांनी ठार मारले. त्यात बसवण्णा उर्फ बसवेश्वर आहेत, संत ज्ञानेश्वर देखील आहेत.ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली ही सुद्धा सदेह वैकुंठाला जाण्यासारखीच आवई आहे.
Deleteकवडे म्हणतात," 'फाल्गुन वद्य द्वितीया' हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते......सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही".
ReplyDeleteतुकोबांचा खून झाला अस तुम्हाला वाटून उपयोग नाही...
ReplyDeleteवाटायला काही पण वाटेल आणि मग कोणाच् पण नाव घेता येईल
प्रत्येक गोष्टीला पुरावा लागतो
तर्क तर काही पण करता येतील
तुमच्या लेखा मधून निघनारे अर्थ पहा काय निघतात
1-तुकोबाराय वैकुंठा ला गेले नाहीत
(म्हणजे ते त्या योग्यतेच् नव्हते का..???)
2- शिवाजिमहाराजांचे तुकोबा गुरु होते आणि महाराजाना त्यांच्या गुरु चा खून झाला हे समजल नाही
(आणि जवळपास 400 वर्षा नंतर आपण हां शोध लावलात म्हणजे आपल् हेरखात महाराजांच्या पेक्षा पण प्रबळ आहे का..??)
आपण फ़क्त।मंबाजी भट याच्या बद्दल बोलता आहात पण तुकोबांचे 9 अनुयायी ब्राम्हण होते ते नाही सांगत आपण यात बहिणाबाई पण आहेत
एक आपण तेवढे सत्यशोधक आणि तेंव्हा ची देहु मधली जनता दुधखुळि होती का..???
आपल्या लेखाने एकाच वेळी तुकोबारायांची भक्ति आणि शिवरायांच् कर्तुत्व या वर शंका घेताय...!!!!
तुकोबांच्या वाणी ने सगळा समाज मोहित झाला असताना एक भट तुकोबांचा खून करतो आणि बाकी सगळे अनुयायी गप्प बसतात का..??
एका सामान्य स्त्री वर पाटलाने बदअलम केला तर काय शिक्षा होते हे उदहारण अगदी त्याच वेळच् आहे
त्याच स्वराज्यात तुकोबांचा खून झाला हां दिव्य शोध तुम्हाला लागला कसा
का 20 रुपयांची फुकट मिळणारी पुस्तक तुम्ही पण वाचता..??
ज्ञानी आहात आभ्यासु आहात तर हे असेल आरोप करुण स्वस्त पब्लिसिटी का मिळवता..??
आणि तुम्हाला काय वाटते ह्या वर लेख नका लिहु तर कुठे काही पुरावा किंवा कागदपत्र उपलब्ध झाल तर मग त्याच्या आधारे लिखाण करायच असत
आता रांज्याच्या पाटला ने बलात्कार केला याला तर लेखी पुरावा पण आहे
मग आम्ही अस समजायच का की सगळे पाटिल हेच उद्योग करतात..??
एक खंडोजी खोपडे गद्दार निघाला मग काय आम्ही सगळे12 मावळातले देशमुख गद्दार होतो का...???
आणि देशमुख असून पण
लिस्ट देईल तुम्हाला किती देशमुख आणि मराठा काय काय उद्योग करत होते तेंव्हा
कृपया अस जाती जाती मधे विष कालवु नका
आज आपल्या समाजा समोर समस्या वेगळ्या आहेत त्यावर उपाय सुचवा
www.vidarbha24news.com
ReplyDeleteतुकोबा वैकुंठाला सदेह गेले!
ReplyDeleteतयांच्यासाठी कुबेरांन खास पुष्पक विमान पाठवलं होत!
..
..
..काय याक याक
ही बामणी टाळकी!
संत तुकाराम आणि चमत्कार...
ReplyDeleteआमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!
चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात.
'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे.
चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.
साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता!
चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-
कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)
वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे.
वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे.
पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपवावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?
Ata changli tippani dili tyala pan manjurichi vel ka kay time is money boss
ReplyDeleteधन्यवाद प्रतिक्रियेबद्दल.थोडा इतर कामात व्यस्त होतो त्यामुळे प्रतिक्रिया देता आली नाही.
DeleteSamj sudhara desh badlel changalya ani kharya dyanane
ReplyDeleteनारायण बाबा चरित्र आख्यान (गोपाळ बुवा) कुठे मिळेल कृपया सांगावे
ReplyDelete