22 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]

संशोधनापुढे ध्येय
        तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय  ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ? 
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
                                                                                                                                 (क्रमश:)

18 प्रतिक्रिया :

 1. छान लेख आहे मुद्देसुदपणे मांडलेला आहे.तुकोबांचा खुनच केला आहे हे आता बाहेर येत आहे.ही बाब अत्यंत महत्वाची आहे.आपले कार्य कौतुकास्पद आहे.धन्यवाद पुढच्या लेखाची वाट पाहतोय
  जय हिंद जय महाराष्ट्र

  ReplyDelete
 2. तिर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥१॥
  मिळालिया संतसंग । समर्पितां भलें अंग ॥ध्रु.॥
  तिर्थी भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥२॥
  तुका म्हणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥३॥
  तिर्थाच्या ठिकाणी जाण्याची इतकी धडपड आपण करतो, आणि कळत नकळत लुटले जातो. तुकाराम म्हणतात, संतसंग हाच खरा सर्व भावनिक गरजांचा उतारा आहे. नाहीतर कोणीतरी म्हटलेच आहे ना की...
  रांड़, सांड़, सीढ़ी, सन्यासी | इनसे बचे तो काशी ।
  तुकारामांनी तर सांगितले आहे की पूजा करताना संतमंडळी घरी आली तर आधी त्यांचा सत्कार करावा आणि मग देवाची पूजा.
  करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥१॥
  देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥.
  शाळिग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥२॥
  तुका म्हणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥

  ReplyDelete
 3. संत तुकाराम महाराजकी हत्या हुई’, प्रशासन ऐसा वक्तव्य तुरंत रोके !-ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज

  ReplyDelete
  Replies
  1. आशुतोष तांबेकरMonday, 14 April, 2014

   खरं तर असल्या फ़ालतु बनावट भक्तांना बदडले पाहिजे.जे सत्य स्विकारत नाहीत ते तुकोबांचे नाव घेण्याचे लायकीचे नाहीत.

   Delete
  2. अजय जगतापThursday, 17 April, 2014

   तुकोबारायांचा खून केल्यावर भटांनी लोक देह कुठे असे विचारतील म्हणून सदेह वैकुंठी जात आहेत/ गेले असे सांगितले..त्यादिवशी धुलवलीचा (रंगपंचमी) दिवस असल्यामुळे लोक उत्सवात होते..पण ग्रेट तुकोबारायांना मुकले होते...काही लोकांनी विचारले की "तुकोबाराय वैकुंठी जाताना आम्हाला कसे दिसले नाहीत" यावर भटांनी कावा करून सांगितले की "ज्यांना दिसले नाहीत ते दोन बापाचे आहेत"
   बहुजन समाज गुलामीत राहावा म्हणून मनुवादी अश्या पद्धतीने धार्मिक दह्शदवादाचा वापर करतात...

   Delete
 4. तुकाराम महाराजांचा खून हा रामेश्वर भट, मंबाजी भट व सालोपालो या तीन कर्मठांनी मोठ्या शिताजफीने करून पचवला, व त्यातील रामेश्वर भटाने वैकुंठगमनाची एक सुरस कथा बनवून आजही लोकांना अंधारात ठेवले आहे. याचा पुरावा म्हणजे त्यांचे सर्व लिखित वाङमय व पुरावे यांच्या आधारे तथाकथित वैकुंठ गमनावेळी केवळ रामेश्वरंच कसा हजर होता, महाराजांची सावली असलेले टाळकरी हे तेव्हा का नव्हते..?? कारण ते उपस्थित असल्याचा एकही मान्य पुरावा इतिहासात नाही.

  ReplyDelete
 5. तुकारामांविषयीचे दोन्ही लेख अतिशय आवडले. तुम्ही खूप उत्तम काम करत आहात हे वेगळे सांगणे नलगे. नेमाड्यांनी साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या 'तुकाराम' नावाच्या छोटेखानी पुस्तकात तुकारामांवर ख्रिस्ती धर्मप्रसारकांचाही मोठा प्रभाव पडला होता असे लिहिले आहे. किंबहुना विठ्ठल या एकाच देवाची भक्ती वारकरी भक्तीसंप्रदायातील सर्वांनी करावी यामागे तुकारामांवर एकेश्वरवादी इतरधर्मीयांचा असलेला प्रभाव हे महत्त्वाचे कारण आहे.
  तुकारामांविषयी अधिक काही माहिती मिळाल्यास जरूर द्यावी.

  ReplyDelete
 6. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
  ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
  भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.

  ReplyDelete
 7. संत तुकारामाचे वैकुंठगमन ही काय भानगड आहे? ज्या काळात विमानाचा शोध पण लागला नव्हता त्या काळात विमान कुठून आले होते त्यांना न्यायला. तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन की हत्या? याचा शोध घ्यायला हवा.

  ReplyDelete
 8. http://shivrayanchakhun.blogspot.in/2010/09/blog-post.html
  येथे जाऊन वाचा शिवरायांचा म्रुत्यु की खून याविषयी चांगली माहिती दिलेली आहे.

  ReplyDelete
 9. नितीन सावंतMonday, 14 April, 2014

  तुकोबांचा खुनच झाला आहे याच आता काहीच शंका नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. ब्राह्मण आणि हिंदुत्ववादी घाबरट आहेत.तुकोबांचा खून झाला हे सिद्ध झाले तर त्यांना चांगलेच माहीत आहे की ब्राह्मणांचं काही खरं नाही कारण ब्राह्मणांनीच त्यांना छळले आहे.म्हणून ते वैकुंटगमन म्हणून जाबडत असतात.

   Delete
 10. भाऊसाहेब केसरकरThursday, 17 April, 2014

  संत तुकाराम यांचा खुनाच झाला आहे हे कोणी मान्य करो वा न करो ,
  त्यांचेच नाही तर ज्ञानेश्वर आणि भावंडांचे पण असेच काहीतरी झालेले आहे !
  मीराबाईचे पण असेच झाले आहे
  आज जसे पुतळे उभारून स्मारके करून लोक परत पापे करायला मोकळी होतात तसेच हेपण आहे !

  ReplyDelete
 11. हर्षवर्धन पाटीलThursday, 17 April, 2014

  मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री. बी. जी. कोळसे पाटील यांचे तुकारामांच्या हत्येसंदर्भातील सेलू येथे भरलेल्या लोकन्यायालयाच्या उद्घाटन प्रसंगीचे विचार :

  "तुकाराम महाराजांचे तुकडे-तुकडे करून त्यांना मारण्यात आले. परंतु लोकांना सांगण्यात आले की, ते सदेह पुष्पक विमानाने स्वर्गाला गेले, अन आजही आपण या भाकड कथांवर विश्वास ठेवतो."

  ReplyDelete
 12. अभिनव शिंदेThursday, 17 April, 2014

  तुकाराम महाराजांचा खून हा रामेश्वर भट, मंबाजी भट व सालोपालो या तीन कर्मठांनी मोठ्या शिताजफीने करून पचवला, व त्यातील रामेश्वर भटाने वैकुंठगमनाची एक सुरस कथा बनवून आजही लोकांना अंधारात ठेवले आहे. याचा पुरावा म्हणजे त्यांचे सर्व लिखित वाङमय व पुरावे यांच्या आधारे तथाकथित वैकुंठ गमनावेळी केवळ रामेश्वरंच कसा हजर होता, महाराजांची सावली असलेले टाळकरी हे तेव्हा का नव्हते..?? कारण ते उपस्थित असल्याचा एकही मान्य पुरावा इतिहासात नाही.

  ReplyDelete
 13. अजय जगतापThursday, 17 April, 2014

  संत तुकाराम महाराज्यांकडे २०० एकर जमीन होती, महाजनकी होती, शेतकऱ्याची कर्ज खाते बुडवली आणि त्यांना कर्जातून मुक्त केले,
  अश्या तुकोबांनी छत्रपती शिवराय घडवले तेच हलकट बामणांच्या डोळ्यात खुपले,
  असे तुकोबा परत घडू नये म्हणून "सेझ", "जैतापूर" सार...खे प्रकल्प आणून बहुजनाच्या जमिनी काढून घेतात व त्यांना उपाशी मारण्याचा डाव खेळतात हि विषारी सापाची लाही लाजवेल अशी भटा-बामनाची औलाद !!!!

  ReplyDelete
 14. संत तुकाराम आणि चमत्कार...

  आमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!

  चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात.

  'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे.

  चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.

  साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता!

  चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-

  कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
  तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
  दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
  नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
  नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
  नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
  नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
  नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
  नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
  नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
  नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
  आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
  नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)

  वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे.

  वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे.

  पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपावावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.