शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले.ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले. शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती. या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही हिंदू विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे.येर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.
वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही.
रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा... जय शंभुराजे
ब्राह्मणी धर्माचे विध्वंसक महाधुरंदर महापराक्रमी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजेंना विनम्र अभिवादन...
ReplyDeleteजय शंभुराजे.
११ मार्च-शंभूराजे स्मृतिदिन..
ReplyDeleteएक नम्र विनंती
१) यादिवशी आपल्या लाडक्या राजाला मनुच्या औलादींनी हालहाल करुन मारले होते.हा दिवस आपल्यासाठी शोकदिन आहे.तो त्या पध्दतीनेच आचरणात आणा.
२) या दिवशी कोणीही गोड पदार्थ खाऊ नयेत,जमल्यास शंभूराजांचे स्मरण म्हणुन यादिवशी उपाशी रहावे.
३) सकाळी लवकर उठुन शंभूराजांच्या फोटोस हार घालुन त्यांना वंदन करावे.
४) शंभूराजांच्या सत्य चरीत्राचे वाचन करावे.
५) शंभूराजे हे आयुष्यभर कोणा जाती अथवा धर्मासाठी जगले नसुन ते इथल्या रयतेसाठी,सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांसाठी जगले हे सर्वांना समजावुन सांगा आणि इथुन पुढे शंभूराजांच्या नावावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासुन सावध रहा.
जय शंभूराजे
देश धरम पर मित्नेवाला
Deleteशेर शिवा का छावा था
महापराक्रमी परम्प्रतापी
एक ही शम्भू राजा था ||
तेजपुंज तेजस्वी आँखे
नीकल गई पर झुकी नही
दृष्टी गई पर राष्ट्र उत्थान का
दिव्या सपना तों मीटा नही ||
दोनों पैर कटे शम्भू के
धेय्या मार्ग से हटा नही
दोनों हाथ कटे तों क्या हुआ
सत्कर्म कभी भी रुका नही||
मनगटा मधे एवढे बळ कि तलवारीच्या एक घावात मनुष्य काय अश्वाचे पण दोन तुकडे पडतील , भरदार शरीरयष्टि ,वाघाची आक्रमकता आणि अद्वितीय युद्ध कौशल्य ह्याचे धनि म्हणजे छत्रपति संभाजी राजे. शम्भू राजे हे अटकेपार महाराष्ट्र राज्य वाढवणारे महान योद्धे.२४ नोव्हेंबर १६८३ रोजी जुवे बेटावर फिरंग्यांचा शंभू राजांच्या सैन्याकडून दारूण पराभव झाला होता. ह्या नंतर गोवा जवळ पास मराठी साम्राज्यात आले होते. राजकीय आणि पारिवारिक कलह सहन केलेले शंभू राजे हे त्या वेळी एकटेच ४-५ साम्राज्यांशी समर्थपणे लढत होते. त्याचे पराक्रम आणि युद्ध कौशल्य हे त्यावेळी सर्वात उत्कृष्ट दर्जाचे होते म्हणून कि काय औरंगजेब त्यांना फितूरी करुनच पकडू शकला आणि ह्या नंतर एक योद्धे ते इतिहास वीर हा त्यांचा प्रवास सुरु झाला. जसा महाभारतामध्ये कर्ण होता , जो सर्व गुण सम्पन्न असून पण शेवट कौरव मित्र म्हणून स्वतः वर एक डाग लावून गेला तसे काही शम्भू राजांच्या बाबतीत आयुष्याच्या सुरुवातीस झाले असे म्हणता येइल. पण इतिहासामधे आपला मृत्यु जगणारे जर कोणी असतील तर त्यात पृथ्वीराज चौहान आणि छत्रपती संभाजी राजे हे अग्रस्थानी आहेत. छत्रपति शिवरायांच्या प्रभावशाली राज्याच्या शेवटी मराठा साम्राज्यात आलेली मरगळ आणि संभ्रमता ही शम्भू राजे ह्यांच्या बलिदानाला पाहून क्षणात निघून गेली आणि स्वराज्यात एक चैतन्य निर्माण करून गेली. जसे पर्वतावर पाणी,हवा सतत आदळत असते पण पर्वत हां स्थिर असतो तसे शम्भू राजे हे औरंगजेबा समोर आपल्या मृत्युसमयी स्थिर होते. त्यांच्या शरीराला जहाल वेदना देणारे मुघल हे त्यांच्या आत्म्याला त्रास देण्यास सपशेल अपयशी ठरले आणि मृत्युस प्राप्त ठरून पण औरंगजेबा समोर शम्भुराजेच जिंकले. ह्या मराठी मातीचा शंभूराजे हा एक चमत्कार होता त्याना विनम्र अभिवादन ..
Deleteहिंदूधर्मरक्षक हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना शतश: नमन.
ReplyDeleteजयस्तु हिंदुराष्ट्रम जय भवानी जय शिवाजी
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व
ReplyDeleteशत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतून मोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.
ReplyDeleteसंभाजी राजांना औरंगजेबाने पकडले परंतु लगेच मारले नाही. औरंगजेबाने संभाजी राजांना अतिशय हाल-हाल करून ठार मारले. सर्व शत्रूंना औरंगजेबाने एका घावात ठार मारण्याची शिक्षा दिली, मग संभाजी राजांच्या बाबतीतच अशी शिक्षा का दिली याचं विचार कारणे गरजेचे आहे. मनुस्मृती सांगते, जर शूद्राने संस्कृत ऐकले, बोलले किंवा वाचले तर त्याला हाल-हाल करून ठार मारावे. यासाठी मनुस्मृती मध्ये अनेक कठोर शिक्षा दिल्या आहेत. उदा. कान कापणे, डोळे काढणे इ. त्यामुळे संभाजी राजांना मनुस्मृती प्रमाणे ठार मारले नसेल कशावरून ? मग प्रश्न पडतो की औरंगजेब मुसलमान होता, तो संभाजी राजांना मारण्यासाठी मनुस्मृतीचा आधार कसा घेईल ? औरंगजेब मुसलमान असला तरी त्याच्या पदरी असणार्यामध्ये अनेक ब्राम्हण होते. त्यांनी औरंगजेबाला मार्गदर्शन केले नसेल कशावरून ?
ReplyDeleteहे १००% खोटे आहे.डा.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेला छ.संभाजी स्मारक ग्रंथ वाचा.संभाजी महाराजांच्या हत्येच्या वेळी छावणीत हजर असलेल्या खाफ्ही खान,साकी मुस्तैद खान आणि ईश्वरदास नागर यांनी लिहून ठेवले आहे की मुल्ला-मोलवींचा सल्ला घेवून,कुराणाच्या आद्न्येप्रमाणे संभाजी महाराज आणि त्यांचा पेशवा कवी कलश यास मारण्यात आले.समकालीन लिखाणात कुठेही औरंगजेबाच्या ब्राह्मण सल्लागाराम्चा उल्लेख नाही.तसेच कवी कलश हा ब्राह्मण ही सोबत मारला गेला.मनुस्मृतीत ब्राह्मणाची हत्या सांगितली आहे काय?गूढीपाडवा हा खूप जुना सण आहे,पहा डा.आ.ह.साळुंखे यांच्या परशुराम या पुस्तकातील सीता स्वयंवराचे प्रकरण.
Deleteमधुसुदन चेरेकर यांच्या फ़ेसबुक प्रोफ़ाईल वरून
आम्हाला आमचे आई वडिल सांगतात की हा नववर्षदिन आहे त्याचबरोबर यादिवशी राम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते त्यामुले सर्वांनी गुढ्या उभारल्या त्याची आठवन म्हणून आजही आम्ही गुढ्या उभा करतो. ही माहिती आई वडीलाना ब्रम्हानान्नी सांगितलेली असते ते अपनास सांगतात यात खरे किती? खोटे किती ? त्याचा शोध घ्यायचा नसतो कारन आपल्या देशात धर्मं ग्रंथाचे ऑपरेशन करण्यावर बंदी आहे त्यातल्या त्यात देव्धार्माची बाब असेल तर मग असा विचार मानत एने सुद्धा येणे पाप. राम अयोध्येत परत आले म्हणून अयोध्येत गुढ्या उभय करायला हव्यात. हे खरे असेल तर अयोध्येत गुढी पाडवा सर्वात थाटiमाटiत साजरा करायला हवा. अयोध्येत गुढ्या उभय करतात का? आहो! अतोध्येतिल लोकांना गुढ्या म्हणजे काय? हेच माहीत नाही तर उभय करण्याचा प्रश्नच येत नाही. एवढेच काय महाराष्ट्र वगाळता आशय गुढ्या भारतात कोठेच उभारल्या जात नाहीत. शिवाय राम अयोध्येत गुढी पाडव्याला नसून दिवालिच्या पाडव्याला परतला हे लक्ष्यात घ्यायला हवे यामधे गमतीचा भाग असा की तर गम्तिचाच नव्हे तर चिद अनानारा भाग असा की ब्रम्हाणी धर्मत तामब्या शुभ कोंटा ? तर सवासा (सरल ) त्यात नाग वेलिची पाने आहेत वर श्रीफल (नारळ ठेवला आहे चारही बजुन्ना पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत. या धर्मत सवासा तामब्या शुभ तर गुढीपाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुधिला पलता तामब्या हा शुभ कसा? या धर्मत पलते सर्व अशुभ तर त्याच दिवशी हा पलता तामब्या शुभ कसा? केलाय विचार कधी? ब्राम्हण आम्हाला गुढी पाडवा सन साजरा करण्यास का सांगतो ? या मधे एक षड़यंत्र आहे
ReplyDeleteसंभाजी महाराजांना मानाचा मुजरा....जय संभाजी राजे जय मराठा
ReplyDeleteमर्द मराठ्यांनो आपल्या राजाचं बलीदान कधीही विसरू नका..शेवटचा शत्रु मरेपर्यंत लक्षात ठेवा..
महाराज राजश्रियाविराजीत नीतिवंत , कुलवंत , सामर्थ्यवंत सुयोध योध्दा अजिंक्य शंत्रूंजय रणधुरंधर सुवर्णसिंहासनाधिपती छत्रपती श्री संभाजी महाराज की.
ReplyDeleteगुढी पाडव्याबाबतीत पसरवण्यात येणारा गैरसमज चुकीचा - अखिल भारतीय मराठा महासंघ
ReplyDeleteगुढी पाडवा या सणाचा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युशी संबंध जोडणे चुकीचे आहे. हा सण कृषी संस्कृतीशी संबंधित असून ‘गुढी’ हा शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथामध्ये व मराठी भाषेतील साहित्यामध्ये ‘गुढी’ हा शब्द इसवी सनाच्या १३व्या, १४व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे,
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
तसेच तुकारामांनी आपल्या अभंगातून किमान पाच वेळा गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे. कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामधी आनंद आनंद झाला आणि त्याभरात लोकांनी गुढ्या उभारल्या.
ReplyDeleteगोकुळीच्या सुखा | अंतपार नाही लेखा ॥
बाळकृष्ण नंदा घरीं | आनंदल्या नरनारी ॥
गुढिया तोरणे | करिती कथा गाती गाणे ॥ २८३९.१-४ ॥¬
संत तुकाराम महाराजांनीच आणखी एकदा म्हटलेले आहे,
रोमांच गुढियाडोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
गुढी पाडवा सणाबाबत काही लोकांनी समाजात चुकीचे गैरसमज पसरविले असून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी जोडला जाणारा संबंध चुकीचा असून संत तुकाराम महाराजांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजीराजांचा जन्म १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षाआधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता. म्हणून गुढी पाडव्याचा संभाजी महाराजांच्या मृत्युशी काहीही संबंध नाही.
ReplyDeleteउत्तर भारतात चांद्र मास पौर्णिमेला संपतात, म्हणजेच तिकडचे चांद्र मास पूर्णिमान्त असतात. दक्षिण भारतात चांद्र मास अमावस्येला संपून शुक्ल प्रतिपदेला नवीन महिना सुरू होतो. या पद्धतीनुसार महाराष्ट्रात चैत्र शुक्ल प्रतिपदा हा चैत्र महिन्याचा प्रारंभ ठरतो. चैत्र महिना हा बारा महिन्यांपैकी पहिला महिना होय. स्वाभाविकच, चैत्र शुक्ल प्रतिपदा हा वर्षाचा पहिला दिवस ठरतो. ‘प्रतिपदा’ या शब्दाचेच पाडवा असे रूपांतर झाले आहे. त्यामुळे चैत्र शुक्ल पाडवा हा नववर्षाचा पहिला दिवस होय.
म्हणून गुढी पाडवा हा सण नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती साजरा करावा व हिंदू संस्कृतीचे जतन करावे. गुढ्या उभारून घरावरती भगवा ध्वज लावावा व या सणाचे औचित्य साधून गारपिटग्रस्त शेतकर्यांीनासुद्धा मदत करावी, असे आवाहन मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे.
श्री. राजेंद्र कोंढरे श्री. गुलाब गायकवाड
राष्ट्रीय सरचिटणीस जिल्हाध्यक्ष, पुणे
वसंत ॠतुचे आगमन, कृषिजीवनाशी निकटचा संबंध, निसर्गाबरोबरचे नाते, नवीन वर्षाचा प्रारंभ इ. कारणांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेचे स्वागत करण्यासाठी आनंदोत्सव साजरा करावा, या भावनेने गुढी पाडवा साजरा करण्याची कृषी परंपरा आहे. गुढी पाडवा साजरा करणे वा न करणे, ही बाब ऐच्छिक आहे. गुढी पाडवा साजरा करू इच्छिणार्यांाना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि, त्या दिवसाकडे इतर दिवसांपेक्षा वेगळा असा शुभ मुहूर्त म्हणून पाहण्याची आवश्यकता नाही. ज्यांना गुढी भगव्या पताकेच्या वा अन्य एखाद्या स्वरुपात उभी करण्याची इच्छा असेल, ते तसे करू शकतात.
ReplyDeleteगुढीविषयी काही तपशिल ः
1) गुढी हा शब्द अस्सल देशी आहे. त्याचे मूळ संस्कृत भाषेमध्ये नाही. याचाच अर्थ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला तत्सम वा तद्भव शब्द नाही. स्वाभाविकच, हा शब्द वैदिक परंपरेतील नसून बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. शब्द बहुजनांच्या संस्कृतीमधील असल्यामुळे त्याच्या मागची संकल्पनाही बहुजनांचीच आहे. कानडी भाषेमध्ये ‘ध्वज’ या अर्थाने ‘गुडी’ असा शब्द असून ‘राष्ट्रध्वज’ या अर्थाने ‘नाडगुडी’ असा शब्द आहे. ही गोष्ट देखील ‘गुढी’ हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला नसून मूळचा बहुजनांच्या आणि प्रामुख्याने दक्षिण भारतीय बहुजनांच्या भाषेतील आहे, हे दर्शविणारा आहे.
2) मराठी भाषेमध्ये गुढी हा शब्द सुमारे इसवी सनाच्या तेराव्या-चौदाव्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते. उदा.-
संत चोखोबांनी एके ठिकाणी म्हटले आहे ः
टाळी वाजवावी | गुढी उभारावी |
वाट हे चालावी । पंढरीची ।।
संत चोखोबांच्या अभंगातील चरण
(श्री सकल संतगाथा, खंड १ला, श्री संतवाङ्मय प्रकाशन मंदिर, पुणे
प्रकाशक-रमेश शंकर आवटे, प्र.आ.१९२३, दु.आ.१९६७, पृ.१२९)
संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ः
ReplyDeleteआइकैं संन्यासी तो चि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगिं ।
गुढी उभिली अनेकीं । शास्त्रांतरी ।। ज्ञानेश्वरी ६.५२ ॥
‘स्मृतिस्थळ’ हा महानुभाव साहित्यामधील ग्रंथ सुमारे १४व्या शतकात लिहिला गेला आहे. या ग्रंथात ‘गुढी’ या शब्दाची ‘गुढ्या’ आणि ‘गुढेया’ ही रूपे पुढीलप्रमाणे आली आहेत ः
१ ः आणि तुम्ही गुढ्यासरीसें यावे ः (स्मृतिस्थळ ८३)
२ ः गुढेयासरिसें बैजोबा गाडेनिसिं निगाले ः (स्मृतिस्थळ ८५)
‘शिशुपाळवध’ हा महानुभाव साहित्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ होय. त्यामध्ये म्हटले आहे ः
घेत स्पर्शसुखाची गोडी ः श्रीकृष्ण आळिंगिला भुजादंडीं
तंव आत्मा उभितसे गुढीः रोमांचमीसें ॥ शिशुपाळवध ६० ।।
(वरील उदाहरणांतील जाड ठसा मूळचा नव्हे.)
राम आणि सीता यांचा विवाह झाल्यानंतर ते अयोध्येकडे निघाले असताना परशुराम आडवा आल्यानंतर राम आणि परशुराम यांच्यामध्ये झालेल्या संघर्षात रामाने परशुरामाचा पाडाव केला. त्यानंतर दशरथांनी सर्व वर्हातडासह अयोध्येत प्रवेश केला. त्या वेळी अयोध्येतील प्रजेने ध्वज-पताका उभारल्याचे रामायणाने म्हटले आहे. ध्वज-पताका उभारल्या, म्हणजेच अयोध्येतील जनतेने आनंदाने गुढ्या उभारल्या, असा होतो.
संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून किमान पाच वेळा गुढी / गुढ्या उभारण्याचा उल्लेख केला आहे.
ReplyDeleteकृष्णाच्या जन्मानंतर गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि त्या भरात लोकांनी गुढ्या उभारल्या, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. त्यांचा यासंबंधीचा अभंग पुढीलप्रमाणे आहे ः
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाही लेखा ।।
बाळकृष्ण नंदा घरी । आनंदल्या नरनारी ।।
गुढिया तोरणे । करिती कथा गाती गाणे ।। २८३९.१-४ ॥
कृष्णाने कालियावर मात केल्यानंतर त्याच्या गोपाळ मित्रांना अतिशय आनंद झाला. त्यांच्यापैकी जो चपळ होता, त्याच्या हातात गुढी देऊन त्याला कृष्णाने आनंदाची बातमी देण्यासाठी पुढे पाठविले, हे नोंदविताना तुकारामांनी म्हटले आहे,
पुढ पाठविले गोविंदें गोपाळा । देउनि चपळा हातीं गुढी |।४५५३.२।।
आनंदाची ही बातमी गोकुळात पोचल्यानंतर तेथे काय घडले, ते सांगताना तुकाराम म्हणतात,
शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥
आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली गुढी हरुषें मात ॥
४५५५.१,२ ।।
त्यानंतर कृष्ण गोकुळात आल्यावर तेथे किती आनंदाचे वातावरण होते, ते नोंदविताना तुकाराम म्हणतात,
नेणे वर्णधमर्जी आली समोरी | अवघी च हरी आळिंगिली ॥
हरि लोकपाळ आले नगरात | सकळांसहित मायबाप ॥
पारणे तयांचे जाले एका वेळे | देखिले सावळे परब्रह्म ॥
ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती | गुढिया उभविती घरोघरीं ॥
घरोघरीं सुख आनंद सोहळा | सडे रंग माळा चौकदारी ॥
४५५६.१-५ ॥
संत तुकारामांनीच आणखी एकदा म्हटले आहे,
रोमांचगुढिया डोलविती अंगें | भावबळें खेळविती सोंगें रे |
तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे | या विठोबाच्या अंगसेंगें रे ॥
अ.क्र.१९२.५ ॥
(जाड ठसा मूळचा नव्हे.)
संत तुकारामांचा मृत्यू इसवी सन १६५० मध्ये झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म इसवी सन १६५७ मध्ये झाला. याचा अर्थ संभाजी महाराजांच्या जन्माच्या सुमारे ७ वर्षे आधी वैकुंठवासी झालेल्या संत तुकारामांचा हा अभंग इसवी सन १६५० पूर्वीच लिहिला गेला होता.
Please Visit Sambhaji Maharaj website
ReplyDeletewww.sambhajimaharaj.com