22 September 2013

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी महापुरुषांचे कार्य विचार डोक्यात घ्या त्यानेच खरी प्रगती होईल.
                                         - शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब
                                                         (मराठा सेवा संघ संस्थापक)
            संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांना खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनीच समोर आणला.महात्मा फ़ुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती.त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फ़ुले यांनी लिहिले.शिवरायांचा पोवाडा लिहुन खरे शिवराय गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभुषण होते हे सत्य सर्वप्रथम मांडले.महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार.शिवरायांना ते कमी लेखत नव्हते.किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच.शिवराय हे निरक्षर नव्हते.आज याचे पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही.आज महात्मा फ़ुले हयात नाहीत.ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता.महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय ,छ.शिवाजी महाराजांचा विजय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना "क्रुष्णराव अर्जुन केळूस्कर" गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते.या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.केळूस्कर गुरुजी हे एक बहुजन विद्वान होते.छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बॅरिस्टर" झाल्यावर त्यांची कोल्हापूर शहारात रथातून मिरवणूक काढून फ़ुले उधळली होती.राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.सयाजीराव गायकवाड हे इ.स. १८७५ ते इ.स.१९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते.बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
मराठा स्वराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणार्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलुखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फ़डकत ठेवला;पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही.परंतू आपला इतिहास न समजलेला बहुजन आजही आपण कोण आहोत हे विसरत आहेत.त्यामुळे आता आपणच ठरवावे की,आपण कोण आहोत ? कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील ? हाच खरा प्रश्न आहे.

10 प्रतिक्रिया :

  1. खूपच छान लेख!

    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. ब्राह्मण नेत्यांनी घडविलेल्या मुस्लिमविरोधी दंगली!

    स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांच्या विरोधात अनेक दंगली झाल्या. यातील प्रत्येक दंगलीचे नेतृत्व ब्राह्मणांनीच केले आहे. फार जुना इतिहास चाळायची गरज नाही. १९९० नंतरच्या काही दंगलींकडे नजर टाकली तरी ब्राह्मण हेच मुस्लिमांचे खरे शत्रू असल्याचे दिसून येईल.

    १९९२ : बाबरी मशीद पाडली :

    भारतातील ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपल्या विविध संघटनांच्या मदतीने ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. भाजपा, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या तीन प्रमुख संघटना बाबरी मशीद पाडण्यात सहभागी होत्या. या तिन्ही संघटना आरएसएस चालविते. बाबरी पाडण्यात आली तेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते डॉ. मुरली मनोहर जोशी. डॉ. जोशी जातीने ब्राह्मण आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली झाल्या. त्यात १२०० लोक मारले गेले. मरणाèयांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती.

    १९९२-९३ मुंबई दगंल :

    डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मुंबईत मुसलमानविरोधी दंगल झाली. त्यात ५०० मुस्लिम मारले गेले. या दंगलीची सूत्रे शिवसेनेने हलविली, असा ठपका न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने ठेवला आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले बाळ ठाकरे जातीने सारस्वत ब्राह्मण आहेत. न्या. श्रीकृष्ण दंगलीची चौकशी करीत होते, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार होते. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. जोशी हेसुद्धा जातीने ब्राह्मणच आहेत. जोशी यांच्या सरकारने १९९६ मध्ये न्या. श्रीकृष्ण आयोग रद्द केला. प्रसार माध्यमांनी आरडा ओरड केल्यानंतर २८ डिसेंबर १९९६ रोजी पुन्हा आयोग कायम करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी दंगल भडकावली असा ठपका आयोगाने अहवालात ठेवला. हा अहवालही ब्राह्मण जोशींनी फेटाळला. माध्यमांनी पुन्हा आरडा-ओरड केली. त्यावर हा अहवाल स्वीकारला पण त्यावर कारवाई केली नाही. ५०० मुस्लिमांना मारणाèया आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही.

    मुंबई दंगलीत हात असल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे एक ब्राह्मण नेते मधुकर सरपोतदार आणि इतर २ जणांना मुंबईच्या कोर्टाने २८ जुलै २००८ रोजी १ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पण त्यांना लगेच जामीन मिळाला. २० फेब्रुवारी २०१० रोजी शिक्षा न भोगताच सरपोतदार यांचे निधन झाले.

    २००२ गुजरात दंगल :

    गुजरातमध्ये मुसलमानविरोधी दंगल भडकाविण्यात आली. सुमारे ३ हजार मुसलमान क्रूरपणे जाळून मारण्यात आले. सुमारे १ हजार मुस्लिम बेपत्ता झाले. १ लाख मुस्लिमांना घरे दारे सोडून पळून जावे लागले. या दंगलीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. आरएसएस ही ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना आहे. या दंगलीची चौकशी होऊ नये, म्हणून आरएसएसचे लोक अजूनही प्रयत्नशील आहेतच.

    २०१३ : मुझप्परनगर दंगल?

    ReplyDelete
    Replies
    1. अजुन किती दिवस असेच बरळत राहणार की सर्व काही ब्राह्मणांनी केले ? काहीतरी चांगलं प्रबोधनिक लिहित चला नाव काय तर लिहा वाचा आता असे लिहिणार आणि वाचणार असेल तर काय डोंबल प्रबोधन होणार ? कोणीही उठ्तो आणि काहीही बडबडत सुटतो.ठिक आहे पुर्वीच्या ब्राह्मनांनी काही अतिरेक केला असेलही पण आता काय शिल्लक आहे का त्यातले ?

      Delete
    2. या ब्राह्मणांवर कायदेशीर कारवाई व्हावी!

      इतिहास काळी ब्राह्मणांनी चुका केल्या असतीलही, पण त्याची शिक्षा आताच्या ब्राह्मण समाजाला का देता? असा प्रश्न ब्राह्मणच नव्हे तर अनेक बहुजनही उपस्थित करीत असतात. हा युक्तिवाद अत्यंत लंगडा आणि दिशाभूल करणारा आहे. भूत-भविष्य-वर्तमान अशा कोणत्याही काळातील ब्राह्मण माणू आणि ब्राह्मण समाज हा एकाच जातीय विचाराने काम करीत असतो. इतिहास काळापेक्षाही सध्याचा ब्राह्मण समाज मनाने किडलेला आणि नासलेला आहे. आपल्या जातीचा अभिमान आणि इतर जातींविषयी पराकोटीचा द्वेष असे एकमेव सूत्र घेऊन हा समाज जगत आला आहे, आजही जगत आहे. फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापरही ही जमात याच सूत्राच्या आधारे करीत आहे.
      महाराष्ट्रातील ब्राह्मण फेसबुकवर आपण सगळे ब्राह्मण या नावाने एक क्लोज्ड ग्रुप चालवतात. या ग्रुपवर केवळ ब्राह्मणांनाच सदस्य करून घेतले जाते. महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले विचारवंत, पत्रकार, लेखक मंडळी या ग्रुपचे सदस्य आहेत. जुन २०१२ च्या मध्यापर्यंत या ग्रुपची सदस्य संख्या १२,८०० च्या वर पोहोचलेली आहे. हा ग्रुप इतर जातींच्या विरोधात सातत्याने कटकारस्थाने करीत आहे. ही कारस्थाने गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. ब्राह्मणेतर जातीतील महापुरुषांबद्दल अत्यंत गलिच्छ प्रचार येथे केला जातो.

      या ग्रुपवरील कारवाया अशा आहेत की, ब्राह्मण ही जात जगातील सर्वाधिक जात्यंध जात आहे, हे याची खात्री पटल्यावाचून राहत नाही. ६ महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून मी या ग्रुपच्या कारवायांवर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या सर्व कारवायांवर लिहायचे म्हटले तर हजारो पाने लिहावे लागतील.

      बहुजनांविरोधात गुन्हेगारी कारवाया

      एक स्पष्टिकरण देते. क्लोज्ड ग्रुप चालविणे गुन्हा नाही. परंतु, अशा ग्रुपवरून विखारी जातीयवादाचा प्रसार करणे नक्कीच गुन्हा आहे. बहुजन समाजातील नेत्यांचे, महापुरुषांचे चारित्र्यहनन करणे, फेसबुकवरील महापुरुषांच्या नावे उघडण्यात आलेले पेजेस बंद पाडण्यासाठी त्यांच्या विरुद्ध सामुहिक ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, बहुजन समाजाच्या हितासाठी लिखाण करणा-या लोकांची फेसबुक खाती बंद पाडण्यासाठी सामुहित ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया हा ग्रुप करीत आहे. अनेक लोकांची फेसबुक खाती यांनी बंद पाडली आहेत.

      Delete
  3. छ. शिवाजी महाराज हिंदू होते काय?
    छ. शिवाजी महाराज हे हिंदू होते, इतकेच नव्हे तर ते गो-ब्राम्हण प्रतिपालक होते असा दांडगा प्रचार कांही हितसंबंधी लोक गेली १००-१२५ वर्षे नेटाने करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पोवाडे लिहिले, कथा-कादंबर्‍या-नाटके लिहिली, सिनेमे काढले. आता ते अधिकचा प्रचार टी.व्ही. वरून आणि इंटरनेटवरूनही करत आहेत.

    पण विचार करण्यासारखी बाब ही आहे की छ. शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदू नावचा धर्म अस्तित्वात होता काय? तसा तो आजही अस्तित्वात नाही, पण आज निदान बरेच लोक स्वत:ला हिंदू समजतात. शिवकालातील लोक स्वत:ला हिंदू समजत होते अस कसलाही पुरावा नाही. धर्म या अर्थाने त्यावेळी कोठेही हिंदू शब्द वापरला गेलेला नाही.

    ब्रम्ह हत्या हे 'हिंदू' धर्मात सगळ्यात मोठे पाप आहे
    त्या काळात शैव धर्म, वारकरी धर्म, सनातन धर्म/वर्णाश्रम धर्म, इस्लाम धर्म हे दख्खनेतील मुख्य धर्म होते. छ. शिवाजी महाराज हे धर्माने शैव होते. तसेच त्यांची वारकरी धर्माशीही चांगलीच जवळीक होती. शैव व वारकरी हे दोन्ही समतावादी धर्म. छ. शिवाजी महाराजांना हिंदू ठरवणार्‍या मेंदूंना ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. पण हे मेंदू गोबेल्सच्या मेंदूशी स्पर्धा करणारे असल्याने ते महाराजांना हिंदू या नावाच्या बुरख्याखाली विषमतावादी सनातन वर्णाश्रम धर्माच्या चौकटीत बसवून त्यांना गो-ब्राम्हण प्रतिपालक ठरवत असतात तसा प्रचार करत असतात.महाराजांना कट्टर हिंदू ठरवतात. ’हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ अशा प्रकारची पुस्तके लिहून घेतली जातात. पण महाराज हिंदू नव्हते हे पुढील गोष्टींवरुन सहज दिसून येते:

    १. महाराजांनी शुद्र आणि अतिशुद्रांच्या हाती शस्त्रे दिली.
    २. महाराजांनी स्वत:चे आरमार उभे केले, व स्वत: समुद्री मोहिमांमध्ये भाग घेतला.
    ३. महाराजांनी जिजाऊला शहाजी राजांचा मृत्युनंतर सती जावू दिले नाही.
    ४. महाराजांनी अनेक ब्रम्हहत्या केल्या. ('हिदू' धर्मात हे फार मोठे पाप आहे. )
    ५. महाराजांनी म्लेंछ लोकांशी मैत्री केली, आपल्या सैन्यात मुस्लीमांना मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला.
    ६. महाराजांनी नेताजी पालकर व इस्लाम स्वीकरलेल्या इतर अनेकांना शैव धर्मात परत आणले. ('हिदू' धर्मात शुद्धी करणाचा अधिकार फक्त ब्राम्हनांनाच आहे. )
    ७. महाराजांनी आपल्या दुसर्‍या राज्याभिषेकाच्या वेळी एक दलीत स्त्रीशी लग्न केले.
    (य़ा विषयावरील माझा सविस्तर इंग्रजी लेख ’हाऊ शिवाजी डिमॉलिशड मनुस्मृती’ वाचावा: http://maratha-history.blogspot.com/... )

    वरील सगळ्या गोष्टी सरळ-सरळ हिंदू धर्माच्या विरोधात जातात. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांना हिंदू ठरवणे हे केवळ चुकीचे आहे.

    ReplyDelete
  4. मस्त लेख लिहिला आहे पाटील साहेब असेच प्रबोधन करत रहा सदैव..तरच बहुजन मुक्ती संभव आहे
    खेडेकर साहेबांना मानाचा मुजरा.....मराठा संघटनांचे आधारस्थंभ

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. शिवरायांची एकंदर २२ अस्सल पत्रे उपलब्ध आहेत त्यापैकी ८ पत्रे ब्राह्मणांना इनाम देणारी आहेत .उर्वरितपैकी ५ पत्रांमध्ये समर्थ रामदासांचा उल्लेख आहे या व्यतिरिक्त ६ पत्रे दादोजी कोंडदेवाचा न्यायाबद्दल गौरवपूर्ण उदगार काढणारी आहेत हि अस्सल पत्रे कोठे उपलब्ध होतील याची माहिती पुणे भारत इतिहास संशोधन मंडळ मध्ये मिळू शिवछत्रपतींची पत्रे पुस्तक अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिले असून त्यात पत्रांच्या फोटोप्रती आहेत मोरेश्वर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रात "महाराज गोब्राह्मणांचे प्रतिपालक आहेत असा उल्लेख आहे
    छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिलेला असून त्यात दहाव्या नंबरचा श्लोक आहे "येन क्षोणीतले कलाविकले बुधावताराम गते /गोपाले खिल वर्णधर्म निचये म्लेंचे :सामासाहिते /
    भुयस्तसतत्परीपालनाय साकिलानेत्वा सुरेद्वेशीन:/स्वे स्वे वर्णपथ विहिता विप्रदिवर्न:क्रमात /"याचा अर्थ खालील प्रमाणे
    ज्याप्रमाणे कलियुगाच्या सुरुवातीस गोपालाने बुद्धावतार घेतला त्याप्रमाणे म्लेछानी हिंसेने जात व धर्म नष्ट केला तेव्हा शिवाजीने गाईब्राह्मनाचा प्रतिपाळ करण्यासाठी ईश्वराच्या शत्रूंचा नाश केला

    ReplyDelete
  7. कुळवाडी भूषण असे ज्योतिबा फुले यांनी स्वतःला आपल्या शिवाजी महाराजांवरील पोवाड्यात म्हंटले आहे कुळवाडी भूषण गातो पवाडा शिवाजीचा असे म्हंटले आहे कोणीही पोवाडाच काय साधा अभंग तयार करताना स्वतचे नाव घालतो E.G तुका म्हणे,एका जनार्दनी इ म शासनाने फुले समग्र वैन्ग्मय प्रसिद्ध केले आहे त्यातील काही उतारे म फुले समग्र वांग्मय पान न ५१
    "अफजलखान शूर पठाण आला वाईस /शोभला मोठ्या फौजेस /
    कारकुनाला वचनी दिले हिवरे बक्षीस /फितविले लोभी ब्राह्मणास
    गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास /चुकला नाही संकेतास
    माते पाई डोई ठेवी ,लपवी हत्यारास /बरोबर आला बेतास
    समीप येता शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास/कमी करी आपल्या चालीस
    वर भेटभाव वाघनख मारी पोटास /भयभीत केले पठाणास
    पोटी जखम सोसी केला वार शिवाजीस /झोंबती एकमेकास
    हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस /पठाण मुकला प्राणास
    ज्योतिबा फुले म्हणतात राजेंनी अफजलचा वकील(गोपीनाथ बोकील ) फितूर करून घेतला अफजलला एकट्याला बोलविले त्याला पाहून राजे वाघाला घाबरतात तसे घाबरले त्यास बोलावून कपटाने त्याचा खून केला वास्तविक असा आरोप तर मुस्लिम इतिहासकारांनी सुद्धा केलेला नाही जेव्हा अफजलने प्रथम वार केला तेव्हा राजे चिलखत असल्याने वाचले व स्वतःच्या रक्षणासाठी बिचवा मारला
    फुले समग्र वांग्मय पान न ५७ २ मोहमद झाला जवामर्द खरा /त्यागिले संसारा /सत्यासाठी
    खोटा धर्म सोडा सांगे जगताला /जन्म घालविला /इशापाई
    जगहितासाठी लिहिले कुराण /हिमतीचा राणा /जगी वीर
    फुले समग्र वांग्मय पान न ५५६
    जगाचा पालक निर्मिक अनादी /सर्व काळ बंदी /निके सत्य /"भोळा वारकरी त्यास दिली हूल /स्मरणात फळ आहे म्हणे /
    क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास /गाठी शिवाजीस /मतलबी /
    दादू कोंडदेव त्या टेवी अविदद्वान /करवी तुलादान /ऐदी भटा /
    स्वजातीहीतासाठी बोधिले पाखांड /धर्मलंड खरे ज्योती म्हणे / महात्मा फुले समग्र वागमय पान न ७०१
    "शिवाजीने ज्या ज्या लढाया केल्या त्या त्या लढायामध्ये आमचे नुकसान झाले आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर आम्हास सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभाव होता परंतु काही झाले नाही का आपल्या स्थितीमध्ये फरक पडला नाही याचे काहीतरी कारण असावे आपल्याच इतिहासावरून कळून येते कि शिवाजी आपण आपल्या राजा होण्याचे कारण फक्त "गो ब्राम्हाणाचे रक्षण करण्या करिताच "असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे "गो ब्राम्हाणाचे रक्षण करीत होता असे उघड दिसते " मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते त्यापेक्षा दुःसह स्तिथी मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही"

    ReplyDelete
    Replies
    1. मराठेशाही मध्ये मराठ्यांचे शत्रुंची सख्या जास्त होती त्यामुळे नक्की तो काळ असा होता की सर्वांना दुख भोगावे लागले असणार...पण त्या दुखामुळे आज किती तरी पिढ्या सुखाने राहत अहेत...आहे असे निवांत मुस्लिम राज्याशाहीत राहत असते तर काय परिस्थिती असती बहुजनांनी [ब्राह्मणांचे काय सोडून द्या त्यांना कोणीही राज्यकर्ता चालतो हुजरेगिरी करायला.]

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.