इतिहासामध्ये रामदासांचे महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत.एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे "महात्म्य" प्रसिद्ध केले जाते,त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत.गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत.त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत.या रामदासी कथांबद्दल लिहिताना "न.र.फ़ाटक" यांनी आपल्या "रामदास व शिवाजी" या लेखात लिहिले आहे की "रामदासी चमत्काराच्या ज्या दुसर्या कथा आहेत, त्या पुर्वीच्या व नंतरच्या साधु संतांच्या चमत्काराशी जुळणार्या आहेत, इतकेच नव्हे तर काही कथा इतर साधू संतांच्या चरित्रातून घेऊन रामदासाच्या चरित्रात भरल्या आहेत की काय असा संशय येतो.आपल्या गुरु च्या जीवनकथेत कसलीही उणीव राहू नये व दुसरा कोणताही संत कोणत्याही बाजूने आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ दिसू नये, असा संकल्प करून सांप्रदायिक लोक रामदासाची चरित्रे लिहावयास बसल्यानंतर चमत्काराचा तुटवडा कसा उत्पन्न होणार ? उदा.सरस्वती गंगाधरचे गुरुचरित्र आणि रामदासाचे चरित्र ही एकमेकांशी ताडून पाहिल्यास वरील विधानाची सत्यता अंतरंगात ठसेल.",न.र.फ़ाटक यांनी यापुढे अनेक उदाहरणे देऊन हे विधान स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी विरक्त होऊन एकदा आपल्या तथाकथित गुरुच्या म्हणजे रामदासाच्या झोळीत आपले राज्य अर्पण केल्याचा कागद टाकून दिला आणी रामदासाने तो कागद शिवरायांना परत देऊन मला गोसाव्याला राज्य काय करावयाचे आहे.तुज राज्य चालव फ़क्त माझ्या स्वामित्वाची खूण म्हणून आपल्या राज्याचे निशाण भगवे कर म्हणजे झाले असे सांगितले.अशी कथा जी सांगितली जाते ती वरील मसाल्याचीच आहे.या कथेलाही ऐतिहासिक आधार नाही.न.र. फ़ाटक लिहितात की,"शत्रुला जिंकून राज्य अर्पण करण्याची कल्पना अतिशय प्राचिन काळापासून हिंदू वाड्मयात प्रचलित आहे.युधिष्ठिरने कौरवांच्या पराभवानंतर राज्य ब्राह्मणाला समर्पिल्याचे वर्णन महाभारतात आहे.वसिष्ठ ला रामचंद्रांनी राज्य दिल्याची कथा आहे.रजपुतांच्या इतिहासात" अशी उदाहरणे सापडतात.गोपीचंदाचा राज्यत्याग हा या कथापरंपरेतीलच एक दुवा आहे." शिवाय थोडीशी मिळालेली जहागीर ज्याला सोडून देता आली नाही,त्याने मिळालेले राज्य परत केले असे म्हणजे हा निव्वळ ढोंग आहे.
छत्रपती शिवरायांचे भगवे निशाण पाहून रामदासाच्या झोळीत राज्यार्पण करण्याची इच्छा रामदासाच्या भक्तांना झालेली दिसते.रामदास साधूपुरुष होते तेंव्हा सन्याश्याच्या भगव्या वस्त्राची जोड शिवरायांच्या भगव्या निशाणाशी घालून दिली की ठिक जमेल असे समजून ही कथा रामदासाच्या चरित्रात घुसडलेली दिसते.पण या चरित्रकारांनी जात विचार केलेला दिसत नाही.कारण रामदास हे संन्याशी नसल्याने ते इतर सन्यांश्यांसारखे भगवे वस्त्र न वापरता विटकरी रंगाचे वस्त्र वापरत होते जिथे स्वत:चे वस्त्रच भगवे नव्हते तिथे शिवरायांच्या झेंड्याला भगवे वस्त्र कोठून देणार ?.
बर्याच इतिहासकारांनी भेगवा झेंडा या विषयावर प्रकाश टाकलेला आहे.भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून असून तो शहाजीराजांनी सुरु केलेला आहे.हे मत कोणत्याही भटोबाला किंवा रामदासी भक्ताला खोडता आलेले नाही."रामदास आणि शिवरायांची भेट झालीच नाही असे बर्याच इतिहासकारांचे म्हणने आहे.तरीही थोडा वेळ मानले की शिवराय आणि रामदासांची भेट झाली तर ती १६७६ मध्येच.त्यावेळी शिवराज्याभिषेक होऊन दोन वर्षे झाली होती व त्याआधीच भगवा सर्वत्र फ़डकत होता.यावरून भगव्या झेंड्याचा संबंध रामदास स्वामींशी लावण्यात अडचण येत आहे." बरे रामदासांच्या सांगण्यावरून भगवा झेंडा शिवरायांनी घेतला असे मानल्यास पुर्वी राज्य कमविताना निशाण कोणते होते याचाही उल्लेख कोठे आढळत नाही, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.
"छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे पराक्रमी होते.पाच पातशाहीत त्यांनी सन्मानामे नोकरी केली.मोठमोठ्या लढाया मारल्या.कर्नाटकात फ़ार मोठा मुलुख जिंकला व तंजावरचा पाया घातला.आपला अंमल जाहीर करण्याला व सैन्याच्या हालचालीला निशाणीची म्हणजे झेंड्याची गरज असते.त्यासाठी शहाजीराजांनी आपले निशाण भगवे केले."शेडगांवकरांच्या बखरीच्या छापिल पुस्तकात १३ व्या पानावर पुढील मजकूर आहे.दुसरी लढाई जाधवराव वजीर व राजे यांची जाहली नंतर शहाजीराजे हे कोथळा पर्वत चढोन शिखरावर फ़ौजेसुदा राजघाटाने चढून गेले,त्या दिवसापासून राजघाट असे अद्याप म्हणत आहेत.श्रीशंभु महादेव यांचे दर्शन करून शंभुचे भगवे वस्त्र प्रासादिक ते आम्हांस वंद्य हे जाणुन शहाजीराजे यांना त्याचक्षणी आपली लष्कराची ढाल भगवी व हत्तीवरील निशाण व घोड्यावरील डंका निशाण भगवे." त्याच दिवसापासुन तीच चाल आजपावेतो चालत आहे.परंतू पुर्वीचे मुळ ठिकाण उदेपुरास निशाण पाच रंगाचे तिकडे आहे हे सुर्यवंशी राणाजी म्हणोन तेच निशाण पुर्वीचे आहे.शहाजीराजे यांनी शंभुचे ठिकाणी तळीचे ठिकाणी तळ्याचे चिरेबंदी ताल बांधावयाचे काम सुरु केले.नंतर तेथुनच कुच दरकुच करून विजापुरास लढाई करीत करीत गेले.शके १५४८ क्षयनाम सवतसरे फ़सली सन १०३६ या साली तेथे जाऊन सुलतान महमदशहा पातशहा याची व शहाजीराजे या उभयतांचे भेटीचा समारंभ जाहला."
"शेडगांवकरांच्या बखरीतील काही गोष्टी चुकीच्या ठरतील.कालाची संगती त्यात कोठे कोठे बरोबर रहिलेली नाही.बखर लिहिणार्यास गोष्टी जशाजशा आठवल्या तसतशा त्याने त्या लिहिल्या आहेत.तथापि शेडगांवकरांचा राजघराण्याशी निकट संबंध होता. व निशाण बदलण्याची गोष्ट सर्व घराण्यांत घडून आल्याने तिची माहीती कर्णोपकर्णी सर्व भोसल्यांना असलीच पाहिजे.आपले निशाण पुर्वी कसले होते आणि ते पुढे काय कारणाने केंव्हा बदलले ही माहीती बापापासून मुलाला व आजापासून नातवाला मिळणे साहजीकच आहे.मुळचे निशाण उदेपुरचे पाचरंगी होते.पण शंभुप्रसादानंतर ते भगव्या रंगाचे शहाजीने केले असेही ही बखर सांगते."
शहाजी राजांना शंभु महादेवाची भक्ती विशेष होती असे दिसते.म्हणूनच त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव शंभु ठेविले.यापुर्वी या घराण्यात शंभु हे नाव आढळत नाही.दुसरा पुत्र शिवाजी यांचेही नाव शिव हे शंभुमहादेवाचेच आहे. नामदार भास्करराव जाधव यांनी शहाजीराजांनी हे भगवे निशाण स्वीकारले तो प्रसंग किती आणीबाणीचा होता ते वर्णन करून संकटकाली कुलस्वामीचा प्रसाद म्हणूनच भगव्या निशाणाची उत्पत्ती झाली असे लिहिले आहे.पुढे ते लिहितात की "विजापुरच्या अदिलशहाची भेट सन १६२६ मध्ये झाली असे का.स.प.या. पान.४१० यावरून उघड होते. यापुर्वी थोडेच दिवस भगवे निशाण शहाजी राजांनी सुरु केले होते.म्हणून शहाजींच्या पुणे व सुपे जहागिरीत हे निशाण शिवजन्माच्या अगोदरच फ़डकू लागले होते.शिवाजी राजांस बालपणापासूनच भगव्याचा अभिमान वाटत होता व त्याच निशाणाखाली लढून त्यांनी व त्यांच्या सरदारांनी हिंदुपदपातशाही स्थापना केली."
"राज्याभिषेक करूण घेतांना छत्र,चामर,सुर्यपान,सिंहासन वगैरे राजचिन्हे धारण करावी लागली.त्यावेळी छत्रपतींच्या उच्च दर्जास साजेल असा जरीपटकाही स्वीकारला.पण भगवे निशाण हे आपल्या कुलस्वामींच्या स्मरणार्थ आहे व तय त्या कुलस्वामींच्या प्रसादाच्या दिवसापासून आपल्या घराण्याचा खरा उदय झाला ही गोष्ट स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाही चालू ठेवला.सध्या मोठया समारंभाच्या वेळी जरीपटका भगव्या झेंड्याबरोबरच मिरवण्यात येतो.कायम सतत फ़डकणारे निशाण भगवा झेंडाच आहे."
"तंजावरसही मुळापासून भगवा झेंडाच फ़डकतो ही गोष्ट विशेष विचार करण्यासारखीच आहे.भगवा रामदासांच्या आज्ञेने शिवछत्रपतींनी सुरु केला असता तर तो तंजावत मध्ये फ़डकणे संभवनीय नाही.तंजावर शिवरायांच्या अंमलात केंव्हाही नव्हते, व व्यंकोजीराजे हे आपल्या वडील भावाचा नेहमीच मत्सर करीत.म्हणून त्यांचे निशाण तंजावरास टिकणे शक्य नाही.यावरून भगवे निशाण शिवछत्रपतींनी सुरु केले नसले पाहिजे.बखरीत वर्णिल्याप्रमाणे शहाजी राजांनी आपले निशाण भगवे ठरविले.याच कारणाने त्यांच्या महाराष्ट्रातील व कर्नाटकातील मुलुखात तेच सर्वत्र प्रचारात आले.शिवाजी व व्यंकोजी या शहाजीराजांच्या मुलांनी त्याचा अभिमान धरून तेच पुढे चालविले.यासाठी हा भगवा झेंडा मराठेशाहीचे निशाण म्हणून शहाजीराजांच्या वेळेपासून सर्वत्र दिसून येत आहे."
यावरून शिवरायांच्या राज्यार्पणाची कथा आणि भगवा झेंडा यांच्या संबंधात रामदासांची किंमत काय आहे हे लगेच दिसून येते.
जय जिजाऊ || जय शिवराय
मृत्युंजय हि भगवी ज्वाला झळकत राहो,
ReplyDeleteही संतांची ईश्वरनिष्ठा,
प्राणाहूनही प्रिय धर्म प्रतिष्ठा,
आत्मबलाने सुर्यापरी हा तळपत राहो,
भगवा झेंडा गगनी निर्भय फडकत राहो.
माणुसकीचा हा उद्गाता,
दुर्बल दलितांचा हा त्राता,
समर रुद्र हा अन्यायावर धडकत राहो,
भगवा झेंडा गगनी निर्भय फडकत राहो.
ह्या त्यागाची उज्वल दीक्षा,
चारित्र्याची सत्वपरीक्षा,
घराघरात सुखशांती हा बरसात राहो,
भगवा झेंडा गगनी निर्भय फडकत राहो.
- श्री मंगेश पाडगावकर
भगवा झेंडा प्राण माझा प्राण भगवा झेंडा प्राण
ReplyDeleteजिंदगीची आण माझ्या जिंदगीची आण॥धृ॥
डुलते कशी पहा रायाची स्वारी
खुशीत आला राया डुलतोय भारी
मोतियांचि खाण माझी मोतियांचि खाण ॥१॥
याच्याच छायेखाली हिंन्दुमर्दांनी
गनिम पिटाळिलं पाजुन पाणी
माझ्या अंगी त्राण त्येच माझ्या अंगी त्राण॥२॥
अन्यायाची आता येई शिसारी
घेऊन हातामधी नंग्या समशेरी
करु दाणादाण सारी करु दाणादाण॥३॥
साऱ्या गावामधी वेशीवेशीला
प्रांता प्रांताला अन् साऱ्या देशाला
मांडुन बसला ठाण आता मांडुन बसला ठाण॥४॥
ग्यानबा तुकाराम विठु रखुमाई
याच्यात दिसती मला काशी गंगामाई
गेलं हरपुन भान माझं गेलं हरपुन भान ॥५॥
भगवा झेंडा फडकला ....झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा..झेंडा मराठ्यांचा ..!!
ReplyDeleteखुप छान
Deleteखुप छान .जय शिवराय
Deleteरणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
ReplyDeleteविजयश्रीला श्रीविष्णूपरी भगवा झेंडा एकचि हा ॥ध्रु॥
शिवरायाच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाचि
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई
अधर्म लाथेने तुडवी
धर्माला गगनी चढवी
राम रणांगणी मग दावी ॥१॥
कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्णकारणी क्षणही न कधि धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरि नच फडफडला
जणू जटायू रावणमार्गी उलट रणांगणि हा दिसला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासाश्वासासह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी
मलिन मृत्तिका लव न धरी
नगराजाचा गर्व हरी ॥२॥
मुरारबाजी करि कारंजी पुरंदरावर हृदयाची
सुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयाच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुर्वंडी कन्याप्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामिभक्तिचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे
हे नंदनवन देवाचे
मूर्तिमंत हा हरि नाचे ॥३॥
स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतिव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमामाधवासवे पोचता गगनांतरि जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते या भगव्या झेंड्यावरती
नसून असणे, मरून जगणे राख हो्उनी पालवणे
जिवाभावाच्या जादूच्या या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे
मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नवविश्व उठे ॥४॥
ह्या झेंड्याचे हे आवाहन ’हरहर महादेव’ बोला
उठा हिंदुनो अंधारावर घाव निशाणीचा घाला
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउन पान हलेना हाताने
कलंक असला धुवुन काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात
व्हा राष्ट्राचे राउत
कर्तृत्वाचा द्या हात ॥५॥
रामदास संत नव्हे स्वराज्यातील जंत हूता स्वराज्यद्रोही कुठला रामदास्या
ReplyDeleteमराठा साम्राज्यशी कोणत्याही रामदासाचा संबंध नव्हत भगवा तर आपला आहे रामदासाचा लंगुटा हिरव्या करलचा होता,,,हिरच्या मुल्ला मामू........
ReplyDeleteपोराच्या शिक्षणाला भरायला पैसे नाहीत म्हणुन पोराला 2 म्हशी घेऊन देऊन त्याला शेतात पाठवतात आई बाप..हेच दिवस बघायचे राहीले होते रे मराठ्यांनो........आज मराठ्यांच्या पोरांची शिक्षणाची क्षमता असुन ....डोनेशन च्या भयंकर अत्याचारामुळे मराठ्यांची युवक पिढी घरी बसुन सडतेय ....... कलेक्टर बनन्याची क्षमता असलेल पोरग गुर राखायला जातय .....आरे हे बघुन कस काय वाटत नाही रे आरक्षणाला विरोध करनार्या मराठ्यांनो एवढै कृतघ्न होऊ नका समाजाप्रती जरा आपल्या कर्तव्याची जाण ठेवा ........मराठ्यांची पिढी शिक्षणापासुन वंचित ठेवली जातेय रे एवढ पाहुन पण कस शांत बसता. अन्याय होतैय हे कळन्याईतके अडानी राहु नका .....ऊठा लढा आरक्षणासाठी............जय जिजाऊ जय शिवराय
ReplyDeleteराष्ट्रध्वज......!
ReplyDeleteप्रबोधनकार ठाकरे यानी २०/०८/१९४७ नवशक्ती मध्ये लिहलेले पत्र - (तिरंगा अधिकृत ध्वज ठरल्यानंतर पाच दिवसांनी लिहलेले पत्र ) -
"दहा जुलै ला हिंदू महासभेचे काही नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांताक्रूझ विमानतळावर भेटले, त्यांना दोन भगवे ध्वज भेट दिले, भगवा ध्वजच राष्ट्र ध्वज म्हणून निवडावा, अशी विनंती केली. बाबासाहेब ध्वज समितीत सदस्य होते, बाबासाहेबांनीहि या कल्पनेचा विचार करण्याचे आश्वासन दिले, दिल्लीत येवून भगव्या राष्ट्रध्वजाबाबात समितीला निवेदन द्यावे, असे बाबासाहेबांनी सुचविले होते. प्रत्यक्षात दिल्लीत कुणी गेले नाही. समितीत बाबासाहेबांनी हा विषय मांडला, पण पाठींबा मिळाला नाही.
भगव्याचा आग्रह करणारे दिल्लीत का गेले नाहीत, प्रश्न उपस्थित करत प्रबोधनकारांनी माशी कुठं शिकली, असा प्रश्न विचारला आहे,
भेटण्यास आलेल्या शिष्टमंडळास बाबासाहेब म्हणाले, "आपण थोर - थोर प्रातिनिधिक संस्थांची थोर - थोर मंडळी आहात, हे काम माझ्यासारख्या एका महाराच्या पोरावर सोपवणं हा तुमच्या मनाचा थोरपणा आहे. दिल्लीत मला तुमचे भक्कम पाठबळ लाभले तर हे कार्य मला साधेल."
- संदर्भ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड - १०, पाने १७ ते १९, आभार - सकाळ
संपादन - राज जाधव......!